Raigad Fort Information In Marathi | रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती

Raigad Fort Information In Marathi | रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती , छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक महत्वपूर्ण किल्यांपैकी एक किल्ला म्हणजे रायगड किल्ला . या किल्ल्याचे प्राचीन नाव रायरी असे होते . तर युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्रालटर असे म्हणत .पाचशे वर्षांपूर्वी हा एक डोंगर होता तेव्हा त्यास तणस व रासिवटा अशी दोन नावे होती . डोंगराचा आकार उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास नंदादीप असेही संबोधले जात असे .

Table of Contents

Raigad Fort Information In Marathi | रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती

Raigad Fort Information In Marathi

रायगड किल्ल्याचा इतिहास :

घोड्याच्या नालाप्रमाणे आकार असलेल्या पठारावर वसलेला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेला रायगड किल्ला महाड या ठिकाणापासून २५ km अंतरावर आहे , हा किल्ला समुद्रसपाटीपासून ८२० मीटर म्हणजेच २७०० फुट उंचीवर आहे . रायरी या प्राचीन नावाने प्रसिद्ध असलेला हा किल्ला सध्या महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षण स्मारक आहे .

Raigad Fort Information In Marathi | रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती, रायगड किल्ल्यावर कोणकोणत्या सत्ताधाऱ्यानी वर्चस्व केले ते बघुयात ,

बारावे शतक : बाराव्या शतकात मराठे पाळेगारांचे रायरी हे निवासस्थान होते .

इसवी सन १४३६ : दुसऱ्या अलाउद्दीन बहमनशाहने हा किल्ला ताब्यात घेतला .

इसवी सन १५४९ : अहमदनगरच्या निजामशाहाने हा किल्ला ताब्यात घेतला .त्यानंतर आदिलशहाने रायारीवर हल्ला करून रायरी आणि आसपासचा प्रदेश ताब्यात घेतला

इसवी सन १६२१ : पुन्हा किल्ला निजामशाहीत गेला .

इसवी सन १६३६ : मोगलांनी निजमशाही नष्ट केली आणि आदिलशहाशी करार केला त्यानुसार रायरी आदिलशहा कडे आली .

इसवी सन १६३६ ते १६४४ : आदिलशाह तर्फे चंद्रराव मोरे यांच्याकडे रायरी आली.

इसवी सन १६५६ : छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ च्या सुमारास जावळी जिंकून चंद्रराव मोऱ्याकडील सर्व किल्ले काबीज केले .

रायगड किल्ल्यालाच राजधानी का केले ?

Raigad Fort Information In Marathi | रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेला रायगड किल्ला त्याच्या उत्तरेस घोसाळगड , वायव्येकडील तळेगड ,दक्षिणेकडील कांगोरा चांभारगड -सोनगड , पूर्वेकडील तोरणा , ईशान्येकडील लिंगाणा अशा किल्ल्यांची संरक्षण फळीच जणू किल्ल्याच्या चहु बाजुंनी होती . रायगड किल्ला सागरी दळणवळणासाठी जवळचे ठिकाण आहे तसेच ह्या किल्ल्याचे भौगोलिक स्थान बघता शत्रूला या किल्ल्यावर येणे थोडे अवघड वाटेल . या सर्व गोष्टींचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडला स्वराज्याची राजधानी म्हणून घोषीत केले .

शिवनेरी किल्ल्याची संपूर्ण माहिती येथे वाचा https://marathisampada.com/chhatrapati-shivaji-maharaj-fort-in-marathi/

सिंहगड किल्ल्याची संपूर्ण माहिती येथे वाचा https://marathisampada.com/sinhgad-kondhana-fort-information-in-marathi/

सिंधुदुर्ग या जलदुर्गाची माहिती येथे वाचा https://marathisampada.com/sindhudurg-fort-information-in-marathi/

रायगड किल्ल्यावरील प्रेक्षणीय ठिकाणे :

Raigad Fort Information In Marathi | रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती

१) पाचाडचा जिजाबाईंचा वाडा :

जसे वय वाढले तसे जिजाबाईंना गडावरची थंड हवा , थंडगार वारा सहन होत नव्हता .म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचाड जवळ त्यांच्यासाठी एक वाडा बांधून घेतला .तेथे एक पायऱ्यांची विहीर आहे त्यास तक्क्याची विहीर असे म्हणत .तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी बनवलेले मोठे दगडी आसन बघण्यासारखे आहे .

२) खुबलढा बुरुज :

गड चढायला सुरुवात केली कि पहिलेच एक बुरुजाचे ठिकाण दिसते तोच हा खुबलढा बुरुज , बुरुजा शेजारीच एक दरवाजा आहे ,त्याला चित दरवाजा असे म्हणत .

३) नाना दरवाजा :

नाना दरवाज्याचा अर्थ होतो लहान दरवाजा य दरवाज्यास नाणे दरवाजा असेही म्हणत. नाना दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकरयांसाठी लहान अश्या दोन खोल्या आहेत . त्यांना देवडा म्हणतात . दरवाज्यास दोन कमानी आहेत .

४)मशीदमोर्चा /मदारमोर्चा :

खुबलढा बुरुजा पाशी जो चित दरवाजा आहे त्यातून आत गेल्यावर नागमोडी रस्ता आहे त्या रस्त्याच्या पुढे सपाटी लागते .त्या जागेत दोन पडक्या इमारती दिसतात त्यातील एक पहारेकऱ्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे .तेथेच एक मोठी तोफाही दिसते .तिथेच मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे .पुढे खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात .

५) महादरवाजा :

महादारवाजाच्या बाहेरील बाजूस दोन सुंदर कमळ कोरले आहेत . दोन कमळांचा अर्थ आहे किल्ल्यात श्री आणि सरस्वतीचा वास आहे .श्री आणि सरस्वती म्हणजे विद्या आणि लक्ष्मी होय .महादरवाज्याला दोन मोठे बुरुज आहे एका बुरुजाची उंची ७५ फुट आहे तर दुसऱ्या बुरुजाची उंची ६५ फुट आहे . तटबंदी मध्ये जी उतरती भोके दिसतात त्यास जंग्या असे म्हणतात .शत्रूवर हल्ला करण्यासाठी हि भोके असतात . महादरवाज्याच्या आतील बाजूस देवड्या आहेत तसेच संरक्षकांसाठी राहण्यासाठी खोल्या आहेत .महादरवाज्यापासून टकमक टोक ते हिरकणी टोकापर्यंत तटबंदी आहे .

Raigad Fort Information In Marathi

६) चोर दिंडी :

महादरवाज्यापासून तोपर्यंत एक तटबंदी आहे त्यावरून चालत गेल्यावर तटबंदी दिसते . त्याच्या अलीकडेच एक चोर दिंडी बांधलेली चोर दिंडीला येण्यासाठी बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत पायऱ्या आहेत.

७)हत्ती तलाव :

हत्तींना पाणी पिण्यासाठी स्नानासाठी या तलावाची सोय केलेली होती.

८)गंगासागर तलाव:

हत्ती तलावापासून जवळच धर्मशाळेची इमारत आहे त्या इमारतीपासून अंदाजे ५०-६० पावले चालत गेल्यावर जो तलाव आहे तो गंगासागर तलाव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी जे सप्त सागराचे पाणी व महंतांनी आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली म्हणूनच या तलावाला गंगासागर तलाव म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिबंदीसाठी या पाण्याचा वापर केला जाई.

९)स्तंभ :

गंगा सागराच्या दक्षिण दिशेने दोन उंच मनोरे दिसतात त्यांना स्तंभ असे म्हणतात. या स्तंभांचा उल्लेख जगदीश्वराच्या शिलालेखात आढळतो.

१०)पालखी दरवाजा:

बालेकिल्ल्यात प्रवेश करायचा असेल तर पालखी दरवाज्यातून प्रवेश केला जातो. स्तंभाच्या बाजूने भिंत आहे त्या भागात ३१ पायऱ्या बांधलेल्या आहेत त्या चढून गेल्या की पालखी दरवाजा लागतो.

११)मेणा दरवाजा:

पालखी दरवाजातून प्रवेश केल्यानंतर दररोज एक मार्ग दिसतो तो आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो समोरच राण्यांचे महाल आहेत. सध्या त्यांची स्थिती चांगली नसून राण्यांच्या महालाचे सात अवशेष दिसतात.

१२)राजभवन:

राजभवन 86 फुट लांब आणि 33 फूट रुंद आहे. प्राण्यांचे महाल आहेत त्यासमोरच दासींच्या खोल्यांचे अवशेष दिसतात त्याच्या मागील बाजूस एक भिंत आहे त्या भिंती बागेचा दरवाजा आहे दरवाजातून बालेकिल्ल्याच्या आत प्रवेश केला जातो तिथे एक प्रशस्त चौथरा आहे तोच राजभवनाचा चौथरा आहे.

१३)रत्नशाळा:

काही गुप्त बोलणी करण्यासाठी खलबत खाना तयार केलेला आहे म्हणजेच एक खोली तयार केलेली आहे तीच रत्नशाळा आहे असे म्हणून सांगितले जाते. ही खोली तळघरात आहे.

१४) राज्यसभा:

राज्यसभा जवळजवळ एक 220 फुट लांब आणि 124 फूट रुंद आहे. या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. पूर्वेकडे तोंड केलेले सिंहासनाची जागा आहे. अनेक बखरीं मध्ये उल्लेख आहे की राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन हे ३२ मणांचे सोन्याचे सिंहासन होते.

१५)नगारखाना:

सिंहासन समोर नगारखाना आहे नगारखान्यात प्रवेश करण्यासाठी भव्य प्रवेशद्वार आहे. किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर जाण्यासाठी नगारखान्यातून पायऱ्या चढून वर जावे लागते.

१६)बाजारपेठ:

नगारखान्याच्या समोर मोकळी जागा आहे तेथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे त्या मोकळ्या जागेला होळीचा माळ असे म्हणतात. पुतळ्याच्या समोरच बाजारपेठ आहे. बाजारपेठेच्या दोन भव्य रांगा आहे .प्रत्येक रांगेत 22 दुकाने आहेत. दोन रांगांमधून ४० फूट रुंदीचा रस्ता आहे . आजही त्याकाळी बाजारपेठ कशी असेल याचा अंदाज आपण बांधू शकतो.

Raigad Fort Information In Marathi

१७)शिरकाई देऊळ:

शिरकाई ही गडावरील मुख्य देवता आहे. शिर्के हे रायगडाचे स्वामी होते .याची आठवण करून देणारी गड स्वामिनी शिरकाई देवी हिचे मंदिर गडावर आहे . शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस शिरकाई देवीचे मंदिर आहे शिरकाई देवीचे मंदिर हे राजवाड्याच्या लागून डाव्या बाजूस होते तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजून आहे. आपण जे बघतो हे नंतर बांधलेले शिरकाई देवीचे मंदिर आहे.

१८) जगदीश्वर मंदिर:

बाजारपेठेच्या खालच्या बाजूस ब्राह्मण वस्तीचे अवशेष दिसतात . समोर एक भव्य महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर आहे. मंदिरासमोर नंदी ची मूर्ती आहे. पण सध्या मंदिराची अवस्था बिकट झालेली आहे . मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप आहे .मंडपाच्या मध्यभागी कासव आहे.

१९) महाराजांची समाधी:

मंदिराच्या पूर्व दरवाजापासून थोड्या अंतरावर गेलं की जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी आहे. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे आणि बारा टाकी दिसतात.

Raigad Fort Information In Marathi

२०)कुशावर्त तलाव:

होळीचा माळ सोडून डाव्या हाताला गेले की कुशावर्त तलाव दिसतो . तलावा जवळ एक महादेवाचे छोटेसे देऊळ आहे.

२१) वाघ दरवाजा:

कुशावर्त तलावाजवळून उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते क्या दरवाजाने वर चढणे तर अशक्यच आहे परंतु दोर लावून खाली उतरू शकतो.

२२) टकमक टोक:

बाजारपेठेच्या समोरून खाली उतरून गेले कि कडेने जाता येते जवळच एक दारूच्या कोठारा टकमक टोकाचा रस्ता हा अतिशय निमुळता आहे सध्या बऱ्यापैकी पडझड झाली आहे . टोकावर प्रचंड वारा असतो आणि जागाही कमी असल्यामुळे या टोकावर जाताना गोंधळ करू नये. अतिशय सावधानतेने टोकाचे निरीक्षण करावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगारांना शिक्षा म्हणून या या टकमक टोकावरून त्यांचा कडेलोट केला जात असे.

२३) हिरकणी टोक:

गंगासागर कडून उजवीकडे जी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोका च्या संदर्भात असलेली हिरकणी गवळणीची कथा आपण सगळ्यांनीच ऐकलेली आहे. टोकावर काही तोफा आहेत . बुरुजावर उभे राहिल्यास डाव्या हाताला गांधारीचे खोरे तर उजव्या हाताला काली नदीचे खोरे दिसते.

२४)वाघ्या कुत्र्या ची समाधी:

शिवाजी महाराजांकडे वाघ्या नावाचा एक कुत्रा होता . ज्यावेळेस शिवाजी महाराजांचे अंत्यसंस्कार चालू होते, त्यावेळेस त्या कुत्र्याने देखील त्या आगीत उडी घेतली असे इतिहासकार सांगतात. त्याच वाघ्या कुत्र्याची समाधी येथे बांधण्यात आली आहे.

Raigad Fort Information In Marathi | रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती

रायगड किल्ल्यावर कसे जायचे

बस सेवा:

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसने तुम्ही महाड पर्यंत जाऊ शकता. मोहोळ बस स्थानकावर एसटी बस उपलब्ध आहे जी थेट किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत घेऊन जाते किंवा निजामपूर गावात जाणारी कोणत्याही बसने तुम्ही येऊ शकतात आणि पायथ्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पाचाड नाक्यावर उतरू शकतात.

महाड बस स्थानकापासून ऑटोरिक्षा ही मिळतात ज्या तुम्हाला थेट पाचाड गावापर्यंत घेऊन जातील.

रायगडाचा जर ट्रेक करायचा असेल तर पाचाड खिंडीत उतरून तुम्ही १४३५ पायऱ्या चढून रायगडावर जाऊ शकतात.

रायगडावर जाण्यासाठी रोपे ची देखील व्यवस्था आहे.

गडावरील खाण्याची आणि राहायची सोय:

गडावर एक धर्मशाळा आहे तिथे राहायची सोय होऊ शकते .राहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही .गडावर अन्नपदार्थांचे दुकाने आहेत. गडावर पाण्याची चांगली सोय आहे. शुद्ध आणि फिल्टर पाणी आपल्याला गडावर जायला मिळते

थोडक्यात पण महत्त्वाचे :

Raigad Fort Information In Marathi | रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती ,आजच्या या लेखात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड या किल्ल्याची माहिती घेतली रायगड ही त्या काळात मराठी स्वराज्याची राजधानी होती. याच किल्ल्याची अवस्था आज तितकीशी चांगली नसून पण किल्ला जसा आहे. तसाच ठेवण्याची जबाबदारी आपली आहे आपल्या ऐतिहासिक वास्तूंची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे . किल्ल्यावर जाताना किल्ल्यावर घाण होणार नाही याची काळजी घ्या लेख ,आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा. धन्यवाद