PM Suryoday Yojana 2024 | पंतप्रधान सूर्योदय योजना २०२४, आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सूर्योदय योजना याबद्दल ट्विटरवरून माहिती दिली होती. परंतु ती योजना काय आहे कशी राबवली जाणार आहे याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पंतप्रधान सूर्योदय योजनेबद्दल माहिती दिली या योजनेअंतर्गत एक कोटी घरांच्या छतांवर सोलर पॅनल बसवले जाणार असून त्याद्वारे दरमहा 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे.
घराच्या छतावर सोलर पॅनल बसवल्यामुळे वीज निर्मिती तर होईलच त्याचप्रमाणे वीज वीर भरण्यापासून मुक्तता देखील मिळेल तसेच तयार झालेली वीज विकून रोजगार निर्मिती ही करता येईल. हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
योजनेचा मुख्य उद्देश हा गरीबआणि मध्यमवर्गीय कुटुंबांना वीज निर्मिती क्षेत्रात स्वावलंबी करणे, वीज बिल भरण्याच्या कामातून सुटका मिळवून देणे, तसेच तयार झालेल्या विजेच्या विक्रीतून कमाई करणे हा हा आहे.
पंतप्रधान सूर्योदय योजनेचा हा एक उद्देश झाला परंतु पर्यावरणाशी निगडित एक मुख्य उद्देश आहे तो म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण करणे नैसर्गिक रित्या मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाचा उपयोग करून वीज निर्माण करणे त्या विजेचा रोजच्या जीवनात वापर करणे हा होय. पंतप्रधान सूर्योदय योजनेमुळे अतिरिक्त वीज निर्मिती वरील ताण देखील थोडा कमी होईल.
पंतप्रधान सूर्योदय योजना आणि पंतप्रधान सूर्य घर योजना या दोन्ही योजना एकमेकांशी संबंधित योजना आहेत. केंद्र सरकारने घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याच्या योजनेला पंतप्रधान सूर्योदय योजना असे संबोधले आहे, तर मोफत वीज निर्माण करायच्या योजनेला पंतप्रधान सूर्य घर योजना असे संबोधले आहे. त्यामुळे या दोन्ही योजना वेगवेगळ्या नसून एकच आहेत.
पंतप्रधानसूर्योदय योजनेअंतर्गत एक कोटी घरांवर सोलर पॅनल बसवले जाणार आहे. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे विज बिल कमी होईल तसेच भारत विजेच्या क्षेत्रात स्वावलंबी होईल.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात सांगितले की सौर पॅनल बसवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले जाईल. त्याचे फायदे समजून सांगितले जातील. योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शहरी स्थानिक संस्था किंवा पंचायतीच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या लोकांकडून मार्गदर्शन केले जाईल. प्रामुख्याने सौर पॅनल बसवण्यासाठी जो काही खर्च येईल त्या खर्चाचा बोजा जनतेवर पडणार नाही याची सरकार खबरदारी घेईल. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांना अनुदान दिले जाईल.
पंतप्रधान सूर्योदय योजना २०२४ या लेखात आपण पंतप्रधान सूर्योदय योजना म्हणजे काय पंतप्रधान सूर्योदय योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो , योजनेअंतर्गत किती बचत केली जाऊ शकते, अर्ज कसा करावा पंतप्रधान सूर्योदय योजनेचा अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागतील याची संपूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत.
PM Suryoday Yojana 2024 | पंतप्रधान सूर्योदय योजना २०२४
काय आहे PM Suryoday Yojana 2024 योजना?
पंतप्रधान सूर्योदय योजना बद्दल सांगताना ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री आर के सिंग यांनी सांगितले . ही योजना प्रामुख्याने मध्यम उत्पन्न असलेल्या लोकांसाठी आहे. म्हणजेच ज्या घरात अल्प उत्पन्न आहे त्या घरात सौर ऊर्जेद्वारे वीज पोहोचवली जाणार आहे. रूफ टॉप सोलर प्रोग्राम साठी 40% पर्यंत अनुदान दिले जाईल, हे अनुदान 60 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे आमचे प्रयत्न आहेत. उर्वरित 40 टक्के कर्ज असेल विशेष श्रेणीतील राज्यांसाठी अनुदान हे 70% असेल.
या योजनेअंतर्गत एक किलो वॅट सौर पॅनल बसवण्यासाठी 30,000 रुपये, 2kw सौर पॅनल बसवण्यासाठी 60,000 रुपये आणि 3 किलो वॅट सौर पॅनल बसवण्यासाठी 78000 रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे.
किती सबसिडी मिळेल?
पंतप्रधान सूर्योदय योजना अंतर्गत 1 किलो वॅट साठी 18000 ते 20,000रुपये सबसिडी मिळेल. या योजनेअंतर्गत 300 युनिट मोफत वीज उपलब्ध होणार आहे.
किती बचत होईल?
130 स्क्वेअर फुट क्षेत्रफळावर रू फ टॉप सोलर प्लांट4.32 किलो वॅट वीज निर्माण करेल. साधारण वर्षभरात1576.8 किलो वॅट वीज निर्माण होईल. यामुळे दररोज अंदाजे 13 रुपये आणि वार्षिक कंदाचे 5000 रुपये वाचतील. 200 स्क्वेअर फुट क्षेत्रफळावर 4 किलो वॅट सोलर प्लांट बसवायचा असेल त्यासाठी साधारण 86000 रुपये खर्च येईल. यामध्ये केंद्र सरकार36000 कृपया अनुदान देईल. आणि तुम्ही स्वतः 50000 रुपये गुंतवू शकता किंवा राज्य सरकार देत असलेल्या अनुदानाचा फायदा घेऊ शकता. या सोलर प्लांट मुळे दररोज 8.64 किलो वाईट वीज निर्माण होईल आणि दरवर्षी 9460 रुपयांची बचत होईल.
पीएम सूर्योदय योजनेसाठी अर्ज कसा करावा?
पंतप्रधान सूर्योदय योजनेसाठी नोंदणी करायची असल्यास तुम्ही तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये देखील जाऊ शकतात.
किंवा
1) pmsuryagarh.gov.in या वेबसाईटला जा, apply for rooftop solar या ऑप्शन वर जा.
2) तुम्ही ज्या राज्यात राहतात , त्या राज्याचे नाव निवडा. तुम्ही राहता त्या क्षेत्रातील वितरण कंपनी निवडा.
3) त्यानंतर तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी टाकावा लागेल.
4) पुढील फॉर्म भरण्यासाठी तुम्ही ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाचा वापर करून लॉगिन करू शकता.
5) लॉगिन केल्यानंतर रू फ टॉप सोलर साठी अर्ज करा.
6) तुमचा अर्ज मंजूर होईपर्यंत तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल.
7) अर्जमंजूर झाल्यानंतर तुमच्या प्रभागातील नोंदणीकृत विक्रेत्याकडून डिस्कॉम द्वारे प्लांट स्थापित करून घ्या.
8) प्लांट चे इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर प्लांट चा तपशील सबमिट करा आणि साठी अर्ज करा.
9) नेट मीटर बसवल्यानंतर आणि डिस्कॉम द्वारे तपासणी केल्यानंतर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरून कमिशनिंग प्रमाणपत्र मिळू शकेल किंवा तुम्ही प्रमाणपत्र तयार करू शकाल.
10) तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यानंतर तुमच्या बँक खात्याचे तपशील आणि कॅन्सल चेक म्हणजेच रद्द केलेल्या चेक पोर्टल द्वारे सबमिट करावे लागेल.
11) त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात 30 दिवसांच्या आत सबसिडी मिळेल.
अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी दाखला
शिधापत्रिका
विज बिल
मोबाईल नंबर
बँकेचा तपशील
पासपोर्ट आकाराचे फोटो
पंतप्रधान सूर्योदय योजनेचा पर्यावरणीय फायदा:
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सूर्योदय योजना २०२४ योजनेची घोषणा केली, त्यावेळी देशातील अल्प उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबां चा फायदा लक्षात घेतला त्याचबरोबर सूर्योदय योजनेमुळे पर्यावरणाची हानी होणार नाही पर्यावरणाला कसा फायदा होईल हे लक्षात घेतले, पंतप्रधान सूर्योदय योजनेमुळे घराच्या छतावर जे सोलर प्लांट बसवले जातील. सूर्यप्रकाशाचा उपयोग करून सौर ऊर्जेची निर्मिती होईल. सौर ऊर्जेमुळे तयार झाले ल्या विजेचा उपयोग घरगुती वापरासाठी केला जाईल. तसेच अतिरिक्त तयार झालेल्या विजेची विक्री करून उत्पन्न मिळवता येईल. सौर ऊर्जा आपल्याला मोफत मिळते त्या वाया जाणाऱ्या सौर ऊर्जेचा योग्य उपयोग करून वीज निर्मिती केली तर मानव जातीला तर फायदा आहेच परंतु पर्यावरणाला देखील फायदा होऊ शकतो. सौर ऊर्जेच्या वापरामुळे इतर मार्गाने तयार होणाऱ्या विजेचा उपयोग कमी होईल आणि वीज बचत होऊ शकेल या बचत केलेला विजेचा भविष्यात उपयोग होऊ शकतो. सौर ऊर्जेच्या वापरामुळे निर्माण केलेल्या विजेचा वापर करून आपण निर्मितीवर जो अतिरिक्त ताण पडत आहे तो काही प्रमाणात कमी करू शकतो.
FAQ : PM Suryoday Yojana 2024 | पंतप्रधान सूर्योदय योजना २०२४
१) पंतप्रधान सूर्योदय योजना आणि पंतप्रधान सूर्या घर योजना वेगवेगळे आहेत का?
ans : पंतप्रधान सूर्योदय योजना आणि पंतप्रधान सूर्य घर योजना एकमेकांशी संबंधित अशा योजना आहेत. घराच्या छतावर सोलर प्लांट बसवणे याचा समावेश पंतप्रधान सूर्योदय योजनेत आहे तर वीज निर्मिती करणे याचा समावेश पंतप्रधान सूर्य घर योजनेत आहे.
२) पंतप्रधान सूर्योदय योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
ans: पंतप्रधान सूर्योदय योजनेचा लाभ अल्प उत्पन्न असलेले मध्यमवर्गीय कुटुंबांना होऊ शकतो.
३) पंतप्रधान सूर्योदय योजना कधीपासून राबविण्यात येणार आहे?
ans: पंतप्रधान सूर्योदय योजना 2024 पासून राबविण्यात येणार आहे.
४) पंतप्रधान सूर्योदय योजनेअंतर्गत किती युनिट वीज मोफत मिळणार आहे?
ans: पंतप्रधान स्वराज्य जननी अंतर्गत 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे.
५) पंतप्रधान सूर्योदय योजनेअंतर्गत तयार झालेले विजेची विक्री करू शकतो का?
ans: पंतप्रधान सूर्योदय योजना अंतर्गत तयार झालेल्या विजेची करू शकतो.
६) पंतप्रधान सूर्योदय योजनेसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघेही अनुदान देतात का?
ans: पंतप्रधान सूर्योदय योजनेसाठी केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकार उपलब्ध करून देते.
७) पंतप्रधान सूर्योदय योजनेअंतर्गत सीडी मिळते?
ans: पंतप्रधान सूर्योदय योजनेअंतर्गत 18,000 ते 20,000 रुपये पर्यंत सबसिडी मिळते.
८) पंतप्रधान सूर्योदय योजनेचा अर्ज कसा करावा?
ans: पंतप्रधान सूर्योदय योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांची मदत घेऊ शकतात किंवा
सरकारच्या pmsuryagarh.gov.in या ऑफिशिअल वेबसाईट वरून अर्ज भरू शकतात.
९) पंतप्रधान सूर्योदय योजनेच्या अर्जासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात?
ans : सूर्योदय योजनेच्या अर्जासाठी आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, शिधापत्रिका, विज बिल, मोबाईल नंबर,
बँकेचा तपशील ,पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी आवश्यक कागदपत्रे लागतील.
हे हि वाचा
लखपती दीदी योजना २०२४https://marathisampada.com/lakhpati-didi-yojana-2024/
राष्ट्रीय वयोश्री योजना २०२४ https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/
अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/
लेख आवडल्यास आणि महत्वपूर्ण वाटल्यास आपल्या प्रियजनांन सोबत नक्की शेयर करा . लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा . धन्यवाद