Sindhudurg Fort Information In Marathi | सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती

Sindhudurg Fort Information In Marathi | सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांपैकी आज सिंधुदुर्ग या जलदुर्गाची माहिती आपण या लेखात बघणारा आहोत. अरबी समुद्रात असलेला सिंधुदुर्ग हा किल्ला २५ नोव्हेंबर १६६४ रोजी बांधायला सुरुवात केली . २१ जून २०१० रोजी भारत सरकारने सिंधुदुर्ग या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले .

सिधुदुर्ग किल्ला ४८ एकर परिसरात पसरलेला आहे .समुद्रातून होणारी परकीय आक्रमणे रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची उभारणी केली तसेच या किल्ल्यामुळे इंग्रज ,पोर्तुगीज ,डच , फ्रेंच यांच्यावर हि धाक बसला आणि समुद्रात सत्ता स्थापन करून राज्याच्या रक्षणाचे काम सिंधुदुर्ग किल्ल्यामुळे सोपे झाले .

सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास :

छत्रपती शिवाजी महाराजांना भुईकोट किल्ल्या प्रमाणेच जलदुर्गाचे राज्यातील महत्त्व माहित होते परकीय आक्रमणे रोखायची असतील तर समुद्रात देखील आपली गस्त असली पाहिजे हे ते जाणून होते म्हणूनच त्यांनी जलदुर्ग उभारणी साठी चांगले , भक्कम, सुरक्षित स्थळे शोधली त्यातीलच मालवण जवळील एक कुरटे नावाचे काळा खडक असलेले बेट इसवी सन १६६४ साली सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी निवडण्यात आले .

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते तटांची पायाभरणी केली गेली . ३०० पोर्तुगीज कारागीर , ३००० मनुष्यबळ यांनी तीन वर्षे अखंड काम करून १६६७ साली सिंधुदुर्ग हा किल्ला पूर्ण केला. सिंधुदुर्ग हा किल्ला हा ४८ एकर परिसरात पसरलेला असून तटाची उंची ३० फुट तर रुंदी १२ फुट आहे .तटाला भक्कम करण्यासाठी २२ बुरुज बांधले आहेत तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून फक्त तटाच्या बधानीचा खर्च हा ८० हजार होन असून पूर्ण किल्ला बांधायला एक कोटी होन खर्ची पडले . (होन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील चलन आहे . )

Sindhudurg Fort Information In Marathi | सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळे :

१) किल्ल्याचा दरवाजा :

किल्याचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे परंतु या जागी प्रवेशद्वार आहे असे लक्षात येत नाही .तटा जवळ उतरल्यानंतर उत्तरेच्या दिशेने तोंड केले असता एक खिंड दिसते .या खिंडीतून आत गेले असता किल्ल्याचा दरवाजा आहे . दरवाजा बनविण्यासाठी भक्कम अशा उंबराच्या फळ्यांचा वापर केला आहे. उंबराच्या लाकडाबरोबरच सागाच्या लाकडाचाही वापर केला आहे. उंबराचे लाकूड दीर्घकाळ टिकते .

२) गोड्या पाण्याच्या विहिरी :

किल्ल्यावर तीन गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत दही बाव ,दुध बाव , साखर बाव अशी त्या विहिरींची नावे आहेत. (बाव म्हणजे विहीर ) .आजही या विहिरींचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते . किल्ल्याच्या आत गोड पाणी आणि बाहेर खारे पाणी हा निसर्गाचा चमत्कारच आहे हो कि नाही ! त्यामुळे त्या काळी किल्ल्यावर राहणे सुलभ होत असे. किल्ल्यावर एक कोरडा तलाव आहे त्याचा उपयोग पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी होतो .

३) शिवराजेश्वर मंदिर :

छत्रपती राजाराम महाराजांनी आपले वडील छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर या किल्ल्यावर स्थापन केले आहे . शिवाजी महाराजांच्या मूर्ती चे विशेष म्हणजे हि मूर्ती बैठी मूर्ती असून दाढी नसलेला गोलाकार चेहरा आणि कोळ्यांच्या वेशात अशी हि मूर्ती आहे .अशी मूर्ती बाकी कोठेही पहावयास मिळत नाही . महाराजांच्या नोंद असलेल्या तीन तलवारींपैकी तुळजा नावाची तलवार मूर्तीच्या समोर काचेच्या पेटीत ठेवली आहे . किल्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर मंदिर येथे येते .

४) भक्कम तटबंदी :

किल्याला ३ किमी लांब, ९ मीटर उंच , ४ मीटर रुंद अशी भक्कम तटबंदी आहे .समुद्राच्या लता झेलत आजही हि तटबंदी तशीच उभी आहे . काही ठिकाणी दगडाची झीज झालेली दिसतेय.

५) शिवाजी महाराजांच्या हाता-पायांचे ठसे:

किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे बघायला मिळतात . छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातापायाचे ठसे बघून आपण आपोआप नतमस्तक होऊन मुजरा करतो .

६) महादेवाचे मंदिर :

सिंधुदुर्ग किल्ल्यावर महादेवाचे मंदिर आहे .या मंदिरात शिवलिंग तर आहे पण त्याच बरोबर एक शिवकालीन भुयार देखील आहे . भुयाराची लांबी १२ किलोमीटर असून ३ किलोमीटर खोल आहे .हे भुयार गावात निघते असे म्हणतात .

७) किल्ल्यावरील काही वैशिष्ट्य पूर्ण गोष्टी :

गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवायला जागा आहेत .

बंदुका रोखण्यासाठी तटाला ठिकठिकाणी भोके आहेत .

किल्ल्याच्या बांधणी सती वापरलेला चुना आजही दिसतो .

किल्ल्यावर मराठ्यांचा भगवा ध्वज आणि ध्वजस्तंभ होता त्याची उंची २२८ फुट इतकी होती . हा भगवा ध्वज इसवी सन १८१२ पर्यंत फडकत होता .

समुद्रात दूर वरूनच हा भगवा ध्वज दृष्टीस पडत असे त्यामुळे मच्छीमार लोकांना खडक असल्याचा संकेत मिळत असे .

इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला गेल्यानंतर त्यांनी तो काही प्रमाणात उद्ध्वस्त केला आहे .

किल्यावर पश्चिमेकडे जरीमरीचे मंदिर आहे आजही लोक तेथे वस्ती करून राहतात .

किल्ल्यावर मारुतीचे मंदिर आहे तेथूनच बुरुजावर जाण्याचा मार्ग आहे .

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर किल्ल्यांची माहिती या ठिकाणी वाचा :

शिवनेरी किल्ल्याची संपूर्ण माहिती येथे वाचा : https://marathisampada.com/chhatrapati-shivaji-maharaj-fort-in-marathi/

सिंहगड किल्ल्याची संपूर्ण माहिती येथे वाचा : https://marathisampada.com/sinhgad-kondhana-fort-information-in-marathi/

Sindhudurg Fort Information In Marathi | सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती

सिंधुदुर्ग किल्ल्यावर कसे जावे :

बस सेवा :

पुण्याहून बसने जायचे असेल तर थेट जाता येत नाही . पुण्यातून कणकवली येथे यावे आणि तेथून सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी टॅक्सी मिळते .

रेल्वे सेवा :

पुण्यातून रेल्वे ने जायचे असल्यास मांडवी एक्स्प्रेस ने सिंधुदुर्ग येथे उतरून जाता येते .

कोकण रेल्वे ने गेले असता कुडाळ आणि सिंधुदुर्ग हे जवळचे स्टेशन आहेत .मालवण पासून दोन्ही स्टेशन ३० km अंतरावर आहेत .मालवण ला पोहोचल्यावर बोट भाड्याने घेवू शकता .

विमान सेवा :

सर्वात जवळचे विमानतळ गोव्यातील दाबोलीन विमानतळ आहे .हे विमानतळ १३० km अंतरावर आहे . विमानतळावरून मालवण ला जाण्यासाठी कॅब किंवा बस मिळतात .

सिंधुदुर्ग किल्ल्याला कधी भेट द्यावी :

सिंधुदुर्ग किल्ल्याला हिवाळ्यात म्हणजेच ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात भेट द्यावी .

पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे बोट सेवा अनियमित असते त्यामुळे पावसाळ्यात सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणे टाळावे .

सिंधुदुर्ग किल्ला बघताना घ्यावयाची काळजी :

Sindhudurg Fort Information In Marathi | सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती

किल्ला बघायला सकाळी लवकर सुरुवात करा त्यामुळे किल्ला बघायला जास्त वेळ मिळेल .

किल्ल्याची अधिक माहिती समजून घेण्यासाठी मार्गदर्शक घ्या .

किल्ल्यावरील सुंदर दृश्य टिपण्यासाठी कॅमेरा अवश्य घेऊन जा.

किल्ला बघायला जाताना पाणी आणि खाण्याचे पदार्थ घेऊन जा .

किल्ल्यावर कचरा टाकू नका .

आपल्यामुळे किल्ल्यावर अस्वच्छता होणार नाही याची काळजी घ्या .

किल्ला बघायला जाताना आरामदायी शूज घाला .

उन्हाच्या त्रासापासून वाचण्यासाठी टोपी सोबत घ्या .

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आजूबाजूची ठिकाणे

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आजूबाजूला बरीच बघण्यासारखी ठिकाणे आहेत. तुम्ही जेव्हा सिंधुदुर्ग किल्ला बघायला जाल तेव्हा या निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या .बघुयात कोणती आहेत ती ठिकाणे :

१) तारकर्ली बीच :

हा कोकणातील सर्वात मोहक असा बीच आहे सिंधुदुर्ग किल्यापासून हा बीच फक्त १० km अंतरावर आहे . बीच वर फिरायला जितकी मज्जा येते तेवढाच या बीच वरून सूर्यास्त बघायला हि खूपच छान वाटत.

तारकर्ली बीच प्रमाणेच निवती बीच, देवबाग बीच , टोंडावली बीच अशा इतरही बीच ला तुम्ही भेट देऊ शकता आणि समुद्रात खेळायचा आनंद घेऊ शकता .

२)कराली बॅकवॉटर:

कराली बॅकवॉटर हे ठिकाण किल्ल्यापासून खूपच जवळ आहे ,किल्ल्यापासून फक्त २.२ km अंतरावर कराली बॅकवॉटर हे ठिकाण आहे .या ठिकाणी कराली नदी अरबी समुद्राला मिळते .येथे तुम्ही बोटिंग चा आनंद घेऊ शकता .

३)सुनामी बेट :

किल्ल्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असल्या ह्या ठिकाणी समुद्र शांत असतो त्यामुळे बोटिंग शी संबंधित सगळे खेळ खेळायचा आनंद तुम्ही येथे घेऊ शकता.

थोडक्यात पण महत्त्वाचे:

Sindhudurg Fort Information In Marathi | सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती, या लेखात आपण सिंधुदुर्ग या जलदुर्गाची माहिती घेतली .या सुट्टीत सिंधुदुर्ग किल्ल्याची सहल नक्की करा .छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्याला एकदा तरी भेट नक्कीच द्या ,पण किल्ला बघताना किल्ल्यावर घान होणारा नाही ना, किल्ल्यावरील प्राणी मात्रांना आपल्यामुळे त्रास तर होणार नाही ना याची काळजी घ्या कारण आपल्या ऐतिहासिक वास्तू ची जपणूक करणे हे आपलेच नाही तर प्रत्येकाचे कर्तव्य आहे .त्यामुळे किल्ला बघताना एवढी काळजी घ्या . लेख आवडला असल्यास आम्हाला नक्की कळवा ,आणि हि महत्वपूर्ण माहिती आपल्या मित्र मंडळीना नक्की शेयर करा . धन्यवाद

FAQ (Sindhudurg Fort Information In Marathi | सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती)

१) सिंधुदुर्ग हा कोणत्या प्रकारातील किल्ला आहे ?

ans :सिंधुदुर्ग हा जलदुर्ग या प्रकारातील किल्ला आहे.

२)सिंधुदुर्ग किल्ला बघायला किती वेळ लागतो ?

ans : सिंधुदुर्ग किल्ला बघायला साधारण २ ते ३ तास इतका वेळ लागतो .

३) सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आजूबाजूला बघण्यासारखी ठिकाणे कोणती आहेत ?

ans: सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आजूबाजूला तारकर्ली बीच ,निवती बीच, देवबाग बीच , टोंडावली बीच हे बीच बघण्यासारखे आहेत तसेच कराली बॅकवॉटर,सुनामी बेट देखील बघण्यासारखे आहे .

४) सिंधुदुर्ग किल्ला बघण्याचा योग्य काळ कोणता ?

ans : सिंधुदुर्ग किल्ला साधारण ऑक्टोबर ते फेब्रुवारी या दरम्यान बघायला जावे . हिवाळा असल्यामुळे वातावरण आल्हाददायक असते .

५) सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ राहण्याची सोय आहे का?

ans : सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आसपास बरीच हॉटेल आहेत तेथे राहायची आणि जेवणाची सोय होऊ शकते .

६) सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ?

ans : सिंधुदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या तालुक्यात आहे.

७) सिंधुदुर्ग किल्ल्यावर कसे जाऊ शकतो ?

ans : सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी बस ,रेल्वे आणि विमान सेवा उपलब्ध आहे .