Summer Health Tips In Marathi | उन्हाळ्यात काय करावे आणि काय करू नये

Summer Health Tips In Marathi | उन्हाळ्यात काय करावे आणि काय करू नये , उन्हाळ्यात आपली स्वतःची, आपल्या घरच्यांची ,आपल्या घरातील पाळीव प्राण्यांची तसेच घराच्या आजूबाजूला असलेल्या बागबगीच्याची (परसबागेची ) कशी काळजी घ्यावी. मार्च महिना चालू होताच वातावरणातील थंडावा कमी होऊन उष्णता वाढायला सुरुवात होते . वसंत ऋतूचा असलेला हा काळ वातावरणातील उष्णताही मोठ्या प्रमाणात वाढवतो .जसजसे उन्हाळा वाढत जातो तसतसे अनेक आजारांचा धोका वाढत जातो . थंडीत शरीरात तयर झालेला कफ उन्हाळ्यात अति उष्णतेमुळे वितळतो त्यामुळे कफ दोषाशी संदर्भात असलेल्या अनेक समस्या निर्माण होतात . या काळात सर्दी-खोकला तसेच विविध अॅ लर्जी होण्याचा धोका वाढतो . याच बरोबर Dihydration , थकवा , चक्कर येणे या सारख्या समस्या निर्माण होतात . उष्मघाताबरोबरच, जुलाब ,ताप , अन्नातून विषबाधा , पोटाचे त्रास ,डोकेदुखी तसेच त्वचेशी संबंधित अनेक समस्या उन्हाळ्यात डोके वर काढतात .

अशा वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आरोग्याची योग्य ती काळजी घेणे गरजेचा आहे . आपल्या रोजच्या जीवन शैलीत थोडेफार बदल केले तरी या वर्षीचा उन्हाळा आपल्याला सुसह्य होईल यात काही शंका नाही .

उन्हाळ्यात आपली स्वतःची, आपल्या घरच्यांची ,आपल्या घरातील पाळीव प्राण्यांची तसेच घराच्या आजूबाजूला असलेल्या बागबगीच्याची (परसबागेची ) कशी काळजी घ्यावी या बद्दल Summer Health Tips In Marathi | उन्हाळ्यात काय करावे आणि काय करू नये या लेखात माहिती दिली आहे .माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना मित्रमैत्रिणींना नक्की शेयर करा .

Summer Health Tips In Marathi | उन्हाळ्यात काय करावे आणि काय करू नये.

उन्हाळ्याच्या ऋतूत आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी कशी घ्यावी

Summer Health Tips In Marathi

उन्हाळ्याच्या ऋतूत आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी कशी घ्यावी या बद्दल आपण Summer Health Tips In Marathi | उन्हाळ्यात काय करावे आणि काय करू नये या लेखात बघणार आहोत . उन्हाळ्यातील काळजीबद्दल काही टिप्स खालील प्रमाणे :

उन्हाळ्यात वातावरणात खूप उष्णता असते, घामामुळे शरीरातील पाणी कमी होत असते , त्यामुळे dihydration होऊ शकते , dihydration होऊ नये यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्या , उन्हाळ्यात ८-१० ग्लास पाणी प्यावे.

पाण्याबरोबरच सरबत ,ज्यूस यांचे देखील सेवन करावे. उन्हाळ्यात लिंबू पाणी , जलजीरा पाणी, ताक ,मठ्ठा, उसाचा रस , नारळ पाणी ,कैरीचे पन्हे या सारखे सरबत प्यावे

उन्हाळ्यात कलिंगड ,द्राक्ष ,संत्री ,टरबूज, आंबा अशी ताजी फळे बाजारात उपलब्ध असतात या फळांच सेवन कराव त्यामुळे आपले शरीर hydrated राहायला मदत होते .

कलिंगड, संत्री, मोसंबी उस या फळांमध्ये पाण्याचे जास्त प्रमाण असते त्यामुळे या सारख्या फळांचा रस देखील प्यावा .

पालक , मेथी ,दुधी, डांगर ,काकडी ,बीट ,कांदा ,या सारख्या पालेभाज्या आणि फळभाज्या रोजच्या जेवणात खाव्या यामुळे प्रतिकार शक्ति वाढते आणि कोणतेही आजार व्हायची संभावना कमी होते .

उन्हाळ्यात शिळे अन्न जास्त प्रथिने युक्त अन्न खाणे टाळावे .

तेलकट ,तुपकट , मसालेदार प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे .

उन्हाळ्यात अंडी, चिकन, मटन असे उष्ण पदार्थ कमी खावे .

उन्हाळ्यात सैल, सुती, हलक्या रंगाचे कपडे घाला .

उन्हळ्यात अंगभर सैल कपडे घाला , अंगभर कपड्यांमुळे उन्हापासून शरीराचे संरक्षण होईल .

विनाकारण घराबाहेर पडू नका .

जेष्ठ व्यक्ती उन्हात घराबाहेर पडणार नाही याची काळजी घ्या .

उन्हात बाहेर जाताना गॉगलचा वापर करा , उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी टोपी ,छत्री यांचा वापर करा .

उन्हाळ्यात बाहेरून घरी आल्यानंतर हातपाय पाण्याने स्वच्छ धुवा , डोळे देखील थंड पाण्याने स्वच्छ धुवा .

बाहेर जाताना शक्य असल्यास सुती कपड्याने चेहरा व डोके झाकून घ्या .

बाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत ठेवा ,कांदा असावा .

चहा, कॉफी तसेच बाहेरील शीत पेये पिणे टाळावे .

तुम्हाला जर आजारी किंवा अशक्त असल्यासारखं वाटत असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जा .

पार्किंग मध्ये पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुलांना एकटे सोडू नका.

तुमचे घर थंड ठेवण्यासाठी पडदे , शटर किंवा सनशेड चा वापर करा . शक्यतो AC चा व[आर करणे टाळावे .

शक्य असल्यास रात्री खिडक्या उघड्या ठेवा .

झोपण्यापूर्वी घरातील फरशी (लादी ) थंड पाण्याने पुसून घ्यावी .त्यामुळे घरात थंडावा निर्माण होईल .

रात्री झोपताना थंड पाण्याने अंघोळ करून झोपावे .

उष्णतेवर मात करण्यासाठी उन्हाळ्यातील सर्वोत्तम उन्हाळी पेये बनवायचा विचार करताय मग हे हि वाचा https://marathisampada.com/summer-drinks-in-marathi/

उन्हाळ्यातील आहार कसा असावा याबद्दल थोडक्यात माहिती येथे वाचा https://marathisampada.com/summer-diet-tips-in-marathi/

उन्हाळ्यात कोणते कपडे घालावे याचा प्रश्न पडलाय त्याच उत्तर ह्या लेखात वाचा https://marathisampada.com/summer-outfits-in-marathi/

उष्माघात (heatstroke) झालेल्या व्यक्तींची कशी काळजी घ्यावी :

उष्माघाताची काही लक्षणे ताप , मळमळ ,डोकेदुखी, चक्कर येणे ,नाकातून रक्त येणे अशी आहे ,अशी लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीला त्वरित जवळच्या दवाखान्यात घेऊन जा.

उष्माघात झालेल्या व्यक्तीला थंड जागी बसवा किंवा सावलीत बसवा .

त्या व्यक्तीला ओल्या कपड्याने पुसून काढा .किंवा थंड पाण्याने अंघोळ घाला . शरीराचे तापमान कमी ठेवण्याचा प्रयत्न करा .

उष्माघात झालेल्या व्यक्तीला लिंबू पाणी ORS प्यायला द्या .शरीर hydrated ठेवण्याचा प्रयत्न करा .

उष्माघात झालेल्या व्यक्तीला त्वरित जवळच्या दवाखान्यात घेऊन जा .

उन्हाळ्याच्या ऋतूत आपण आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी

उन्हाळ्याच्या ऋतूत आपण आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी या बद्दल आपण Summer Health Tips In Marathi | उन्हाळ्यात काय करावे आणि काय करू नये या लेखात बघणार आहोत .हल्ली शहरात प्रत्येक घरात पाळीव प्राणी असतात तसेच गावाकडेही जनावरे असतात. उन्हाळा सुरु झाल कि जसा आपल्याला उष्णतेचा त्रास होतो तसाच त्रास प्राण्यांना देखील होत असतो .प्राण्यांचा देखील उन्हाळा सुसह्य करणे हे आपले काम आहे .उन्हाळ्यात त्यांची योग्य ती निगा राखली गेली तर ते देखील अनेक आजारांपासून दूर राहतील .चला तर मग बघुयात कि उन्हाळ्यात प्राण्यांची काळजी कशी घ्यावी .

Summer animal Health Tips  in marathi

घरगुती पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी हे आपण बघुयात

मानवी शरीराच्या तापमानापेक्षा प्राण्यांच्या शरीराचे तापमान अधिक असते .त्यामुळे प्राण्यांना पिण्यासाठी मुबलक पाणी द्या . वारंवार फ्रेश पाणी त्यांच्यासाठी ठेवत जा .

कुलिंग चटई बाजारात मिळतात त्या तुम्ही वापरू शकतो. प्राण्यांच्या शरीरातील उष्णता शोषण्याचे काम हि चटई करेल ,त्यामुळे प्राण्यांना थंडावा मिळेल .

तुम्ही पाळीव प्राण्यांना खायला फळे सुद्धा देऊ शकता .पण डॉक्टरांना विचारून योग्य प्रमाणात द्या .

उन्हाळ्यात चिकन ,मटन असे अति उष्ण पदार्थ पाळीव प्राण्यांना देणे टाळावे .

उन्हाळ्यात प्राण्यांना वारंवार थंड पाण्याने अंघोळ घाला , त्यामुळे शरीराचे तापमान कमी होते आणि त्यांना थंडावा जाणवेल .तसेच वारंवार अंघोळ घातल्याने त्वचेचे संक्रमण टाळता येते .

प्राण्यांना सकाळी लवकर आणि सायंकाळी बाहेर फिरवा .

भर दुपारी उन्हात फिरवू नये यामुळे उष्माघात व्हायची शक्यता असते .

उन्हाळ्यात बाहेर फिरताना रोड गरम असतात त्यामुळे पंजे भाजू शकतात, अशावेळी तुम्ही बाजारात पेट्स साठी मिळणारा पाम बाम चा वापर करू शकता.

पार्क केलेल्या बंद गाडीत प्राण्यांना ठेवू नका .उष्णतेमुळे त्यांना त्रास होवू शकतो .

शेतातील जनावरांची काळजी कशी घ्यावी हे आपण बघुयात

उष्णतेपासून संरक्षण होण्यासाठी दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे .

जनावरांना सकाळी आणि सायंकाळी चरण्यासाठी घेऊन जावे . दुपारच्या वेळी घेऊन जाऊ नये .

जनावरे बांधतात त्या ठिकाणी थंडावा राहील अशी व्यवस्था करावी .

प्राण्यांना पिण्यासाठी मुबलक पाणी मिळेल अशी व्यवस्था करावी .

उन्हाळ्याच्या ऋतूत आपण आपल्या परस बागेची काळजी कशी घ्यावी

उन्हाळ्याच्या ऋतूत आपण आपल्या परस बागेची काळजी कशी घ्यावी या बद्दल आपण Summer Health Tips In Marathi | उन्हाळ्यात काय करावे आणि काय करू नये या लेखात बघणार आहोत . उन्हाळा चालू झाला कि अंगणात ,बागेत किंवा मग टेरेस वर लावलेल्या झाडांची काळजी घेण खरच खूप मोठ आव्हान असत. उन्हाळ्यात झाडांना रोज पाणी दिला तरी झाड सुकून जातात . कुंडीतील माती लगेच कोरडी होते .झाडाची वाढ होणे थांबते .असा वेळी झाडांची काळजी कशी घायला हवी याबद्दल काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे .यामुळे आपल्या बरोबरच आपल्या झाडांचाही उन्हाळा सुसह्य होईल .

Summer plants Health Tips In Marathi

कुंडीतील माती लवकर सुकू नये यासाठी कुंडीतल्या मातीवर पालापाचोळ्याचा एक थर तयार करा त्यामुळे direct सूर्य किरण मातीवर पडणार नाहीत त्यामुळे मातीतील जास्त काळ ओलावा टिकून राहील .

बाजारात काही आकर्षक दगड मिळतात त्यांचा वापर गार्डन डेकोरेशन साठी केला जातो . असे दगड कुंडीतील मातीवर ठेवा त्यामुळे direct सूर्य किरण मातीवर पडणार नाहीत माती झाकली जाईल आणि माती लवकर कोरडी होणार नाही .

झाडांना सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्या .

टाकीतील पाणी गरम होत असेल तर असे गरम पाणी झाडांना देऊ नये .

झाडांना सामान्य तापमानातील पाणी द्यावे .

शेतीत ठिबक सिंचन वापरले जाते तसेच ठिबक सिंचन आपल्या बागेतील झाडांसाठी तयार करा .

थबक सिंचन बनविताना प्लास्टिकच्या बाटलीच्या झाकणाला छिद्र पाडा ,बाटली पाण्याने भरून घ्या आणि ती बाटली कुंडीत उलटी किंवा तिरकी करून ठेवा, यामुळे झाडाला थेंब थेंब पाण्याचा पुरवठा होत राहील . त्यामुळे मातीतील ओलावा टिकण्यास मदत होईल .

झाडांना स्प्रे बॉटल ने अंघोळ घालण्यास विसरू नका ,त्यामुळे झाडांची पाने पिवळी होण्याचे प्रमाण कमी होईल .

झाडांच्या वरती ग्रीन नेट (हिरवा पडदा ) लावा त्यामुळे उन्हापासून झाडांचे संरक्षण होईल .

उन्हाळ्यात झाडांना खते देण्याचे टाळावे किंवा कमी प्रमाणात द्या कारण खते मातीत टाकल्यावर उष्णता निर्माण करतात त्यामुळे झाडांना त्रास होवू शकतो .

निष्कर्ष :

अशा प्रकारे उन्हाळ्यात आपली स्वतःची, आपल्या घरच्यांची ,आपल्या घरातील पाळीव प्राण्यांची तसेच घराच्या आजूबाजूला असलेल्या बागबगीच्याची (परसबागेची ) कशी काळजी घ्यावी या बद्दल Summer Health Tips In Marathi | उन्हाळ्यात काय करावे आणि काय करू नये या लेखात आपण माहित बघितली . वरती दिलेल्या टिप्स जर आपण उपयोगात आणल्या तर नक्कीच आपला उन्हाळा खूपच सुखकर जाऊ शकतो याची मला खात्री आहे. सर्वसामान्य ज्ञानावर आधारित हि माहित आहे . त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधे हही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत . हि विनंती .माहित आवडल्यास आपल्या प्रियजनांना , ज्यांना गरज आहे अशा लोकांपर्यंत नक्की पोहोचवा . धन्यवाद .