Summer Drinks In Marathi | उष्णतेवर मात करण्यासाठी सर्वोत्तम उन्हाळी पेय ,उन्हाळा चालू झाला कि काहीतरी थंडगार खाव प्यावं वाटतच ना, अशीच काही थंडगार उन्हाळी पेय आज आपण या लेखात बघणार आहोत . उन्हाळा सुरु झाला कि वातावरणातील उष्णता तर वाढतेच पण त्या बरोबर शरीरात देखील उष्णतेचे प्रमाण वाढते . खूप जणांना उष्णतेचा भयंकर त्रास होतो, शरीरात उष्णता वाढली कि नाकातून रक्त येणे , डोक्याची किवा मग तळपायांची आग होणे , छातीत किंवा संपूर्ण शरीरात जळजळ होणे असे अनेक त्रास दिसून येतात .उन्हाळ्यात खूप जास्त प्रमाणात घाम येतो त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळेच Dehydration चा पण खूप त्रास होतो. शरीरात पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी सतत पाणी पिणे गरजेचे असते . पण प्रत्येक वेळी नुसते पाणी पिणे शक्य होत नाही .त्यामुळे विविध सरबत , ज्युस , रस यांच्या सेवनाने शरीरात पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी मदत होते . म्हणूनच बनवायला सोपे असे काही उन्हाळी पेय आज आपण Summer Drinks In Marathi | उष्णतेवर मात करण्यासाठी सर्वोत्तम उन्हाळी पेय या लेखात बघणार आहोत . लेख वाचा जी उन्हाळी पेय तुम्हाला आवडतील ती घरी बनवून आणि पिऊन बघा आणि हि माहिती आपल्या प्रियजनांनबरोबर शेअर करा .
Summer Drinks In Marathi | उष्णतेवर मात करण्यासाठी सर्वोत्तम उन्हाळी पेय
आपण Summer Drinks In Marathi | उष्णतेवर मात करण्यासाठी सर्वोत्तम उन्हाळी पेय लेखात खालील काही पेयां बद्दल माहित घेणार आहोत .
१) सब्जाचे पाणी :
सब्जा नाव घेतला तरी आपल्या डोळ्यासमोर फालुदा , स्मुदी , ज्युस असे शरीराला थंडावा देणारी पेय येतात.सब्जा जस पदार्थांची चव वाढवतो तसेच तो आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप महत्वाचा आहे . साब्ज्याच्या बिया ह्या आकाराने लहान आणि काळ्या रंगाच्या असतात .सब्ज्या मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रथिने असतात . सब्जा पाण्यात भिजवला कि फुगतो आणि मग त्यानंतर त्याचा वापर करू शकतो . सब्ज्याच्या पाण्याच्या सेवनाने हाडांचे आरोग्य सुधारते ,पचन शक्ति उत्तम राहते .उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना फायदा होतो . वजन कमी करण्यासाठी मदत होते . उन्हाळ्यात सब्ज्याच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील दाह कमी होतो . सब्ज्याच्या बियाणांमध्ये anti-oxidants असतात ते शरीरातील दाह कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते .
सब्ज्याचे पाणी कसे प्यावे ?
सब्जा किती प्रमाणात खावा याला विशेष काही नियम नाही . सब्जा पाण्यात भिजत घालावा . पाण्यात भिजायला घातल्यावर त्याचा आकार वाढतो . त्यानंतर तुम्हाला गरज असेल तस सरबता मध्ये एक-दोन चमचे भिजलेला सब्जा टाकून सेवन कराव . आपण पाणी पितो त्यात देखील एक चमचा भिजलेला सब्जा टाकून पिला तरी काही हरकत नाही .
२) लिंबाचे सरबत :
उन्हाळ्यातील हे सर्वात साधे आणि सोपे पेय आहे . पाहुणे आले कि हमखास बनविले जाते , आणि बनवायला हि खूपच सोपे आहे . लिंबामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. आणि आपल्या शरीराला विटामिन सी ची खूप गरज असते . शरीरात शीतलता निर्माण करायचे काम लिंबाचे सरबत करते . लिंबू पाणी किंवा लिंबू सरबत अन्न पचन व्हायला देखील मदत करतात .सध्या लिंबू सरबता बरोबरच लिंबू सोडा ही प्रसिद्ध होत आहे. लिंबू सरबत बनवताना त्यात साखर , मीठ, काळे मीठ , जीरा पावडर टाकले कि लिंबू सरबतची चव तर वाढतेच पण त्याच बरोबर सरबताची गुणवत्ता हि वाढते .
३) कैरीचे पन्हे :
उन्हाळा चालू होतो त्याबरोबर चाहूल लागते ती आंब्याची .उन्हाळ्यात कैरी म्हणजेच कच्चा आम मोठ्या प्रमाणात मिळतात त्यामुळे कैरीचे पन्हे उन्हाळ्यात पिणे खास असते . कैरीचे पन्हे शरीरात थंडावा निर्माण करते त्याच बरोबर मनाला ताजेतवाने देखील करते .
कैरीचे पन्हे बनविण्यासाठी लागणारे साहित्य :
१) कच्ची कैरी
२) गुळ – १ वाटी
३) वेलची पावडर – १/२ टी स्पून
कैरीचे पन्हे बनविण्याची कृती :
१) कैरी स्वच्छ धुवून कुकर मध्ये शिवून घ्या .२ शिट्ट्या मध्ये कैरी शिजते .
२)थंड झाल्यावर कैरीचे साल काढून घ्या .
३)हाताने संपूर्ण कैरीचा पल्प बाजूला करा .
४) १ वाटी कैरीचा पल्प घ्या त्यात एक वाटी गुळ मिक्स करा .शक्यतो हातानेच मिक्स करा .
५)१/२ टी स्पून वेलची पावडर टाका .चांगले मिक्स करून घ्या .तयार मिश्रण गाळणीने गाळून घ्या म्हणजे गुळाचे काही मोठे खडे असतील तर ते बाजूला होतील .
६) हा कैरीचा पल्प हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवू शकता .
७) कैरीचे पन्हे बनवताना ग्लासात एक -दोन चमचे कैरीचा पल्प घ्या त्यात पाणी किंवा बर्फ घालून चांगले मिसळा आणि सर्व्ह करा .
Summer Drinks In Marathi | उष्णतेवर मात करण्यासाठी सर्वोत्तम उन्हाळी पेय
४) लस्सी :
लस्सी हे खूप जणांचे आवडते पेय आहे . लस्सी हि दह्यापासून बनविली जाते . दह्यात पाणी , साखर टाकून मिक्स करून लस्सी बनविली जाते . लस्सी शरीराला फक्त थंडावाच देते नाही तर ताजेतवाने देखील करते. दही आपल्या शरीरातील आतड्यांचे आरोग्य सुधारते तसेच पचन क्रिया सुधारायला देखील मदत करते .
लस्सी बनविण्यासाठी लागणारे साहित्य :
१) दही
२) पाणी
३) मलई
४)साखर
लस्सी कशी बनवावी ?
१) एका भांड्यात दही घ्या , दही रवीने चांगले घोसळून (फेटून ) घ्या. त्यात साखर घाला आणि परत एकदा मिक्स करा .
२) आता भांड्यात एक ग्लास भर पाणी टाका आणि मिक्स करा .
३)ग्लासात लस्सी घ्या त्यावर मलई घाला आणि सर्व्ह करा . आवडत असतील तर ड्राय फ्रुट घालू शकता .
५) मठ्ठा :
Summer Drinks In Marathi | उष्णतेवर मात करण्यासाठी सर्वोत्तम उन्हाळी पेय या लेखात आपण बघणार आहोत कि मठ्ठा , ताक , लस्सी हे सगळे दह्यापासून बनविले जाणारे पेय आहेत . हे पेय आपण फक्त उन्हाळ्यातच नाही तर इतर वेळी देखील पिऊ शकतो त्यामुळे शरीराला फायदाच होतो . दह्यामुळे पचन शक्ती सुधारायला मदत होते . शरीरात थंडावा निर्माण होतो .तसेच उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे मठ्ठा , ताक , लस्सी हे पेय शरीरातील पाण्याची योग्य पातळी ठेवण्यास मदत करतात .
मठ्ठा बनविण्यासाठी लागणारे साहित्य :
दही
१/२ इंच आलं
२ हिरव्या मिरच्या
१/२ टी स्पून जीरा पावडर
१/२ टी स्पून चाट मसाला
१/२ टी स्पून काळ मीठ
१/२ टी स्पून कोथांबीर
१ टी स्पून साखर
मीठ चवीनुसार
मठ्ठा बनविण्याची कृती :
१) दह्यात पाणी टाकून रवीच्या मदतीने चांगले मिक्स करून त्याचे ताक बनवून घ्या .
२) आलं ,मिरच्या , कोथिंबीर यांचो पेस्ट करून घ्या . पेस्ट मध्ये पाणी घालून ती पेस्ट गाळून ताकात टाका म्हणजे मठ्ठा पिताना आलं मिरचीचे तुकडे दाताखाली येणार नाही .
३)चवीनुसार मीठ, साखर टाका, जीरा पावडर, चाट मसाला , काळ मीठ टाकून मिक्स करा .
४)वरतून थोडी कोथिंबीर टाकून मठ्ठा सर्व्ह करा .
वजन कमी करायचा विचार करताय मग हे हि वाचा https://marathisampada.com/best-weight-loss-tips-for-men-and-women/
६) पियुष :
हे महाराष्ट्राचे पारंपारिक पेय आहे . उन्हाळा सुरु झाला कि महाराष्ट्रीयन कुटुंबांमध्ये पियुष हमखास बनविले जाते . ताकापासून बनविले जाते त्यामुळे दह्याचे शरीराला जे जे फायदे होतात ते सर्व फायदे पियुष हे पेय पिल्यामुळे देखील मिळतात . ह्या उन्हाळ्यात आपल्या घरी पियुष बनवून नक्की प्या . पियुष बनविण्याची कृती खाली दिलेली आहे .
पियुष बनविण्यासाठी लागणारे साहित्य :
२ कप ताक
३/४ चमचे पिठी साखर
१/२ कप केशर श्रीखंड (तुम्हाला आवडेल ते श्रीखंड घ्या )
१/२ टी स्पून वेलची पावडर
१/२ टी स्पून ड्राय फ्रुट पावडर
पियुष बनविण्याची कृती :
१) एका भांड्यात ताक घ्या , पिठी साखर श्रीखंड घालून चांगले मिक्स करा .
२)वेलीची पावडर , ड्राय फ्रुट पावडर टाकून परत एकदा मिक्स करा .
३)पियुष तयार आहे . सर्व करण्यापूर्वी फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्या .
७) जल जीरा सरबत :
पाणी ,जिरे ,पुदिना ,लिंबू वापरून बनविले जाणारे हे सरबत उन्हाळा लागला कि आपण हमखास करून पितो.ह्या सरबतामध्ये वापरला जाणारा प्रत्येक घटक शरीराला फायदेशीरच आहे .जिरे पचन शक्तीला मदत करते . पुदिना शरीरातील जळजळ कमी करते , लिंबू शरीरात थंडावा निर्माण करते . त्यामुळे उन्हाळ्यात जलजीरा सरबत पिणे फायद्याचे ठरते .
जल जीरा सरबत बनविण्यासाठी लागणारे साहित्य :
पाणी
जीरा पावडर
पुदिना
कोथिंबीर
हिरवी मिरची
आलं
काळी मिरी पावडर
चाट मसाला
काळे मीठ
लिंबू
मीठ
जलजीरा सरबत बनविण्याची कृती :
१) कोथिंबीर, पुदिना, आलं , हिरवी मिरची, काळे मीठ, काळी मिरी एकत्र करून मिक्सर मध्ये बारीक करून घ्या .स्मूथ प्युरी तयार करा .
२) एक भांडे घ्या त्यात हि तयार चटणी घाला ,त्यात आवश्यकतेनुसार थंड पाणी घाला .लिंबाचा रस , मीठ घालून सर्व्ह करा जलजीरा सरबत .
Summer Drinks In Marathi | उष्णतेवर मात करण्यासाठी सर्वोत्तम उन्हाळी पेय
८) फळांचे ज्युस :
१) उसाचा रस :
उन्हाळा चालू झाला कि रस्त्याच्या कडेने आपल्याला उसाची गुऱ्हाळे बघायला मिळतात .लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यानाच उसाचा रस खूपच आवडतो . उसाचा रस प्यायल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते . तसेच उसाचा रस शरीरातील पाण्याची योग्य पातळी ठेवण्यास मदत करतो . शरीरात थंडावा निर्माण करायचं काम देखील उसाचा रस करतो .
२) नारळ पाणी :
नारळ पाणी हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट आहे त्यामुळे अशक्तपणा आलं कि डॉक्टर आपल्याला नारळ पाणी प्या असा सांगतात . उन्हाळ्यात शरीरात निर्माण होणारी पाण्याची कमतरता भरून काढण्याच काम नारळ पाणी करते. नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत .
३) संत्री / मोसंबी ज्युस :
संत्री/ मोसंबी मध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे संत्र्याच्या ज्युस चा शरीराला फायदाच होतो . शरीराला ताजेतवाने करायचे काम संत्री मोसंबीचा ज्युस करते .
४) कलिंगड ज्युस :
कलिंगड मिक्सर मध्ये बारीक करून त्याचा ज्युस बनवू शकतो. कलिंगड मध्ये पाण्याचे प्रमाण खूप असल्यामुळे उन्हाळ्यात कलिंगड खाणे फायद्याचे ठरते .कलिंगड ज्युस बनविताना त्यात लिंबाचा रस आणि बर्फ देखील घालू शकतो.
५) लीची ज्युस :
लीची मध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात असते, त्याच बरोबर इतर फळांच्या तुलनेत ह्या फळात जास्त पोषण मुल्ये आहे .लीची च्या ज्युस मध्ये सोडा किंवा पुदिन्याची पाने टाकून ज्युसची चव अजून वाढवू शकतो.
६) Strowberi juice:
Strowberi मध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. तसेच फोस्फारस चे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असते . त्यामुळे उन्हाळ्यात Strowberi juice पिणे फायद्याचे ठरते .
Summer Drinks In Marathi | उष्णतेवर मात करण्यासाठी सर्वोत्तम उन्हाळी पेय या लेखात आपण अनेक उन्हाळ्यात घरी सहज बनविता येतील अशी उन्हाळी पेय बघितली . यातील तुम्हाला वाढतील ती पेय ह्या उन्हाळ्यात घरी बनवून बघा , पिऊन बघा , आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा . धन्यवाद .