Rashtriya Vayoshri Yojana 2024 in Marathi | राष्ट्रीय वयोश्री योजना २०२४

राष्ट्रीय वयोश्री योजना 2024

Rashtriya Vayoshri Yojana 2024 in Marathi | राष्ट्रीय वयोश्री योजना २०२४ या योजने अंतर्गत ६० वर्ष पेक्षा जास्त वय असणाऱ्या जेष्ठ नागरिकांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अभाधित ठेवण्यासाठी राज्यात राष्ट्रीय वयोश्री योजना राबविण्यात येत आहे .

माणसाचे जसजसे वय वाढते तसतसे अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात , जेष्ठ नागरिक म्हणजे ज्याचे वय ६० पेक्षा जास्त आहे असे नागरिक, बऱ्याचदा हे जेष्ठ नागरिक हे संपूर्ण पणे कुटुंबावर अवलंबून असतात. त्यातच काही शारीरिक व्याधी असल्यास त्या कुटुंबातील कर्त्या पुरुषावर त्या व्याधी साठी लागणाऱ्या खर्च चा भार येतो, प्रत्येक वेळी कुटुंब तो भार सहन करू शकेलच असे नाही ,आणि गरीब किंवा दारिद्र रेषेखालील कुटुंबाना हा खर्च परवडणारा नसतोच या सगळ्याचा विचार करून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदिजी यांनी राष्ट्रीय वयोश्री योजनेची सुरुवात केली .

राष्ट्रीय वयोश्री योजना हि केंद्र शासनाने सुरु केलेली महत्वपूर्ण योजना आहे . देशातील जेष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्या दृष्टीने हि योजना खूपच महत्वपूर्ण आहे . या योजने अंतर्गत देशात ठीक ठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे , त्यात डॉक्टरांच्या उपस्थित दिव्यांग व्यक्तींना आणि जेष्ठ नागरिकांची तपासणी करून त्यांच्या अपंगत्वा नुसार उपयोगात येणारे उपकरणे आणि सहाय्यक वस्तू पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे . देशातील वृद्ध गरीब वर्गाला वाढत्या वयाबरोबर जीवन जगणे सुसय्य व्हावे हा एकमेव उद्देश या योजनेचा आहे.

Rashtriya Vayoshri Yojana 2024 in Marathi | राष्ट्रीय वयोश्री योजना २०२४ हि एक केंद्र सरकारची महत्वपूर्ण योजना आहे त्यासाठी केंद्र सरकारद्वारे वित्त पुरवठा केला जाणार आहे .या योजनेच्या अंमलबजावणीसाठी येणारा खर्च जेष्ठ नागरिक कल्याण निधी मधून केला जाईल . राष्ट्रीय वयोश्री योजना सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत एक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीद्वारे , म्हणजेच कृत्रिम अवयव उत्पादन महामंडळ (ALIMCO- Artificial Limbs Manufacturing Corporation Of India) मार्फत लागू केली जाते .राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिबिरात ट्राय सायकल, व्हील चेअर , वाकिंग स्टिक , रोलेटर, स्मार्ट केन , ब्रेल किट , ब्रेल केन ,एडीएल कीट,

Rashtriya Vayoshri Yojana 2024 in Marathi | राष्ट्रीय वयोश्री योजना २०२४ हि एक केंद्र सरकारची महत्वपूर्ण योजना आहे त्यासाठी केंद्र सरकारद्वारे वित्त पुरवठा केला जाणार आहे .या योजनेच्या अंमलबजावणीसाठी येणारा खर्च जेष्ठ नागरिक कल्याण निधी मधून केला जाईल . राष्ट्रीय वयोश्री योजना सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत एक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीद्वारे , म्हणजेच कृत्रिम अवयव उत्पादन महामंडळ (ALIMCO- Artificial Limbs Manufacturing Corporation Of India) मार्फत लागू केली जाते .राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिबिरात ट्राय सायकल, व्हील चेअर , वाकिंग स्टिक , रोलेटर, स्मार्ट केन , ब्रेल किट , ब्रेल केन ,एडीएल कीट, चालण्याची काठी (walking sticks),हात आणि पायाच्या कोपऱ्याना बांधायची पट्टी (elbow crutches),चालण्याची काठी (walker/ crutches),श्रवण यंत्र (hearing aid), कृत्रिम दात (artificial dentures), चष्मा (spectacles) या उपकरणांचे मोफत वाटप करण्यात येईल .

आपल्या संपूर्ण लोकसंखेच्या १०-१२ टक्के जेष्ठ नागरिक आहेत , जेष्ठ नागरिक म्हणजे ज्याचे वय ६० पेक्षा जास्त आहे .ह्या जेष्ठ नागरिकांना वयानुसार अनेक मानसिक तसेच शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते , वाढत्या वयानुसार अनेक शारीरिक अपंगत्व देखील येत असते हि बाब लक्षात घेवून शासनाने शारीरिक अपंगत्वा नुसार उपकरणे उपलब्ध करून देणे ,तसेच मनस्वास्थ्य केंद्र , योगोपचार केंद्रे उपलब्ध करून देण्याचे आयोजिले आहे , या सगळ्या मुळे जेष्ठ नागरिकांच्या जीवनात सक्रियता, गतिशीलता येईल , मोकळे पणाने जीवन व्यतीत करता येईल . आपल्या घरात किंवा जवळपास असे जेष्ठ नागरिक असतील तर त्यांना या योजनेचा लाभ कसा घेता येईल या साठी तुम्ही मदत करा ,हा लेख त्यांच्या पर्यंत पोहोचवा . Rashtriya Vayoshri Yojana 2024 in Marathi |राष्ट्रीय वयोश्री योजना २०२४ लेखातील महत्वाचे मुद्दे त्यांना समजावून सांगा . चला तर मग या योजनेची संपूर्ण माहिती घेवूया .

योजनेचे नाव राष्ट्रीय वयोश्री योजना
योजनेचे उद्दिष्ट जेष्ठ नागरिकांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अभाधित ठेवणे
लाभार्थी वय अट वय ६० पेक्षा जास्त असावे
योजनेचा लाभ शारीरिक अपंगत्वा नुसार उपकरणे उपलब्ध करून देणे ,मनस्वास्थ्य केंद्र , योगोपचार केंद्रे उपलब्ध करून देणे .


लेखातील महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे :
  1. Rashtriya Vayoshri Yojana 2024 in Marathi चे उद्दिष्ट
  2. Rashtriya Vayoshri Yojana 2024 in Marathi | राष्ट्रीय वयोश्री योजना २०२४ चे वैशिष्ट्य
  3. योजनेच्या अटी व नियम
  4. राष्ट्रीय वयोश्री योजना २०२४ साठी आवश्यक कागदपत्रे
  5. राष्ट्रीय वयोश्री योजना २०२४ चा अर्ज रद्द होण्याची कारणे
  6. राष्ट्रीय वयोश्री योजने अतंर्गत दिली जाणारी उपकरणे

वरील मुद्द्यांची सविस्तर माहिती खालील प्रमाणे :

१) Rashtriya Vayoshri Yojana 2024 in Marathi चे उद्दिष्ट:

  • जेष्ठ नागरिकांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अभाधित ठेवणे .
  • जेष्ठ नागरिकांच्या जीवनाचा स्तर उंचावणे .
  • जेष्ठ नागरिकांच्या शारीरिक व्याधी नुसार त्यांना उपकरणे खरेदी साठी पैश्यांची उपलब्धता करून देणे.
  • जेष्ठ नागरिकांचा आर्थिक स्तर सुधारणे .

२) राष्ट्रीय वयोश्री योजना २०२४ चे वैशिष्ट्य:

  • केंद्र सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी राबवलेली महत्वपूर्ण योजना आहे.
  • राज्यातील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या अपंगत्वा नुसार गरजेची उपकरणे उपलब्ध करून देणे .
  • या योजनेसाठी राज्यसरकारला केंद्र सरकार कडून आर्थिक मदत करण्यात येते .
  • राष्ट्रीयवयोश्री योजना हि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील जेष्ठ नागरिकांसाठी शारीरिक अपंगत्वा नुसार उपकरणे उपलब्ध करून देणे ,मनस्वास्थ्य केंद्र , योगोपचार केंद्रे उपलब्ध करून देणे यासारखी मदत करणार आहे .
  • राज्यातील वृद्ध तसेच अपंग महिला देखिल या योजनेचा लाभ घेवू शकता .
  • राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत दिली जाणारी उपकरणे हि उत्तम दर्जाची आणि अल्प किमतीत दिली जाणार आहे .

३) योजनेच्या अटी व नियम:

  • राज्यातील ६० पेक्षा जास्त वय असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल .
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा नागरिक/ रहिवाशी असणे गरजेचे आहे
  • राज्यातील ६० पेक्षा कमी वय असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही .
  • अर्ज करणाऱ्या जेष्ठ अर्जदाराकडे BPL रेशन कार्ड (दारिद्र्य रेषेखालील कार्ड )असणे बंधनकारक आहे.
  • ४० % पेक्षा जास्त अपंगत्वा असेल तरच राष्ट्रीय वयोश्री या योजनेचा फायदा घेता येईल.
  • प्रत्येक अर्जादाराची डॉक्टरांकडून शारीरिक तपासणी करूनच त्यांच्या अपंगत्वा साठी उपयुक्त ठरतील अशी उपकरणे पुरवली जातील.
  • एका अर्जदाराला फक्त एकाच शारीरिक व्याधी साठी उपकरणाचा लाभ घेता येईल.
  • अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. २ लाखापेक्षा जास्त नसावे .
  • निवड केलेल्या जिल्ह्यात , लाभार्थ्याच्या संख्ये पैकी ३० %महिला असतील .

४) राष्ट्रीय वयोश्री योजना २०२४ साठी आवश्यक कागदपत्रे :

  1. आधार कार्ड / मतदान कार्ड
  2. राष्ट्रीयकृत बँकेची बँक पास बुक झेरोक्स
  3. पास् पोर्ट आकाराचे २ फोटो
  4. BPL रेशन कार्ड
  5. रहिवाशी पुरावा
  6. मोबाईल नंबर
  7. वयाचा दाखला किंवा जेष्ठ नागरिक कार्ड
  8. शारीरिक दृष्ट्या अपंग असल्यास अपंगत्वाचा पुरावा /दाखला
  9. ई -मेल आयडी

५) राष्ट्रीय वयोश्री योजने चा अर्ज रद्द होण्याची कारणे :

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा नागरिक/ रहिवाशी नसेल तर अर्ज रद्द होईल .
  • अर्जदाराचे वय ६० पेक्षा कमी असल्यास अर्ज रद्द होईल.
  • अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. २ लाखापेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द होईल .
  • अर्जदार दारिद्र रेषेखालील नसल्यास अर्ज रद्द होईल.
  • अर्जदाराचे अपंगत्व ४० % पेक्षा कमी असल्यास अर्ज रद्द होईल .
  • अर्जदार व्यक्तीने एका पेक्षा जास्त उपकरणांसाठी अर्ज केला तर अर्ज रद्द होईल किंवा सगळ्यात प्रथम ज्या उपकरणा साठी अर्ज कला असेल ते उपकरण त्यांना देता येईल.

६) राष्ट्रीय वयोश्री योजने अतंर्गत दिली जाणारी उपकरणे :

  • चालण्याची काठी (walking sticks)
  • हात आणि पायाच्या कोपऱ्याना बांधायची पट्टी (elbow crutches)
  • चालण्याची काठी (walker/ crutches)
  • तीन पायाची सायकल
  • श्रवण यंत्र (hearing aid)
  • कृत्रिम अवयव
  • कृत्रिम दात (artificial dentures)
  • चष्मा (spectacles)
  • Tripod/ Quadpods
  • wheel chair
राष्ट्रीय वयोश्री योजना 2024

राष्ट्रीय वयोश्री योजना २०२४ FAQ:

Q. राष्ट्रीय वयोश्री योजना काय आहे ?

राष्ट्रीय वयोश्री योजना २०२४ या योजने अंतर्गत ६० वर्ष पेक्षा जास्त वय असणाऱ्या जेष्ठ नागरिकांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अभाधित ठेवण्यासाठी राज्यात राष्ट्रीय वयोश्री योजना राबविण्यात येत आहे .

Q. राष्ट्रीय वयोश्री योजनेचे लाभार्थी कोण आहेत ?

राज्यातील ६० पेक्षा जास्त वय असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल.

Q .राष्ट्रीय वयोश्री योजने अतंर्गत कोणती उपकरणे दिली जाणार आहे ?

ट्राय सायकल, व्हील चेअर , वाकिंग स्टिक , रोलेटर, स्मार्ट केन , ब्रेल किट , ब्रेल केन ,एडीएल कीट, चालण्याची काठी (walking sticks),हात आणि पायाच्या कोपऱ्याना बांधायची पट्टी (elbow crutches),चालण्याची काठी (walker/ crutches),श्रवण यंत्र (hearing aid), कृत्रिम दात (artificial dentures), चष्मा (spectacles).

Q. राष्ट्रीय वयोश्री योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे ?

  1. आधार कार्ड / मतदान कार्ड
  2. राष्ट्रीयकृत बँकेची बँक पास बुक झेरोक्स
  3. पास् पोर्ट आकाराचे २ फोटो
  4. BPL रेशन कार्ड
  5. रहिवाशी पुरावा
  6. मोबाईल नंबर
  7. वयाचा दाखला किंवा जेष्ठ नागरिक कार्ड
  8. शारीरिक दृष्ट्या अपंग असल्यास अपंगत्वाचा पुरावा /दाखला
  9. ई -मेल आयडी

Q .राष्ट्रीय वयोश्री योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे ?

१) सर्वप्रथम न्याय आणि समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला जावे .

२) होम पेज वर तुम्हाला वयोश्री रजिस्त्रेशन हा पर्याय दिसेल , या पर्यायावर क्लिक केल्यानंतर विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल

३) आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

४) त्यानंतर कॅप्टचा कोड भरून फॉर्म सबमिट करावा , अश्याप्रक्रारे नोंदणी पूर्ण होईल

५)त्यानंतर track & view पर्यायावर जावून application स्टेटस चेक करता येईल .