PM PRANAM YOJANA 2024 | पंतप्रधान प्रणाम योजना २०२४

PM PRANAM YOJANA 2024 | पंतप्रधान प्रणाम योजना २०२४, PM Promotion of Alternate Nutrients for Agriculture Management Yojana , योजनेअंतर्गत रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खते, कंपोस्ट खत, बायो फर्टीलायझर यासारख्या नैसर्गिक खतांचा वापर करून मातीची सुपीकता टिकवून ठेवणे, जमिनीची धूप कमी करणे आणि शेतीची उत्पादकता वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

2023 चा अर्थसंकल्पात पीएम प्रणाम योजनेची घोषणा करण्यात आली. सर्वप्रथम या योजने ची निर्मिती का करण्यात आली हे आपण समजून घेऊयात, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार अशा योजनांवर काम करत आहे ज्या योजनांमुळे सरकारच्या तिजोरीवरील अनुदानाचा भार कमी होईल आणि त्याचप्रमाणे शेतीमध्ये रासायनिक खतांचा आणि विविध रसायनांचा वापर कमी होईल. पंतप्रधान प्रणाम योजने अंतर्गत रासायनिक खतांना पर्यायी खते निर्माण करणे या गोष्टीवर प्रामुख्याने काम करण्यात येणार आहे.

PM PRANAM YOJANA 2024 , PM PRANAM YOJANA यामध्ये PRANAM म्हणजे प्रमोशन ऑफ अल्टरनेट न्यूट्रिएंट्स फॉर एग्रीकल्चर मॅनेजमेंट हे डिपार्टमेंट सरकारला रासायनिक खतांना पर्यायी खते निर्माण करण्यासाठी काय पावले उचलावी लागतील यासाठी सरकारला मदत करत आहे.

PM PRANAM YOJANA 2024,अंतर्गत रासायनिक खतांचा वापर कमी करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे त्याचप्रमाणे शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि पिकांची पोषकता वाढवण्यासाठी पर्यायी खतांचा त्याचप्रमाणे नैसर्गिक खतांचा वापर करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे या कामावर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे युरियाचा वापर आणि युरियाचे उत्पादन कमी करणे हादेखील या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे.

सरकारच्या अंदाजानुसार येत्या आर्थिक वर्षात रासायनिक खतांवरील अनुदानाचा आकडा 2.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचेल. जो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 39 टक्क्यांहून अधिक असेल. 2021-22 मध्ये रासायनिक खतांवर अनुदान म्हणून सरकारने 1.62 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. या सगळ्याचा विचार करता सरकारी तिजोरीवर अनुदानाचा भार पडू नये यासाठी पंतप्रधान प्रणाम योजना आणली आहे. या योजनेसाठी सरकार कोणताही वेगळा निधी देणार नसून रासायनिक खतांसाठी दिला जाणारा निधीच या योजनेसाठी वापरण्यात येणार आहे.

PM PRANAM YOJANA 2024 योजनेमुळे रासायनिक खतांचा अतिवापर थांबवणे, रासायनिक खतांना पर्यायी खते म्हणून सेंद्रिय खते, कंपोस्ट खत, शेणखत, बायो फर्टीलायझर यांचा वापर करणे. नैसर्गिक खतांचा वापर करून जमिनीची धूप थांबवणे, जमिनीची पोषकता टिकवून ठेवणे, मातीचे आरोग्य सुधारून शेतकरी पुरेशी पोषक तत्वे असणाऱ्या पिकांचे जास्त उत्पादन घेऊ शकते.

पंतप्रधान प्रणाम योजना २०२४

PM PRANAM YOJANA 2024

पंतप्रधान प्रणाम योजनेची वैशिष्ट्ये:

1) रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी करायला प्रोत्साहन देणे.

2) रासायनिक खतांच्या अनुदानात कपात करणे, 2022-23 मध्ये 2.25 लाख कोटी रुपये अनुदान दिले जाईल असा अंदाज आहे तेच 2021-22 मध्ये 1.62 लाख कोटी रुपये खर्च केले गेले होते.

3) पंतप्रधान प्रणाम योजनेसाठी कोणतेही वेगळे अनुदान दिले जाणार नाही.

4) रासायनिक खतांसाठी दिला जाणारा निधीच पंतप्रधान प्रणाम योजनेसाठी वापरण्यात येणार आहे.

5) प्रत्येक राज्याला अनुदानावर बचत केलेल्या पैशाच्या 50% इतके अनुदान मिळेल.

6) राज्य मिळालेल्या निधीपैकी 70 टक्के निधी गाव, ब्लॉक आणि जिल्हा स्तरावर पर्यायी खते आणि पर्यायी खत उत्पादन सुविधा विकसित करण्याच्या कामात वापरू शकता.

7) उरलेल्या 30% निधीचा वापर शेतकरी, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था आणि बचत गटांना मदत करण्यासाठी केला जाऊ शकतो. यात योजनेसंदर्भात गावात जनजागृती कार्यक्रम करणे, शेतकऱ्यांना रासायनिक खतांना पर्याय खते वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे, रासायनिक खतांचा वापर कमी करणे यासाठी प्रोत्साहन देणे असे कार्यक्रम घ्यावे.

पंतप्रधान प्रणाम योजने उद्दिष्टे:

1) पंतप्रधान प्रणाम योजनेचा मुख्य उद्देश रासायनिक खते आणि सेंद्रिय खतांच्या मिश्रणात खतांचा संतुलित वापर करून शेतीची उत्पादकता वाढवणे हा आहे.

2) पंतप्रधान प्रणाम योजनेअंतर्गत सुरुवातीला एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

3) यासाठी 10,000 जैव संसाधन केंद्र स्थापन केली जाणार आहे.

4) जैव संसाधन केंद्रांमुळे राष्ट्रीय स्तरावर सूक्ष्म खते आणि कीटकनाशक उत्पादनाचे आणि वितरणाचे जाळे वाढवण्यास मदत होणार आहे.

5) रासायनिक खतांचा वापर कमी केल्यामुळे जमिनीचा दर्जा सुधारेल.

6) जमिनीची धूप रोखण्यास मदत होईल आणि जमिनीची पोषकता टिकून ठेवण्यास मदत होईल.

7) त्यामुळे शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.

8) रसायन विरहित अन्नपदार्थांचे सेवन करून देशातील लोकांना निरोगी जीवन जगण्याची संधी मिळेल.

PM PRANAM YOJANA 2024

पंतप्रधान प्रणाम योजनेचे कृषी क्षेत्राला होणारे फायदे:

1) सेंद्रिय, नैसर्गिक खतांबरोबरच पर्यायी पोषक खतांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाईल.

2) रासायनिक खतांच्या कमीत कमी वापरामुळे जमिनीचा पोत सुधारेल.

3) जास्तीत जास्त पोषक तत्वे असणारे पीक घेता येईल.

4) जमिनीची उत्पादन क्षमता वाढल्यामुळे शेतीमाला चे प्रमाण देखील वाढेल.

5) कॉम्प्रेस बायोगॅसच्या वापरास प्रोत्साहन दिले जाईल.

6) स्वच्छ ऊर्जा निर्मिती करण्यास प्रोत्साहन दिले जाईल.

किती अनुदानित युरिया मिळणार?

पुढील तीन वर्षांसाठी शेतकऱ्यांना सध्या आहे त्याच दरात युरिया उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सध्याचा दर असा आहे 242 रुपये दराने 45 किलो युरियाची अनुदानित बॅग उपलब्ध आहे. तसेच 2025-26 पर्यंत जवळजवळ 44 कोटी आठ नॅनो युरियाच्या बाटल्या उत्पादन क्षमता असलेले 8 नॅनो युरिया प्लांट सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

PM PRANAM YOJANA 2024

निष्कर्ष:

PM PRANAM YOJANA 2024 या लेखात आपण पंतप्रधान प्रणाम योजनेची सविस्तर माहिती बघितली. या योजनेअंतर्गत रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक आणि सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करून शेतीची पोषकता टिकवून ठेवून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश आहे. या योजनेमुळे जमिनीची जास्तीत जास्त काळजी घेतली जाईल. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्याचप्रमाणे जमिनीचे धूप रोखण्यास मदत होईल. रासायनिक खतांवर विरहित अन्नपदार्थांचे सेवन करून देशातील नागरिकांना निरोगी आयुष्य मिळेल.

FAQ:PM PRANAM YOJANA 2024

१) प्रधानमंत्री प्रणाम योजना कोणासाठी आहे?

ans: प्रधानमंत्री प्रणाम योजना शेतकऱ्यांसाठी आहे.

२) प्रधानमंत्री प्रणाम योजनेचा उद्देश काय आहे?

ans: रासायनिक खतांच्या जोडीने सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करून शेतीत उत्पादकता वाढवणे हा प्रधानमंत्री प्रणाम योजनेचा उद्देश आहे.

३) प्रधानमंत्री प्रणाम योजनेचा कृषी क्षेत्राला कसा फायदा होईल?

ans: प्रधानमंत्री प्रणाम योजनेचा कृषी क्षेत्राला होणारा फायदा खालील प्रमाणे:

1) सेंद्रिय, नैसर्गिक खतांबरोबरच पर्यायी पोषक खतांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाईल.

2) रासायनिक खतांच्या कमीत कमी वापरामुळे जमिनीचा पोत सुधारेल.

3) जास्तीत जास्त पोषक तत्वे असणारे पीक घेता येईल.

4) जमिनीची उत्पादन क्षमता वाढल्यामुळे शेतीमाला चे प्रमाण देखील वाढेल.

5) कॉम्प्रेस बायोगॅसच्या वापरास प्रोत्साहन दिले जाईल.

6) स्वच्छ ऊर्जा निर्मिती करण्यास प्रोत्साहन दिले जाईल.

केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा

राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/

अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/

लखपती दीदी योजना https://marathisampada.com/lakhpati-didi-yojana-2024/

प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/

सुकन्या समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/sukanya-samriddhi-yojana-2024-in-marathi/

हर घर नल योजना २०२४ https://marathisampada.com/har-ghar-nal-yojana-2024/

नमो ड्रोन दीदी योजना https://marathisampada.com/namo-drone-didi-yojana-in-marathi/

महिला समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/mahila-samriddhi-yojana-2024-in-marath/

जननी सुरक्षा योजना २०२४ https://marathisampada.com/janani-suraksha-yojana-2024-in-marathi/

माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ https://marathisampada.com/mazi-kanya-bhagyashree-yojana-2024-in-marathi/

प्रधान मंत्री मातृ वंदना योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-matru-vandana-yojana-2024-in-marathi/

लेक लाडकी योजना २०२४ https://marathisampada.com/lek-ladki-yojana-2024-in-marathi/

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२४ https://marathisampada.com/widow-pension-scheme-2024-in-marathi/

प्रधान मंत्री मुद्रा योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-mudra-yojana-2024/

आयुष्मान भारत योजना २०२४ https://marathisampada.com/ayushaman-bharat-yojana-2024/

प्रधान मंत्री कौशल विकास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-kaushal-vikas-yojana-2024/

प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-ujjwala-yojana-2024/

प्रधान मंत्री सौभाग्य योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-saubhagya-yojana-2024/

प्रधान मंत्री आवास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-awas-yojana-2024/

लाडली बहाना योजना २०२४ https://marathisampada.com/ladali-bahana-yojana-2024/