PM KISAN SANMAN NIDHI YOJANA 2024 | प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना २०२४ ( PM-KISAN ) , या योजनेअंतर्गत 2018 पासून अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना व 2 हेक्टर पर्यंत शेती असणाऱ्या शेतकरी कुटुंबांना केंद्र सरकारकडून प्रति हप्ता ₹2000 म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेत एक मोठा बदल करून फक्त दोन हेक्टर शेती असणाऱ्या कुटुंबांना नव्हे तर सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा अर्थ असा की देशातील सर्वच शेतकरी कुटुंबीय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत केंद्र सरकार वर्षभरात ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन आहे त्यांना तीन समान हप्त्यांमध्ये 6000 रुपये आर्थिक सहाय्य देते. तुमची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मधील लाभार्थी स्थिती चेक करण्यासाठी तुम्ही PM KISAN अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. तुमचा आधार नंबर मोबाईल नंबर आणि नोंदणी क्रमांक टाकून, तुम्ही या योजनांसाठी पात्र आहात का? तुम्हाला आतापर्यंत या योजनेअंतर्गत किती हप्ते मिळाले? हे तपासू शकता.
PM किसान लाभार्थी स्थिती म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची पात्रता जाहीर करणे.PM किसान लाभार्थी स्थितीमध्ये तुम्ही योजनेसाठी पात्र आहात का? तुम्हाला योजनेअंतर्गत किती रक्कम मिळाली आहे? तुमच्या खात्यातील सध्याची आर्थिक स्थिती काय आहे? याबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकते. ते तपासण्यासाठी तुम्हाला PM किसान ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन आधार क्रमांक, मोबाईल नंबर, आणि नोंदणी क्रमांक टाकून चेक करता येईल.
PM किसान लाभार्थी यादी अंतर्गत तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान योजने चे अर्थसहाय्य मिळवणाऱ्या पात्र शेतकऱ्यांची नावे बघू शकता. तुमच्या भागातील सर्व पात्र शेतकऱ्यांची नावे तुम्हाला PM किसान लाभार्थी यादी मध्ये बघता येते. PM किसान लाभार्थी यादी बघण्यासाठी तुम्हाला PM किसान ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुमचे राज्य, जिल्हा, उपविभाग, ब्लॉक आणि गाव यांची माहिती टाकावी लागेल. त्यानंतर तुम्ही PM किसान लाभार्थी यादी मध्ये पात्र शेतकऱ्यांची नावे तपासू शकता.
योजनेसाठी जसे पात्र लाभार्थी आहेत तसेच काही अपात्र लाभार्थी देखील आहेत ते कोणते ते आपण बघूयात, जमीन धारण करणारी संस्था, निवृत्ती वेतन 10000 पेक्षा जास्त घेणारी, आयकर भरणारी व्यक्ती, आजी-माजी महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष, आजी माजी आमदार खासदार, आजी-माजी सर्व मंत्री, संविधानिक पद धारण केलेले आजी-माजी व्यक्ती, नोंदणीकृत डॉक्टर, वकील आणि अभियंता इत्यादी या व्यक्ती प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी पात्र आहेत. ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
PM KISAN SANMAN NIDHI YOJANA 2024 | प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना २०२४
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यांची माहिती:
1) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपये तीन टप्प्यात दिले जाणार आहे.
2) प्रत्येक टप्प्यात ₹2000 दिले जातील.
3) म्हणजेच केंद्र सरकारकडून शेतकऱ्याला दर महिन्याला ₹500 मिळतील.
4) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांचा ₹2000 चा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.
प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजनेसाठी पात्रता:
1) भारतात राहणारे शेतकरी कुटुंबीय या योजनेचा लाभ घेऊ शकता.
2) भारतात राहणारे कोणत्याही राज्यातील शेतकरी कुटुंबीय या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
3) पूर्वी दोन एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना होती परंतु आता सर्व शेतकरी बांधव प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेसाठी पात्र आहेत.
4) प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे बँकेत खाते असणे बंधनकारक आहे.
5) बँक खाते नसल्यास योजनेचा लाभ घेण्यापूर्वी बँकेत खाते उघडावे लागेल.
6) अल्पभूधारक शेतकरी कुटुंबीय म्हणजेच पती-पत्नी आणि त्यांचे अल्पवयीन मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा
राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/
अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/
लखपती दीदी योजना https://marathisampada.com/lakhpati-didi-yojana-2024/
प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/
सुकन्या समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/sukanya-samriddhi-yojana-2024-in-marathi/
पी एम किसान योजनेचे अपात्र लाभार्थी:
1) जमीन धारण करणारी संस्था,
2) निवृत्ती वेतन 10000 पेक्षा जास्त घेणारी,
3)आयकर भरणारी व्यक्ती,
4)आजी-माजी महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष,
5)आजी माजी आमदार खासदार,
6)आजी-माजी सर्व मंत्री,
7)संविधानिक पद धारण केलेले आजी-माजी व्यक्ती,
8)नोंदणीकृत डॉक्टर, वकील आणि अभियंता .
पी एम किसान योजनेचा लाभ कुटुंबातील सर्व सदस्यांना मिळतो का?
PM KISAN SANMAN NIDHI YOJANA 2024 | प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना २०२४ योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम आहेत. हे नियम आपण पाळले तर आपण या योजनेचा घेऊ शकतो. खूप जणांना असे वाटते की एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य पी एम किसान योजनेअंतर्गत पैसे मिळवू शकतात. परंतु पी एम किसान योजनेचा नियमांमध्ये हे स्पष्टपणे सांगितले आहे की एका कुटुंबातील एका सदस्याला या योजनेचा लाभ घेता येईल. परंतु एका कुटुंबातील इतरही सदस्य या योजनेचा लाभ घेताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येऊ शकते. या योजनेअंतर्गत मिळालेले पैसेही त्यांच्याकडून काढून घेण्यात येऊ शकता. पी एम किसान योजनेअंतर्गत मिळणारे हफ्ते हे लाभार्थ्याच्या आधारकार्डशी जोडलेले असतात. आधार कार्ड सोबत जोडलेला डेटाबेस मध्ये कुटुंबातील इतर सदस्यांची ही माहिती असते. त्यामुळे पी एम किसान योजनेच्या नियमांचे उल्लंघन केले तर लगेच कारवाई होऊ शकते.
केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग https://marathisampada.com/pmfme-scheme-2024-in-marathi/
नमो ड्रोन दीदी योजना https://marathisampada.com/namo-drone-didi-yojana-in-marathi/
महिला समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/mahila-samriddhi-yojana-2024-in-marath/
जननी सुरक्षा योजना २०२४ https://marathisampada.com/janani-suraksha-yojana-2024-in-marathi/
माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ https://marathisampada.com/mazi-kanya-bhagyashree-yojana-2024-in-marathi/
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी कशी करावी?
1) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला जावे.
2) समोर होम पेज ओपन होईल, त्यावर “शेतकरी कॉर्नर” हा पर्याय क्लिक करा.
3) शेतकरी कॉर्नर पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अजून तीन पर्याय दिसतील. त्यातील “नवीन शेतकरी नोंदणी “या पर्यायावर क्लिक करावे.
4) नवीन शेतकरी नोंदणी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन शेतकरी नोंदणी फॉर्म ओपन होईल.
5) या फॉर्ममध्ये विचारलेले सर्व वैयक्तिक माहिती व्यवस्थित वाचून भरावे.
6) फॉर्म मधील सर्व माहिती भरून झाल्यानंतर, फॉर्म सबमिट करा.
7) या सबमिट केलेल्या फॉर्मची एक छायाप्रत आपल्याजवळ ठेवा.
8) अशा प्रकारे प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
मतदार ओळखपत्र
ड्रायव्हिंग लायसन
नरेगा कार्ड
बँक खात्याचा तपशील( खाते क्रमांक,IFSC कोड, बँक पासबुकची प्रत)
मोबाईल नंबर
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून बाहेर कसे पडायचे?
1) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून तुम्ही सो इच्छेने बाहेर पडू शकता.
2) त्यासाठी तुम्हाला पी एम किसान योजनेच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जावे लागेल.
3) त्यानंतर समोर दिसणारे होम पेजवर Voluntary Surrender of PM Kisan Benifits या पर्यायावर क्लिक करा.
4) त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक आणि कॅपचा कोड टाकून, ओटीपी जनरेट करा.
5) ओटीपी टाकल्यानंतर या योजनेमार्फत तुम्ही आतापर्यंत किती हप्ते घेतले त्या सर्व हप्त्यांची माहिती तुम्हाला दिसेल.
6) त्यानंतर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा नाही आणि योजना परत करायची आहे का? असे विचारले जाईल.
7) तुम्हाला या योजनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून तुम्हाला होय या बटनावर क्लिक करावे लागेल.
8) अशाप्रकारे तुमच्याकडून ही योजना परत केली जाईल.
9) तुम्हाला सरकार मार्फत प्रमाणपत्र दिले जाते.
निष्कर्ष:
PM KISAN SANMAN NIDHI YOJANA 2024 | प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना २०२४ या लेखात आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल सविस्तर माहिती बघितली. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना किती आर्थिक मदत मिळते, किती हप्त्यांमध्ये मिळते, योजनेसाठी नाव नोंदणी कशी करावी, तसेच कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात याबद्दल सविस्तर माहिती बघितली. शेतकऱ्यांसाठीच्या, महिलांसाठीच्या, मुलींसाठी चा केंद्र सरकार व राज्य सरकारच्या इतर महत्त्वपूर्ण योजनांची सविस्तर माहिती वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. असेच महत्त्वपूर्ण लेख लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेख जास्तीत जास्त शेअर करा. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.
FAQ:PM KISAN SANMAN NIDHI YOJANA 2024 | प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना २०२४
1) प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना कोणासाठी आहे?
ans: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना भारतातील सर्व राज्यातील शेतकरी कुटुंबासाठी आहे.
2) प्रधानमंत्री किसान सन्माननिधी मार्फत किती आर्थिक मदत मिळते?
ans: प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेमार्फत 6000 रुपये इतकी वार्षिक आर्थिक मदत मिळते.
3) प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेमार्फत किती हप्त्यात आर्थिक मदत मिळते?
ans: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना मार्फत तीन हप्त्यात आर्थिक मदत मिळते.
4) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना मार्फत प्रत्येक हप्त्याला किती आर्थिक मदत मिळते?
ans: प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना मार्फत प्रत्येक हप्त्याला ₹2000 इतक्या आर्थिक मदत मिळते.
केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा
प्रधान मंत्री मातृ वंदना योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-matru-vandana-yojana-2024-in-marathi/
लेक लाडकी योजना २०२४ https://marathisampada.com/lek-ladki-yojana-2024-in-marathi/
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२४ https://marathisampada.com/widow-pension-scheme-2024-in-marathi/
प्रधान मंत्री मुद्रा योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-mudra-yojana-2024/
आयुष्मान भारत योजना २०२४ https://marathisampada.com/ayushaman-bharat-yojana-2024/
प्रधान मंत्री कौशल विकास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-kaushal-vikas-yojana-2024/
प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-ujjwala-yojana-2024/