NARALI PURNIMA 2024 WISHES IN MARATHI | नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा २०२४

NARALI PURNIMA 2024 WISHES IN MARATHI | नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा २०२४ , यावर्षी 19 ऑगस्ट 2024 नारळी पौर्णिमा आहे. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हटले जाते. या दिवशी रक्षाबंधन साजरे केले जाते त्यामुळे या पौर्णिमेला राखी पौर्णिमा असेही म्हणतात.

नारळी पौर्णिमा या सणाला कोळी बांधवांमध्ये विशेष महत्त्व आहे. नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा प्रमुख सण आहे असेही म्हटले जाते. नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून समुद्राला शांत होण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने मच्छीमारी चे काम पुन्हा सुरू करण्यासाठी समुद्राकडून आशीर्वाद घेतात. मच्छीमारी आमची जहाजे, बोटी, होड्या सुखरूप राहू देत, मच्छीमारी करायला गेलेले सर्व मच्छीमार सुखरूप घरी येऊ देत. यासाठी समुद्राकडे प्रार्थना करतात.

नारळी पौर्णिमा हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला येतो. या सणाच्या दरम्यान माशांचा प्रजनन काळ चालू असतो त्यामुळे मच्छीमार शक्यतो यावेळी मासेमारी करत नाहीत. नारळी पौर्णिमा झाल्यानंतर मासेमारी करण्यास सुरुवात केली जाते. श्रावण महिन्यात पावसाचा जोर थोडा कमी झालेला असतो. त्यामुळे मासेमारी करणे थोडे सोपे होते. श्रावण महिन्याच्या आधी भरपूर प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे मासेमारी करणे शक्य होत नाही. म्हणून या दरम्यान मासेमारी ही बंद ठेवली जाते. नारळी पौर्णिमेच्या दिवशी मच्छिमार समुद्राला नारळ वाहून त्याची पूजा करतात. मच्छीमारी चे काम पुन्हा सुरू करण्यासाठी समुद्राकडून आशीर्वाद घेतात. आणि मासेमारीला सुरुवात करतात. याच दरम्यान खवळलेला समुद्र शांत झालेला असतो त्यामुळे मासेमारी करणे हे सोपे होते.

नारळी पौर्णिमेच्या दिवशी सर्व कोळी बांधव छान पैकी नटून थटून दाग दागिने नवनवीन कपडे घालून समुद्रकिनाऱ्यावर समुद्राची पूजा करण्यासाठी येतात. या दिवशी नारळाचा वापर करून घरात नैवेद्यासाठी गोड पदार्थ बनवले जातात.

अशा या सगळ्यांच्या लाडक्या नारळी पौर्णिमा या सणाच्या आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि कोळी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी मी मराठीत काही शुभेच्छापत्र NARALI PURNIMA 2024 WISHES IN MARATHI घेऊन आले आहे. ते तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना पाठवा आणि त्यांच्या नारळी पौर्णिमा या सणाचा आनंद द्विगुणीत करानारळी पौर्णिमेला राखी पौर्णिमा असे म्हटले जाते. नारळी पौर्णिमेच्या रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो.भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा रक्षाबंधन हा सण आहे. कोणताही सण म्हटलं विविध पद्धतीने शुभेच्छा दिल्या जातात. आपल्या प्रियजनांना वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देण्याची मजाच काही वेगळी असते. आजच्या या लेखात आपण नारळी पौर्णिमा या सणाच्या विविध शुभेच्छा संदेश बघणार आहोत. यातील तुम्हाला आवडतील ते शुभेच्छा संदेश आपल्या प्रियजनांना पाठवा.

NARALI PURNIMA 2024 WISHES IN MARATHI | नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा २०२४

NARALI PURNIMA 2024 WISHES IN MARATHI

1) दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे…

कोळी बांधवांना सुखाचे दिस येऊ दे..

नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…!

2) कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा…!

3) सण आयलाय गो, आयलाय गो

नारळी पुनवचा..

मनी आनंद मावना

कोळ्यांच्या दुनियेचा

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

4) नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येते भरती,

दर्या राजा शांत होण्यासाठी बांधव प्रार्थना करती

घराघरात आज नैवेद्याला नारळी भात,

सागराला सोन्याचा नारळ अर्पण करून मासेमारीला होते सुरुवात…

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

5) रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा सण

तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येवो

हीच आमची मनोकामना…

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

हे हि वाचा रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा https://marathisampada.com/rakshabandhan-quoets-in-marathi/

6)नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येते भरती,

दर्या राजा शांत होण्यासाठी बांधव प्रार्थना करती

नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!

7)घराघरात आज नैवेद्याला नारळी भात,

सागराला सोन्याचा नारळ अर्पण करून मासेमारीला होते सुरुवात…

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

NARALI PURNIMA 2024 MASSAGES IN MARATHI

NARALI PURNIMA 2024 WISHES IN MARATHI

8) सागरा माझ्या भावा

कृपा कर मजवरी

खळवळू नको आम्हावरी

हीच आमची मागणी

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

10) नारळी पौर्णिमा तुम्हाला आणि

तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येवो,

समुद्र देव शुभाशीर्वाद देऊन तुम्हाला सौख्य, मांगल्य देवो

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

11) दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे..

सर्वांना सुखाचे दिस येऊ दे….

नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

12) परंपरा मांगल्याची, श्रद्धेची, समुद्र देवतेच्या पूजनाची

नारळी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!

13) मान्सूनचा शेवट आणि मासेमारीच्या नव्या हंगामाची सुरुवात होते

त्या नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा…..!

14) नारळी पौर्णिमेचा दिवस तुम्हाला सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा….!

15) सर्वांना सुख, समृद्धी ,ऐश्वर्य लाभो..

नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…!

16) आपल्या कोळी बांधवांची परंपरा, श्रद्धेची, मांगल्याची, आणि समुद्राच्या पूजनाची..

नारळी पौर्णिमेच्या सर्व कोळी बांधवांना खूप खूप शुभेच्छा…..!

NARALI PURNIMA STATUS IN MARATHI

NARALI PURNIMA 2024 WISHES IN MARATHI

17) सण आला नारळी पुनवेचा…

दरिया सारंगा नमन करतो तुजला..

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

18) कोळी बांधवांचा सण आला

उधाण आलं आनंदाला,

मासेमारी आरंभ करती.

नारळ अर्पण करून सागराला……

नारळी पौर्णिमेच्या सर्व कोळी बांधवांना हार्दिक शुभेच्छा…!

19) दिवस आज नारळी पौर्णिमेचा

सण आहे आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा

सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

20) दर्या सागरा आहे आमचा राजा…

त्याच्या जीवावर आम्ही करतो मजा

नारळी पौर्णिमेला नारळ सोन्याचा…

सगळे मिळून अर्पण करू दर्याला

सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश पाठवायचे आहे मग हे हि वाचा

आई बाबांचा वाढदिवस, आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस, मित्र-मैत्रिणी, आपला भाऊ ,आपली बहीण यांचेदेखील वाढदिवस आपण खूप आनंदाने साजरा करतो. परंतु वाढदिवसाच्या साजरा करताना आपल्या मनातील भावना आपल्या समोरच्या प्रिय व्यक्तीला समजाव्या असे प्रत्येकाला वाटते. परंतु प्रत्येकाला भावना बोलून दाखवता येत नाही. अशावेळी असे शुभेच्छा संदेश उपयोगी पडतात. आपल्या मनातील भावना योग्य पद्धतीने शब्दांची योग्य गुंफण करून समोरच्या पुढे मांडले तर त्यालाही आनंद होतो. तसेच विविध शुभेच्छा संदेश पुढील लेखांमध्ये वाचा.

आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes for Mother In Marathi | आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes For Father In Marathi |बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

भावा साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा 100+Birthday Wishes For Brother In Marathi 2024 | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes For Sister in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मित्र मैत्रिणींसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes For Friends In Marathi | मित्र-मैत्रिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा Wedding Anniversary Wishes In Marathi | लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

२१) सण मला नारळी पौर्णिमेचा

कोळी बांधवांच्या आनंदाचा

दर्या राजा असे देव त्यांचा

रक्षणकर्ता तो सकलांचा

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

22) कोळी बांधवांचा सण,

उधाण आलं आनंदाला

कार्यारंभ करती,

अर्पून नारळ सागराला…

नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…!

NARALI PURNIMA QUOTES IN MARATHI

NARALI PURNIMA 2024 WISHES IN MARATHI

23) सण आलाय गो, आलाय गो

नारळी पुनवेचा..

मनी आनंद मावना

कोळ्यांच्या दुनियेचा…

अरे बेगिन बेगिन चला किनारी

जाऊ देवाच्या पूजेला..

हात जोडूनी नारळ

सोन्याचा अर्पण करूया दर्याला……

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

24) कोळीवारा सारा सजलाय गो..

कोळी ये नाखवा आयलाय गो…

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

२५) सण आनंदाचा दिवस आज नारळी पौर्णिमेचा…

सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमा खूप खूप शुभेच्छा…!

26) नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमेच्या

सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा…!

27) सागराला करू वंदन,

मानाने करू नारळ अर्पण..

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

28) कोळीवाडा सगळा सजलाय गो

कोळी ये दाखवा आयला गो

नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा….!

29) दर्याचे धन होडीत येऊ दे

आमच्या कोळी बांधवांना सुखाचे दिवस येऊ देत

नारळी पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा…….!

30) सण नारळी पौर्णिमे चा, सण आहे जिव्हाळ्याचा

नारळी पौर्णिमेच्या खूप हार्दिक शुभेच्छा….!

NARALI PURNIMA SHUBHECHHA IN MARATHI

NARALI PURNIMA 2024 WISHES IN MARATHI

31) नारळी पौर्णिमेचा सण सर्व कोळी बांधवांना

सुख समाधान आणि समृद्धी घेऊन येऊ दे

हीच सागराला प्रार्थना…

नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…!

32) यावर्षीची नारळी पौर्णिमा तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना

सुखाची आणि समृद्धीची जावो हीच प्रार्थना…

नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…..!

33) कोकण म्हणजे लाल मातीतली वाट

कोकण म्हणजे निसर्गाचा थाट

कोकण म्हणजे मच्छी आणि पापलेट

कोकण म्हणजे आनंदाला उधाण

सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…!

34) कोकण म्हणजे निळी शार खाडी

कोकण म्हणजे माडाची झाडी…

कोकण म्हणजे सागराची गाज..

कोकण म्हणजे रुपेरी वाळूचा साज…

नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…!

35) सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!

36) नारळी पौर्णिमेच्या दिवशी

समुद्राला नारळ अर्पण करून

सर्व कोळी बांधवांच्या समृद्धी जीवनासाठी प्रार्थना करूया

सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…!

37) समुद्र देवाला करून वंदन

सन्मानपूर्वक करु नारळ अर्पण

नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…!

38) नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा…!

आजच्या लेखात मी तुमच्यासाठी नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा पत्रांचा समावेश केला आहे. तुम्हाला या नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा. या लेखातील शुभेच्छा या नारळी पौर्णिमेला तुम्ही तुमच्या प्रियजनांना नक्की पाठवा. तुम्हाला देखील नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.