Summer Diet Tips In Marathi | उन्हाळ्यातील आहार

Summer Diet Tips In Marathi | उन्हाळ्यातील आहार, मार्च महिन्यापासूनच उन्हाळा सुरु झालाय, वातावरणातील उष्णता अधिक प्रमाणात वाढली आहे . वातावरण जसजसे उष्ण व्हायला लागते तसतसे शरीर जास्तच आळशी होत जाते कोणतेही काम करायची इच्छा होत नाही ,मसालेदार , चमचमीत ,तेलकट पदार्थांकडे तर बघू नये असाच वाटत हो ना ? उन्हाळ्यात खाण्याची इच्छा देखील खूप कमी होते. रोज जे पदार्थ खातो ते पण नकोसे वाटतात . उन्हाळ्यात उष्णतेमुळे द्रव पदार्थ जास्त प्रमाणात प्यायले जातात त्यामुळे भुक मंदावते आणि जेवण करायची इच्छा कमी होते .

उन्हाळ्यातील आहार कसा असावा , आहारात कोणते बदल करायला हवेत ,कोणत्या पदार्थांमुळे किंवा कोणत्या पेयांमुळे शरीराला थंडावा मिळेल ,तुमच्या अशा अनेक प्रश्नांना मी Summer Diet Tips In Marathi | उन्हाळ्यातील आहार या लेखात उत्तर देणार आहे , लेख वाचा लेख आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेयर करा.

Summer Diet Tips In Marathi | उन्हाळ्यातील आहार

१) उन्हाळ्यातील पेयं :

उन्हाळ्यात सतत काही ना काही तरी थंड पित रहावस वाटत . पण नेमके कोणते पेय प्यायचे ज्यांचा शरीराला फायदा झाला पाहिजे .

उन्हाळ्याच्या दिवसांत माठातील थंड पाणी प्यावे .

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी /जळजळ कमी करण्यासाठी पाण्यात सब्जा चे बी टाकून प्यावे .त्यामुळे शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होते .

शरीरात पचन क्रिया सुधारण्यासाठी ताक, मठ्ठा , लस्सी अशा दह्यापासून बनविलेल्या पेयांचे सेवन करावे . पचन क्रिया तर सुधारतेच पण त्याबरोबरच शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होते .

जलजीरा पाणी ,लिंबू सरबत ,कोकम सरबत, कैरीचे पन्हे ह्या सारख्या सरबतांमुळे शरीरातील दाह कमी व्हायला मदत होते .

उन्हाळ्याच्या दिवसांत नारळ पाणी , उसाचा रस पिणे देखील खूप फायद्याचे ठरते , शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्याच काम नारळ पाणी आणि उसाचा रस करतो .

उन्हाळ्यात कलिंगड ,टरबूज ,संत्री ,मोसंबी, strawberri , अननस असे अनेक फळ उपलब्ध होतात.उन्हाळ्यात या फळांचा juice घेणे फायद्याचे ठरते .शरीर hydrated राहायला मदत होते .

उन्हाळ्यात कैरीचे पन्हे , ताक , मठ्ठा , लस्सी ,पियुष ,जलजीरा सरबत हि पेय घरी कशी बनवायची या बद्दल सविस्तर माहिती खालील लेखात माहिती दिली आहे नक्की वाचा ,

summer drinks in marathi |सर्वोत्तम उन्हाळी पेय https://marathisampada.com/summer-drinks-in-marathi/

उन्हाळ्यात कोणते कपडे घालावे याबद्दल विचार करताय मग हेही नक्की वाचा summer outfits https://marathisampada.com/summer-outfits-in-marathi/

२) उन्हाळ्यातील पालेभाज्या आणि फळभाज्या :

उन्हाळ्यात पालेभाज्यांची कमतरता असते .उन्हामुळे हिरवा भाजी पाला जास्त प्रमाणात उपलब्ध होत नाही .त्यामुळे मेथी ,पालक ,अंबाडी अशा पालेभाज्या उपलब्ध झाल्या तर त्यांचा आहारात नक्की समावेश करावा .

उन्हाळ्यात फळ भाज्या मिळतात , डांगर ,दुधीभोपळा ,कोबी, फ्लोवेर, सिमला मिरची यासारख्या फळ भाज्यांचा आहारात समावेश असावा .

काकडी, गाजर ,बीट ,टोमॅटो, मुळा कांदा यांची कोशिंबीर बनवून रोजच्या आहारात त्याचा समावेश असावा .

३) उन्हाळ्यातील डाळी आणि धान्य :

उन्हाळ्यात भुक जरी मंदावली असेल तरी पौष्टिक आहार घेणे तितकेच महत्वाचे असते .हिरव्या भाज्या , फळ भाज्यांबरोबरच काही डाळींचा रोजच्या जेवणात समावेश असणे गरजेचे आहे .

उन्हाळ्यात योग्य प्रमाणात सगळ्या प्रकारच्या डाळी खाणे फायद्याचे ठरते .डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात essential nutrients असतात त्याच प्रमाणे calcium , phosphorus ,iron देखील असते . डाळीं मध्ये fibers देखील असतात त्यामुळे पचन क्रिया सुधारते .

कोणतीही डाळ बनविताना डाळ थोड्या वेळासाठी भिजवून ठेवली आणि मग शिजवली तर त्या डाळीचा कोणताही त्रास होत नाही .

तुरडाळ , उडीद डाळ ,चना डाळ , मुगाची डाळ आपण रोजच्या जेवणात वापरू शकतो .

नाचणी ,ज्वारी असे थंड प्रवृत्तीचे धान्य उन्हाळ्यात खाणे फायद्याचे ठरते नाचणी ,ज्वारी पासून तुम्ही डोसा किंवा भाकरी बनवून शकता .

उन्हाळ्यात दहीभात खाणे पोटासाठी उत्तम असते .दुपारच्या जेवणात किंवा चार ते सहाच्या दरम्यान तुम्ही दहीभात खाऊ शकता .दहीभाताने पचनक्रिया सुधारते .रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राहते .

Summer Diet Tips In Marathi | उन्हाळ्यातील आहार

४) उन्हाळ्यातील सुकामेवा :

उन्हाळ्यात सुकामेवा खाऊ नये असेच सांगितले जाते कारण सुक्यामेव्यामध्ये खूप प्रमाणात उष्णता असते .उन्हाळ्यात आधीच खूप उष्णता असते आणि उष्णता असलेले पदार्थांचे जर आपण सेवन केले तर शरीराला त्रास होईल .त्यामुळे सुकामेवा खाताना जरा बेतानेच खावा .

उन्हाळ्यात मनुके ,अंजीर, बदाम खायला काहीच हरकत नाही . मनुके ,अंजीर, बदाम शक्यतो रात्री पाण्यात भिजवून सकाळी खावे .

उन्हाळ्यात तुम्ही खजूर देखील खाऊ शकता . खजूर तसेच किंवा भिजवून खाल्ले तरी चालते .

एकंदरीतच उन्हाळ्यात सुकामेवा खा पण जरा जपून .

५) उन्हाळ्यातील कडधान्य :

उन्हाळ्यात भाजी पालाच मिळत नाही त्यामुळे कडधान्य तर खावेच लागते . उन्हाळ्याच्या दिवसांत कडधान्यांना मोड लवकर आणि चांगल्या प्रकारे येतात . कड धान्य शरीराला प्रोटीन पुरविण्याचे काम करतात त्यामुळे स्नायू बळकट व्हायला मदत होते .

मुग ,मठ ,मटकी ,हरभरे अशी कड धान्य मोड आणून तुम्ही खाऊ शकता .

तुम्ही कडधान्यांची भाजी बनवा किंवा कडधान्यांचे चाट बनवून देखील खाऊ शकता . फक्त उन्हाळ्यातच नाही तर इतर दिवसांत हि असे कडधान्यांचे चाट करून खाऊ शकता. कडधान्यांचे चाट बनविताना त्यात कांदा , टोमॅटो, कोथिंबीर ,लिंबू आणि चाट मसाला घाला यामुळे त्याची चव अजूनच वाढेल .

६) उन्हाळ्यात हे पदार्थ नक्कीच खा :

१) व्हेज सॅंडविच :

रोजची पोळी भाजी ,भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर व्हेज सॅंडविच नक्कीच ट्राय करा . बनवून तर पटकन होईल तसेच पोट पण भरेल .व्हेज सॅंडविच बनविताना ब्रेड मध्ये काकडी ,बटाटा, बीट, टोमॅटो घाला आणि झटपट सॅंडविच सर्व्ह करा .

२) कढी (ताकाची कढी ):

ताकाची कढी हा उन्हाळ्यातील जेवणासाठी बेस्ट ऑप्शन आहे .कढी आपण पोळी,भातासोबत खाऊ शकतो .कढी खाल्यानंतर ताजेतवाने तर वाटतेच पण पोट सुद्धा जड वाटत नाही .

३) सोलकढी :

ताकाच्या कधी प्रमाणेच सोलकढी देखील उन्हाळ्यातील जेवणासाठी उत्तम ऑप्शन आहे .कोकम आणि नारळाच्या दुधापासून बनवलेली सोलकढी खूपच पौष्टिक असते .कोकम मुळे शरीराला थंडावा मिळतो ,पचन चांगले होते. त्यामुळे ह्या उन्हाळ्यात सोलकढी नक्की बनवून खा.

४) मुग डाळीचा डोसा :

रोज रोज वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर मुग डाळीचा डोसा नक्कीच ट्राय करा .मुग डाळीचा डोसा बनवायला तर सोपा आहे त्याच बरोबर पौष्टिकही आहे .हा डोसा चटणी किंवा मग सांबर बरोबर खाऊ शकता .

५) कोकम सरबत :

आंबट चव असणारे कोकम पचन क्रिया सुधारायलाही मदत करते. कोकम सरबत पिल्याने शरीरात electrolyte balance राखले जाते . त्यामुळे उन्हाळ्यात रोज कोकम सरबत आवश्यक प्यावे .

६) दहीभात :

उन्हाळ्यात दहीभात खाणे पोटासाठी उत्तम असते . उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात किंवा चार ते सहाच्या दरम्यान तुम्ही दहीभात खाऊ शकता .दहीभाताने पचनक्रिया सुधारते .रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राहते .

७) गुलकंद :

शरीरात नैसर्गिक थंडावा निर्माण करायचे काम गुलकंद करतो .गुलकंद गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार कला जातो. रात्री झोपायच्या आधी दुधातून गुलकंद घेतले तर शांत झोप लागते .

८) दहीवडा :

दहीवडा खाल्याने शरीराला तर थंड वाटते त्याबरोबर पोट देखील भरते . दह्यामुळे पचन क्रिया सुधारते .शरीरातील उष्णता कमी होते ,त्यामुळे उन्हाळ्यात दहीवडा नक्की खा

९) आंबा :

उन्हाळा चालू झाला कि आंब्याचा सिझन देखील चालू होतो .आंबा रोज पण मर्यादित प्रमाणात खावा असे तज्ञ सांगतात . आंब्यामुळे शरीराला अनेक मुबलक जीवनसत्वे मिळतात . शरीरात ऊर्जा निर्माण करायचं काम आंबा करता असतो . त्यामुळे उन्हाळ्यात आंबा खा पण प्रमाणातच .

Summer Diet Tips In Marathi | उन्हाळ्यातील आहार

उन्हाळ्यात कोणते पदार्थ खाणे टाळले पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे :

७) उन्हाळ्यात हे पदार्थ खाणे टाळावे :

Summer Diet Tips In Marathi

उन्हाळ्यात फीज मधले पाणी पिणे टाळावे .

उन्हाळ्यात अति प्रमाणात सुकामेवा खाणे टाळावे .

उन्हाळ्यात पचायला जड असे मांसाहारी अन्न (चिकन ,मटन ,अंडी )खाणे टाळावे .

उन्हाळ्यात मसालेदार पदार्थ खाणे टाळावे .

उन्हाळ्यात तेलकट, तुपकट ,तिखट पदार्थ खाणे टाळावे .

उन्हाळ्यात बाजरी हे धान्य खाणे टाळावे .बाजरी प्रवृतीने उष्ण असते .

आईस क्रीम , विविध शीतपेय यांचे अति प्रमाणात सेवन करू नये .

उन्हाळ्यात रसदार फळे उपलब्ध असतात त्यांचे अति प्रमाणात सेवन करू नये .

८) निष्कर्ष :

Summer Diet Tips In Marathi | उन्हाळ्यातील आहार या लेखात उन्हाळ्यात कोणते पदार्थ खावे कोणते पदार्थ खाऊ नये याबद्दल मी माहिती दिली .माहित आवडली असेल तर आम्हाला नक्की कळवा .आणि तुमच्या प्रियजनांना मित्रा मैत्रिणींना नक्की पाठवा त्यांनाही फायदा होईल. धन्यवाद

९) FAQ (Summer Diet Tips In Marathi | उन्हाळ्यातील आहार)

१) उन्हाळ्यात कोणते पदार्थ खाणे टाळावे ?

ans : शरीरात उष्णता वाढवणारे पदार्थ जसे कि चिकन ,मटन ,अंडी ,मसालेदार भाज्या ,सुकामेवा हे पदार्थ उन्हाळ्यात खाणे टाळावे .

२) उन्हाळ्यात किती ग्लास पाणी प्यावे ?

ans : उन्हाळ्यात १२-१५ ग्लास पाणी प्यावे .

३) उन्हाळ्यात कोणते सरबत प्यावे ?

ans: उन्हाळ्यात लिंबू सरबत, कोकम सरबत , कैरीचे पन्हे , ताक .लस्सी ,मठ्ठा यासारखी पेय प्यावी.

४) उन्हाळ्यातील पौष्टिक पदार्थ कोणते ?

ans: दहीभात , कढी, सोलकढी , मुग डाळ डोसा ,ज्वारी, नागलीची भाकरी तसेच लिंबू सरबत, कोकम सरबत , कैरीचे पन्हे , ताक .लस्सी ,मठ्ठा हे पौष्टिक पदार्थ उन्हाळ्यात खाऊ शकतो .

५) उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी कशी करावी ?

ans : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सब्जाचे पाणी पिऊ शकता . त्याच बरोबर जेवणात दह्याचा समावेश करावा . मसालेदार पदार्थांचे सेवन टाळले तर शरीरातील उष्णता कमी ह्वायला मदत होते. तसेच ज्या पदार्थांची प्रवृत्ती उष्ण असते असे पदार्थ उन्हाळ्यात खाऊच नये.