PRADHAN MANTRI SAUBHAGYA YOJANA 2024 | प्रधान मंत्री सौभाग्य योजना २०२४

PRADHAN MANTRI SAUBHAGYA YOJANA 2024 | प्रधान मंत्री सौभाग्य योजना २०२४, भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2022 मध्ये संपूर्ण देशातील कोणतेही गरीब कुटुंब अंधारात राहू नये, प्रत्येक घरात वीज पोहोचली पाहिजे यासाठी प्रधानमंत्री सौभाग्य योजना सुरू केले. या योजनेअंतर्गत ज्या ज्या गरीब कुटुंबाकडे वीज कनेक्शन नाही अशा कुटुंबांना मोफत वीज देण्यास प्रारंभ केला.

प्रधानमंत्री सौभाग्य योजनेला प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना असे म्हटले जाते. देशातील ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना वीज कनेक्शन घेण्यासाठी जो खर्च लागतो तो परवडणारा नसतो. त्यामुळे अशी कुटुंबीय आपले संपूर्ण जीवन हे अंधारातच घालवत असतात. अशा आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना वीज जोडणे करून देऊन त्यांचे जीवन प्रकाशमय करण्याचा प्रधानमंत्री सौभाग्य योजनेचा उद्देश आहे.

आजच्या जगात आपल्या घरात एक दिवस वीज नसेल तरी आपण किती अस्वस्थ होतो. आणि ही गरीब कुटुंबीय वर्षानुवर्ष विजेशिवाय जगताय. विजेशिवाय जगताना किती अडचणी येतात त्या अडचणींचा सामना ते रोज करताय. मुलांना रात्री विजेशिवाय अभ्यास करता येत नसेल.

घरात विजेवर चालणाऱ्या यंत्रांची सुविधा नसेल .अशा काही अडचणी त्यांना समोर जावे लागत असेल. या सर्व गोष्टींचा विचार करून प्रधानमंत्री सौभाग्य योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटुंबांना वीज जोडणी करून त्यांचे आयुष्य सुखकर करण्यात येणार आहे.

PRADHAN MANTRI SAUBHAGYA YOJANA 2024 | प्रधान मंत्री सौभाग्य योजना २०२४ आजच्या लेखात आपण प्रधानमंत्री सौभाग्य योजनेची सविस्तर माहिती बघणार आहोत. ही योजना नेमकी काय आहे? या योजनेसाठी पात्रता व अटी काय आहेत? तसेच योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? योजनेसाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रांची गरज आहे? याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात बघणार आहोत. त्यासाठी लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

PRADHAN MANTRI SAUBHAGYA YOJANA 2024 | प्रधान मंत्री सौभाग्य योजना २०२४

PRADHAN MANTRI SAUBHAGYA YOJANA 2024

प्रधानमंत्री सौभाग्य योजनेचा उद्देश:

1)PRADHAN MANTRI SAUBHAGYA YOJANA 2024 योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील शहरी व ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटुंबांना मोफत वीज जोडणी करून देणे.

2) या योजनेअंतर्गत वीज कनेक्शन तर मोफत मिळतेच पण त्यासोबतच एक एलईडी बल्ब , डीसी पॉवर प्लग आणि पाच वर्षापर्यंत मीटर दुरुस्तीची मोफत सेवा दिली जाते. त्यासाठी लागणारा खर्च सरकार करते.

3)प्रधानमंत्री सौभाग्य योजनेअंतर्गत देशातील जवळपास 262.84 लाख घरांना वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. आतापर्यंत207.14 ग्रामीण भागातील घरांना वीज कनेक्शन देण्यात आले आहे.

4)वीज कनेक्शन देण्यासाठी 2011 च्या जनगणने चा उपयोग करण्यात आलेला आहे. त्या जनगणनेत नाव नोंदणी असलेल्या कुटुंबांना मोफत वीज कनेक्शन दिले जात आहे.

5) ज्या गरीब कुटुंबांची नावे या जनगणना यादीत नाही अशा कुटुंबांना ₹500 भरून वीज कनेक्शन देण्यात येणार आहे.

6) हे ₹500 एकदम न भरता 10 टप्प्यांमध्ये भरायचे आहे.

प्रधानमंत्री सौभाग्य योजनेचे फायदे:

1) देशातील प्रत्येक कुटुंबाला वीज कनेक्शन उपलब्ध करून देणे.

2) देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला वीज उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवनमान सुधारणे.

3) वीज उपलब्ध करून देऊन मुलांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.

4) गरीब कुटुंबांना वीज उपलब्ध करून देऊन त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे शिक्षण आरोग्य आणि आर्थिक प्रगतीला प्रोत्साहन देणे.

5) वीज कनेक्शन चा खर्च परवडत नसलेल्या गरीब कुटुंबांना मोफत वीज पुरवणे.

6) मोफत वीज कनेक्शन बरोबरच एक एलईडी बल्ब , डीसी पॉवर प्लग आणि पाच वर्षापर्यंत मीटर दुरुस्तीची मोफत सेवा दिली जाते.

7) वीज उपलब्ध झाल्यामुळे घरातील दैनंदिन कामे करणे सोयीचे होणार आहे.

8) विजेच्या उपलब्धतेमुळे मुलांना अभ्यास करताना अडचणी येणार नाहीत.

केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा

राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/

अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/

लखपती दीदी योजना https://marathisampada.com/lakhpati-didi-yojana-2024/

प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/

सुकन्या समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/sukanya-samriddhi-yojana-2024-in-marathi/

प्रधानमंत्री सौभाग्य योजनेसाठी पात्रता:

1) प्रधानमंत्री सौभाग्य योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.

2) प्रधानमंत्री सहभागी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा अर्जदार हा सरकारी कर्मचारी नसावा.

3) आयकर भरणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र नाही.

4) पाच एकर पेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा फायदा घेता येणार नाही.

5) जमीन आणि संपत्ती असणारे मालक या योजनेसाठी अपात्र आहेत.

6) जर व्यक्तीकडे तीन खोल्यांचे घर असेल तर ती व्यक्ती या योजनेसाठी अपात्र मानले जाईल.

7) अर्जदाराचे 2011 च्या जनगणनेच्या यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे.

8) 2011 च्या जनगणना यादीत नाव नसेल तर वीज कनेक्शन साठी ₹500 भरावे लागतात.

PRADHAN MANTRI SAUBHAGYA YOJANA 2024

प्रधानमंत्री सौभाग्य योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड

पॅन कार्ड

उत्पन्नाचा दाखला

जातीचे प्रमाणपत्र

रहिवासी दाखला

मोबाईल नंबर

पासपोर्ट साईज फोटो

ईमेल आयडी

प्रधानमंत्री सौभाग्य योजनेसाठी ऑफलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया:

1) प्रधानमंत्री सौभाग्य योजने साठी अर्ज करायचे असल्यास तुम्हाला तुमच्या जवळील महावितरण कार्यालयात जावे लागेल.

2) महावितरण कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांकडून तुम्हाला अर्ज मिळेल.

3) अर्ज व्यवस्थित वाचून भरावा, अर्जात विचारलेली वैयक्तिक माहिती व्यवस्थित भरावे.

4) अर्ज भरून झाल्यानंतर अर्ज सांगितलेली आवश्यक कागदपत्रे अर्जाला जोडावीत.

5) त्यानंतर अर्ज महावितरण कार्यालयात जमा करावा.

6) अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला एक पोच पावती देण्यात येईल. त्या पावतीच्या आधारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे हे तपासू शकता.

7) अर्ज जमा झाल्यानंतर संबंधित अधिकारी अर्जाचे आणि कागदपत्रांची पडताळणी करतील.

8) अशा प्रकारे प्रधानमंत्री सौभाग्य योजनेसाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होते.

9) अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर योजनेसाठी पात्र असलात तर पुढील काही दिवसातच तुम्हाला वीज कनेक्शन पुरवण्यात येते.

प्रधानमंत्री सौभाग्य योजनेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया:

1) प्रधानमंत्री सौभाग्य योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला http://saubhagya.gov.in भेट द्यावी लागेल.

2) तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल त्यावरील गेस्ट (Guest) या पर्यायावर क्लिक करा.

3) साइन इन करण्यासाठी तुमचा आयडी आणि पासवर्ड टाका आणि साइन इन बटनावर क्लिक करा.

4) साइन इन झाल्यानंतर तुम्हाला योजनेची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.

5) त्यानंतर तुम्हाला योजनेसाठी चा अर्ज दिसेल त्या अर्जावर क्लिक करा.

6) अर्ज ओपन झाल्यावर अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा.

7) संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर , अर्ज सांगितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

8) सर्व आवश्यक कागदपत्रांची अपलोडिंग झाल्यानंतर अर्ज सबमिट करा.

9) अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळेल. या नोंदणी क्रमांकाचा उपयोग करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे हे तपासू शकता.

10) अशा प्रकारे प्रधानमंत्री सौभाग्य योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होते.

केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग https://marathisampada.com/pmfme-scheme-2024-in-marathi/

नमो ड्रोन दीदी योजना https://marathisampada.com/namo-drone-didi-yojana-in-marathi/

महिला समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/mahila-samriddhi-yojana-2024-in-marath/

जननी सुरक्षा योजना २०२४ https://marathisampada.com/janani-suraksha-yojana-2024-in-marathi/

माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ https://marathisampada.com/mazi-kanya-bhagyashree-yojana-2024-in-marathi/

निष्कर्ष:

PRADHAN MANTRI SAUBHAGYA YOJANA 2024 | प्रधान मंत्री सौभाग्य योजना २०२४ या लेखात आपण प्रधानमंत्री सौभाग्य योजनेची सविस्तर माहिती घेतली. योजनेसाठी काय पात्रता व अटी आहेत, योजनेचा अर्ज कसा करावा, त्याचबरोबर कोणकोणते आवश्यक कागदपत्रे योजनेसाठी लागतात याबद्दल माहिती बघितली. PRADHAN MANTRI SAUBHAGYA YOJANA 2024 योजनेमुळे देशातील सर्व गरीब कुटुंबांचे आयुष्य प्रकाशमय होईल यात शंका नाही. शेतकऱ्यांसाठीच्या, महिलांसाठीच्या, मुलींसाठीच्या केंद्र सरकार व राज्य सरकारच्या इतरही महत्त्वपूर्ण योजनांची सविस्तर माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना व्हावा यासाठी लेख जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.

FAQ: PRADHAN MANTRI SAUBHAGYA YOJANA 2024 | प्रधान मंत्री सौभाग्य योजना २०२४

1) प्रधानमंत्री सौभाग्य योजना काय आहे?

ans: प्रधानमंत्री सौभाग्य योजनेअंतर्गत देशातील गरीब कुटुंबांना मोफत वीज कनेक्शन पुरवणे .

2) प्रधानमंत्री सौभाग्य योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

ans: देशातील आर्थिक दृष्ट्या आणि गरीब कुटुंबीय प्रधानमंत्री सौभाग्य योजनेचा लाभ घेऊ शकतात.

3) प्रधानमंत्री सौभाग्य योजनेसाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतात?

ans: प्रधानमंत्री सौभाग्य योजनेसाठी खालील आवश्यक कागदपत्रे लागतात:

आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो, ईमेल आयडी इत्यादी.

4) प्रधानमंत्री सौभाग्य योजनेसाठी कोण पात्र आहे?

ans: 2011 च्या जनगणनेच्या यादीत नाव असणारे आणि भारताचा नागरिक असलेले सर्वच गरीब कुटुंबीय प्रधानमंत्री सौभाग्य योजनेसाठी पात्र आहेत.

5) प्रधानमंत्री सौभाग्य योजनेसाठी कोण पात्र नाही?

ans: आयकर भरणारी व्यक्ती, जमीन व संपत्तीचे मालक असणारी व्यक्ती, पाच एकर पेक्षा जास्त जमीन असणारी व्यक्ती, सरकारी कर्मचारी असणारी व्यक्ती, आणि तीन खोल्यांचे घर असणारे व्यक्ती प्रधानमंत्री सौभाग्य योजनेसाठी पात्र नाहीत.

6) 2011 च्या जनगणनेत नाव नसेल तर प्रधानमंत्री सौभाग्य योजनेचा फायदा कसा घ्यावा?

ans: 2011 च्या जनगणनेत नाव नसेल तर ₹500 भरून प्रधानमंत्री सौभाग्य योजना अंतर्गत वीज कनेक्शन मिळू शकते.

7) प्रधान मंत्री सौभाग्य योजनेची अधिकृत वेबसाईट काय आहे ?

ans: प्रधान मंत्री सौभाग्य योजनेची http://saubhagya.gov.in हि अधिकृत वेबसाईट आहे.

केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा

प्रधान मंत्री मातृ वंदना योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-matru-vandana-yojana-2024-in-marathi/

लेक लाडकी योजना २०२४ https://marathisampada.com/lek-ladki-yojana-2024-in-marathi/

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२४ https://marathisampada.com/widow-pension-scheme-2024-in-marathi/

प्रधान मंत्री मुद्रा योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-mudra-yojana-2024/

आयुष्मान भारत योजना २०२४ https://marathisampada.com/ayushaman-bharat-yojana-2024/

प्रधान मंत्री कौशल विकास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-kaushal-vikas-yojana-2024/

प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-ujjwala-yojana-2024/

प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना २०२४ https://marathisampada.com/pm-kisan-sanman-nidhi-yojana-2024/