PRADHAN MANTRI KAUSHAL VIKAS YOJANA 2024 |प्रधानमंत्री कौशल विकास योजना २०२४ (PMKVY) सरकारच्या कौशल विकास व उद्योग मंत्रालयाच्या वतीने देशातील तरुणांसाठी राबवण्यात येणारे महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील तरुणांना उद्योगांशी संबंधित प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मिती करण्यात मदत करते.
भारतासारख्या अतिशय जास्त लोकसंख्या असलेल्या देशात सुशिक्षित तरुणांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु सर्वात सुशिक्षित रोजगार कमावतात असे नाही. बहुसंख्य सुशिक्षित तरुण हे बेरोजगार असल्याचे आपण पाहतो . हे लक्षात घेऊन PRADHAN MANTRI KAUSHAL VIKAS YOJANA 2024 |प्रधानमंत्री कौशल विकास योजना २०२४ योजनेचे निर्मिती करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार तरुणांना योग्य प्रशिक्षण देऊन एखादे कौशल पारंगत करून त्यातून रोजगार निर्मिती करण्याचे ध्येय आहे. केंद्र सरकार विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचे वर्ग राबवते. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण वर्गाची कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात येत नाही. हे मोफत प्रशिक्षण दिले जाते.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील बेरोजगारी कमी करणे हा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी या विनामूल्य कौशल प्रशिक्षणाचा लाभ घेऊन रोजगार निर्मिती साठी नवीन पर्याय निवडावा.
PRADHAN MANTRI KAUSHAL VIKAS YOJANA 2024 |प्रधानमंत्री कौशल विकास योजना २०२४ योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या 40 कौशल्य अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येते. लाभार्थी तरुण त्याला आवडतो तो विषय निवडून प्रशिक्षण घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत शिक्षण देण्यासाठी प्रत्येक राज्यात आणि शहरात प्रशिक्षण केंद्र उघडले आहेत.
2023 -24 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री कौशल विकास योजनेबद्दल सांगितल्या, येत्या तीन वर्षात प्रधानमंत्री कौशल विकास योजना 4.0 सुरू केली जाईल अशी त्यांनी घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून देशातील तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी देशात 30 स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर ही उभारण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाईल.
प्रधानमंत्री कौशल विकास योजना 4.0 योजनेअंतर्गत रोबोटिक्स, कोडींग, AI ,IOT ,3D यासारख्या डिजिटल आणि आधुनिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच प्रिंटिंग, सॉफ्ट स्किल यांचेही प्रशिक्षण तरुणांना दिले जाणार आहे.
PRADHAN MANTRI KAUSHAL VIKAS YOJANA 2024 |प्रधानमंत्री कौशल विकास योजना २०२४ या लेखात आपण या योजनेत कोणकोणत्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते या बद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत .
PRADHAN MANTRI KAUSHAL VIKAS YOJANA 2024 |प्रधानमंत्री कौशल विकास योजना २०२४
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेची उद्दिष्टे:
1) प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत देशातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
2) देशातील गरीब कुटुंबातील तरुण ज्यांना पैसे देऊन प्रशिक्षण घेणे शक्य नाही अशा तरुणांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे.
3) या योजनेअंतर्गत तरुणांना विविध उद्योगांशी संबंधित प्रशिक्षण देऊन त्यांच्या कौशल्यात अधिक सुधारणा करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
4) प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत भारतातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन भारताला प्रगतीपथावर नेणे.
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेतील अभ्यासक्रमांची यादी:
कृषी अभ्यासक्रम
पोशाख अभ्यासक्रम
सौंदर्य आणि वेलनेस
मोटार वाहन अभ्यासक्रम
विमा बँकिंग वित्त अभ्यासक्रम
गुड्स अँड कॅपिटल कोर्स
इलेक्ट्रॉनिक कोर्स
बांधकाम अभ्यासक्रम
अन्नप्रक्रिया उद्योग अभ्यासक्रम
फर्निचर अँड फिटिंग कोर्स
जेम्स अँड ज्वेलरी कोर्स
मायनिंग कोर्स
ग्रीन जॉब कोर्स
प्लंबिंग कोर्स
पॉवर इंडस्ट्री कोर्स
आरोग्यसेवा अभ्यासक्रम
भूमी रूप व्यवस्था अभ्यासक्रम
रिटेल कोर्स
रबर कोर्स
लोह आणि स्टील कोर्स
सिक्युरिटी सर्विस कोर्स
आयटी कोर्स
लेदर कोर्स
टेलिकॉम कोर्स
जीवन विज्ञान अभ्यासक्रम
टेक्स्टाईल कोर्स
हॉस्पिटल ईटी अँड टुरिझम कोर्स
लॉजिस्टिक कोर्स
मनोरंजन आणि मीडिया कोर्स
अपंग व्यक्तींसाठी कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे फायदे:
1) देशातील 10 वी 12 वी वर्गातून बाहेर पडलेल्या तरुण वर्गाला या योजनेचा फायदा घेता येईल.
2) या योजनेअंतर्गत विविध कौशल्यांचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
3) या योजनेअंतर्गत विविध कौशल्यांचे घेऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
4) या योजनेअंतर्गत जवळपास 40 अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेसाठी पात्रता:
1) योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
2) ही योजना फक्त बेरोजगार तरुणांसाठी आहे.
3) ज्या तरुणांकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
4) शाळा /कॉलेज ड्रॉप आउट तरुण या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
5) अर्जदाराला हिंदी आणि इंग्रजी भाषांचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
6) 10 वी 12 वी नंतर शिक्षण सोडलेल्या सर्व विद्यार्थ्यांना व तरुणांना या योजनेचा लाभ घेता येईल.
केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा
राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/
अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/
लखपती दीदी योजना https://marathisampada.com/lakhpati-didi-yojana-2024/
प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/
सुकन्या समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/sukanya-samriddhi-yojana-2024-in-marathi/
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
मतदान ओळखपत्र
रहिवासी दाखला
बँक खाते पासबुक
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
ईमेल आयडी
प्रधानमंत्री कौशल विकास अधिकृत वेबसाईट https://www.pmkvyofficial.org/
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी:
1) सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
2) वेबसाईट वर गेल्यानंतर समोर असलेल्या होम पेजवर तुम्हाला या योजनेची लिंक दिसेल.
3) लिंक वर क्लिक करावे , त्यानंतरची स्क्रीन तेथे योजनेची सर्व प्रकारची माहिती दिलेली आहे.
4) दिलेली माहिती व्यवस्थित वाचा आणि त्यानुसारच फॉर्म भरावा.
5) सर्व माहिती वाचून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी स्किल इंडियाची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
6) त्यानंतर स्किल इंडियाचे ऑफिशियल पोर्टल ओपन होईल, तुम्हाला विद्यार्थी किंवा प्रशिक्षक कोणासाठी नोंदणी करायची असेल त्या ऑप्शन वरती क्लिक करा.
7) त्यानंतर फॉर्म ओपन होईल. फॉर्म व्यवस्थित वाचून त्यात विचारलेली वैयक्तिक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, इत्यादी व्यवस्थित भरा.
8) फॉर्म भरल्यानंतर त्यात सांगितलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रांचे जोडणी करा.
9) सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा.
10) अशा प्रकारे प्रधानमंत्री कौशल विकास योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी पूर्ण होते.
NOTE:
PMKVY 2.0 आणि PMKVY 3.0 चे रजिस्ट्रेशन बंद झाले आहेत. सध्या कोणतेही प्रशिक्षण सुरू नाही.
PMKVY 4.0 याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यावर काम चालू आहे.
अधिक माहितीसाठी ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन बघू शकता.
केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग https://marathisampada.com/pmfme-scheme-2024-in-marathi/
नमो ड्रोन दीदी योजना https://marathisampada.com/namo-drone-didi-yojana-in-marathi/
महिला समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/mahila-samriddhi-yojana-2024-in-marath/
जननी सुरक्षा योजना २०२४ https://marathisampada.com/janani-suraksha-yojana-2024-in-marathi/
माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ https://marathisampada.com/mazi-kanya-bhagyashree-yojana-2024-in-marathi/
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे प्रशिक्षण केंद्रे कसे शोधावे?
1) सर्वप्रथम प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे ऑफिशियल वेबसाईट वर जावे.
2) समोर ओपन झालेल्या होम पेजवर Find a Training Center हा पर्याय दिसेल यावर क्लिक करावे.
3) त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, त्यात तुम्हाला ट्रेनिंग सेंटर शोधण्यासाठी तीन पर्याय दिले जातील, जसे की सर्च बाय सेक्टर, सर्च बाय जॉब रोल्स आणि सर्च बाय लोकेशन.
4) यापैकी तुम्हाला हवे असलेल्या पर्यायावर क्लिक करून सबमिट करा
5) त्यानंतर तुम्ही प्रशिक्षण केंद्र शोधू शकतात.
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेतील हेल्पलाइन नंबर:
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेसाठी केंद्र सरकारकडून 0880055555, 1800-123-9626
हे हेल्पलाइन नंबर देण्यात आले आहे.
या नंबर वर मिस कॉल देऊन तुम्ही योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.
योजनेबद्दल काही समस्या असल्यास तुम्ही कॉल करून त्यांच्याकडून मदत घेऊ शकता.
निष्कर्ष:
निष्कर्ष:
PRADHAN MANTRI KAUSHAL VIKAS YOJANA 2024 |प्रधानमंत्री कौशल विकास योजना २०२४ या लेखात आपण प्रधानमंत्री कौशल विकास योजनेची संपूर्ण माहिती घेतली. कोणकोणत्या अभ्यासक्रमाचे जाते, योजनेसाठी नाव नोंदणी कशी करावी, योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात याबद्दल सविस्तर माहिती बघितली, असे महत्त्वपूर्ण लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेख शेअर करा. शेतकऱ्यांसाठी , महिलांसाठीच्या, मुलींसाठीच्या केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.
FAQ:PRADHAN MANTRI KAUSHAL VIKAS YOJANA 2024 |प्रधानमंत्री कौशल विकास योजना २०२४
1) प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा फायदा कोण घेऊ शकता?
ans: देशातील सर्व बेरोजगार तरुण या योजनेचा फायदा घेऊ शकता.
2) प्रधानमंत्री कौशल विकास योजना 4.0 कधी जाहीर करण्यात आले?
ans: प्रधानमंत्री कौशल विकास योजना 4.0 2023 च्या अर्थसंकल्पात सादर करण्यात आले.
3) प्रधानमंत्री कौशल विकास योजनेत अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते ?
ans: प्रधानमंत्री कौशल विकास योजनेत 40 अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाते.
केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा
प्रधान मंत्री मातृ वंदना योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-matru-vandana-yojana-2024-in-marathi/
लेक लाडकी योजना २०२४ https://marathisampada.com/lek-ladki-yojana-2024-in-marathi/
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२४ https://marathisampada.com/widow-pension-scheme-2024-in-marathi/
प्रधान मंत्री मुद्रा योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-mudra-yojana-2024/
आयुष्मान भारत योजना २०२४ https://marathisampada.com/ayushaman-bharat-yojana-2024/