PMFME SCHEME 2024 IN MARATHI | प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग

PMFME SCHEME 2024 IN MARATHI | प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजेच Pradhan Mantri Formalization of Micro Food Processing Enterprise Scheme (PMFME Scheme). योजने च्या नावावरूनच योजना अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित आहे हे लक्षात येते. भारतामध्ये स्थानिक पातळीवर असंघटित पणे कुठल्याही ब्रँड नेम शिवाय अनेक अन्नपदार्थ तयार केले जातात आणि विकले जातात. भारतामध्ये अन्नप्रक्रिया उद्योगातून खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात अन्नप्रक्रिया उद्योग केले जातात. परंतु या क्षेत्रात सरकारमार्फत योग्य ते कर्ज उपलब्ध जात नाही म्हणूनच सरकारने या योजनेचे आयोजन केले आहे. या योजनेमार्फत केंद्र सरकार तर्फे अन्न प्रक्रिया उद्योग करू इच्छिणाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल, त्यांना त्यांच्या उद्योगासाठी योग्य ती साधनसामग्री पुरवली जाईल. तयार झालेला अन्नपदार्थ विकण्यासाठी योग्य ते व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल. उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा नाही आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केला जाईल. त्यातून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होईल हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

अन्नप्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. परंतु या उद्योगाला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे हे लक्षात घेता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ह्या योजनेची घोषणा केली. अन्नप्रक्रिया उद्योगाला कोणकोणत्या संकटांचा सामना करावा लागतो हे आपण बघूयात,

१) त्यांना त्यांच्या व्यवसायाचे योग्य ते प्रशिक्षण नसणे.

२) आधुनिक यंत्रसामग्री आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता असणे.

३) प्रमाणात उत्पादन तयार न होणे.

४) उत्पादनाला योग्य तो पॅकेजिंग नसल्यामुळे मार्केटमध्ये विकताना अडचणी येणे.

५) पॅकेजिंग बरोबर ब्रँडिंग ची कमतरता असणे.

६) उत्पादन बाजारात कसे विकावे याबद्दल योग्य ते मार्गदर्शन न मिळणे.

७) मुबलक प्रमाणात भांडवल उपलब्ध नसणे.

PMFME SCHEME 2024 IN MARATHI | प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग

PMFME SCHEME 2024 IN MARATHI

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची उद्दिष्टे

१) सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना, शेतकरी उत्पादन कंपन्या, बचत गट, सरकारी संस्था, किंवा या उद्योगातील काही वैयक्तिक लाभार्थी यांना कर्ज पुरवठा करणे.

२) असंघटित पणे अन्न प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची विशिष्ट ठिकाणी नोंदणी करणे.

३) सार्वजनिक रित्या मोठ्या प्रमाणात अन्न प्रक्रिया सुविधा निर्माण करणे.

४) तयार केलेले अन्नपदार्थ साठवण्या साठी योग्य ती व्यवस्था उपलब्ध करून देणे.

५) तयार केलेल्या अन्नपदार्थाची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रयोगशाळेची उभारणी करणे.

६) अन्नपदार्थाचे योग्य पॅकेजिंग आणि ब्रँडिंग साठी मार्गदर्शन करणे.

७) अन्नप्रक्रिया उद्योग या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी मार्गदर्शन करणे.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची पात्रता :

१) वैयक्तिक लाभार्थी

२) शेतकरी उत्पादक कंपन्या

३) बचत गट

४) सहकारी संस्था

५) नवीन अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करू इच्छिणारे लाभार्थी

६) सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजक

७) योजनेचा लाभ घेणाऱ्याचे वय कमीत कमी 18 वर्ष असावे.

८) लाभार्थ्याला अन्न प्रक्रिया उद्योगाचा अनुभव असावा.

९) एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकते.

PMFME SCHEME अंतर्गत कोणते प्रकल्प पात्र आहेत:

१) नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया करणारे उद्योग

२) सध्या अस्तित्वात असणारे सूक्ष्म अन्न प्रक्रिया करणारे उद्योग.

३) अन्नप्रक्रिया उद्योगात 10 पेक्षा कमी कामगार असावेत.

४) प्रकल्प हा वैयक्तिक, प्रोप्रायटरी शिप किंवा पार्टनरशिप फर्म असावे.

५)LLP व Pvt Ltd कंपन्या सुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत

६) बिगर सहकारी संस्था (NGO )

PMFME SCHEME अंतर्गत किती कर्ज मिळते?

PMFME SCHEME 2024 IN MARATHI | प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सरकारतर्फे 90% पर्यंत कर्ज मिळू शकते. योजनेच्या सबसिडी नुसार तुमच्या एकूण प्रकल्पा चा जो खर्च असेल त्याच्या 35% किंवा जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. जर आपण आपला प्रकल्प 40 लाखापर्यंत उभारणारा असू तर आपल्याला 35% पर्यंत कर्ज मिळू शकते किंवा जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत अनुदान मिळू शकते.

PMFME योजनेत स्व गुंतवणूक आवश्यक आहे का?

अन्न प्रक्रिया उद्योगासाठी सरकारकडून आपल्याला कर्ज तर मिळेलच परंतु प्रकल्पामध्ये आपल्याला कमीत कमी 10% स्व गुंतवणूक करणे बंधनकारक आहे.

PMFME योजनेसाठी पात्र उद्योग:

PMFME SCHEME 2024 IN MARATHI | प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत काही लहान अन्नप्रक्रिया उद्योग यांचा समावेश केला आहे. त्यातील काही उदाहरणे खालील प्रमाणे:

बेकरी उद्योग

पापड तयार करणे

मसाले तयार करणे

बटाटे आणि केळी चिप्स बनवणे

काजू प्रक्रिया उद्योग

डाळ मिल

मिल्क प्रॉडक्ट

शेवया तयार करणे

लोणचे तयार करणे

कच्चा घाण्याचे तेल काढणे

टोमॅटो केचप तयार करणे

PMFME योजनेसाठी अपात्र उद्योग

सरकार तर्फे पात्र उद्योगांची जशी यादी जाहीर केली आहे तसेच तसेच काही उद्योग अपात्र देखील केले आहेत त्यातील काही उद्योग खालील प्रमाणे:

कच्च्या दुधाची खरेदी विक्री

प्रक्रिया न केलेले फळभाज्या

मधुमक्षिका पालन

प्रक्रिया न केलेले धान्य

प्रक्रिया न केलेल्या मसाल्यांची खरेदी विक्री

प्रक्रिया न केलेल्या कृषिमाल

मांस व मासे विक्री

हॉटेल, मेस, किराणा

कुक्कुटपालन

वराह पालन

शेळीपालन

ODOP म्हणजे काय?

one DISTRICT one PRODUCT (ODOP ) या योजनेमधील हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. याचा अर्थ असा की या योजनेअंतर्ग एका विशिष्ट जिल्ह्यात एखादा विशिष्ट प्रॉडक्ट तयार होत असेल तर त्या प्रॉडक्टच्या संबंधित अन्नप्रक्रिया उद्योग प्रकल्पाची उभारणी करणे, त्या उद्योग प्रकल्पाला गरजेची असलेली नवनवीन यंत्रसामग्री पुरवणे, त्या प्रॉडक्ट उत्पादन वाढेल याकडे लक्ष देणे, त्या प्रॉडक्टची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रयोगशाळांची निर्मिती करणे त्या एका विशिष्ट प्रॉडक्ट वर लक्ष केंद्रित करून त्या विशिष्ट जिल्ह्यात रोजगार निर्मितीला चालना देणे हा यामागील उद्देश आहे.

PMFME SCHEME 2024 IN MARATHI योजने साठी निवड प्रक्रिया:

१)ODOP च्या माध्यमातून जे प्रकल्प येतील त्यांना प्राधान्य असेल.

२) पातळीवर या योजनेसाठी अर्ज मागवण्यात येतील.

३) आपल्या प्रकल्पाचा सर्वे केला जाईल.

४) सर्वे झाल्यानंतर जिल्हा पातळी वरील समितीकडे रिपोर्ट जमा केले जाते.

५) जिल्हा समितीने मंजुरी दिल्यास बँकेकडे कर्जासाठी प्रस्ताव मांडण्यात येईल.

६) कर्ज मंजूर झाल्यानंतर बँक ऑनलाईन पद्धतीने माहिती अपलोड करेल.

७) सर्व कागदपत्रांची शहानिशा झाल्यानंतर बँक कर्ज देते आणि योजनेच्या ऑफिशिअल वेबसाईट वर माहिती अपलोड करते.

८) काही दिवसातच अनुदानाचा पहिला टप्पा बँकेकडे जमा होईल. त्यानंतर दुसरा टप्पा जमा होईल.

९) बँकेत अनुदान आल्यानंतर आपल्या कर्ज खात्यात ला लिंक केले जाईल.

योजनेसाठी अर्ज कसा करावा

१)PMFME SCHEME ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन योजनेसाठी अर्ज करू शकतात.

२) अर्ज केल्यानंतर सर्व अर्जांची जिल्हा समितीद्वारे छाननी केली जाते.

३) पात्र अर्ज बँकेकडे कर्ज मंजुरीसाठी पाठवले जातात.

४) बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्या चे अर्ज राज्य समिती कडून बँकांकडे पाठवले जातात.

५) अर्जात काही त्रुटी असल्यास आपल्याला कळवण्यात येईल त्या त्रुटींची पूर्तता 30 दिवसाच्या आत करणे गरजेचे आहे.

६) आपण सगळ्या नियम व अटी मध्ये योग्य असाल तर बँक आपले कर्ज मंजूर करते, सर्व कागदपत्रांची छाननी झाल्यावर बँक कर्ज वितरण करते

७) आपल्या अनुदान बँकेकडे पाठवले जाते. ही सबसिडी आपल्या कर्ज खात्याला पाठवले जाते जेणेकरून तेवढ्याच रकमेवर व्याज आकारले जाईल.

८) कर्ज खात्या चा लॉक इन कालावधी तीन वर्षाचा आहे. म्हणजे तीन वर्षाचा आत कर्ज खाते बंद करता येत नाही.

अर्ज करताना लागणारे आवश्यक कागदपत्रे

पॅन कार्ड

आधार कार्ड

व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा

भाडेकरार

उद्यम रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र

शॉप ॲक्ट

FSSAI प्रमाणपत्र

GST

खरेदी करणार असलेल्या मशीनचे कोटेशन

शेड बांधायचे असल्यास त्याचे कोटेशन

वीज कनेक्शन

प्रोजेक्ट रिपोर्ट

बँक पासबुक

आपल्या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती

ITR

निष्कर्ष

PMFME SCHEME 2024 IN MARATHI | प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या लेखात आपण सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग बद्दल सविस्तर माहिती घेतली योजनेसाठी अर्ज कसा करावा, कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत, निवड प्रक्रिया कशी असेल, कोणत्या उद्योग समाविष्ट आहेत हे बघितलं माहिती महत्त्वपूर्ण तर आहेच पण उपयोगी पण आहे लेख महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत नक्की शेअर करा. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना याबद्दल नक्की माहिती द्या. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा .धन्यवाद.

FAQ : PMFME SCHEME 2024 IN MARATHI | प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग

१)PMFME SCHEME योजनेत कशासाठी कर्ज मिळते?

ans: PMFME SCHEME योजनेत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी कर्ज मिळते.

२) माझे कर्ज रिजेक्ट होऊ शकते का?

ans : योग्य कारण देऊन बँक कर्ज रिजेक्ट करू शकते.

३) प्रकल्पाचा विमा करावा लागतो का?

ans : होय, संपूर्ण प्रकल्पाचा व त्यात वापरण्यात येणाऱ्या मशीनचा व व मालाचा विमा करावा लागतो.

४) एकाच कुटुंबातील किती व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकता?

ans: एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.

५) या योजनेत स्व गुंतवणूक करणे गरजेचे आहे का?

ans: होय, या योजनेत स्वगुंतवणूक करणे बंधनकारक आहे.

६) या योजनेत किती टक्के व गुंतवणूक करणे गरजेचे आहे?

ans: या योजनेत कमीत कमी 10% स्व गुंतवणूक करणे गरजे चेआहे.

हे हि वाचा

राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/

अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/

लखपती दीदी योजना https://marathisampada.com/lakhpati-didi-yojana-2024/

प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/

सुकन्या समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/sukanya-samriddhi-yojana-2024-in-marathi/