PRADHAN MANTRI AWAS YOJANA 2024| प्रधान मंत्री आवास योजना २०२४

PRADHAN MANTRI AWAS YOJANA 2024| प्रधान मंत्री आवास योजना २०२४ , केंद्र सरकारच्या योजनांपैकी ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे . 2015 मध्ये सुरू झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशातील शहरी व ग्रामीण भागातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी स्वतःचे परवडणारे घर उपलब्ध करून देणे हा या योजनेमागचा उद्देश आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेचा मुख्य उद्दिष्ट 31 मार्च 2022 पर्यंत 20 दशलक्ष घरे बांधण्याचे होते. हे बदलून आता अंतिम मुदत डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 2.95 कोटी घरे बांधली जातील.

PRADHAN MANTRI AWAS YOJANA 2024| प्रधान मंत्री आवास योजना २०२४ योजनेच्या मदतीने आपले घर घेण्याचे स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. या योजनेअंतर्गत गृहकर्जावर सबसिडी मिळते. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे घरगुती उत्पन्न हे 18 लाखापेक्षा जास्त नसावे ( यामध्ये पती-पत्नी एकत्रित उत्पन्नाचा समावेश होतो) ही योजना फक्त पहिले घर घेण्यासाठी लागू आहे. या योजनेचा लाभ फक्त तुम्ही नवीन घर घेण्यासाठी करून घेऊ शकतात.

तुम्ही इतर गृहनिर्माण योजनेअंतर्गत केंद्रीय मदत घेतली असेल तर प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या नावावर किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर भारतात कोठेही घर असेल तर तुम्ही PRADHAN MANTRI AWAS YOJANA 2024| प्रधान मंत्री आवास योजना २०२४ योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. प्रधानमंत्री आवास योजनेचे दोन भागांमध्ये विभागणी केली गेली आहे.

1)प्रधानमंत्री आवास योजना अर्बन म्हणजेच शहरी भागासाठी

2) प्रधानमंत्री आवास योजना रुरल म्हणजे ग्रामीण भागासाठी

देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचे हक्काचे घर मिळवून देण्यासाठी याआधी अनेक योजना तयार करण्यात आल्या जसे की 1990 मध्ये इंदिरा आवास योजना, 2009 मध्ये राजीव आवास योजना आणि त्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजने ची घोषणा करण्यात आली.

PRADHAN MANTRI AWAS YOJANA 2024| प्रधान मंत्री आवास योजना २०२४

प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी:

लाभार्थीकुटुंबाचे वार्षिक उत्पन्न
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) 3 लाख रुपयांपर्यंत
कमी उत्पन्न गट(LIG) 3 लाख रुपये ते 6 लाख रुपयांपर्यंत
मध्य उत्पन्न गट(MIG-1) 6 लाख रुपये ते 12 लाख रुपयांपर्यंत
मध्य उत्पन्न गट (MIG-2) 12 लाख रुपये ते 18 लाख रुपयांपर्यंत

1) प्रधानमंत्री आवास योजना तपशील (अर्बन म्हणजेच शहरी भागासाठी)

लाभ MIG -I MIG -II
इंटरेस्टेड सबसिडी 4% 3%
कमाल सबसिडी रक्कम 2.35 लाख 2.30 लाख
कमाल होम लोन कालावधी 20 वर्षे 20 वर्षे
अनुदानासाठी कमाल होम लोन क॒कांटम 9 लाख 12 लाख
इंटरेस्ट सबसिडी NPV साठी सवलत दर 9%9%
कमाल कार्पेट क्षेत्र 160 चौरस मीटर 200 चौरस मीटर

2) प्रधानमंत्री आवास योजना तपशील ( रुरल म्हणजे ग्रामीण भागासाठी)

लाभEWSLIG
इंटरेस्टेड सबसिडी6.5%6.5%
कमाल सबसिडी रक्कम2.67 लाख2.67 लाख
कमाल होम लोन कालावधी20 वर्षे20 वर्षे
अनुदानासाठी कमाल होम लोन क॒कांटम6 लाख6 लाख
इंटरेस्ट सबसिडी NPV साठी सवलत दर9%9%
कमाल कार्पेट क्षेत्र30 चौरस मीटर60 चौरस मीटर

LIG आणि MIG लाभार्थी : CLSS किंवा क्रेडिट लिंक सबसिडी योजनेसाठी पात्र आहेत.

EWS : योजनेच्या संपूर्ण मदतीसाठी पात्र आहेत.

(LIG आणि MIG लाभार्थ्यांना योजनेचा लाभ त्यांचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. )

प्रधानमंत्री आवास योजनेची उद्दिष्टे:

1) देशातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे

2) देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटुंबीयांना घर उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

3) खाजगी क्षेत्राच्या मदतीने झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना परवडणारी स्वतःची घरे उपलब्ध करून देणे.

4) PRADHAN MANTRI AWAS YOJANA 2024| प्रधान मंत्री आवास योजना २०२४ योजनेअंतर्गत CLSS आणि क्रेडिट लिंक सबसिडी योजनेद्वारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना स्वतःचे घर घेण्यासाठी सबसिडी उपलब्ध करून देणे.

5) प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वतःचे घर बांधू इच्छिणाऱ्या लोकांना कुटुंबीयांसाठी सबसिडी उपलब्ध करून देणे.

प्रधानमंत्री आवास योजनेची वैशिष्ट्ये:

1) प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचे मुदत ही 20 वर्षांसाठी आहे.

2) प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जावर 6.50 % इतका सबसिडी इंटरेस्ट रेट आकारला जातो.

3) या योजनेअंतर्गत बांधण्यासाठी पर्यावरण अनुकूल आणि शाश्वत तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो.

4) घर बांधताना ज्येष्ठ नागरिक आणि इतर व्यक्तींना ग्राउंड फ्लोअर ला प्राधान्य देण्याचे सोय उपलब्ध आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्रता:

1) प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे स्वतःचे किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर देशात कोठेही स्वतःचे घर नसावे.

2) पती-पत्नी आणि अविवाहित मुले असे कुटुंब प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र ठरतात.

3) कुटुंबातील सर्वात प्रौढ कमावत्या सदस्यांना स्वतंत्र कुटुंब असे मानले जाते आणि त्यांच्या वैवाहिक स्थिती कडे दुर्लक्ष करून त्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

4) वैवाहिक स्थितीमध्ये विवाहित जोडप्यांच्या बाबतीत पती-पत्नी पैकी एक किंवा दोघेही एकत्रित मालकी मध्ये एकाच घरासाठी पात्र असतील. परंतु त्यांनी वार्षिक उत्पन्नाच्या पात्रतेच्या निकषांचे पूर्तता करणे बंधनकारक आहे.

5) प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न हे 18 लाखांपेक्षा जास्त नसावे.

6) पती-पत्नी दोघेही कमावते असल्यास दोघांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 18 लाखांपेक्षा जास्त नसावे.

7) या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेता येईल. जर तुम्ही पहिले घर घेताना या योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्ही दुसरे घर घेताना या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

8) प्रॉपर्टी पेपर मध्ये महिलांचे नाव असावे.

9) एकमेव मालकीच्या मालकी महिलांकडे घर असणे आवश्यक आहे.

10) जर संयुक्त मालकी असेल तर मालकां पैकी एक मालक ही महिला असणे आवश्यक आहे.

10) कुटुंबात महिला सदस्य नसतील हा नियम टाळला जातो.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:

1) प्रथम प्रधानमंत्री आवास योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या.

2) समोर ओपन झालेल्या होम पेजवर मेनू ऑप्शन वर क्लिक करा आणि नागरिक मूल्यांकन पर्याय निवडा.

3) त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाका.

4) आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर एप्लीकेशन पेज ओपन होईल.

5) समोर ओपन झालेल्या पेजवर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती त्याच बरोबर उत्पन्नाचा तपशील, बँक खात्याची सर्व माहिती त्याच बरोबर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागते.

6) फॉर्म काळजीपूर्वक व्यवस्थित भरून झाल्यानंतर आणि सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा.

7) फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्यासाठी एक युनिक एप्लीकेशन नंबर तयार होईल.

8) हा नंबर लक्षात ठेवा म्हणजे भविष्यात याचा उपयोग होईल.

9) भरलेला अर्ज डाऊनलोड करून घ्या. आणि तुमच्या जवळच्या CSC ऑफिस मध्ये किंवा PMAY देणाऱ्या कोणत्याही संस्थेमध्ये फॉर्म डिपॉझिट करा.

10) फॉर्म सोबत सर्व आवश्यक कागदपत्रांची जोडणी करणे आवश्यक आहे.

11) त्यानंतर फॉर्म ची आणि सर्व कागदपत्रांची पडताळणी होईल. आणि तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला तसे कळविण्यात येईल.

12) अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होते.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

पॅन कार्ड/आधार कार्ड/मतदान ओळखपत्र/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन

रहिवासी दाखला

उत्पन्नाचा दाखला/ आयटीआर/ फॉर्म 16/ मागील दोन महिन्याची सॅलरी स्लिप/ सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट

प्रॉपर्टी डॉक्युमेंट मध्ये: विक्रीसाठी करार/आवश्यक प्रॉपर्टी डॉक्युमेंट चेन/ खरेदीदार करार/ वाटप पत्र

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कोणते कर लाभ मिळतील:

1)सेक्शन 80 C: दीड लाखापर्यंत कपात मिळेल.

2) सेक्शन 24 b: अर्जदारांना व्याजाच्या रकमेवर दोन लाखांपर्यंत कपात मिळेल.

3) सेक्शन 80 EE: पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या ग्राहकाला 50,000 पर्यंत वार्षिक कर सवलत मिळेल.

4) सेक्शन 80EEA: अर्जदार व्याजाच्या रकमेवर दीड लाखापर्यंत कपात मिळू शकतो.

निष्कर्ष:

PRADHAN MANTRI AWAS YOJANA 2024| प्रधान मंत्री आवास योजना २०२४ या लेखात आपण प्रधानमंत्री आवास योजने बद्दल सविस्तर माहिती बघितली. या योजनेसाठी अर्ज कसा करावा, कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतात. त्याचबरोबर या योजनेसाठी पात्रता व अटी काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती बघितली. शेतकऱ्यांसाठीच्या, महिलांसाठीच्या बालकांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांबद्दल माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.

FAQ:PRADHAN MANTRI AWAS YOJANA 2024| प्रधान मंत्री आवास योजना २०२४

1) प्रधानमंत्री आवास योजना काय आहे?

ans: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

2) प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची परतफेड मुदत किती आहे?

ans: प्रधानमंत्री आवास योजना मिळणाऱ्या कर्जाची परतफेड मुदत 20 वर्षाची आहे.

3) प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जावर किती सबसिडी इंटरेस्ट रेट आकारला जातो?

ans: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जावर6.50% इतका सबसिडी इंटरेस्ट रेट आकारला जातो.

4) प्रधानमंत्री आवास योजने मुळे कर लाभ मिळतो का?

ans: होय,प्रधानमंत्री आवास योजना मुळे कर लाभ मिळतो.

केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा

राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/

अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/

लखपती दीदी योजना https://marathisampada.com/lakhpati-didi-yojana-2024/

प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/

सुकन्या समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/sukanya-samriddhi-yojana-2024-in-marathi/

हर घर नल योजना २०२४ https://marathisampada.com/har-ghar-nal-yojana-2024/