Sukanya Samriddhi Yojana 2024 In Marathi | सुकन्या समृद्धी योजना २०२४

Sukanya Samriddhi Yojana 2024 In Marathi | सुकन्या समृद्धी योजना २०२४, ही केंद्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे.22 जानेवारी 2015 पासून सुकन्या समृद्धी योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलीच्या उत्तम भविष्याची तरतूद करून ठेवू शकतात. एकविसाव्या शतकात आपण आहोत तरीदेखील घरात मुलीचा जन्म झाला तेव्हापासून मुलीच्या वडिलांना तिच्या भविष्याची चिंता सतावत असते. मुलीचे शिक्षण, आरोग्य, पुढे जाऊन तिचं लग्न या सगळ्यासाठी लागणारा खर्च हा अधिकच असतो. हा खर्च भागवण्यासाठी मुलीचे वडील एफडी, एसआयपी, नॅशनल सेविंग स्कीम यासारख्या अनेक ठिकाणी गुंतवणूक करतात. परंतु या सगळ्या गुंतवणुकीत व्याजदर तितकासा चांगला मिळत नाही. मुलीच्या वडिलांच्या डोक्यावरील खर्चाचा हा भार थोडा हलका करण्यासाठी केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना राबवली आहे. सुकन्या समृद्धी योजना व्याजदर योग्य प्रमाणात देते त्याचप्रमाणे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देखील देते.

सध्याच्या काळात मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या लग्नासाठी वडिलांना सुरुवातीपासूनच आर्थिक नियोजन करणे गरजेचे असते. मुलगी जन्माला आल्याबरोबर तिच्यासाठी आर्थिक गुंतवणूक केली तर वयाच्या 21 व्या वर्षी एक उत्तम रक्कम त्या कुटुंबाच्या हातात असेल. त्या रकमेचा उपयोग मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी करता येऊ शकतो. महागाईचा विचार सुरुवातीपासूनच अशी गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केल्यामुळे मुलींना चांगले आणि सुरक्षित भविष्य मिळेल.

सुकन्या समृद्धी योजनेत मुलीचे वडील किंवा मुलीचे पालक तिचा जन्म झाल्यापासून ते 21व्या वयापर्यंत गुंतवणूक करू शकतात. समृद्धी योजनेत खाते उघडण्यासाठी काही वयोमर्यादा ठरवून दिलेले आहे. त्यात मुलीचा जन्म झाल्यापासून म्हणजे शून्य वयापासून मुलगी 10 वर्षाची होण्यापूर्वी मुलीचे पालक कधीही खाते उघडू शकतात. खाते उघडण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळील पोस्ट ऑफिसला जाऊ शकतात किंवा बँकेत जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडू शकता .सुकन्या समृद्धी योजनेत केलेल्या गुंतवणूकी मुळे पालकांना करात सवलत देखिल मिळू शकते.सुकन्या समृद्धी योजना आयटी कायदा 1961 च्या कलम 80 सी अंतर्गत करात सवलत देते.या लेखात आपण सुकन्या समृद्धी योजना २०२४ या योजनेची सविस्तर माहिती बघणार आहोत .योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो,खाते कसे उघडायचे, किती वर्ष गुंतवणूक करावी लागेल.सुकन्या समृद्धी योजनेचा मॅच्युरिटी कालावधी किती असेल, मॅच्युरिटी कालावधी च्या आधीच सुकन्या समृद्धी योजनेचे खते बंद करू शकतो का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखात आपण बघणार आहोत .लेख महत्वपूर्ण आहे आपल्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा .

Table of Contents

Sukanya Samriddhi Yojana 2024 In Marathi | सुकन्या समृद्धी योजना २०२४

Sukanya Samriddhi Yojana 2024 In Marathi

योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मुलीचे पालक आणि मुलगी या दोघांनाही होतो.

सुकन्या समृद्धी योजनेची पात्रता:

1) मुलगी भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.

2) मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असावे.

3) तुम्ही मुलीचे पालक असणे आवश्यक आहे किंवा तुम्ही मुलीचे कायदेशीर पालक असणे आवश्यक आहे.

4) एका मुलीसाठी एक खाते उघडू शकता.

5) दोन मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेचा फायदा घेऊ शकतात. परंतु जुळ्या मुलींचा जन्म झाल्यास तुम्ही तीन मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेचा फायदा घेऊ शकतात.

सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज कसा करावा

1) तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस ला किंवा अधिकृत बँकेच्या शाखेत जा.

2) सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्यासाठी फॉर्म घ्या.

3) फॉर्म वाचून व्यवस्थित भरा आणि फॉर्म सोबत आवश्यक कागदपत्रांची जोडणी करा.

4) सुकन्या समृद्धी योजनेत खाते चालू करण्यासाठी पहिले डिपॉझिट करा. पहिले डिपॉझिट करण्यासाठी तुम्ही चेक, डिमांड ड्राफ्ट किंवा कॅश डिपॉझिट करू शकता.

5) तुमचे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडले गेले आहे .नवीन खात्याचे नवीन पासबुक तुम्हाला मिळेल. त्यात दर महिन्याचा खात्याचा तपशील असेल.

Sukanya Samriddhi Yojana 2024 In Marathi | सुकन्या समृद्धी योजना २०२४ आवश्यक कागदपत्रे:

मुलीच्या जन्माच्या दाखल्याच्या प्रमाणपत्राची प्रत

मुलीचे पालक असल्याचा किंवा कायदेशीर पालक असल्याचा पुरावा

रहिवासी दाखला

दोन किंवा तीन मुलींचा एकाच वेळी जन्म झाल्यास, संबंधित डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र

सुकन्या समृद्धी योजना किती गुंतवणूक करू शकतो?

1) सुकन्या समृद्धी योजनेत एका आर्थिक वर्षात कमीत कमी 250 रुपये जमा करणे आवश्यक आहे.

2) सुकन्या समृद्धी व योजनेत एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये गुंतवणूक करू शकतो.

3) या योजनेत दर महिन्याला 12500 रुपये जमा करता येतात.

सुकन्या समृद्धी योजनेत किती व्याज मिळते?

सुकन्या समृद्धी योजनेत ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठी सरकार 7.6 टक्के इतके व्याज देते. सुकन्या समृद्धी योजनेत प्रत्येक महिन्याच्या पाचव्या दिवसाच्या शेवटी आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेला व्याज दिले जाते. आर्थिक वर्षाच्या शेवटी हातात शिल्लक असलेल्या रकमेवर व्याज दिले जाते.

सुकन्या समृद्धी योजनेचा मॅच्युरिटी कालावधी:

1) सुकन्या समृद्धीचा मॅच्युरिटी कालावधी हा मुलीच्या वयाच्या 21व्या वर्षी आहे.

2) सुकन्या समृद्धी योजनेत तुम्हाला जास्तीत जास्त 14 वर्षापर्यंत गुंतवणूक करावी लागते.

3) सुकन्या समृद्धी योजनेत 14 वर्षानंतर पुढील सात वर्षे जमा झालेल्या रकमेवर सरकार व्याज देते अशा परिस्थितीत तुम्ही गुंतवणूक केल्यास तीन पट फायदा होऊ शकतो.

4) मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तुम्ही 50% रक्कम काढू शकतात.

5) मुलगी 21 वर्षा ची झाल्यानंतर तुम्हीच संपूर्ण रक्कम काढू शकतात.

सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातून कधी व किती रक्कम काढू शकतो?

1)सुकन्या समृद्धी योजनेत मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेतून 50%पैसे काढता येतात.

    2) सुकन्या समृद्धी योजनेत मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेतून संपूर्ण रक्कम काढू शकतात.

    3) पैसे काढताना काही नियम व अटी आहेत, त्यात तुम्ही वर्षातून एकदा एक रकमी पैसे काढू शकता किंवा हप्त्यांमध्ये पैसे काढू शकतात.

    4) सुकन्या समृद्धी योजनेत खातेदाराचा अचानक मृत्यू झाल्यास खात्यातील रक्कम खातेदाराच्या पालकांना नॉमिनी ला दिले जाते.

    सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कधी बंद होते?

    1) सुकन्या समृद्धी योजनेत जेव्हा मुलगी 18 वर्षांची होते किंवा तिचं लग्न होते त्यावेळी सुकन्या समृद्धी योजनेचे खाते बंद होते.

    2) सुकन्या समृद्धी योजनेत खातेदाराचा अचानक मृत्यू झाल्यास खाते बंद होते.

    निष्कर्ष:

    Sukanya Samriddhi Yojana 2024 In Marathi | सुकन्या समृद्धी योजना २०२४ केंद्र सरकारने मुलींच्या भविष्यासाठी त्यांच्या पालकांना आर्थिक स्वावलंबन निर्माण करण्याच्या हेतूने उचललेले एक पाऊल आहे. या लेखात आपण सुकन्या समृद्धी योजनेची संपूर्ण माहिती बघितली. लेखातील ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त मुलींच्या पालकांपर्यंत इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेख आपल्या जवळील प्रियजनांना नक्की शेअर करा. लेखा आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.

    FAQ:

    1) Sukanya Samriddhi Yojana 2024 In Marathi योजनेचे खाते ऑनलाइन उघडता येते का?

    ans: समृद्धी योजनेचे खाते ऑनलाईन उघडता येत नाही. खाते उघडण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा तुमच्या जवळील अधिकृत बँकेत जावे लागेल.

    2) Sukanya Samriddhi Yojana 2024 In Marathi योजनेचा कालावधी किती आहे?

    ans: सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी हा 21 वर्षांचा आहे.

    3) सुकन्या समृद्धी योजनेत किती वर्षापर्यंत गुंतवणूक करावी लागते?

    ans: सुकन्या समृद्धी योजनेत 14 वर्षापर्यंत गुंतवणूक करावी लागते.

    4) सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कधी उघडू शकतो?

    ans: सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मुलीच्या जन्मानंतर म्हणजे शून्य वया पासून ते मुलगी 10 वर्षाची होईपर्यंत खाते उघडू शकतो.

    5) सुकन्या समृद्धी योजनेत कमीत कमी किती गुंतवणूक करू शकतो?

    ans: सुकन्या समृद्धी योजना कमीत कमी 250 रुपये इतकी गुंतवणूक करू शकतो.

    6) सुकन्या समृद्धी योजनेमुळे करात काही सूट मिळते का?

    ans: सुकन्या समृद्धी योजना आयटी कायदा 1961 च्या कलम 80 सी अंतर्गत लागू आहे. त्यामुळे करात सूट मिळू शकते.

    7) सुकन्या समृद्धी योजने च्या खात्यातील रक्कम कधी काढता येते?

    ans: सुकन्या समृद्धी योजनेत मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 50% रक्कम काढू शकतो आणि मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर संपूर्ण रक्कम काढू शकतो.

    8) सुकन्या समृद्धी योजने त किती टक्के व्याज मिळते ?

    ans: सुकन्या समृद्धी योजनेत ७.६ टक्के व्याज मिळते .

    9)सुकन्या समृद्धी योजनेत मुदत पूर्व खाते बंद करू शकतो का?

    ans : होय, सुकन्या समृद्धी योजनेत मुदत पूर्व खाते बंद करू शकतो.

    10) सुकन्या समृद्धी योजना कधी सुरु झाली ?

    ans:सुकन्या समृद्धी योजना 22 जानेवारी 2015 ला सुरु झाली .

    11) सुकन्या समृद्धी योजनेत जास्तीत जास्त किती गुंतवणूक करू शकतो?

    ans: सुकन्या समृद्धी योजना जास्तीत जास्त १.५० लाख रुपये इतकी गुंतवणूक करू शकतो.

    12)सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

    ans :सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे हि आहेत मुलीच्या जन्माच्या दाखल्याच्या प्रमाणपत्राची प्रत, मुलीचे पालक असल्याचा किंवा कायदेशीर पालक असल्याचा पुरावा, रहिवासी दाखला, दोन किंवा तीन मुलींचा एकाच वेळी जन्म झाल्यास, संबंधित डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र.

    हे हि वाचा

    राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/

    अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/

    लखपती दीदी योजना https://marathisampada.com/lakhpati-didi-yojana-2024/

    प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/