PRADHAN MANTRI MATRU VANDANA YOJANA 2024 IN MARATHI |प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २०२४

PRADHAN MANTRI MATRU VANDANA YOJANA 2024 IN MARATHI |प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २०२४ , देशातील मातांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडून राबविण्यात आलेली ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. आपल्या देशातील दारिद्र्य रेषेखालील अनेक कुटुंबांना मोलमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह करावा लागतो. पुरुषांप्रमाणे महिलांना देखील मोलमजुरी करून आपले व आपल्या कुटुंबाचे पोट भरावे लागते. अशातच महिला गर्भवती असेल तर तिला नुसता आराम करता येत नाही, कारण संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर असते, अशा अवस्थेतही तिला मोलमजुरी करण्यासाठी जावेच लागते. याचा विपरीत परिणाम म्हणजे गर्भवती माता आणि त्यांच्या गर्भातील बालकाच्या आरोग्यावर होतो. गर्भवती मातेला योग्य प्रमाणात आहार न मिळाल्यामुळे गर्भवती माता कुपोषित होते तिची शारीरिक क्षमता कमी होते .आणि याचा परिणाम गर्भातील बालकाच्या आरोग्यावर होतो. अति काम आणि पोषक आहाराचा अभाव यामुळे कधीकधी प्रसूतीच्या वेळी गर्भवती मातेचा मृत्यू होणे किंवा गर्भातील बालकाचा मृत्यू होणे, कुपोषित बालक जन्माला येणे अशा घटना घडतात. तसेच बाळ जन्माला आल्यानंतर आईचे पुरेसे दूध न मिळाल्यामुळे बाळ कुपोषित होते कधी कधी मृत्यू देखील ओढवतो.

PRADHAN MANTRI MATRU VANDANA YOJANA 2024 IN MARATHI |प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २०२४ योजनेअंतर्गत गर्भवती माता आणि बालकांच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी तसेच मातेला व बालकांना सकस आणि पोषण आहार पुरवून मातेच्या व बालकांच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणणे. गर्भवती माता व नवजात पालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करणे. हा या योजनेचा उद्देश आहे.

केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 1 जानेवारी 2017 रोजी सुरू केले. लाभार्थी महिला जर जननी सुरक्षा योजनेची पण लाभार्थी असेल तर तिला अतिरिक्त ₹1000 म्हणजेच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना व स्तनपान मातांना एकूण 6000 रुपये इतके आर्थिक सहाय्य मिळेल. हे आर्थिक सहाय्यक तीन हप्त्यांमध्ये मिळेल. गर्भधारणेच्या तारखेची नोंदणी केल्यानंतर 1000 रुपये हा पहिला हप्ता, त्यानंतर गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर प्रसूतीपूर्व तपासणी पूर्ण केल्यानंतर 2000 रुपये हा दुसरा हप्ता तर प्रसूती झाल्यानंतर बालकाच्या जन्मानंतर आणि बीसीजी, डी पी टी, ओ पी व्ही आणि हिपॅटायटिस बी ह्या लसींचा लसीकरण झाल्यानंतर योजनेचा तिसरा हप्ता ₹2000 रुपये मिळतील. आणि जननी सुरक्षा योजनेअंतर्गत महिलेला ₹1000 दिले जातील .

PRADHAN MANTRI MATRU VANDANA YOJANA 2024 IN MARATHI |प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २०२४ योजनेत केंद्र शासनाचा 60% तर राज्य शासनाचा 40% काटा असेल. या या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा होईल.

PRADHAN MANTRI MATRU VANDANA YOJANA 2024 IN MARATHI |प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २०२४ या लेखात आपण प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी काय पात्रता व अटी आहेत, योजनेसाठी अर्ज कसा करावा योजनेसाठी चा आर्थिक लाभ कसा मिळवावा त्याचप्रमाणे योजनेचा अर्ज करताना कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतात याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत.यासाठी लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

PRADHAN MANTRI MATRU VANDANA YOJANA 2024 IN MARATHI |प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २०२४

PRADHAN MANTRI MATRU VANDANA YOJANA 2024 IN MARATHI

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २०२४ योजनेचा उद्देश:

गर्भवती महिलांना आर्थिक मदत व सकस आहार पुरवून नवजात बालकाला आणि गर्भवती मातेला कुपोषित होण्यापासून वाचवणे.

गरोदरपणात मातेला काम न करता आर्थिक मदत देणे.

गर्भवती माता व नवजात बालकां चा मृत्युदर कमी करणे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत:

1) पहिला हप्ता: ₹1000 गरोदरपणाच्या नोंदणीच्या वेळेस.

2) दुसरा हप्ता: ₹2000 गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर आणि प्रसुतीपूर्व तपासणी झाल्यानंतर.

3) तिसरा हप्ता: ₹2000 प्रसूती झाल्यानंतर बालकाच्या जन्मानंतर आणि बीसीजी, डी पी टी, ओ पी व्ही आणि हिपॅटायटिस बी ह्या लसींचा लसीकरण झाल्यानंतर

4) जननी सुरक्षा योजना अंतर्गत ₹1000 लाभार्थी महिलेला प्रसूती झाल्यानंतर मिळतात.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी साठी पात्रता:

1) अर्ज करणारी महिला महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे बंधनकारक आहे.

2) या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला फक्त एकदाच लाभ मिळवता येईल.

3) पहिला हप्ता मिळाल्यानंतर प्रसूती दरम्यान गर्भपात झाल्यास पुढील गर्भधारणेच्या वेळेस योजनेचे पुढील हप्ते महिलेला मिळतात.

4) 1 जानेवारी 2017 रोजी किंवा त्यानंतर गर्भधारणा झालेल्या सर्व महिला प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेऊ शकतात.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी नोंदणी:

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी ऑफलाईन नोंदणी कशी करावी?

1) अर्जदार महिलांनी आपल्या जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र, आरोग्य सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य अधिकारी कार्यालय जाऊन या योजनेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

2) नोंदणीसाठी फॉर्म 1-A व्यवस्थित भरून आवश्यक कागदपत्रांसह आणि पतीच्या संमती पत्रासह अंगणवाडी सेविका किंवा आरोग्य अधिकारी कार्यालयात फॉर्म जमा करावा.

3) अंगणवाडी सेविका कडून लाभार्थी महिलेला पावती देण्यात येईल.

4) भविष्यातील आर्थिक लाभासाठी ही पावती जपून ठेवणे गरजेचे आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी?

1) महिला व बालविकास मंत्रालयाच्या ऑफिशिअल वेबसाईट ला भेट द्या.

2) होम पेज ओपन होईल त्यावर ई-मेल आयडी, पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉगिन करा.

3) लॉगिन केल्यानंतर प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा अर्ज ओपन होईल.

4) फॉर्म मध्ये विचारलेली माहिती वाचून व्यवस्थित भरा.

5) फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा, अशा प्रकारे प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी पूर्ण होईल.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी आवश्यक कागदपत्र:

महिला व तिच्या पतीचे आधार कार्ड

रेशन कार्ड

बँक खात्याची माहिती/ पोस्ट खात्याची माहिती

पासपोर्ट आकाराचे फोटो

माता व बाळ संरक्षण काळ(MCP कार्ड)

मोबाईल नंबर

आर्थिक लाभ घेण्यासाठी हप्त्या नुसार कागदपत्रांची आवश्यकता:

1) पहिला हप्ता तुम्ही मला पण डिस्टर्ब करताय तुम्हाला पण डिस्टर्ब होत आहे त्याच्यामुळे: फॉर्म1-A पूर्ण भरून त्यासोबत माता बाल संरक्षण प्रमाणपत्र व बँक किंवा पोस्ट खात्याची संपूर्ण माहिती.

2) दुसरा हप्ता: किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी केल्याचे प्रमाणपत्र फॉर्म1-B प्रत.

3) तिसरा हप्ता: जन्म नोंदणी प्रमाणपत्र फॉर्म1-C प्रत , बाळाच्या लसीकरणाचा पहिला डोस दिल्याची नोंदणी, माता व बाल संरक्षण प्रमाणपत्र .

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी हेल्पलाइन नंबर:

हेल्पलाइन नंबर: 104

PRADHAN MANTRI MATRU VANDANA YOJANA 2024 IN MARATHI

निष्कर्ष:

PRADHAN MANTRI MATRU VANDANA YOJANA 2024 IN MARATHI |प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २०२४ या लेखात आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची संपूर्ण माहिती बघितली. योजनेसाठी पात्रता, योजनेचा उद्देश वैशिष्ट्य त्याचप्रमाणे अर्ज करण्याची पद्धत याबद्दल सविस्तर माहिती बघितली . केंद्र सरकार व राज्य सरकारच्या महिलांसाठी, बालकांसाठी, शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची सविस्तर माहिती होण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. लेख महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या माहितीतील लोकांना नक्की शेअर करा. लेख आवडल्यास मला नक्की कळवा. धन्यवाद.

हेही वाचा

राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/

अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/

लखपती दीदी योजना https://marathisampada.com/lakhpati-didi-yojana-2024/

प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/

सुकन्या समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/sukanya-samriddhi-yojana-2024-in-marathi/

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग https://marathisampada.com/pmfme-scheme-2024-in-marathi/

नमो ड्रोन दीदी योजना https://marathisampada.com/namo-drone-didi-yojana-in-marathi/

महिला समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/mahila-samriddhi-yojana-2024-in-marath/

जननी सुरक्षा योजना २०२४ https://marathisampada.com/janani-suraksha-yojana-2024-in-marathi/

माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ https://marathisampada.com/mazi-kanya-bhagyashree-yojana-2024-in-marathi/

FAQ:PRADHAN MANTRI MATRU VANDANA YOJANA 2024 IN MARATHI |प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २०२४

1) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना कोणासाठी आहे?

ans: प्रधानमंत्री मातृ वंदना योजना गर्भवती मातेसाठी व तिच्या नवजात बालकांसाठी आहे.

2) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत किती पैसे मिळतात?

ans: प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला 6000 रुपये मिळतात.

3) प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा अर्ज कसा करावा?

ans: प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा अर्ज ऑनलाइन व ऑफलाइन ते तिने करू शकता.

4) प्रधानमंत्री मातृ वंदना योजने साठी किती वय असावे?

ans: प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी गर्भवती महिलेचे वय 19 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.

5) प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ कधीपासून घेऊ शकतो?

ans: 1 जानेवारी 2017 रोजी किंवा त्यानंतर गर्भधारणा झालेल्या गर्भवती महिला प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेऊ शकता.

6) प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे पैसे किती हप्त्यांमध्ये मिळतात?

ans: प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे पैसे तीन हप्त्यांमध्ये मिळतात. ते हप्ते खालील प्रमाणे:

1) पहिला हप्ता: ₹1000 गरोदरपणाच्या नोंदणीच्या वेळेस.

2) दुसरा हप्ता: ₹2000 गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर आणि प्रसुतीपूर्व तपासणी झाल्यानंतर.

3) तिसरा हप्ता: ₹2000 प्रसूती झाल्यानंतर बालकाच्या जन्मानंतर आणि बीसीजी, डी पी टी, ओ पी व्ही आणि हिपॅटायटिस बी ह्या लसींचा लसीकरण झाल्यानंतर

4) जननी सुरक्षा योजना अंतर्गत ₹1000 लाभार्थी महिलेला प्रसूती झाल्यानंतर मिळतात.

7) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना साठी हेल्पलाइन नंबर काय आहे?

ans: प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी हेल्पलाइन नंबर 104 हा आहे.

8) प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी अर्ज करताना कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतात?

ans: प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी अर्ज करताना खालील आवश्यक कागदपत्रे लागतात:

महिला व तिच्या पतीचे आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खात्याची माहिती/ पोस्ट खात्याची माहिती, पासपोर्ट आकाराचे फोटो ,माता व बाळ संरक्षण काळ(MCP कार्ड), मोबाईल नंबर इत्यादी

9) प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी हत्या नुसार कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतात?

ans: प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी हत्या नुसार खालील आवश्यक कागदपत्रे लागतात:

1) पहिला हप्ता तुम्ही मला पण डिस्टर्ब करताय तुम्हाला पण डिस्टर्ब होत आहे त्याच्यामुळे: फॉर्म1-A पूर्ण भरून त्यासोबत माता बाल संरक्षण प्रमाणपत्र व बँक किंवा पोस्ट खात्याची संपूर्ण माहिती.

2) दुसरा हप्ता: किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी केल्याचे प्रमाणपत्र फॉर्म1-B प्रत.

3) तिसरा हप्ता: जन्म नोंदणी प्रमाणपत्र फॉर्म1-C प्रत , बाळाच्या लसीकरणाचा पहिला डोस दिल्याची नोंदणी, माता व बाल संरक्षण प्रमाणपत्र .

10) प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ महिला किती वेळा घेऊ शकतात?

ans: प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ लाभार्थी महिला फक्त एकदाच घेऊ शकते.

11) प्रसूती दरम्यान गर्भपात झाल्यास या योजनेचा लाभ कसा मिळवता येतो?

ans: प्रसूती दरम्यान गर्भपात झाल्यास पुढील गर्भधारणेच्या वेळेस पंतप्रधान मातृ वंदना योजनेचे पुढील हप्ते मिळतात.