WIDOW PENSION SCHEME 2024 IN MARATHI | महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२४

WIDOW PENSION SCHEME 2024 IN MARATHI | महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२४, विधवा महिलांच्या आर्थिक सबलीकरण यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने राबवलेले संपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत विधवा महिलांना दरमहा एक विशिष्ट रक्कम देण्यात येईल. जेणेकरून महिला त्यांच्या दैनंदिन गरजा भागवू शकते आणि आर्थिक मदतीसाठी त्यांना कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.

Indira Gandhi National widow pension scheme, महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून महाराष्ट्र विधवा पेंशन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील विधवा महिलांना आर्थिक सहाय्य मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

महाराष्ट्र सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे विधवा महिलांचे जीवनमान उंचावेल, त्या आत्मनिर्भर होतील, समाजातील त्यांचा आत्मसन्मान वाढेल तसेच दैनंदिन गरजांसाठी कोणापुढेही मदतीसाठी हात पसरवावे लागणार नाही हे हेतू या योजनेमुळे पूर्ण होतील.

WIDOW PENSION SCHEME 2024 IN MARATHI | महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२४ योजनेअंतर्गत विधवा महिलांना दरमहा 600 रुपये मिळतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी विधवा महिलेला महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच महिलेचे वय 40 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे. त्याचप्रमाणे विधवा महिला सरकारकडून कोणतेही अतिरिक्त पेन्शन किंवा उत्पन्न घेत नसावे.

योजनेसाठी अर्ज केल्यानंतर सर्व कागदपत्रांची छाननी होते. आणि त्यानंतर महिलेला मिळणारी पेन्शन ची रक्कम थेट बँक खात्यात जमा होते. विधवा महिलांना महाराष्ट्र सरकारकडून मिळणारी ही एक महत्त्वपूर्ण आर्थिक मदत आहे. दारिद्र्य रेषेखालील विधवा महिला ज्या आपला उदरनिर्वाह करू शकत नाही अशा महिलांना आर्थिक मदत पुरविणे , विधवा महिलांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत देणे, विधवा महिलांना आत्मनिर्भर बनवणे, विधवा महिलांचा समाजातील मान सन्मान वाढवणे, विधवा महिलांना देखील इतर महिलांप्रमाणे समाजात मानाने वावरण्यासाठी प्रोत्साहन देणे, विधवा महिलांना सन्मानाने आणि सुरक्षित जीवन जगण्यासाठी सक्षम बनवणे. हा या योजनेचा मुख्य हेतू आहे .

महाराष्ट्र सरकार कडून मिळणाऱ्या या आर्थिक मदतीमुळे विधवा महिला इतर महिलांप्रमाणे समाजात मानाने वावरू शकतील . त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक प्रेरणा मिळेल . समाजातील स्वावलंबी महिला म्हणून समाज त्यांच्या कडे बघेल. तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना त्यांना कोणाकडेही आर्थिक मदती साठी हात पसरावे लागणार नाही .त्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेवू शकतीलआणि एक आत्मा निर्भर स्त्री म्हणून त्या समाजात वावरतील .

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना या लेखात आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. योजनेसाठी काय पात्रता व अटी आहेत हे बघणार आहोत योजनेसाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रांची गरज लागते हे बघणार आहोत. योजनेचा फायदा कोण कोण घेऊ शकतो याची सविस्तर माहिती बघणार आहोत.

Table of Contents

WIDOW PENSION SCHEME 2024 IN MARATHI | महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२४

WIDOW PENSION SCHEME 2024 IN MARATHI

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचा उद्देश:

1) दारिद्र्य रेषेखालील विधवा महिला ज्या आपला उदरनिर्वाह करू शकत नाही अशा महिलांना आर्थिक मदत पुरवणे.

2) विधवा महिलांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत देणे.

3) विधवा महिलांना आत्मनिर्भर बनवणे.

4) विधवा महिलांचा समाजातील मान सन्मान वाढवणे.

5) विधवा महिलांना देखील इतर महिलांप्रमाणे समाजात मानाने वावरण्यासाठी प्रोत्साहन देणे.

6) विधवा महिलांना सन्मानाने आणि सुरक्षित जीवन जगण्यासाठी सक्षम बनवणे.

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचे फायदे:

1) महाराष्ट्रातील विधवा महिलांना दर महा 600 रुपये इतके आर्थिक सहाय्य मिळेल.

2) या आर्थिक मदतीमुळे विधवा महिलांना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल.

3) या योजनेअंतर्गत विधवा महिलांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे त्यांना सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.

4) आर्थिक मदतीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचे कमी होईल.

5) या आर्थिक मदतीमुळे विधवा महिला स्वावलंबी होतील.

6) महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे विधवा महिलांचे जीवनमान उंचावेल.

WIDOW PENSION SCHEME 2024 IN MARATHI

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी पात्रता:

1) अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.

2) अर्जदार महिला विधवा असणे आवश्यक आहे.

3) अर्जदार विधवा महिलेचे वय 40 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे.

4) अर्जदार विधवा महिला बीपीएल म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील कार्ड असणे आवश्यक आहे.

5) अर्जदार विधवा महिलेचे वार्षिक उत्पन्न हे महाराष्ट्र सरकारने सांगितलेल्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे.

6) अर्जदार विधवा महिला सरकारकडून कोणतेही पेन्शन किंवा आर्थिक मदत घेत नसावे.

7) अर्जदार विधवा महिला कोणत्याही सरकारी किंवा खाजगी संस्थेत नोकरीला नसावे.

8) अर्जदार हा करदाता नसावा.

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड

मतदान ओळखपत्र

उत्पन्नाचा दाखला

वयाचा दाखला देणारे प्रमाणपत्र

बँक खाते पासबुक

पासपोर्ट आकाराचा फोटो

मोबाईल नंबर

जातीचे प्रमाणपत्र

पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया:

१) महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:

1) महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ऑफिशिअल वेबसाईट ला भेट द्या.

2) महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना ऑनलाइन अर्ज या लिंक वर क्लिक करा.

3) तुम्ही पहिल्यांदाच लॉगिन करत असाल तर तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकून वेबसाईटवर नाव नोंदणी करा.

4) तुम्ही या आधीच नाव नोंदणी केले असेल तर तुमचे नाव आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

5) अर्जात विचारलेली सर्व माहिती वाचून व्यवस्थित भरा.

6) अर्जासोबत सांगितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. ( जसे की ओळख प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, बीपीएल कार्ड, वयाचा पुरावा, पतीचा मृत्यू प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, आणि तुमच्या बँक खात्याचे तपशील इत्यादी )

7) अर्जात सर्व माहिती भरल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्र अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करा. अशा प्रकारे महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होते.

8) फॉर्म सबमिट केल्यानंतर संबंधित अधिकारी आलेल्या अर्जाची व कागदपत्रांची छाननी करतील.

9) अर्ज मंजूर झाल्यानंतर विधवा महिलेला मिळणारे निवृत्तीवेतन दिलेल्या बँक खात्यात जमा होते.

२) महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया:

1) तुमच्या जवळील ग्रामपंचायत किंवा समाज कल्याण कार्यालयाला भेट द्या. आणि महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज मागवा.

2) फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती, बँक खात्याचा तपशील तसेच संपर्क माहिती व्यवस्थित भरा.

3) फॉर्म मध्ये सांगितलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रांची जोडणी करा.

4) व्यवस्थित भरलेला फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रांची जोडणी केल्यानंतर फॉर्म जमा करा. तुम्हाला अर्जाची पोच पावती मिळेल. अशा प्रकारे महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होते.

5) अर्ज जमा केल्यानंतर अर्जाची आणि कागदपत्रांची योग्य ती पडताळणी केली जाईल.

6) अर्ज मंजूर झाल्यानंतर विधवा महिलेला मिळणारे निवृत्तीवेतन दिलेल्या बँक खात्यात जमा होईल.

निष्कर्ष:

WIDOW PENSION SCHEME 2024 IN MARATHI | महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२४ या लेखात आपण महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेबद्दल सविस्तर माहिती बघितली. योजनेसाठी असणाऱ्या पात्रता व अटी कोणत्या आहेत, तसेच योजनेचे काय फायदे आहेत, योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो, तसेच योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे आहे, आणि महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचा अर्ज करताना कोणत्या आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता आहे. हे बघितलं. शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, मुलींसाठी केंद्र सरकारच्या व महाराष्ट्र सरकारच्या अनेक योजना आहेत अशा सर्व योजनांबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला आवश्य भेट द्या. अशी महत्व पूर्ण माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लेख जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.

FAQ:WIDOW PENSION SCHEME 2024 IN MARATHI | महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२४

1) महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना आणि Indira Gandhi National widow pension scheme या दोन्ही सारख्याच योजना आहेत का?

ans: होय,महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना आणि Indira Gandhi National widow pension scheme या दोन्ही सारख्याच योजना आहेत.

2) महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचा उद्देश काय आहे?

ans: दारिद्र्य रेषेखालील विधवा महिलांना आर्थिक सहाय्य मिळवून देणे हा महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचा उद्देश आहे.

3) महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी वयाची अट काय आहे?

ans: महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी विधवा महिलेचे वय 40 ते 65 वर्षे या वयोगटातील असावे.

4) महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे का?

ans: होय महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.

5) महाराष्ट्र विधवा पेन्शन योजने अंतर्गत किती निवृत्ती वेतन मिळते?

ans: महाराष्ट्र विधान पेन्शन योजनेअंतर्गत दरमहा 600 रुपये इतके निवृत्ती वेतन मिळते.

6) महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करावा?

ans: महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.

7) महाराष्ट्र विधवा पेन्शन योजने च्या अर्जासाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतात?

ans: महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेच्या अर्जासाठी खालील आवश्यक कागदपत्रे लागतात: आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला देणारे प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक,पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल नंबर, जातीचे प्रमाणपत्र, पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र इत्यादी.

हेही वाचा

राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/

अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/

लखपती दीदी योजना https://marathisampada.com/lakhpati-didi-yojana-2024/

प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/

सुकन्या समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/sukanya-samriddhi-yojana-2024-in-marathi/

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग https://marathisampada.com/pmfme-scheme-2024-in-marathi/

नमो ड्रोन दीदी योजना https://marathisampada.com/namo-drone-didi-yojana-in-marathi/

महिला समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/mahila-samriddhi-yojana-2024-in-marath/

जननी सुरक्षा योजना २०२४ https://marathisampada.com/janani-suraksha-yojana-2024-in-marathi/

माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ https://marathisampada.com/mazi-kanya-bhagyashree-yojana-2024-in-marathi/

प्रधान मंत्री मातृ वंदना योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-matru-vandana-yojana-2024-in-marathi/

लेक लाडकी योजना २०२४ https://marathisampada.com/lek-ladki-yojana-2024-in-marathi/