Summer Outfits In Marathi | उन्हाळ्यासाठी हे आहेत योग्य कपडे

Summer Outfits In Marathi | उन्हाळ्यासाठी हे आहेत योग्य कपडे ,उन्हाळा आला कि कोणते कपडे घातले कि आपल्याला गरम होणार नाही याचा विचार आपण कपडे खरेदी करायच्या आधी करतच असतो .उन्हाळ्यात कडक उन्हामुळे खूप घाम येतो .इतर ऋतुत घाम आला कि काही वाटत नाही पण उन्हाळ्यात घाम आला कि त्याचा खूप त्रास होतो . तसेच उन्हाळ्यात अंगाला खूप घट्ट होणारे कपडे घातले तरीही खूप त्रास होतो हाच त्रास कमी करून उन्हाळा सुसह्य व्हावा असे प्रत्येकाला वाटत असते म्हणूनच Summer Outfits In Marathi | उन्हाळ्यासाठी हे आहेत योग्य कपडे या लेखात आपण उन्हाळ्यात कोणते कपडे वापरावे , कोणते कपडे घालणे कटाक्षाने टाळावे तसेच उन्हाळ्यात अजून आपण कशा पद्धतीने काळजी घेऊ शकतो आणि उन्हाळा मजेत घालवु शकतो हे बघणार आहोत .माहिती आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना , प्रियजनांना नक्की शेअर करा .

Summer Outfits In Marathi | उन्हाळ्यासाठी हे आहेत योग्य कपडे

१) सैल कपडे घाला :

उन्हाळ्यात कपडे निवडताना शक्यतो सैल कपडे निवडा . कपडा जितका कमी अंगाला लागेल तेवढा गरम कमी होईल . उन्हाळ्यात घाम जास्त येतो आणि जर आपण घट्ट कपडे घातले तर घाम येण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकते . त्वचा लाल होणे त्यावर पुरळ येणे अश्याप्रकारचा त्वचे संबंधित त्रास होऊ शकतो . म्हणूनच उन्हाळ्यात सैल आणि हवेशीर कपडे घाला .

२) सुती (कॉटन )कपड्यांचाच वापर करा :

सुती कापडा मध्ये पाणी शोषून घेऊन त्याचे हवेत बाष्पीभवन करण्याचे तत्व आहे . त्यामुळे जेव्हा आपण उन्हाळ्यात सुती कपडे घालतो तेव्हा आपल्या शरीरातील घाम शोषून घेवून त्याचे हवेत बाष्पीभवन करते त्यामुळे आपल्याला घामाचा खूप त्रास होत नाही . आपल्या त्वचेवरील ओलावा कमी करते त्यामुळे bacterial infection चा त्रास कमी होतो .सुती कपडे हे साधारण आपल्या टॉवेल सारखे काम करतात .लिनन चे कपडे देखील सुती कपड्या इतकेच आरामदायक असतात .त्यामुळे लिनन चे कपडे देखील आपण उन्हाळ्यात वापरू शकतो .

उन्हाळ्यात सिल्क , सिंथेटिक किंवा नायलॉन चे कपडे वापरणे टाळावे . उन्हाळ्याच्या दिवसांत ह्या मटेरीअल चे कपडे शरीराला नुकसान करणारे असतात .

उन्हाळ्यात काही स्पेशल summer drinks बनवायचा विचार करताय मग हे हि बघा https://marathisampada.com/summer-drinks-in-marathi/

Summer Outfits In Marathi | उन्हाळ्यासाठी हे आहेत योग्य कपडे

३) फिकट रंगाच्या कपड्यांची निवड करा :

पांढरा , आकाशी , पिवळा असे हलक्या शेड्स असलेले रंग /या रंगांचे कपडे तुम्हाला थंड ठेवतात .असे रंग सूर्यकिरण परावर्तित करण्याचे काम करतात .तर डार्क /भडक रंगाचे कपडे सूर्यकिरण शोषून घेतात त्यामुळे जास्त गरम होते . त्यामुळे उन्हाळ्यात शक्यतो फिकट रंगांचे कपडे वापरा . त्यामुळे घाम कमी येईल आणि तुम्हाला थंड वाटेल .त्यामुळे उन्हाळ्यात योग्य रंगांच्या कपड्यांची निवड केली तर तुमचा उन्हाळा खूपच सुसह्य जाईल .

४) कपड्यांची योग्य Style निवडा :

उन्हाळा आला कि खूप गरम होत, घाम येतो त्यामुळे खूप जन shorts किंवा sleeveless कपडे घालायला प्राधान्य देतात ,पण हे खरच योग्य आहे का? असे कपडे घातल्यावर आपण उन्हाळा मजेत घालवु शकतोय का? तर उत्तर आहे “नाही “. कारण shorts किंवा sleeveless कपड्यांमुळे आपली त्वचा थेट सूर्यकिरनाच्या संपर्कात येते . सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेला हानी होते ,त्वचा लाल होते किंवा त्वचेवर पुरळ येते .त्यामुळे उन्हाळ्यात shorts किंवा sleeveless कपडे घालणे टाळावे . त्वचा थेट सूर्यकिरनाच्या संपर्कात आली तर उष्णतेमुळे त्वचा कोरडी पडते , कडक होते आणि त्यामुळे एजिंग आणि सुरकुत्या होण्याची शक्यता वाढते .उन्हाळ्यात घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावणे बंधनकारकच आहे करण त्यामुळे त्वचेचे रक्षण होते .

Summer Outfits In Marathi | उन्हाळ्यासाठी हे आहेत योग्य कपडे या लेखात कपड्यांची योग्य style निवडताना काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजे .

१) स्त्रीयांनी सैल पॅंट किंवा प्लाझो आणि कुर्ता किंवा टॉप यांची निवड करावी .

२)पंजाबी ड्रेस घालताना ते खूप घट्ट नसावेत .

३) अंगाला खूप घट्ट होतील अशा लेगींस किंवा चुडीदार घालणे टाळावे .

४)पुरुषांनी शर्ट घालण्या आधी बनियन घालावे , बनियन घाम शोषून घेते .आणि शरीरातून निघणारा घाम सुकण्यास मदत होते आणि त्यामुळे शर्ट भिजणार नाही .

५) कमी वर्क काम असलेले ड्रेस निवडा .प्रिंटेड ड्रेस वापरा ,वर्क ड्रेस मुळे गरमीची समस्या जास्त तीव्र होते.वर्क च्या कपड्यामुळे त्वचेला देखील त्रास होतो .

६)वर्क असलेल कपडे काढताना आणि घालताना अंगाला घासले जातात त्यामुळे त्वचेची आग होते .

७) shorts किंवा sleeveless कपडे घालण्याचे टाळावे .

५) कॅप /हॅट/छत्री आणि गॉगल्स वापरा

उन्हाळ्यामध्ये उन्हापासून संरक्षण होण्यासाठी कॅप /हॅट वापरा .कॅप /हॅट घालताना आतून डोक्याला रुमाल बांधणे फायद्याचे ठरते. उन्हाळ्यात कॅप /हॅट बरोबरच बाहेर जाताना छत्री वापरे जास्त सोयीस्कर असते .छत्री मुळे पूर्ण शरीराचे उन्हापासून संरक्षण होते . उन्हाळ्यात डोळ्यांना उष्णतेचा खूप जास्त त्रास होतो ,डोळ्यांची आग होणे ,डोळे दुखणे , डोळ्यांमध्ये जळजळ होणे असे अनेक त्रास उन्हामुळे होतात त्यामुळे उन्हाळ्यात बाहेर जाताना गॉगल्स / सन ग्लासेस वापरा त्यामुळे डोळ्याचे संरक्षण होईल आणि डोळ्यांचे त्रास कमी होतील .

Summer outfits in marathi

६) टाल्कम पावडर वापरा :

उन्हाळ्यात घाम खूप येतो ,घाम करण्याच्या विचारणे अनेक जण टाल्कम पावडर लावतात पण त्याचा फारसा उपयोग होत नाही . टाल्कम पावडर जास्त प्रमाणात लावू नये .शक्यतो टाल्कम पावडर रात्री झोपताना लावावी याचा तुम्हाला अधिक फायदा होईल .जास्त प्रमाणात टाल्कम पावडर लावल्यामुळे त्वचेवरील छिद्रे बंद होऊन जास्त घाम येण्याची समस्या निर्माण होऊ शकते .

७) कमीत कमी दागिन्यांचा वापर करावा :

उन्हाळ्यात शक्यतो कमीत कमी दागिने वापरावे किंवा दागिनेच वापरू नये . सण समारंभाला थोड्या वेळेपुरतेच दागिने वापरा .त्यामुळे गरम कमी होईल .उन्हाळ्यात जितके जास्त दागिने घालाल तितके जास्त गरम होते त्यामुळे दागिने घालणे टाळावेच .

८) उन्हाळ्यात या कपड्यांना प्राधान्य द्या :

उन्हाळ्यात घाम तर खूप येतो त्यामुळे घट्ट कपडे तर घालू शकत नाही . उन्हाळ्यात कोणते कपडे घालावे यासाठी मी तुम्हाला काही ऑप्शन सुचवते :

Summer Outfits In Marathi | उन्हाळ्यासाठी हे आहेत योग्य कपडे

१) जंप सूट :

उन्हाळ्यात कुठे बाहेर फिरायला जायचे असेल तेव्हा तुम्ही जंप सूट घालू शकतो .जंप सूट मध्ये तुम्हाला खूपच आरामदायी वाटेल आणि जंप सूट काहूप घट्ट वगेरे नसतो त्यामुळे तुम्ही हा ड्रेस घातला कि तुम्हाला comfortable वाटेल .जंप सूट मध्ये वेगवेगळे रंग उपलब्ध असतात .कॉटन मटेरीअल मधेही जंप सूट मिळतात .

२) मॅक्सी ड्रेस :

तुम्ही तुमच्या आवडी नुसार मॅक्सी ड्रेस निवडू शकतात .मॅक्सी ड्रेस हे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असतात .उन्हाळ्यात वेगवेगळ्या पॅटन चे मॅक्सी ड्रेस बघायला मिळतात . उन्हाळ्यात कॉटन मटेरीअल मध्ये सुद्धा मॅक्सी ड्रेस बाजारात मिळतात .मॅक्सी ड्रेस घातलेली स्त्री स्टायलीश तर दिसतेच पण तिला स्वतःला सुद्धा खूप comfartable वाटत असते . मॅक्सी ड्रेस हा पुर्नंघाभर असतो त्यामुळे सन टानिंग पासुन देखील संरक्षण मिळते .

३) प्लाझो आणि कुर्ता /टॉप :

उन्हाळ्यात तुम्ही कॉटन मध्ये प्लाझो आणि कुर्ता घेऊ शकता.हे तुम्हाला स्टायलीश लुक देईल .हे कॉम्बिनेशन तुम्ही ऑफिस साठी , कॉलेज साठी देखील वापरू शकता .घट्ट लेगींस ऐवजी उन्हाळ्यात प्लाझो खूपच आरमदायी ठरते .

४) स्कर्ट आणि टॉप:

लॉंग / शोर्ट स्कर्ट आणि टॉप हे कॉम्बिनेशन उन्हाळ्यात घालायला खूपच comfortable असते. उन्हाळ्यात स्कर्ट निवडताना कॉटन चे प्रिंटेड स्कर्ट निवडू शकतो . लॉंग / शोर्ट स्कर्ट आणि टॉप हे तुम्हाला स्टायलीश लुक तर देईलच पण त्याबरोबर आरामदायी देखील आहे .लॉंग / शोर्ट स्कर्ट आणि टॉप तुम्ही ऑफिस , कॉलेज ला देखील वापरू शकता .

५) लेयरिंग clothes:

उन्हाळ्यात लेयरिंग clothes कसे वापरावे असे तुम्हाला वाटत असेल न , मग मी सांगते कि लेयरिंग clothes वापरताना कोणती काळजी घ्यायची . त्यामुळे उन्हाळ्यात जरी तुम्ही लेयरिंग clothes वापरले तरी तुम्ही comfortable feel करू शकता.लेयरिंग करताना आतील सॉलिड टी -शर्ट हा कॉटन चा असावा त्यामुळे घाम आला तरी टी -शर्ट मध्ये शोषला जातो . लेयरिंग मध्ये वर जो शर्ट तुम्ही घालाल त्याची बटणे नेहमी खुली ठेवा .

६) पोलो ड्रेस :

हा वनपीस प्रमाणे असतो . दिसायला पण एकदम स्टायलीश दिसतो आणि अतिशय पातळ फॅब्रिक मध्ये येतो . उन्हाळ्यात घालताना तुम्ही कॉटन मध्ये देखील घेऊ शकता .

७) फ्रॉक:

उन्हाळ्या साठी हा एक जबरदस्त ऑप्शन आहे . उन्हाळ्यात फ्रॉक घेताना तुम्ही कॉटन मटेरीअल मध्ये घेवू शकता . फ्रॉक घातल्यावर शक्यतो गरम होत नाही आणि फ्रॉक मुळे स्टायलिश लुक देखील येतो . उन्हाळ्यातील हि एक स्वस्तात मस्त फॅशन आहे असा म्हणायला काही हरकत नाही .

९)थोडक्यात पण महत्वाचे (उन्हाळ्यात काय घालावे आणि काय घालू नये )

Summer outfits in marathi

१)उन्हाळ्यात काय घालू नये:

  • उन्हाळ्यात घट्ट कपडे घालू नये
  • उन्हाळ्यात गडद रंगाचे कपडे घालू नये
  • उन्हाळ्यात जीन्स घालणे टाळावे .
  • उन्हाळ्यात खूप दागदागिने घालू नये
  • वर्क असलेले कपडे घालणे टाळावे
  • सिल्क ,सिंथेटिक आणि नायलॉन मटेरीअल चे कपडे घालणे टाळावे .
  • shorts किंवा sleeveless कपडे घालण्याचे टाळावे .

२)उन्हाळ्यात काय घालावे:

  • उन्हाळ्यात शक्यतो सैल कपडे घालावे .
  • उन्हाळ्यात कॉटन मटेरीअल असलेले च कपडे घालावे .
  • फिकट रंगाचे कपडे घालावे .
  • कॅप /हॅट/छत्री आणि गॉगल्स वापरा
  • टाल्कम पावडर वापरा
  • कमीत कमी दागिने घाला .

१०) निष्कर्ष :

उन्हाळा सुसह्य करण्यासाठी कोणते कपडे घालवे , उन्हाळ्यात कशी काळजी घाली याबद्दल थोडक्यात Summer Outfits In Marathi | उन्हाळ्यासाठी हे आहेत योग्य कपडे या लेखात मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडल्यास आम्हला नक्की कळवा आणि तुमच्या मित्रामैत्रीना तुमच्या प्रियजनांना देखील हि माहिती पाठव . धन्यवाद