UNION BUDGET 2024-25 | २०२४ -२५ च्या अर्थसंकल्पात कोणाला काय मिळाले ?

UNION BUDGET 2024-25 | २०२४ -२५ च्या अर्थसंकल्पात कोणाला काय मिळाले ? , मंगळवारी देशाचा 2024-25 साठी अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला. देशातील सर्वसामान्य नागरिकांपासून ते देशातील मोठमोठ्या उद्योजकांपर्यंत सगळ्यांचे लक्ष या अर्थसंकल्पाचे होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा सातवा अर्थसंकल्प आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी UNION BUDGET 2024-25 सादर करण्याआधी सांगितले की लोकांचा आमच्या धोरणांवर विश्वास आहे . जागतिक अर्थव्यवस्था सध्या कठीण परिस्थितीतून जात असताना भारतीय अर्थव्यवस्था हे अजून मजबूत आणि दमदार कामगिरी करत आहे. देशात महागाई नियंत्रणात आहे त्याच बरोबर भारतातील चलनवाढीचा दर सुमारे 4% आहे.

UNION BUDGET 2024-25

UNION BUDGET 2024-25

नऊ सूत्रांवर आधारित अर्थसंकल्प

कृषी क्षेत्रातील उत्पादकता

रोजगार आणि कौशल्य

सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय

उत्पादन आणि सेवा

शहरी विकासाला चालना

ऊर्जा सुरक्षा

पायाभूत सुविधा

नवकल्पना संशोधन आणि विकास

पुढच्या पिढीतील सुधारणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संपूर्ण अर्थसंकल्प UNION BUDGET 2024-25 या नऊ सूत्रांवर आधारित सादर केला, त्यात पहिले प्राधान्य कृषी क्षेत्रातील उत्पादकता आहे. दुसरं प्राधान्य रोजगार व कौशल्य या क्षेत्राला आहे. तिसर प्राधान्य सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय या क्षेत्राला आहे. चौथ प्राधान्य उत्पादन आणि सेवा या क्षेत्राला आहे. पाचव प्राधान्य शहरी विकासाला चालना याला आहे. सहाव प्राधान्य ऊर्जा सुरक्षा या क्षेत्राला आहे. सातव प्राधान्य पायाभूत सुविधाना आहे. आठव प्राधान्य नवकल्पना संशोधन आणि विकास या क्षेत्राला आहे. पुढच्या पिढीतील सुधारणा याला नवव प्राधान्य आहे.

कोणत्या क्षेत्राला किती आर्थिक तरतूद

क्षेत्रकोटी रुपये
संरक्षण 454773
ग्रामीण विकास265808
कृषी151851
गृह150983
शिक्षण125638
आरोग्य89287

विविध क्षेत्रांसाठी बजेटच्या घोषणा:

1) कृषी क्षेत्र:

1)कृषी क्षेत्राला आणि कृषी क्षेत्राशीअसलेल्या क्षेत्रांना 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

2)UNION BUDGET 2024-25 अर्थसंकल्पात सांगितल्यानुसार सरकार यंदा नैसर्गिक शेतीला चालना देणार आहे.

3)नैसर्गिक शेती राबवू इच्छिणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये त्यांचा प्रचार केला जाईल.

4)तेलबिया उत्पादनात देशाला आघाडीवर घेऊन जाण्यासाठी कडधान्य आणि तेलबिया ( मोहरी, सोयाबीन) यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येईल.

5)उत्पादकता वाढवण्यासाठी आणि हवामानाला अनुकूल पीक वानांवर भर देण्यासाठी कृषी संशोधन सेटअप ची व्यवस्था करण्यात येईल. खाजगी क्षेत्राला ही यामध्ये निधी दिला जाणार आहे.

6)32 पिकांच्या आणि बागायती पिकांच्या 109 उच्च उत्पादक आणि हवामानास अनुकूल वान शेतकऱ्यां ना वापरण्यासाठी देण्यात येतील.

7)100 हजार बायो इनपुट रिसोर्स सेंटर ची स्थापना करण्यात येणार आहे.

8)भाजीपाला पुरवठा करणाऱ्या साखळीशी संबंधित शेतकरी, उत्पादक संस्था, सहकारी संस्था आणि स्टार्टअप ला प्रोत्साहन देण्यात येईल.

9)प्रत्येक राज्याच्या सहकार्याने शेतकरी आणि त्यांच्या जमिनी तीन वर्षात डिजिटल करून डिजिटल पब्लिक इन्फ्रा(DPI) तयार केले जातील.

10)यावर्षी 400 जिल्ह्यातील खरीप पिकांचे सर्वेक्षण DPI च्या माध्यमातून केले जाणार आहे.

11)6 कोटी शेतकऱ्यांचा तपशील आणि त्यांच्या जमिनीची नोंद शेतकरी आणि जमीन नोंदणी मध्ये केली जाईल.

12) पाच राज्यांमध्ये जन समर्थ आधारित किसान क्रेडिट कार्ड जारी केले जाईल.

2) संरक्षण क्षेत्र:

1) एकूण बजेटच्या 12.9 टक्के रक्कम संरक्षण क्षेत्राला देण्यात आली आहे.

2)IDEX साठी देण्यात येणारी रक्कम ही संरक्षण तंत्रज्ञान कंपन्यांना संशोधनासाठी दिली जाणार आहे.

3) माजी सैनिकांच्या संरक्षण निवृत्ती वेतनासाठी 1.41 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

4) ऑपरेशनल संरक्षण सजगतेसाठी 91088 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

5) लष्करासाठी 192680 कोटी रुपये देण्यात येणार आहे.

6) नौदल आणि हवाई दलासाठी अनुक्रमे32778 आणि46223 कोटी रुपये देण्यात येणार आहे.

7) बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO साठी 6500 कोटी रुपये देण्यात येणार आहे.

3) बिहार आणि आंध्र प्रदेश :

1) बिहार मध्ये रस्ते प्रकल्पांसाठी 26 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहे.

2) बिहार मध्ये 21 हजार कोटी रुपयांचे पावर प्लांट उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.

3) आंध्र प्रदेशला 15,000 कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे.

4) पुढील पाच वर्षे मोफत रेशन मिळणार आहे.

5) बिहार मध्ये तीन एक्सप्रेसवे ची घोषणा

6) बोधगया- वैशाली द्रुतगती मार्ग बांधला जाणारा

7) पाटणा- पूर्णिया बांधकाम होणार

4) कर प्रणाली:

सरकारने नवीन कर प्रणाली मध्ये बदल केला आहे

3 लाखांपर्यंत NIL
3-7 लाख 5%
7-10 लाख 10%
10-12 लाख 15%
12-15 लाख 20%
15 लाखाने अधिक 30%

* 7 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या नारी भेट मिळू शकतो.

परदेशी कंपन्यांकडून घेतला जाणारा कॉर्पोरेट टॅक्स 40% वरून कमी करून 35 टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

5) स्टार्ट अप्स:

केंद्रीय अर्थसंकल्पात स्टार्ट अप इको इकोसिस्टम ला मोठा दिलासा मिळाला आहे.

खाजगी कंपन्यांकडून या स्टार्ट अप मध्ये गुंतवणूक केली जाते त्या गुंतवणुकीवर आतापर्यंत एंजल टॅक्स लावला जायचा आता एंजल टॅक्स रद्द करण्यात आला आहे.

6) देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि बेरोजगारीच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी अर्थसंकल्पात तीन नव्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. या तीन योजनांसाठी पुढील पाच वर्षात 2000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे

7) संघटित क्षेत्रात पहिल्यांदाच नोकरी मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना पहिल्या महिन्यात त्यांच्या पगारात व्यतिरिक्त सरकारकडून काही रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम 15000 रुपयांपर्यंत असेल.

8) महिलांच्या नावाने घर खरेदी केल्यास नोंदणी करताना द्यावे लागणारे मुद्रांक शुल्क stamp duty सवलत देण्यात येणार आहे.

विविध क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी नोकरदार महिला वर्गा साठी वसतिगृहाचे स्थापना करण्यात येणार आहे.

महिला व मुलींसाठीच्या योजनांसाठी 3 लाख कोटी रुपये देण्यात येणार आहे

9) प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये तीन कोटी घरे बांधली जाणार.

10) सरकारमार्फत शहरांमध्ये रेंटल हाउसिंग विकसित करण्यात येणार आहे. याद्वारे बांधली जाणारी घरे ही मोठ्या कंपन्या आणि कारखान्यांच्या जवळपास बांधली जातील. त्यामुळे कामगारांना स्वस्त भाड्याचे घर मिळू शकेल.

11) कॅन्सर या आजाराच्या अजून तीन औषधांवर किमतीत सूट देण्यात आली आहे.

12) मोबाईल फोन, चार्जर, मोबाईलच्या ॲक्सेसरीज वरीलBCD कमी करून15% करण्यात आली आहे.

13) सोन्या-चांदीच्या सीमा शुल्कात 6% कमी तर प्लॅटिनम मध्ये 6.4 टक्के करण्यात आली आहे.

14) सोलर सेल आणि सोलर पॅनल शी संबंधित वस्तूं वरील करात सूट देण्यात आली आहे.

FAQs:UNION BUDGET 2024-25 | २०२४ -२५ च्या अर्थसंकल्पात कोणाला काय मिळाले ?

1) महिलांच्या नावाने घर खरेदी केल्यास नोंदणी करताना द्यावे लागणारे मुद्रांक शुल्क stamp duty सवलत देण्यात येणार आहे का?

ans:2024 च्या अर्थसंकल्पा नुसार महिलांच्या नावाने घर खरेदी केल्यास नोंदणी करताना द्यावे लागणारे मुद्रांक शुल्क stamp duty सवलत देण्यात येणार आहे .

2)2024 च्या अर्थसंकल्पा नुसार कॅन्सर या आजाराच्या औषधांवर सूट देण्यात येणार आहे का?

ans: 2024 च्या अर्थसंकल्पा नुसार या आजाराच्या अवस्थांवर सूट देण्यात येणार आहे.

3)2024 च्या अर्थसंकल्पा नुसार कोणत्या राज्यांसाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात आली आहे?

ans:2024 च्या अर्थसंकल्पा नुसार बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी विशेष आर्थिक प्रस्तुत करण्यात आली आहे.

4)प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये किती कोटी घरे बांधली जाणार?

ans:प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये तीन कोटी घरे बांधली जाणार.

5)2024 च्या अर्थसंकल्पा नुसार एंजल टॅक्स रद्द करण्यात आला आहे का?

ans:2024 च्या अर्थसंकल्पा नुसार एंजल टॅक्स रद्द करण्यात आला आहे

6)2024 च्या अर्थसंकल्प कोणी सादर केला?

ans:2024 च्या अर्थसंकल्प माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला.

7)2024 च्या अर्थसंकल्पा किती सूत्रांवर आधारित सादर केला आहे?

ans:2024 च्या अर्थसंकल्पा नऊ सूत्रांवर आधारित सादर केला आहे.

8)2024 च्या अर्थसंकल्प हा निर्मला सीतारामन यांचा कितवा अर्थसंकल्प आहे?

ans:2024 च्या अर्थसंकल्प हा निर्मला सीतारामन यांचा सातवा अर्थसंकल्प आहे.

9)2024 च्या अर्थसंकल्पा मध्ये कोणत्या क्षेत्राला किती अनुदान देण्यात आले?

ans:2024 च्या अर्थसंकल्पा मध्ये संरक्षण : 454773, ग्रामीण विकास: 265808, कृषी: 151851, गृह :150983, शिक्षण: 125638 ,आरोग्य :89287 कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे.

10)2024 च्या अर्थसंकल्पा मध्ये कोणत्या राज्यासाठी तीन एक्सप्रेसवे ची घोषणा केली आहे?

ans:2024 च्या अर्थसंकल्पा मध्ये बिहार या राज्यासाठी तीन एक्सप्रेसवे ची घोषणा केली आहे.

11)2024 च्या अर्थसंकल्पा मध्ये कर प्रणालीत बदल करण्यात आला आहे का?

ans:2024 च्या अर्थसंकल्पा मध्ये करणारी बदल करण्यात आला आहे.

12)2024 च्या अर्थसंकल्पा मध्ये बिहार या राज्याला किती कोटींचे पॅकेज देण्यात आले आहे?

ans:2024 च्या अर्थसंकल्पा मध्ये बिहार या राज्याला21 हजार कोटींचे पॅकेज देण्यात आले आहे

13)2024 च्या अर्थसंकल्पा मध्ये आंध्र प्रदेश या राज्याला किती कोटींचे पॅकेज देण्यात आले आहे?

ans:2024 च्या अर्थसंकल्पा मध्ये आंध्र प्रदेश या राज्याला 15000 कोटींचे पॅकेज देण्यात आले आहे?

केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा

राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/

अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/

प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/

हर घर नल योजना २०२४ https://marathisampada.com/har-ghar-nal-yojana-2024/

आयुष्मान भारत योजना २०२४ https://marathisampada.com/ayushaman-bharat-yojana-2024/

प्रधान मंत्री कौशल विकास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-kaushal-vikas-yojana-2024/

प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-ujjwala-yojana-2024/

प्रधान मंत्री सौभाग्य योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-saubhagya-yojana-2024/

प्रधान मंत्री आवास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-awas-yojana-2024/