PRADHAN MANTRI UJJWALA YOJANA 2024 |प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४ , या योजनेअंतर्गत देशातील दारिद्र्य रेषेखालील 5 कोटी महिलांना मोफत घरगुती एलपीजी उपलब्ध करून देण्याचे सरकारचे ध्येय आहे. ग्रामीण भागात आजही चुलीवर स्वयंपाक केला जातो. चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी जंगलातून शेतातून लाकूड तोडून आणावी लागतात तसेच वाळलेले गवत, शेणाच्या गोवऱ्या इत्यादींचा वापर करून चूल पेटवली जाते आणि त्यावर स्वयंपाक केला जातो. लाकडी जमा करण्यासाठी खूप दूरपर्यंत जंगलांमध्ये जावे लागते, त्यासाठी खूप पायपीट करावी लागते. तसेच ही लाकडे चुलीत जाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे महिलांना त्रास होतो. त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. श्वसनाचे अनेक विकार जडतात. ह्या धुराचा दुष्परिणाम घरातील लहान बालकांवर देखील होतो. या धुरामुळे डोळ्यांचे देखील आरोग्य खराब होते. चुलीसाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडां साठी अनेक झाडे तोडावी लागतात. अनेक झाडांची कत्तल करावी लागते. त्यामुळे निसर्गाचा खूप मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो. वर्षानुवर्ष लावलेली झाडे एका क्षणात नष्ट होतात. याचा परिणाम म्हणजे सध्याचे वाढलेले तापमान हा आहे. हे लक्षात घेऊन प्रधानमंत्री उज्वला योजनेची अंमलबजावणी केली आहे.
महिलांच्या आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या शरीराची हानी रोखण्यासाठी तसेच पर्यावरण ऱ्हास कमी व्हावा हे दोन मुख्य ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना तयार करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील घरा घरात एलपीजी सिलेंडर पोचवले जातील. चुलीच्या वापरामुळे ग्रामीण भागात सामाजिक ,आर्थिक आणि आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होतात. या समस्यांवर उपाययोजना म्हणून PRADHAN MANTRI UJJWALA YOJANA 2024 |प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४ तयार करण्यात आली आहे. सर्वांना परवडणारे इंधन या योजने मार्फत घराघरात पोहोचवण्यात येणार आहे.
महिलांचे आरोग्य जपणे, स्वयंपाक करताना वापरण्यात येणारे लाकूड आणि त्यामुळे शरीरावर होणारे तीव्र दुष्परिणाम कमी करणे, जळालेल्या लाकडाच्या होणाऱ्या धुरामुळे घरातील स्त्रियां चे आणि बालकां चे श्वसन विकार कमी करणे हा प्रधानमंत्री उज्वला योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारा ने वय 18 वर्षे पूर्ण केलेले असावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला आपल्या जवळील एलपीजी वितरण केंद्रावर जाऊन अर्ज भरून द्यायचा आहे. अर्जात आपली वैयक्तिक माहिती जसे की नाव, पत्ता, आधार कार्ड नंबर, जनधन बँक खात्याचा नंबर व्यवस्थित भरून देणे बंधनकारक आहे. तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज देखील भरू शकतात. अर्जासोबत बीपीएल प्रमाणपत्र, बीपीएल रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचे फोटो असणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर, लाभार्थी योजनेसाठी पात्र किंवा अपात्र आहे हे ठरवले जाते. पात्र लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन खरेदी करण्याकरता 1600 रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात येते.
PRADHAN MANTRI UJJWALA YOJANA 2024 |प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४ अंतर्गत प्रधानमंत्री उज्वला योजना 2.0 अंतर्गत 75 लाख मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात येणार आहे. 2026 पर्यंत म्हणजे तीन वर्षांसाठी हे कनेक्शन दिले जाते. प्रत्येक लाभार्थी प्रतिवर्षी 12 सिलेंडरच्या रिफील साठी ₹200 अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने जमा केली जाईल.
PRADHAN MANTRI UJJWALA YOJANA 2024 |प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४
प्रधानमंत्री उज्वला योजनेचा उद्देश:
1) ग्रामीण भागातील महिलांचे स्वयंपाक घर धुर मुक्त करणे.
2) धुरामुळे स्त्रियांना आणि बालकांना होणाऱ्या श्वसन विकारांपासून रक्षण करणे.
3) पर्यावरणाचे रक्षण करणे. वृक्षतोड थांबवणे.
4) स्वयंपाक घरासाठी स्वच्छ इंधनाचा पुरवठा करणे.
5) महिलांचे जीवनमान सुधारणे.
केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा
राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/
अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/
लखपती दीदी योजना https://marathisampada.com/lakhpati-didi-yojana-2024/
प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/
सुकन्या समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/sukanya-samriddhi-yojana-2024-in-marathi/
प्रधानमंत्री उज्वला योजनेची वैशिष्ट्ये:
1) ग्रामीण भागातील महिलांना केंद्रबिंदू बनवून केंद्रसरकार ने ही योजना आखली आहे.
2) ग्रामीण भागातील महिलांच्या इंधन समस्या लक्षात घेऊन प्रधानमंत्री उज्वला योजनेची सुरुवात केली आहे.
3) या योजनेअंतर्गत दिले जाणारे गॅस कनेक्शन फक्त कुटुंबातील महिलेच्या नावावरच दिले जाणार आहे.
4) 2023- 24 या वर्षात 9 कोटी कुटुंबांना एलपीजी कनेक्शन देण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
5) प्रधानमंत्री उज्वला योजना मुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजनेचे फायदे:
1) या योजनेअंतर्गत मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिले जाणार आहे
2) या योजने चा लाभ देशातील महिलांना मिळणार आहे.
3) ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळणार आहे.
4) चुली मधून निघणाऱ्या धुरामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या कमी होतील.
5) महिलांना स्वयंपाक करणे सोपे होणार आहे.
6) वृक्षतोड कमी होईल.
7) प्रत्येक सिलेंडरवर ₹200 अनुदान दिले जाणार आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजनेचे लाभार्थी:
अनुसूचित जाती-जमातीतील कुटुंबीय
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील सर्व SC/ST कुटुंब
दारिद्र्य रेषेखालील कुटुंब(BPL)
अंत्योदय अन्न योजनेत समाविष्ट कुटुंब (AAY)
SECC अंतर्गत सूचीबद्ध कुटुंब
वनक्षेत्रात राहणारे कुटुंब
सर्वाधिक मागासवर्गीय कुटुंब
चहा आणि माझी चहा बाग जमाती
बेटे आणि नदी बेटांमध्ये राहणारे कुटुंब
14- कलमी घोषणेनुसार गरीब कुटुंब
केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग https://marathisampada.com/pmfme-scheme-2024-in-marathi/
नमो ड्रोन दीदी योजना https://marathisampada.com/namo-drone-didi-yojana-in-marathi/
महिला समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/mahila-samriddhi-yojana-2024-in-marath/
जननी सुरक्षा योजना २०२४ https://marathisampada.com/janani-suraksha-yojana-2024-in-marathi/
माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ https://marathisampada.com/mazi-kanya-bhagyashree-yojana-2024-in-marathi/
प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या पात्रता व अटी:
1) अर्जदार महिला भारताचा नागरिक असणे बंधनकारक आहे.
2) अर्जदार महिलेचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
3) दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बीपीएल कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
4) कुटुंबातील इतर कोणाकडे किंवा महिलेच्या नावावर आधीचे गॅस कनेक्शन नसावे.
5) अर्जदार महिलेचे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे बंधनकारक आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
बीपीएल रेशन कार्ड
मतदार ओळखपत्र
रहिवासी प्रमाणपत्र
जाती प्रमाणपत्र
जनधन बँक खात्याचे तपशील
कुटुंबातील सदस्यांचा आधार क्रमांक
पंचायत अधिकारी/ नगरपालिका यांनी प्रमाणित केलेले बीपीएल प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
पासपोर्ट साईज चे फोटो
प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:
1) प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास अधिकृत वेबसाईट ला म्हणजेच https://www.pmuy.gov.in या ऑफिशियल वेबसाईटला जावे लागेल.
2) होम पेजवर PMUY कनेक्शन साठी अर्ज करा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
3) त्यानंतर एक पेज ओपन होईल त्यात इंडेन गॅस , भारत गॅस , HP गॅस या पैकी एका LPG वितरण कंपनीची निवड करून त्या पर्यायावर क्लिक करा .
4)त्यानंतर LPG वितरकाची निवड करा .
5)त्यानंतर प्रधान मंत्री उज्ज्वला योजना eKYC अर्जावरील योग्य पर्यायांवर टिक करा.
6) त्यानंतर आधार नंबर आणि कप्चा टाकून OTP जनरेट करा
7) अर्जात विचारलेली वैयक्तिक माहिती व्यवस्थित भरावी .त्यानंतर LPG कनेक्शन ची निवड करावी लागेल ( २ किलो /५ किलो LPG सिलेंडर या पैकी एकाची निवड करा .)
8) त्यानंतर अर्ज सबमिट करा .तुम्हाला एक APPLICATION ID मिळेल तो नोट करून ठेवा .अशाप्रक्रारे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होते .
प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी ऑफ लाईन अर्ज प्रक्रिया:
1) तुमच्या जवळील LPG गॅस वितरण केंद्रात जाऊन योजनेसाठी अर्ज घ्या .
2)अर्जात विचारलेली वैयक्तिक माहिती व्यवस्थित भरा आणि अर्जात सांगितलेल्या सर्व कागदपत्रांची अर्ज सोबत जोडणी करून अर्ज LPG गॅस वितरण केंद्रात जमा करावा .
3)अर्जात गॅससिलेंडर वजनाची निवड करावी लागेल ( २ किलो /५ किलो LPG सिलेंडर या पैकी एकाची निवड करा .)
4 ) सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर तुम्ही योजनेसाठी पात्र ठराल .अशाप्रकारे योजनेची ऑफ लाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होते . दहा ते पंधरा दिवसात लाभार्थ्याला LPG कनेक्शन मिळते .
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0
PRADHAN MANTRI UJJWALA YOJANA 2024 |प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४ अंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 अंतर्गत 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने 1650 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यानंतर प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 10 कोटी 35 लाख इतकी होणार आहे. सर्वसामान्य ग्राहकांसाठी सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी करण्यात आले आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना या ₹200 व्यतिरिक्त प्रति सिलेंडर आणखी ₹200 ची येणार आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्यांना 400 रुपयांनी स्वस्त सिलेंडर मिळणार आहे. प्रधानमंत्री उज्वला योजना 2.0 मध्ये एक नवीन अपडेट देण्यात आली आहे. ती अशी की या योजनेचा फायदा स्थलांतरित मजुरांना देखील घेता येणार आहे. त्यासाठी रेशन कार्डचा कायमस्वरूपी पत्त्याची गरज लागणार नाही.
निष्कर्ष:
PRADHAN MANTRI UJJWALA YOJANA 2024 |प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४ या लेखात आपण प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेची सविस्तर माहिती बघितली . या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या एलपीजी सिलेंडर मुळे आणि मोफत गॅस कनेक्शन मुळे ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचावणार आहे. त्याचप्रमाणे स्वयंपाक घरात स्वयंपाकासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याची गरजही भासणार नाही. या योजनेमुळे महिला अधिक सक्षम बनतील यात शंका नाही. या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळण्यासाठी हा लेख जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तसेच शेतकऱ्यांसाठीच्या आणि महिलांसाठीच्या केंद्र सरकार व राज्य सरकारच्या इतर महत्त्वपूर्ण योजनांची सविस्तर माहिती वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.
FAQ:PRADHAN MANTRI UJJWALA YOJANA 2024 |प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४
1) प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी अर्ज कसा करावा?
ans: प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
2) प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी हेल्पलाईन नंबर काय आहे ?
ans:प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी हेल्पलाईन नंबर पुढील प्रमाणे :
उज्वला योजनेसाठी हेल्पलाईन नंबर: १८०० -२३३ -३५५५
टोल फ्री नंबर : १८०० -२६६ -६६९६
LPG Emergency हेल्पलाईन नंबर: १९०६
३)प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत किती अनुदान (Subsidy ) दिले जाते?
ans:प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत प्रत्येक सिलेंडर वर २०० रुपये इतके अनुदान (Subsidy ) दिले जाते?
केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा
प्रधान मंत्री मातृ वंदना योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-matru-vandana-yojana-2024-in-marathi/
लेक लाडकी योजना २०२४ https://marathisampada.com/lek-ladki-yojana-2024-in-marathi/
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२४ https://marathisampada.com/widow-pension-scheme-2024-in-marathi/
प्रधान मंत्री मुद्रा योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-mudra-yojana-2024/
आयुष्मान भारत योजना २०२४ https://marathisampada.com/ayushaman-bharat-yojana-2024/
प्रधान मंत्री कौशल विकास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-kaushal-vikas-yojana-2024/