Sinhgad (Kondhana) Fort Information In Marathi | सिंहगड (कोंढाणा) किल्ला माहिती

Sinhgad (Kondhana) Fort Information In Marathi | सिंहगड (कोंढाणा) किल्ला माहिती, छत्रपती शिवाजी महारांच्या गड किल्ल्यामधील कोंढाणा हा एक महत्वपूर्ण किल्ला आहे . कोंढाणा किल्याचे नाव सिंहगड का ठेवण्यात आले हे आपण इतिहासात बघितले आहे ,यावर चित्रपट देखील बनविले गेले आहेत . सिंहगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात स्थित आहे . पुण्यापासून नैॠत्य दिशेला २५ km अंतरावर सिंहगड हा किल्ला आहे .समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फुट उंचीवर असलेला हा किल्ल्यावरून पुरंदर ,तुंग , विसापूर ,लोहगड , तोरणा आणि राजगड असा प्रचंड मुलुख दिसतो. सह्याद्री डोंगर रांगेच्या पूर्व शाखेवर असलेल्या भुलेश्वर रांगेवर हा गड आहे . दोन पायऱ्या सारखा दिसणारा खांदकड्याचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा या मुळे सिंहगड किल्ला पुण्यातून कुठूनही पटकन लक्षात येतो

आपण छत्रपती शिवाजी महराजांच्या विविध किल्ल्यांची गडांची माहिती घेत आहोत .आजच्या लेखात असाच एक इतिहासातील महत्वपूर्ण अशा किल्ल्याबद्दल माहिती बघणार आहोत .पुणे स्थित सिंहगडाची माहित खाली प्रमाणे :

Sinhgad (Kondhana) Fort Information In Marathi | सिंहगड (कोंढाणा) किल्ला माहिती

सिंहगडचा इतिहास

सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव होते कोंढाणा . कौडण्य ॠषी यांनी ह्या डोंगरावर तपश्चर्या केली म्हणून या गडाचे नाव कोंढाणा झाले असे स्थानिक महादेव कोळी लोक सांगतात . हा किल्ला सुरुवातीपासूनच महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता .

इसवीसन १३६० मध्ये दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याने दक्षिण स्वारी केली . मंगोल आक्रमाना पासून सुरक्षित राहण्यासाठी त्याने राजधानी देवगिरी येथे हलवली .परंतु त्यावेळी या भागात कोळी राजांचे वर्चस्व होते . त्यावेळी त्याचात आणि स्थानिक कोळी राजांमध्ये मोठे युद्ध झाले. पुढे कोळी राजे जनतेला घेऊन या किल्ल्यात आश्रयाला आले जवळजवळ एक वर्षभर त्यानी हा किल्ला लढवला .त्यांचा हा पराक्रम बघून सुलतान चकित झाला . पुढे निजामशाही पर्यंत हा किल्ला महादेव कोळी सामंताकडे होता .

त्या नंतर हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता .दादोजी कोंडदेव हे या किल्ल्याचे सुभेदार होते .इसवीसन १६४७ मध्ये त्यांनी आपले लष्करी केंद्र बनविले. पुढे इसवीसन १६४९ मध्ये शिवाजी रजनी शहाजी राजांची सुटका करण्यासाठी हा किल्ला आदिलशहाला परत दिला . पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाणा हा एक किल्ला होता. उदेभान राठोड ला मोगलांनी कोंडाण्याचा सुभेदार म्हणून नेमला होता . मुळातच राजपूत असले उदेभान याने मुस्लीम धर्म स्वीकारला होता .

सिंहगड नावाचा इतिहास

शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आले तेव्हा त्यांनी गेलेले सगळे किल्ले परत मिळवायला सुरुवात केली . त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांनी कोंढाणा किल्ला आपल्या ताब्यात नाही याची खंत व्यक्त केली ,तो आपल्या ताब्यात यावा अशी इच्छा बोलून दाखवली . या किल्ल्यावर चढाई करण्याचा विचार चालू असतानाच शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे तेथे आले आणि त्यांनी हि चढाई मी करतो असे शिवाजी महाराजांना सांगितले .या चढाईत तानाजी मालुसरे यांच्या सोबत त्यांचे बंधू सूर्याजी मालुसरे आणि ५०० मावळे होते . या चढाईत तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. तानाजी मालुसरे यांनी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन गड जिंकला. त्यावेळी शिवाजी महाराजांनी “गड आला पण सिंह गेला” आहे वाक्य उच्चारले . म्हणूनच या किल्ल्याला सिंहगड नाव दिले असे इतिहास सांगतो .

Sinhagad (Kondhana) Fort Information In Marathi

गड किल्ल्यांची काळजी कशी घ्यायची आणि शिवनेरी किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती या लेखात वाचा https://marathisampada.com/chhatrapati-shivaji-maharaj-fort-in-marathi/

सिंहगडावरील प्रेक्षणीय स्थळे

१) दारूचे कोठार :

दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच आहे दारूचे कोठार .

२) टिळक बंगला :

सिंहगडावर बाळ गंगाधर टिळक यांचाही बंगला आहे .महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची याच बंगल्यात १९१५ साली भेट झाली होती .

३) कोंढाणेश्वर मंदिर :

हे यादवकालीन शंकराचे मंदिर असून यादवांचे कुलदैवत आहे . मंदिरात एक पिंडी व सांब आहे .

४) देवटाके :

तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताला एक तलाव आहे तेथेच हे देवटाके आहे .पूर्वी आणि आजही या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होतो . महात्मा गांधी जेव्हाजेव्हा पुण्यात येत असत तेव्हा ते या टाक्याचे पाणी मुद्दाम मागवत असत

५) श्री अमृतेश्वर भैरव मंदिर :

कोंढाणेश्वर मंदिरापासून थोडे पुढे गेले कि डावीकडे गडावर अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर आहे .भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे .यादवांच्या आधी या गडावर कोळ्यांची सत्ता होती .मंदिरात भैरव आणि भैरवी अशा दोन मूर्ती आहेत .

६) कल्याण दरवाजा :

गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे .गडाच्या पायथ्याशी असलेल्या कल्याण गावातून गडावर येण्यासाठी हा मार्ग आहे . एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत .वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेले हत्ती आहेत व माहूत अशी दगडी शिल्पे आहेत

७)झुंजार बुरुज :

सिंहगडचे दक्षिण टोक म्हणजे झुंजार बुरुज होय .झुंजार बुरुजावरून समोरच राजगड ,तोरणा खाली पानशेतचे खोरे आणि थोड दूरवर पुरंदर किल्ला दिसतो .

८) तानाजी कडा :

झुंजार बुरुजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने या कडकडे जाता येते .येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढले .

९) राजाराम महाराज स्मारक:

सतत ११ वर्ष मोगलांशी लढणाऱ्या राजाराम महाराजांचे वयाच्या ३० व्या वर्षी सिंहगडावर निधन झाले . राजाराम महाराजांची समाधी गडावर आहे . राजस्थानी पद्धतीचे रंगीत देवाळा सारखा जो घुमट दिसतो तीच छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे .

१०) सुभेदार तानाजींचे स्मारक :

अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने गेल्यावर डाव्या बाजूला सुभेदार तानाजींचे स्मारक आहे . ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारले गेले .दरवर्षी माघ नवमी या दिवशी तानाजींचा स्मृतिदिन साजरा केला जातो.

११) उदेभानाचे स्मारक :

मागलांकडून उदेभानाला सिंहगडचा अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते .दरवाजाच्या मागच्या बाजूस वर गेले असता चौकोनी दगड आहे तेच उदेभानाचे समरक म्हणून ओळखले जाते .

सिंहगड ट्रेक मार्ग :

Sinhgad (Kondhana) Fort Information In Marathi | सिंहगड (कोंढाणा) किल्ला माहिती ,सिंहगडावर ट्रेक ला जाण्याचा विचार करताय मग कोणत्या मार्गाने जायचे हा बद्दल माहिती खाली प्रमाणे :

१) सिंहगडावर जाण्यासाठी दक्षिणेकडून कल्याण दरवाजा आहे .गडाच्या पायथ्याशी कल्याण नावाचे एक छोटेसे गाव आहे तेथून हा दरवाजा आहे .

२)गडाच्या पूर्वेला कोंढणपूर हे एक गाव आहे या गावातून देखील सिंहगडावर जाता येते .या वाटेने थोडी दमछाक होते.

३) उत्तरेकडील खानापूर येथूनही गडावर जाता येते परंतु हा लांब पल्ला आहे .

४) उत्तरेकडील अतकर वाडीचा मार्ग ट्रेकिंगसाठी सर्वात सोपा मार्ग आहे .

ट्रेकचे अंतर : २.७ km

ट्रेकला लागणारा वेळ : २-३ तास

Sinhgad (Kondhana) Fort Information In Marathi | सिंहगड (कोंढाणा) किल्ला माहिती

सिंहगडावर कसे जाल ?

बस सेवा :

पुणे शहरापासून ३५-४० km दूर सिंहगड आहे . पुणे रेल्वे स्टेशन पासून बस ,रिक्षा किंवा खाजगी वाहने सहज उपलब्ध असतात .

पुणे-कोंढाणपूर: पुणे-कोंढाणपूर बसने कोंढाणपूर उतरून कल्याण गावातून कल्याण दरवाजाने गडावर जाता येते .

पुणे दरवाजा : पुणे-सिंहगड या बसने गेले असता या मार्गात तीन दरवाजे पार केल्यावर गडावर प्रवेश करता येतो .पुणे-सिंहगड या मार्गाने जाताना खडकवासला हे धरण लागते .

ट्रेकिंग करायचे असल्यास गडाच्या पायथ्याशी उतरता येते .

गडाच्या मुख्य दरवाज्यापर्यंत वाहने जातात .

थोडक्यात पण महत्वाचे :

आजच्या Sinhgad (Kondhana) Fort Information In Marathi | सिंहगड (कोंढाणा) किल्ला माहिती या लेखात आपण सिंहगड या किल्ल्याची माहिती घेतली .या सुट्टीत महाराष्ट्रातील गड किल्ले बघण्याची योजना नक्की आखा आणि शिवाजी महाराजांचे गड किल्ले एकदा नक्की बघाच ,त्यांचा इतिहास समजून घ्या आणि गड किल्ले बघताना किल्यांवर घाण होणार नाही, पाण्याच्या बाटल्या किल्ल्यांवर टाकू नका ,खाण्याचे पदार्थ इतरत्र फेकू नका याची काळजी घ्या आणि कोणी असे वागत असेल तर त्यालाही असे करण्यापासून रोखा . आपल्या ऐतिहासिक वास्तूंची काळजी घेणा हि आपलीच जबाबदारी आहे हे नेहमी लक्षात ठेवा आणि सर्वाना सांगा .माहिती आवडली असल्यास आम्हाला नक्की कळवा .आणि हि माहित आपल्या प्रियजनांन सोबत नक्की शेयर करा .धन्यवाद

FAQ :Sinhgad (Kondhana) Fort Information In Marathi | सिंहगड (कोंढाणा) किल्ला माहिती

१) सिंहगडाची उंची किती आहे ?

ans : समुद्रसपाटीपासून ४४०० फुट उंचीचा हा किल्ला आहे .

२) सिंहगड कोणत्या दुर्ग प्रकारात मोडतो :

ans : सिंहगड हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारातील आहे .

३) सिंहगडावर बघण्याची ठिकाणे कोणती आहेत ?

ans: सिंहगडावर दारूचे कोठार , टिळक बंगला कोंढाणेश्वर मंदिर, श्री अमृतेश्वर भैरव मंदिर ,देवटाके , कल्याण दरवाजा ,झुंजार बुरुज, तानाजी कडा ,राजाराम महाराज स्मारक, तानाजींचे स्मारक, उदेभानाचे स्मारक असे प्रेक्षणीय स्थळ आपण बघू शकता .

४) सिंहगडावर ट्रेकिंगसाठी जाऊ शकतो का ?

ans: होय , सिंहगडावर ट्रेकिंगसाठी जाऊ शकता.

५) सिंहगडावरील ट्रेक हा कोणत्या ट्रेक प्रकारातील आहे ?

ans: सिंहगडावरील ट्रेक हा मध्यम ह्या ट्रेक प्रकारातील आहे .

६) सिंहगड जिंकण्यासाठी कोणी बलिदान दिले ?

ans: सिंहगड जिंकण्यासाठी सुभेदार तानाजी मालुसरे यांनी बलिदान दिले .

७)सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या भावाचे नाव काय होते ?

ans :सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या भावाचे नाव सूर्याजी मालुसरे होते .

८) सिंहगड किल्ल्याचे प्राचीन नाव काय ?

ans : सिंहगड किल्ल्याचे प्राचीन नाव कोंढाणा असे होते .

९) सिंहगडला किती दरवाजे आहेत ?

ans : सिंहगडला दोन दरवाजे आहेत .

१०) सिंहगड ट्रेक किती किलोमीटर आहे ?

ans: सिंहगड ट्रेक साधारण २.७ किलोमीटर आहे .

११)सिंहगड ट्रेक पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो ?

ans:सिंहगड ट्रेक पूर्ण करण्यासाठी २-३ तास लागतात