PRADHAN MANTRI MUDRA YOJANA 2024| प्रधान मंत्री मुद्रा योजना २०२४

PRADHAN MANTRI MUDRA YOJANA 2024| प्रधान मंत्री मुद्रा योजना २०२४ ( पी एम एम वाय) या योजनेअंतर्गत लघुउद्योगांना म्हणजेच लहान उद्योगांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 8 एप्रिल 2015 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रीफायनांस एजन्सी” अर्थात मुद्रा बँकेचे उद्घाटन केले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी जवळजवळ वीस कोटी रुपये इतके उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुद्रा बँकेतर्फे लहान उद्योगांना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. कर्जाची तीन श्रेणीत विभागणी केली आहे. शिशु श्रेणी, किशोर श्रेणी, तरुण श्रेणी. विविध श्रेणीनुसार कर्जाची रक्कम ही वेगवेगळी आहे. आपला व्यवसाय किती लहान किती मोठा आहे यावरून आपण कर्जाची रक्कम ठरू शकतो. त्यानुसार त्या श्रेणीतील कर्ज आपल्याला उपलब्ध होऊ शकते.

मुद्रा बँकेनुसार देशातील इतर बँकांनीही लघु उद्योगांना कर्ज द्यावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल. मुद्रा बँकेद्वारे लहान दुकानदार आणि कारखानदार यांनाही कर्ज मिळेल. एखाद्याला नवीन उद्योग सुरू करायचा असेल किंवा नवीन काम सुरू करायचे असेल त्यांनाही मुद्रा योजनेमार्फत कर्ज मिळू शकते. तसेच भाजीवाले, फेरीवाले, दुकानदार यांनाही प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे कर्ज मिळू शकते.

मुद्रा बँकेचे कामकाजाचे रिझर्व बँकेच्या नियंत्रणाखाली चालते. मुद्रा बँक ही मुख्यतः लघु उद्योगा साठी कर्ज पुरवठा करते. मुद्रा योजनेद्वारे मिळालेल्या कर्जावर व्याजदरही कमी आहे. एखाद्या व्यक्तीचे कर्ज मंजूर झाल्यावर त्या लाभार्थी व्यक्तीला मुद्रा कार्ड दिले जाते. हे कार्ड क्रेडिट कार्ड सारखे काम करते आणि जेवढे कर्ज मंजूर झाले आहे त्यानुसार ते वापरता येते.

PRADHAN MANTRI MUDRA YOJANA 2024| प्रधान मंत्री मुद्रा योजना २०२४ योजनेच्या महत्त्वपूर्ण बाबी कशा आहेत की मुद्रा योजनेतील कर्ज घेण्यासाठी जामीन लागणार नाही, तसेच कोणत्याही प्रकारचे मोर्गेस ठेवावे लागणार नाही, स्वतःच्या व्यवसायात किंवा उद्योगात स्वतःचे 10% भांडवल गुंतवण्याची गरज नाही, ही योजना फक्त सरकारी बँकेतच मिळू शकते, योजनेचा लाभ घेणारा लाभार्थीचे वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी वर कोणत्याही बँकेचे थकबाकी नसावे.

PRADHAN MANTRI MUDRA YOJANA 2024| प्रधान मंत्री मुद्रा योजना २०२४ योजनेचे दोन मुख्य उद्दिष्ट असे आहेत की लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देणे आणि लहान लहान उद्योगाद्वारे रोजगार निर्मिती निर्माण करणे. एखाद्याला व्यवसाय उभा करायचा आहे भांडवलाची आवश्यकता आहे भांडवल कसे उभे करावे कळत नसेल तर त्याला व्यवसाय उभा करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे कर्ज मिळते.

लघु उद्योजकांना आणि नवउद्योजकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री मुद्रा योजना ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. अनेक नवीन उद्योगातून रोजगार निर्मिती तर होईलच. त्याचप्रमाणे इतरांना नवीन उद्योग चालू करण्याची प्रेरणा देखील मिळेल.तसेच महिलांना देखील नवनवीन व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळेल. या प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अहवालानुसार दर तीन पुरुषांमागे एक महिला प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेते. हे प्रमाण अधिकाधिक व्हावे महिलांनी उद्योग क्षेत्रा भरभराट करावे हा या योजनेचा हेतू आहे.

PRADHAN MANTRI MUDRA YOJANA 2024| प्रधान मंत्री मुद्रा योजना २०२४ या लेखात आपण प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे कोणत्या प्रकारचे कर्ज उपलब्ध होऊ शकते हे बघणार आहोत. या योजनेचे फायदे कसे आहेत, योजनेसाठी अर्ज कसा करावा, योजनेसाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतात याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत.

Table of Contents

PRADHAN MANTRI MUDRA YOJANA 2024| प्रधान मंत्री मुद्रा योजना २०२४

PRADHAN MANTRI MUDRA YOJANA 2024

प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील कर्जाचे प्रकार:

1) शिशु कर्ज: शिशु कर्जा अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

2) किशोर कर्ज: किशोर कर्जा अंतर्गत 50,000 ते 5 लाख रुपया पर्यंत कर्ज दिले जाते.

3) तरुण कर्ज: तरुण कर्ज अंतर्गत पाच लाख ते 10 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे फायदे:

1) प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत हमी शिवाय कर्ज दिले जाते.

2) पंतप्रधान मंत्री मुद्रा योजनेत कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही.

3) प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाचा परतफेड कालावधी पाच वर्षांपर्यंत वाढवता येतो.

4) प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्जदाराला मुद्रा कार्ड दिले जाते, उद्योगाच्या गरजेनुसार त्याला खर्च करता येतो.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

1) देशातील कोणतीही व्यक्ती ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा लोकांना प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत कर्ज मिळते.

2) तुमचा एखादा व्यवसाय काय आहे आणि तुम्हाला त्या व्यवसायात वाढ करायची असेल त्यासाठी तुम्हाला भांडवलाची आवश्यकता असल्यास तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळू शकतात.

PRADHAN MANTRI MUDRA YOJANA 2024

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या महत्त्वपूर्ण बाबी:

1) मुद्रा योजनेतील कर्ज घेण्यासाठी जामीन लागणार नाही.

2) कोणत्याही प्रकारचे मोर्गेस ठेवावे लागणार नाही.

3) स्वतःच्या व्यवसायात किंवा उद्योगात स्वतःचे 10% भांडवल गुंतवण्याची गरज नाही.

4) ही योजना फक्त सरकारी बँकेतच मिळू शकते.

5) योजनेचा लाभ घेणारा लाभार्थीचे वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे.

6)प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी वर कोणत्याही बँकेचे थकबाकी नसावे.

प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत घेतलेल्या कर्जावर किती व्याजदर आहे?

1)प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत वेगवेगळ्या श्रेणीतील कर्जावर वेगवेगळ्या व्याजदर आकारला जातो.

२)आपल्या व्यवसायाचे स्वरूप त्याला लागणारा भांडवल खर्च आणि व्यवसायातील जोखीम याच्या आधारावर व्याजदर निश्चित केला जातो.

3)कमीत कमी 12% इतका व्याजदर आकारला जातो.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी अर्ज कसा करावा?

प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत आपल्याला आपल्या उद्योगासाठी कर्ज हवे असल्यास आपल्याला पुढील पद्धतीचा वापर करावा लागेल.

1) प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराला संबंधित बँकेकडे अर्ज करावा लागेल.

2) अर्जात वैयक्तिक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर व्यवस्थित भरावी.

3) अर्जात सांगितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे भरलेल्या अर्जाचा सहित बँकेत जमा करावे.

4) अशाप्रकारे प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

5) बँक अधिकारी अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी करतील.

6) मान्य केलेल्या कर्जाची रक्कम एक महिन्याच्या आत आपल्या बँक खात्यावर पाठवले जाईल.

7) बँक खात्यावर कर्जाची रक्कम आल्यानंतर आपण आपल्या उद्योगासाठी हे कर्ज वापरू शकतात.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड/ मतदान ओळखपत्र

रहिवासी दाखला( लाईट बिल, घराची पावती)

आपण जो व्यवसाय चालू करणार आहोत त्याचा परवाना व स्थायी पत्ता

व्यवसायासाठी लागणारे भांडवल/ यंत्रसामग्री यांची कोटेशन व बिल

व्यवसायासाठी लागणारे भांडवल ज्या व्यापाऱ्याकडून घेतले त्याचे पूर्ण नाव व पत्ता

पासपोर्ट आकाराचे फोटो

मोबाईल नंबर

ई-मेल आयडी

PRADHAN MANTRI MUDRA YOJANA 2024

निष्कर्ष

PRADHAN MANTRI MUDRA YOJANA 2024| प्रधान मंत्री मुद्रा योजना २०२४ या लेखात आपण प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सविस्तर माहिती घेतली. योजनेचे फायदे, कर्जाच्या श्रेणी, तसेच योजनेसाठी अर्ज कसा करावा, योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, याबद्दल माहिती घेतली. नवोदय उद्योजकांसाठी केंद्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. शेतकऱ्यांसाठीच्या, महिलांसाठीच्या, मुलींसाठीच्या विविध योजनां ची सविस्तर माहिती वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. असा महत्त्वपूर्ण लेखांचा फायदा जास्तीत जास्त लोकांना पोहोचवण्यासाठी लेख जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.

FAQ:PRADHAN MANTRI MUDRA YOJANA 2024| प्रधान मंत्री मुद्रा योजना २०२४

1) प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत कोणाला कर्ज मिळते?

ans: प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत लहान उद्योजक, दुकानदार, फळ वाले, कारखानदार, फेरीवाले यांना कर्ज मिळू शकते.

2) प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत किती लाखापर्यंत कर्ज मिळते?

ans: प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत 10 लाखांपर्यंत कर्ज मिळते.

3) प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील कर्जाच्या श्रेणी काय आहेत?

ans: प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील कर्जाच्या श्रेणी खालील प्रमाणे:

1) शिशु कर्ज: शिशु कर्जा अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

2) किशोर कर्ज: किशोर कर्जा अंतर्गत 50,000 ते 5 लाख रुपया पर्यंत कर्ज दिले जाते.

3) तरुण कर्ज: तरुण कर्ज अंतर्गत पाच लाख ते 10 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.

4) प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जा चा व्याजदर किती आहे?

ans: प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर निश्चित नाही.

5)प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी कोण कोणते आवश्यक कागदपत्रे लागतात?

ans: प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी खालील आवश्यक कागदपत्रे लागतात:

आधार कार्ड/ मतदान ओळखपत्र, रहिवासी दाखला( लाईट बिल, घराची पावती), आपण जो व्यवसाय चालू करणार आहोत त्याचा परवाना व स्थायी पत्ता, व्यवसायासाठी लागणारे भांडवल/ यंत्रसामग्री यांची कोटेशन व बिल, व्यवसायासाठी लागणारे भांडवल ज्या व्यापाऱ्याकडून घेतले त्याचे पूर्ण नाव व पत्ता, पासपोर्ट आकाराचे फोटो,मोबाईल नंबर,ई-मेल आयडी इत्यादी.

6) प्रधानमंत्री मुद्रा योजना यासाठी वयाची काय अट आहे?

ans: प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे 18 वर्षे पूर्ण असावे.

7) प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत कर्ज घेण्यासाठी जामीन लागतो का?

ans: प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत कर्ज घेण्यासाठी जामीन लागत नाही.

8) प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ज्या व्यवसायासाठी कर्ज मिळते त्या व्यवसायात स्व- गुंतवणूक करणे गरजेचे आहे का?

ans: प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत ज्या व्यवसायासाठी कर्ज मिळते त्या व्यवसायात स्वगुंतवणूक करणे गरजेचे नाही.

9) प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ खाजगी बँकेत मिळू शकतो का?

ans: प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ सरकारी बँकेतच मिळू शकतो.

हेही वाचा

राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/

अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/

लखपती दीदी योजना https://marathisampada.com/lakhpati-didi-yojana-2024/

प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/

सुकन्या समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/sukanya-samriddhi-yojana-2024-in-marathi/

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग https://marathisampada.com/pmfme-scheme-2024-in-marathi/

नमो ड्रोन दीदी योजना https://marathisampada.com/namo-drone-didi-yojana-in-marathi/

महिला समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/mahila-samriddhi-yojana-2024-in-marath/

जननी सुरक्षा योजना २०२४ https://marathisampada.com/janani-suraksha-yojana-2024-in-marathi/

माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ https://marathisampada.com/mazi-kanya-bhagyashree-yojana-2024-in-marathi/

प्रधान मंत्री मातृ वंदना योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-matru-vandana-yojana-2024-in-marathi/

लेक लाडकी योजना २०२४ https://marathisampada.com/lek-ladki-yojana-2024-in-marathi/

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२४ https://marathisampada.com/widow-pension-scheme-2024-in-marathi/