PRADHAN MANTRI FASAL BIMA YOAJAN 2024 | प्रधान मंत्री पिक विमा योजना २०२४

PRADHAN MANTRI FASAL BIMA YOAJAN 2024 | प्रधान मंत्री पिक विमा योजना २०२४ केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठीच्या अनेक योजनांपैकी ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यावेळी शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांची घोषणा केले. त्याचबरोबर कोणत्या योजनेसाठी किती शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे याची सविस्तर माहिती दिली. प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी आतापर्यंत 4 कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे असे सांगण्यात आले.

PRADHAN MANTRI FASAL BIMA YOAJAN 2024 | प्रधान मंत्री पिक विमा योजना २०२४ योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे, चक्रीवादळामुळे, गारपीटीमुळे, किंवा दुष्काळ अवकाळी पावसामुळे केव्हा एखाद्या कीटकाच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य हे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत मिळते.

अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे उभे पीक नष्ट झाले हाता तोंडाशी आलेला घास नष्ट झाला तर अशा शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे हा विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांसाठी ही खूपच महत्वपूर्ण योजना आहे. याचा फायदा प्रत्येक शेतकऱ्याने घ्यायलाच हवा.तसेच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन यंत्रणांचा वापर करून शेतीत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यास प्रोत्साहित करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश्य आहे .

सध्या देशातील बदलत्या हवामानामुळे आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे दरवर्षीच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जितका खर्च शेतीसाठी केला तेवढी कमाई शेतकऱ्यांची होत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी तणावग्रस्त अवस्थेत बघायला मिळतात. काही शेतकरी आत्महत्येचा पर्याय अवलंबतात. अर्थात हे करणे खूप चुकीचे आहे. या सगळ्याचा विचार करून नैसर्गिक आपत्तीमुळे, अवकाळी पावसामुळे, कीटकनाशकांच्या प्रादुर्भावामुळे, शेतकऱ्याचे पिक नष्ट झाले तर केंद्र सरकार शेतकऱ्याला आर्थिक सहाय्य प्रदान करते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक दिलासा देण्याचे काम ही योजना करते.

PRADHAN MANTRI FASAL BIMA YOAJAN 2024 | प्रधान मंत्री पिक विमा योजना २०२४ योजनेअंतर्गत खालील पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळते खरीप हंगामातील: भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मुग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन कापूस, कांदा इत्यादी रब्बी हंगाम: गहू, ज्वारी, हरभरा, भात, भुईमूग ,कांदा इत्यादी .

PRADHAN MANTRI FASAL BIMA YOAJAN 2024 | प्रधान मंत्री पिक विमा योजना २०२४ आजच्या या लेखात आपण कोण कोण कोणते नुकसान झाले तर विमा संरक्षण मिळू शकते, त्याचबरोबर प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज कसा करावा, कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतात याबद्दल सविस्तर घेणार आहोत. लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

PRADHAN MANTRI FASAL BIMA YOAJAN 2024 | प्रधान मंत्री पिक विमा योजना २०२४

PRADHAN MANTRI FASAL BIMA YOJANA 2024

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे उद्दिष्टे:

1)नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पर्जन्यवृष्टी, दुष्काळ किंवा कीड व रोगामुळे शेतकरी पीक घेण्यास अपयशी ठरल्यास विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते.

2) शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर ठेवण्यासाठी त्यांनी सातत्याने शेती करावी यासाठी प्रोत्साहन देणे.

3) शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन यंत्रणांचा वापर करून शेतीत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यास प्रोत्साहित करणे.

4) कृषी क्षेत्रात प्रत्येक शेतकऱ्याचे खूप महत्त्वाचे योगदानआहे हे प्रत्येक शेतकऱ्याला पटवून देणे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे वैशिष्ट्ये:

1) प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत दिला जाणारा विमा चा हप्ता हा खरीप पिकांसाठी फक्त 2%, सर्व रब्बी पिकांसाठी 1.5% इतका हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागेल.

2) वार्षिक व्यावसायिक आणि बागायती पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना 5% इतका विमा हप्ता भरावा लागेल.

3) प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना भरावे लागणारे विमा हप्ते दर खूपच कमी आहेत.

4) नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर पूर्ण विमा रक्कम देण्यासाठी शासनाकडून विमा हप्ता भरला जाईल.

5) प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्याला प्रोत्साहन दिले जात आहे.

6) शेतकऱ्यांना क्लेम पेमेंट मध्ये होणारा विलंब कमी होईल त्याचप्रमाणे पीक कटिंग चा डाटा कॅप्चर आणि अपलोड करण्यासाठी स्मार्टफोनचा वापर केला जाईल.

कोणकोणत्या कारणांमुळे झालेल्या नुकसानीसाठी विमा संरक्षण मिळेल?

1) बदलत्या हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे पेरणी आणि लावणी न झाल्यामुळे झालेले नुकसान.

2) पिकांच्या हंगामामध्ये हवामानात झालेल्या प्रतिकूल बदल यामुळे झालेले नुकसान.

3) पिकाची पेरणी केल्यापासून ते पीक हातात येईपर्यंत म्हणजेच पीक काढणीपर्यंत या कालावधीत आलेल्या नैसर्गिक आपत्ती, आग लागणे, गारपीट, चक्रीवादळ यामुळे झालेले नुकसान.

4) पेरणी झाल्यानंतर हवामानात झालेला प्रतिकूल बदल ,पूर, वादळ, अतिवृष्टी, दुष्काळग्रस्त परिस्थिती, पावसाचा अनियमितपणा यामुळे झालेले नुकसान.

5) कीड किंवा इतर रोगां च्या प्रादुर्भावामुळे पिकाच्या उत्पादनात घट होणे.

6) पीक काढणीनंतर हवामानात झालेल्या प्रतिकूल बदलांमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे, अवकाळी पावसामुळे, पिकाचे नुकसान झाल्यास झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाते.

ई -पीक पाहणी म्हणजे काय?

ई -पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करण्यात येते. विमा योजनेत विमा घेतलेले पीक आणि ई -पीक पाहणीमध्ये नोंदविण्यात आलेले पीक यामध्ये फरक आढळल्यास ई -पीक पाहणीमध्ये नोंदविण्यात अंतिम गृहीत धरण्यात येते.

कोणकोणत्या पिकांसाठी विमा संरक्षण लागू आहे?

1) खरीप हंगामातील: भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मुग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन कापूस, कांदा इत्यादी

2) रब्बी हंगाम: गहू, ज्वारी, हरभरा, भात, भुईमूग ,कांदा

तक्रार कशी करावी आणि विम्याचा दावा कसा करावा?

1) पिकाचे नुकसान शेतकरी पीक विमा अॅप , सीएससी केंद्र, किंवा जवळच्या कृषी अधिकार याद्वारे तक्रार नोंदवू शकता.

2) पीक नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या पिक नुकसानीची तक्रार करणे अनिवार्य आहे.

3) तक्रारीमध्ये शेतकऱ्याचे नाव ,सर्वे नंबर आणि नुकसान झालेल्या पिकाचे क्षेत्र यांचा समावेश असणे आवश्यक आहे.

4) त्याचप्रमाणे शेतकऱ्याचा NCIP नुसार एप्लीकेशन नंबर, मोबाईल नंबर, केवायसी अकाऊंट नंबर किंवा सेविंग अकाउंट नंबर सांगणे आवश्यक आहे.

5)प्रीमियम पेमव्हेरिफिकेशन पोर्टल वरून केले जाते .४८ तासात पेमेंट व्हेरिफिकेशन दिले जाते

6) शेतकऱ्याची विमा रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पाठविण्यात येते.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

1) प्रधानमंत्री विमा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सरकारच्या ऑफिशिअल वेबसाईट ला भेट द्या.

2) प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अधिकृत वेबसाईट https://www.pmfby.gov.in/ ही आहे.

3) समोर ओपन झालेल्या होम पेजवर farmer corner असा एक ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

4) त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती जसे की नाव ,पत्ता, मोबाईल नंबर, तुमचे वय, तुम्ही कोणत्या प्रकारचे शेती करतात, जात याबद्दल सविस्तर माहिती भरावी लागेल.

5) वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचा तपशील देखील भरावा लागेल यात बँकेचे नाव,IFSC CODE, तालुका, राज्याचे नाव, बँक शाखेचे, तुमचा सेविंग बँक अकाउंट नंबर याबद्दल सविस्तर माहिती टाकावी लागेल.

6) सर्व माहिती भरून झाल्यानंतर एक कॅपचा कोड येईल तो कॅपचा कोड जशास तसा टाकावा. त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांचे अपलोडिंग करावे आणि सबमिट बटणावर क्लिक करावे.

7) अशा प्रकारे प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होते.

8) तुमचा अर्जाची आणि कागदपत्रांची योग्य पडताळणी झाल्यानंतर अर्जदाराला मंजुरी किंवा नकार एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे कळविण्यात येते.

PRADHAN MANTRI FASAL BIMA YOJANA 2024

प्रधान मंत्री पिक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

आधार कार्ड

मतदान ओळखपत्र

पासपोर्ट

राहिवासी दाखला

पासपोर्ट आकाराचे फोटो

प्रधान मंत्री पिक विमा योजनेची अधिकृत वेबसाईट

प्रधान मंत्री पिक विमा योजनेची अधिकृत वेबसाईट https://www.pmfby.gov.in/

निष्कर्ष :

PRADHAN MANTRI FASAL BIMA YOAJAN 2024 | प्रधान मंत्री पिक विमा योजना २०२४ या लेखात आपण प्रधानमंत्री पिक विमा योजने बद्दल सविस्तर माहिती बघितली. या योजनेसाठी अर्ज कसा करावा, कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतात. त्याचबरोबर या योजनेसाठी पात्रता व अटी काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती बघितली. शेतकऱ्यांसाठीच्या, महिलांसाठीच्या बालकांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांबद्दल माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.

FAQ :PRADHAN MANTRI FASAL BIMA YOAJAN 2024 | प्रधान मंत्री पिक विमा योजना २०२४

१) प्रधान मंत्री पिक विमा योजनेच उद्देश काय आहे ?

ans: नैसर्गिक आपत्ती ,तसेच कीड रोगांपासून शेतीचे झालेल्या नुकसानीसाठी शेतकर्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे .

केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा

राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/

अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/

लखपती दीदी योजना https://marathisampada.com/lakhpati-didi-yojana-2024/

प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/

सुकन्या समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/sukanya-samriddhi-yojana-2024-in-marathi/

हर घर नल योजना २०२४ https://marathisampada.com/har-ghar-nal-yojana-2024/

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग https://marathisampada.com/pmfme-scheme-2024-in-marathi/

नमो ड्रोन दीदी योजना https://marathisampada.com/namo-drone-didi-yojana-in-marathi/

महिला समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/mahila-samriddhi-yojana-2024-in-marath/

जननी सुरक्षा योजना २०२४ https://marathisampada.com/janani-suraksha-yojana-2024-in-marathi/

माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ https://marathisampada.com/mazi-kanya-bhagyashree-yojana-2024-in-marathi/

प्रधान मंत्री मातृ वंदना योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-matru-vandana-yojana-2024-in-marathi/

लेक लाडकी योजना २०२४ https://marathisampada.com/lek-ladki-yojana-2024-in-marathi/

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२४ https://marathisampada.com/widow-pension-scheme-2024-in-marathi/

प्रधान मंत्री मुद्रा योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-mudra-yojana-2024/

आयुष्मान भारत योजना २०२४ https://marathisampada.com/ayushaman-bharat-yojana-2024/

प्रधान मंत्री कौशल विकास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-kaushal-vikas-yojana-2024/

प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-ujjwala-yojana-2024/

प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना २०२४ https://marathisampada.com/pm-kisan-sanman-nidhi-yojana-2024/

प्रधान मंत्री सौभाग्य योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-saubhagya-yojana-2024/

प्रधान मंत्री आवास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-awas-yojana-2024/