Wedding Anniversary Wishes In Marathi | लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश या लेखात आपण आपल्या प्रिय पत्नीला किवा पतीला , नातेवाईकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही सुंदर सुंदर शुभेच्छा संदेश बघणार आहोत . लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्वाचा सोहळा असतो . त्यानंतर लग्नाचा वाढदिवस देखील पती पत्नी साठी खूप महत्वाचा असतो. त्या दिवशी एकमेकांना गिफ्ट तर दिले जातातच , पण मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी शुभेच्छा संदेश देखील दिले जातात . असेच काही Wedding Anniversary Wishes In Marathi | लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश आपण या लेखात बघणार आहोत , यातील शुभेच्छा संदेश आपल्या प्रियजनांना पाठवा आणि तुमच्या मनातील भावना व्यक्त करा .
जीवन जगण्याचा ध्यास तू,
माझ्या शरीरातील श्वास तू ,
माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग तू ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको !
देव करो असाच येत राहो,
तुमच्या लग्नाचा वाढदिवस ,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश ,
असंच सुगंधित रहाव हे आयुष्य ,
जसा प्रत्येक दिवस असो सण खास .
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई बाबांना आणि मित्र मैत्रीणीना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश द्यायचेत मग हेही बघा
आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश https://marathisampada.com/birthday-wishes-for-mother-in-marathi/
बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश https://marathisampada.com/birthday-wishes-for-father-in-marathi/
मित्र मैत्रिणींसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश https://marathisampada.com/birthday-wishes-for-friends-in-marathi/
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे !!!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
देवाचे अनेक आभार त्याने आम्हाला जगातील सर्वात ज्ञानी ,
प्रेमळ आणि समजून घेणारे पालक दिले …!
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो ,
तुम्हाला भरभरून यश मिळो ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासुन हार्दिक शुभेच्छा !
Wedding Anniversary Wishes In Marathi | लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
तुम्ही माझ्या आयुष्यात आणलेल्या सर्व प्रेम
आणि आनंदाबद्दल मी कृतज्ञ आहे ,
धन्यवाद !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्यातील अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नाती जन्मोजन्मीची ,
परमेश्वराने जोडलेली ,
दोन जिवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगद बांधलेली !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमचं जीवन सार आनंदाने , प्रेमाने
आणि संपन्नतेने भरभरून जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो ,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो ,
प्रार्थना आहे देवापाशी कि ,
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
चांगल्या लोकांचे चांगले क्षण ,
चांगल्या लोकांचा चांगला सहवास
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
ओळखीचे रुपांतर मैत्रीत ,
मैत्रीचे रुपांतर प्रेमात ,आणि
प्रेमाचे रुपांतर आयुष्यभराच्या बंधनात झालं ,
होतो जरी शरीराने वेगवेगळे ,
पण कधी एक जीव झालो हे समजलेच नाही !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
एक स्वप्न तुम्हा दोघांचे ,
प्रत्यक्षात आले,
आज वर्षभराने आठवताना मन
माझे आनंदाने भरून आले ,
दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न , संसार आणि जबाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार आपला ….
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
समर्पणाच दुसरा नाव आहे तुमचं नात
विश्वासाची गाथा आहे तुमचं नात
प्रेमच उत्तम उदाहरण आहे तुमचं नात ….
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुम्हा दोघांची सर्व स्वप्न साकार व्हावी हीच आमची इच्छा ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Wedding Anniversary Wishes In Marathi | लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमचे वैवाहिक जीवन सुंदर फुलासारखे असेच फुलात राहो हीच सदिच्छा .
लग्नाच्या या वाढदिवशी प्रार्थना आहे आमची ,
चंद्र तारया एवढी सोबत असो तुमची ….!
तुझे प्रेम माझ्या हृदयात जपून ठेवलेला खजिना आहे ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
मनाच्या शिंपल्यात जपावा आठवणींचा मोती ,
अशीच फुलात राहो सात जन्माची नाती …
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
जशी बागेत दिसतात फुलं छान ,
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
सप्तपदिनी बांधलेलं हे प्रेमच बंधन ,
जन्मभर राहो असाच कायम ,
कोणाचीही लागो न त्याला नजर ,
दरवर्षी अशीच येवो हो लग्न दिवसाची घडी कायम ….
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
जीवनाच्या प्रत्येक क्षणात एकमेकांना आनंद द्या ,
जिथे दुख जाणवणार नाही असा सहवास द्या ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा वाहिनी !
धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
देव आपल्या जोडीला आनंदात ऐश्वर्यात ठेवो ,
आपल्या संसाराला सुख समृद्धी लाभो ,
आपली दिवसेंदिवस प्रगती होत राहो ,
हीच देवाकडे आपल्यासाठी प्रार्थना ….
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको !
अशीच क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो ….
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता ,
असेच भांडत राहा असेच रुसत राहा ,
पण नेहमी असेच सोबत राहा ….
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
सुख-दुखाच्या वेलीवर ,
फुल आनंदाचे उमलू दे ,
फुलपाखरांसारखे स्वातंत्र्य तुम्हा दोघाना लाभू दे ,
नाते तुम्हा दोघांचे विश्वासाचे जन्मो जन्मी सुरक्षित राहू दे .
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
सदैव आनंदात असे राहावे तुमचे जीवन ,
आणि मैत्री तुमची निरंतन वाढत राहो ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झाल आहे ,
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे ,
चुकूनही जावू नकोस माझ्यापसुन लांब ,
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचा प्रेम ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
लग्न म्हणे स्वर्गात ठरतात ,
लग्नाचे वाढदिवस मात्र ,
पृथ्वी तलावर साजरे होतात ,
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे येवो ,
हीच आमुची इच्छा ….
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
गोड माणसे , गोड नाती
विश्वासाने फुलली आहे कांती …
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत
तू माझ्यासाठी खूप खास आहेस ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
अशीच क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
लग्नाचा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो….!
मने जुळली होती , तसे प्रेम बहरत गेले ,
नाते तुमच्या दोघांचे , सहज फुलात गेले
आणि बघा लग्नाचे , हे वर्षही आनंदात गेले ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
दिवा आणि वाती सारखं आपल नात आहे ,
हे नात असाच तेवत रहाव हीच इच्छा आहे ….
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तू आहेस म्हणून तर सगळे काही आहे तूच माझ्या प्रेमाचा गंध आहे
प्रिये , लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझ्या आयुष्यातील प्रेमाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस “आज आणि नेहमी “
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Wedding Anniversary Wishes In Marathi | लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
प्रत्येक वेळी सांभाळून मला घेशील ,
वळण वळणावर साथ मला देशील,
अजून माझ देवाकडे काहीच मागण नाही ,
फक्त देवा हाच नवरा मला जन्मोजन्मी देशील ….
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा !
प्रत्येक समस्येच उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही ,
जीवनच सार आहात तुम्ही ,
अहोंना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझा नवरा , माझा पार्टनर , माझा बॉय फ्रेंड आणि माझा मित्र
बनून राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद …..
HAPPY ANNIVERSARY HUBBY !
अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे ,
सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे ,
आली गेली कितीही संकटे तरीही ,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे…….
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
नवरा खंबीर पाने पाठीशी उभा असेल ,
तर बायको प्रत्येक गोष्टीत यासास्वी झालीच म्हणून समजा …!
जिथे प्रेम आहे तिथेच जीवन आहे
प्रिय नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
कसे गेले वर्ष कळलचं नाही,
लोक म्हणतात लग्नानंतर माणस बदलतात ,
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
देव करो असाच येत राहो ,
तुमच्या लग्नाचा वाढदिवस ,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश ,
असाच सुगंधित रहाव हे आयुष्य ,
जसा प्रत्येक दिवस असो सण खास ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझे जग ज्याच्यापासून सुरु होते ,
आणि ज्याच्यापाशी येऊन संपते अशा माझ्या
पती देवाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमच्या आयुष्यात होवो प्रेमाची बरसात ,
तुम्हाला मिळो देवाचा आशीर्वाद ,
तुमच्या दोघांची प्रेमाची गाडी अशीच राहो चालत ,
दरवर्षी असाच करा साजरा प्रेमाचा हा उत्सव …!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आकाशापासून ते महासागर पर्यंत
निखळ प्रेमापासून सखोल विश्वासा पर्यंत
तुम्ही आयुष्यभर कायम सोबत राहा ….!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Wedding Anniversary Wishes In Marathi | लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
साखरेसारख्या गोड माणसांना मुंग्या लागे पर्यंत ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
विश्वासच नात हे कधीच तुटू नये ,
प्रेमाचा धागा कधीच सुटू नये ,
वर्षावर्षांचे आपले नाते कायम राहो ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
मी या जगातील काही भाग्यवान पुरुषांपैकी एक आहे ,
जो असे म्हणू शकतो कि,
माझी चांगली मैत्रीण आणि पत्नी,
एक समान स्त्री आहेत ….!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
नाराज नको राहू मी तुझ्या सोबत आहे ,
नजरे पासून दूर असलो तरी तू माझ्या हृदयात आहेस ,
डोळे मिटून तू माझी आठवण काढ,
मी तुझ्या समोर उभा आहे ….!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
मी नेहमी विचार करायची कि
एक आदर्श पती असणे शक्य नाही ,
परंतु तुमच्याशी लग्न झाल्यावर ,
माझे सर्व भ्रम दूर झाले….!
माझ्या आदर्श पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझ्या प्रत्येक दुखात धावून येतोस तू ,
भरभरून सुख देतोस तू ,
काही न बोलताच समजून घेतोस तू ,
खऱ्या अर्थाने मला जपतोस तू …!
लाडक्या नवरोबाला……
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
ऊन नंतर सावली ,
सावली नंतर ऊन ,
तसेच सुखानंतर दु:ख,
दु:खा नंतर सुख ,
या दोन्ही वेळी आपण एकमेकांना साथ देऊ
माझ्या प्रेमळ नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
जीवनाच्या ह्या प्रवासात ,
प्रत्येक क्षणी तुझी साथ हवी .
तुझ्या विना प्रवासाची सुरुवातच न व्हावी ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !