PROTEIN RICH FOOD FOR KIDS IN MARATHI | या प्रथिनेयुक्त आहाराने मुलांना बनवा एकदम हेल्दी, मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढीसाठी कॅल्शियम, लोह गरजेचे असते त्याचप्रमाणे प्रोटीन देखील अत्यावश्यक असते. फक्त लहान मुलांनाच नाही तर मोठ्या माणसांना देखील शरीर सुदृढ ठेवण्यासाठी प्रोटीन ची आवश्यकता असते. मग अशावेळी खूप जण प्रोटीन पावडर चा उपयोग करतात परंतु आपल्या रोजच्या आहारातून आपण असे काही अन्नपदार्थ खाऊ शकतो की ज्यामुळे आपल्या शरीराची प्रोटीन ची गरज भागवली जाऊ शकते.
ज्यावेळेस एखादी महिला गर्भवती असते त्यावेळेस गर्भातील बाळाच्या स्नायूंचे योग्य वाढ होण्यासाठी, हाडांची योग्य वाढ होण्यासाठी आणि हाडे मजबूत होण्यासाठी आणि बाळाचे वजन वाढण्यासाठी गर्भवती महिलेला प्रोटीन पावडर दिली जाते. म्हणजेच गर्भात असल्यापासूनच आपल्या शरीराच्या योग्य विकासासाठी प्रोटीन ची आवश्यकता असते. सुरुवातीचे सहा महिने बाळ दुधावर अवलंबून असते. सहा महिन्यानंतर बाळाला द्रव स्वरूपात अन्नपदार्थ देण्यास सुरुवात केली जाते. साधारण बाळ एक वर्षाचे झाल्यानंतर त्याला घनपदार्थ दिले जातात. हे पदार्थ देत असताना हे पदार्थ सर्व पोषण मूल्यांनी भरपूर असणे आवश्यक असते ज्यामुळे बाळाचा सर्वांगी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होऊ शकतो.
लहान मुलांना त्यांच्या हाडांच्या मजबूतीसाठी, स्नायूंच्या वाढीसाठी, वजन वाढण्यासाठी , त्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहावी यासाठी प्रोटीन ची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे शरीरातील वेगवेगळ्या हार्मोन्सची वाढ होण्यासाठी प्रोटीन अत्यावश्यक असते. वजन, नखे आणि केसांच्या वाढीसाठी देखील प्रोटीन गरजेचे असते.
प्रोटीन आहार म्हटलं की खूप जणांना मांसाहार घेणे असे वाटते. खरे तर मांसाहारातून भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतात. मांसाहार मध्ये अंडे, मासे, चिकन आणि मटण या अन्नपदार्थां मधून शरीराची भरपूर प्रमाणात प्रोटीन ची गरज भागवली जाते. परंतु जे लोक मांसाहार करत नाही त्यांच्यासाठी भरपूर शाकाहारी अन्नपदार्थ आहे ज्यामधून शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळू शकतात. शाकाहारी अन्नपदार्थांमध्ये पनीर, सोयाबीन, सर्वच प्रकारच्या डाळी, शेंगदाणे, सुकामेवा, हिरव्या पालेभाज्या, हिरवा वाटाणा, कडधान्य, राजमा, राजगिरा, चणे, ओट्स, नागली, बटाटा, योगर्ट या अन्नपदार्थांवर शरीराला कमी अधिक प्रमाणात प्रोटीन मिळू शकते.
आजच्या PROTEIN RICH FOOD FOR KIDS IN MARATHI | या प्रथिनेयुक्त आहाराने मुलांना बनवा एकदम हेल्दी या लेखात आपण लहान मुलांच्या शारीरिक वाढीसाठी दैनंदिन आहारात किती प्रमाणात प्रोटीन गरजेचे असते हे बघणार आहोत, त्याचप्रमाणे प्रोटीन च्या अभावामुळे कोण कोणत्या शारीरिक समस्या उद्भवू शकतात हे बघणार आहोत, प्रोटीन समृद्ध अन्नपदार्थांची माहिती घेणार आहोत त्याचबरोबर लहान मुलांसाठी सहज सोप्या पद्धतीने बनवता येणाऱ्या प्रोटीन समृद्ध पाककृती बघणार आहोत.
PROTEIN RICH FOOD FOR KIDS IN MARATHI | या प्रथिनेयुक्त आहाराने मुलांना बनवा एकदम हेल्दी
लहान मुलांच्या दैनंदिन आहारात किती प्रमाणात प्रोटीन असावे?
1 ते 3 वर्ष: 13gm
4 ते 8 वर्षे: 19 gm
प्रोटीन च्या अभावामुळे कोणत्या शारीरिक समस्या उद्भवतात?
रोगप्रतिकारशक्ती कमी होणे
वजन कमी होणे
अशक्तपणा येणे
सतत थकवा जाणवणे
शरीराचा योग्य पद्धतीने विकास न होणे
सतत आळस जाणवणे
सतत सुस्ती येणे
हे हि वाचा
६ ते १२ महिन्याच्या बाळासाठी आहार https://marathisampada.com/baby-food-recipes-in-marathi-for-6-12-month-baby/
२ वर्षाच्या बाळासाठी आहार तक्ता /आहार वेळापत्रक https://marathisampada.com/diet-chart-for-2-years-old-baby/
लहान मुलांसाठी लोह समृद्ध अन्नपदार्थ https://marathisampada.com/iron-rich-food-for-baby-in-marathi/
लहान मुलांच्या हाडांच्या वाढीसाठी कॅल्शियम युक्त आहार https://marathisampada.com/calcium-rich-food-for-baby-in-marathi/
मुलांना प्रोटीन युक्त आहाराची का गरज आहे?
फक्त लहान मुलांनाच नाहीतर मोठ्या माणसांना देखील प्रोटीन युक्त आहाराची खूप गरज आहे. आपल्या शरीराला प्रोटीनची का आवश्यकता आहे हे आपण समजून घेऊयात.
1) शरीरातील हाडांचे आरोग्य चांगले राहावे आणि हाडांना बळकटी यावी यासाठी प्रोटीन आवश्यक असते.
2) शरीरातील स्नायूंची योग्य पद्धतीने वाढ होण्यासाठी प्रोटीन आवश्यक असते.
3) केस आणि नखांच्या वाढीसाठी शरीराला प्रोटीन पुरवणे गरजेचे असते.
4) शरीराला मधल्या प्रमाणात प्रोटीन पुरवल्यास त्वचा चांगली राहण्यास मदत होते.
5) प्रोटीन युक्त आहारामुळे प्रतिकार शक्ती मजबूत होते.
6) शरीराला एनर्जी देण्यासाठी प्रोटीन गरजेचे असतात.
7) हार्मोनल बॅलन्स करण्यासाठी आणि मसल्स रिपेअर करण्यासाठी प्रोटीन आवश्यक असतात.
8) अँटीबॉडीज तयार करण्यासाठी देखील प्रोटीन ची गरज असते.
प्रोटीन युक्त अन्नपदार्थ:
1) राजगिरा:
राजगिऱ्याचे लाडू, चिक्की आपल्याकडे उपवासाच्या वेळी वापरले जातात. राजगिरा मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन उपलब्ध असते. त्यामुळे तुम्ही लहान मुलांना राजगिऱ्याचे लाडू आणि चिक्की तर देऊ शकता त्याचबरोबर राजगिऱ्याच्या पिठापासून शिरा, खीर, पुऱ्या आणि थालीपीठ देखील बनवून देऊ शकतात.
2) कडधान्य:
कडधान्यांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन उपलब्ध असते. कडधान्यांमध्ये जसे की मटकी, मसूर, मुग, हरभरा, उडीद, तूर , चणे यांचा समावेश होतो. रात्री भिजवून मोड आणून कडधान्याची भाजी किंवा सॅलड करून तुम्ही खाऊ शकतात. मीठ टाकून शिजवलेले कडधान्य मुले आवडीने खातात.
3) राजमा:
राजमा हा देखील कडधान्य मधील एक धान्य आहे. राजमा रात्रभर भिजवून सकाळी मीठ टाकून शिजवून तुम्ही मुलांना खायला देऊ शकता. राजमा मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन उपलब्ध असते त्याचबरोबर फॅट्स कमी प्रमाणात असतात त्यामुळे ज्या लोकांचं वजन वाढले आहे त्यांच्यासाठी राजमा हा एक चांगला पर्याय आहे.
4) ओट्स:
ओट्स हा प्रोटीन मिळविण्यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे. ओट्स हे कॉम्प्लेक्स कार्ब्स आहे. लहान मुलांना तुम्ही गोड आणि तिखट या दोन्ही चवींमध्ये ओट्स बनवून देऊ शकतात.
5) बटाटा:
स्टार्च युक्तअसलेली ही एक सर्वांचीच आवडती भाजी आहे. बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन उपलब्ध असते त्याचबरोबर इतर अनेक पोषण मूल्य देखील उपलब्ध असतात. लहान मुलांना उकडून बटाटा देणे, बटाट्याचा पराठा बनवणे, बटाट्याचे कटलेट बनवून देणे अशा प्रकारे तुम्ही मुलांना बटाटा देऊ शकता. बटाट्यामुळे लहान मुलांचे वजन वाढण्यासाठी देखील फायदा होतो.
6) भोपळ्याच्या बिया:
भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन तर उपलब्ध असतेच त्याचबरोबर फायबर, लोह, मॅग्नेशियम, आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड उपलब्ध असते. त्यामुळे भोपळ्याच्या बिया खाल्ल्यामुळे शरीराला फक्त प्रोटीनच मिळत नाही तर इतर अनेक पोषणमूल्य देखील म्हणतात. लहान मुलांना भोपळ्याच्या बिया भाजून खायला देऊ शकता.
7) फळभाज्या आणि पालेभाज्या:
आपल्या रोजच्या आहारातील फळभाज्या आणि पालेभाज्या मध्ये देखील प्रोटीन मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. बटाटा, पालक, रताळे, हिरवा वाटाणा, सर्व हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली यामध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन उपलब्ध असते. त्यामुळे रोजच्या आहारात एका तरी पालेभाजीचा किंवा फळ भाजीचा समावेश करावा. यामुळे लहान मुलांना भाज्या खायची सवय देखील लागेल.
8) सुकामेवा:
सुकामेवा मध्ये शरीरातील प्रोटीन ची कमतरता भरून काढण्याची क्षमता असते. रोजच्या रोज योग्य प्रमाणात काजू आणि बदाम यांचे सेवन केल्यास शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून निघू शकते. इतर कोणत्याही ड्रायफ्रूट पेक्षा काजू मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात प्रोटीन आढळून येतात.
9) शेंगदाणे:
शेंगदाणा मध्ये प्रोटीन, विटामिन आणि कॅलरीज मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. रोजच्या रोज शेंगदाणे खाल्ल्यास शरीराची प्रोटीन ची कमतरता भरून निघू शकते. रोज गुळ शेंगदाणे खाल्ल्यास शरीराची प्रोटीन ची कमतरता तर भरून निघेलच त्याचबरोबर गुळातून शरीराला लोह देखील मिळेल. तुम्ही लहान मुलांना
10) सोयाबीन:
सोयाबीन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन उपलब्ध असते. तुम्ही गव्हाचे पीठ दळताना त्यात सोयाबीन घालू शकतात. त्याचबरोबर सोयाबीन वडीचा तुम्ही रोजच्या आहारात वापर केल्यास शरीराची प्रोटीन ची कमतरता भरून निघू शकते.
11) डाळी:
सर्वच डाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन उपलब्ध असते. त्यामुळे लहान मुलांच्या दैनंदिन आहारात एकातरी डाळीचा वापर नक्की करा. यामुळे शरीराची प्रोटीन ची कमतरता भरून निघते. हाडांच्या बळकटीसाठी दररोज डाळीचे सेवन करणे गरजेचे असते.
हेही नक्की वाचा
वजन कमी करण्यासाठी स्त्री व पुरुषांसाठी टिप्स https://marathisampada.com/best-weight-loss-tips-for-men-and-women/
शाकाहारी प्रथिनेयुक्त आहार https://marathisampada.com/vegetarians-protein-diet-in-marathi/
वेगन डाएट म्हणजे नक्की काय ?https://marathisampada.com/vegan-diet-information-in-marathi/
वेगन डाएट करणाऱ्यांसाठी लोहयुक्त पदार्थ https://marathisampada.com/iron-rich-food-sources-for-vegan/
झटपट वजन वाढविण्यासाठी आहार https://marathisampada.com/food-for-weight-gain/
मुलांसाठी सहज सोप्या प्रोटीन युक्त पाककृती:
1) राजगिऱ्याचे थालीपीठ:
साहित्य:
राजगिरा पीठ
जिरे
मीठ
कांदा
हिरवी मिरची
कोथिंबीर
तेल
कृती:
1) एका भांड्यात गरजेनुसार राजगिऱ्याचे पीठ घ्यावे. त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची ,जिरे, धने पावडर, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालावे. थालीपीठ बनविण्यासाठी ज्याप्रमाणे पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ मळावे.
2) एक कापड घ्यावा, कापड पाण्यात भिजवून घ्या . जेवढे थालीपीठ करायचे आहे त्या आकाराचा गोळा घ्या आणि कपड्यावर थालीपीठ बनवून घ्या. थालीपीठ बनवल्यानंतर तव्याला तेल लावून त्यावर थालीपीठ टाका. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने थालीपीठ चांगले खरपूस भाजून घ्या.
3) तयार झालेले थालीपीठ तुम्ही टोमॅटो केचप सोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणी सोबत मुलांना देऊ शकता.
2) राजगिरा चा शिरा:
साहित्य:
राजगिरा पीठ
तूप
पाणी
साखर
कृती:
1) कढईत तूप टाकून राजगिरा पीठ चांगले खमंग भाजून घ्या.
2) पीठ भाजल्यानंतर त्यात गरम पाणी टाकून झाकण ठेवून शिजवून घ्या.
3) त्यानंतर त्यात साखर टाकून पुन्हा एकदा शिजवून घ्या.
4)तयार झालेल्या राजगिरा शिरा मुलांना देऊ शकता.
3) मिक्स डाळीची खिचडी:
साहित्य:
तूर डाळ: दोन चमचे
मूग डाळ: दोन चमचे
मसूर डाळ: दोन चमचे
उडीद डाळ: एक चमचा
तांदूळ: दीड वाटी
कांदा
लसूण
टोमॅटो
आलं
हिरवी मिरची
जिरे/ मोहरी
हळद
तेल
पाणी
मीठ
कृती:
1) सर्व डाळी व तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या. डाळी आणि तांदळाचे प्रमाण तुमच्या गरजेनुसार कमी-जास्त करून घ्या.
2) कुकर मध्ये तेल टाका त्यात फोडणीसाठी मोहरी आणि जिरे टाकावे. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा. कांदा गुलाबीसर परतल्यानंतर त्यात आलं-लसूण पेस्ट टाकावे.
3) त्यानंतर तेलात हिरवी मिरची आणि टोमॅटो टाका सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्यावे.
4) त्यानंतर तेलात धुवून घेतलेले तांदूळ आणि डाळ टाकावे. डाळ व तांदूळ दोन ते तीन मिनिटं तेलात व्यवस्थित भाजून घ्यावे.
5) नुसार पाणी टाकावे चवीनुसार मीठ घालून खिचडी शिजण्यासाठी ठेवावी.
6) गरम गरम खिचडी तूप घालून तुम्ही मुलांना खायला देऊ शकता.
7) मिक्स डाळीची खिचडी हे कम्प्लीट प्रोटीन रिच फूड आहे.
4) सोया चंक्स:
साहित्य:
सोया चंक्स
हळद
लाल तिखट
चाट मसाला
धने पावडर
जिरे
मीठ
तेल
कृती:
1) सोया चंक्स गरम पाण्यात पूर्ण शिजवून घ्या. थंड झाल्यानंतर दोन्ही हाताने दाबून त्यातील सर्व पाणी काढून घ्या.
2) कढईत तेल टाका त्यात जिरे, लाल तिखट, हळद, धना पावडर टाका त्यात शिजवून घेतलेले सोया चंक्स टाका चवीनुसार मीठ टाकून झाकण ठेवून वाफवून घ्या.
3) त्यानंतर थोडी कोथिंबीर घाला.
4) तयार झालेले सोया चंक्स टोमॅटो केचप बरोबर तुम्ही मुलांना देऊ शकता.
निष्कर्ष:
आजच्या PROTEIN RICH FOOD FOR KIDS IN MARATHI | या प्रथिनेयुक्त आहाराने मुलांना बनवा एकदम हेल्दी या लेखात आपण प्रोटीन बद्दल सविस्तर माहिती घेतली, शरीराला प्रोटीन ची आवश्यकता का आहे हे आपण बघितलं, प्रोटीन युक्त अन्नपदार्थ जे तुम्ही लहान मुलांना देऊ शकता त्याबद्दल सविस्तर माहिती घेतली, सहज सोप्या पद्धतीने बनवता येणाऱ्या प्रोटीन युक्त अन्नपदार्थांच्या पाककृती आपण बघितल्या. यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.
( लेखात सांगितलेली सर्व माहिती स्व-अनुभवांवरून सांगण्यात आली आहे. परंतु आपल्या बाळासाठी प्रोटीन युक्त आहार सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)