NAMO DRONE DIDI YOJANA IN MARATHI | नमो ड्रोन दीदी योजना

NAMO DRONE DIDI YOJANA IN MARATHI | नमो ड्रोन दीदी योजना, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ,मुलींसाठी, अल्प रोजगार असणाऱ्या कुटुंबीयांसाठी अनेक योजना राबवल्या, तसेच महिलांसाठी देखील अनेक योजना राबवलेले आहे. महिलांना चूल आणि मूल यातच अडकून न देता. विविध तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांना सबल बनवणे. त्यांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. नवीन तंत्रज्ञान शिकून त्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देणे. हा या विविध योजना मागील उद्देश आहे. नमो ड्रोन दीदी योजना ही त्यातीलच एक योजना आहे. या योजनेत ड्रोन चा वापर करून ग्रामीण भागातील महिलांना शेती क्षेत्रात पुढे आणणे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच चांगले उत्पन्न मिळवणे हा या योजनेचा उद्देश आहे. ड्रोन दीदी योजना भारतीय कृषी संशोधन संस्था यांच्यामार्फत राबविण्यात आली आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये नमो ड्रोन दीदी योजने चे उद्घाटन केले. या योजनेअंतर्गत येत्या पाच वर्षात 1 लाख महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या लेखात आपण नमो ड्रोन दीदी योजना नक्की काय आहे या योजनेत कोण सहभागी होऊ शकतो. तसेच योजनेचा अर्ज कसा करावा. योजनेसाठी कोणते आवश्यक कागदपत्रे लागतात, या योजनेचा शेती क्षेत्राला कसा उपयोग आहे , ड्रोन चा वापर करून शेती कशी करावी हे सविस्तर बघणार आहोत.

NAMO DRONE DIDI YOJANA IN MARATHI | नमो ड्रोन दीदी योजना

NAMO DRONE DIDI YOJANA IN MARATHI

नमो ड्रोन दीदी योजना नेमकी काय आहे?

2023 मध्ये सुरू झालेले ड्रोन दीदी योजना, या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना कृषी क्षेत्राशी निगडित आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाते, त्याबद्दल प्रशिक्षण दिले जाते. या योजनेअंतर्गत बजेट बचत गटाची संबंधित महिलांना 15००० ड्रोन देण्याचे लक्ष आहे.

नमो ड्रोन दीदी योजनेत नक्की कशाचे प्रशिक्षण मिळते?

नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत ड्रोन कसे उडवावे, डाटा संकलित कसा करावा, ड्रोन ची काळजी कशी घ्यावी याबद्दल प्रशिक्षण दिले जाते. ड्रोन चा उपयोग करून शेतीची विविध कामे करण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. यात कीटकनाशकांची व खतां ची फवारणी करणे, बियांची पेरणी करणे, पिकांचे निरीक्षण करणे यांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहेस त्याचबरोबर दरमहा पंधरा हजार रुपये हे दिले जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान महिलांना ड्रोन संबंधित संपूर्ण तांत्रिक गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते.

नमो ड्रोन दीदी योजनेचा फायदा:

नमो ड्रोन दीदी योजनेचा शेती क्षेत्राशी संबंधित अनेक फायदे आहेत.

या योजनेअंतर्गत महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्याला प्राधान्य आहे.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी तर होतीलच त्याचबरोबर कृषी क्षेत्रातील त्यांचे योगदानही वाढेल.

कमी खर्चात आणि कमी अंग मेहनतीशिवाय शेतातही जास्त उत्पन्न घेतले जाऊ शकते.

या योजनेमुळे रोजगाराच्या अनेक संधी मध्येही वाढ होईल.

नमो ड्रोन दीदी योजनेचे भविष्यातील ध्येय:

नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत येत्या तीन वर्षात 10 लाख महिलांना ड्रोन वापरण्याचे आणि ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत सरकार ड्रोन संबंधित प्रशिक्षणाचे केंद्र उभारणार आहेत. तसेच ड्रोन दुरुस्तीसाठी आणि ड्रोन चार्जिंग स्टेशन देखील तयार करणार आहेत. तसेच ड्रोन संबंधी स्टार्टअप आहेत त्यांना सरकार आर्थिक व तांत्रिक मदत करणार आहेत.

ड्रोन शेती खरच गरजेचे आहे का?

ड्रोन मानवा शिवाय हवेत उडू शकते. रिमोट च्या साह्याने माणूस त्याला कंट्रोल करू शकतो. ड्रोन मध्ये जीपीएस सिस्टम, नेव्हिगेशन सिस्टम, कॅमेरे वेगवेगळे सेंसर लावलेले असतात. सध्या ड्रोन ची किंमत खूप जास्त आहे त्यामुळे ड्रोन भाड्याने घेऊन शेतीत उपयोग करणे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. एका ड्रोनचे आयुष्य साधारण चार ते पाच वर्षाचे असते. ड्रोनच्या वापराने शेती केली तर शेतकऱ्यांचे अंग मेहनतीचे काम कमी होईल त्याचबरोबर वेळेतही बचत होईल. तसेच कीटकनाशकांची खतांची फवारणी करताना अनेकदा जीव दगावण्याच्या बातम्या आपण ऐकतो. ड्रोन चा वापर केल्यामुळे या गोष्टी कमी होतील.

ड्रोन द्वारे कोणते शेती काम केले जाते?

ड्रोन द्वारे पिकांना खताची फवारणी करता येते.

ड्रोनच्या मदतीने पिकांवर जेथे कीटकनाशकांचा प्रादुर्भाव झाला आहे तेथेच फवारणी करता येऊ शकते.

ड्रोनवर असणाऱ्या कॅमेराच्या मदतीने शेतीतील कोरड्या जमिनीचा भाग बघून तेथे पाणीपुरवठा करता येईल. त्यामुळे पाण्याचा विनाकारण जास्तीचा वापर टाळता येईल.

नमो ड्रोन दीदी निवड प्रक्रिया:

ड्रोन दीदी बनणारी महिला भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.

ड्रोन दीदी बनवू इच्छिणारी महिला ही बचत गट किंवा एखाद्या स्वयं सेवी समूहातील सदस्य असावी.

ड्रोन दीदी बनवू इच्छिणारी महिलेचे वय 18 वर्षे ते 37 वर्षे या दरम्यान असावे.

NAMO DRONE DIDI YOJANA IN MARATHI | नमो ड्रोन दीदी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

NAMO DRONE DIDI YOJANA IN MARATHI | नमो ड्रोन दीदी योजनेचा लाभ बचत गटातील महिला सदस्यांना घेता येणार आहे त्या महिलांकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

आधार कार्ड

रहिवासी दाखला

पॅन कार्ड

बचत गटाचे ओळखपत्र

पासपोर्ट साईज फोटो

मोबाईल नंबर

ई-मेल आयडी

NAMO DRONE DIDI YOJANA IN MARATHI | नमो ड्रोन दीदी योजनेची आर्थिक मदत कशी मिळणार?

नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत ड्रोन खरेदी करण्यासाठी किंवा ड्रोन संबंधित उपकरणे खरेदी करण्यासाठी लागणारे एकूण रकमेच्या 80% किंवा जास्तीत जास्त आठ लाख रुपये एवढी आर्थिक मदत केंद्र सरकारमार्फत दिले जाणार आहे. आर्थिक दृष्ट्या जिथे ड्रोनचा वापर करणे शक्य आहे तेथील बचत गटातील महिलांना आधी निवडले जाईल आणि मग त्यांना ड्रोन पुरवले जातील. पूर्ण देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून एकूण 15,000 बचत गटांना ड्रोन पुरवले जाणार आहे.

निष्कर्ष:

NAMO DRONE DIDI YOJANA IN MARATHI | नमो ड्रोन दीदी योजना या लेखात आपण नमो ड्रोन दीदी योजनेबद्दल माहिती घेतली, या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना ड्रोन संबंधित कोणकोणते प्रशिक्षण दिले जाते हे बघितले. शेती क्षेत्रात ड्रोन चा उपयोग करून शेती उत्पादनाची वाढ कशा प्रकारे केली जाऊ शकते हे बघितले. तसेच ड्रोनचा वापर करून अंग मेहनतीची कामे कमी होऊ शकतात आणि वेळेचीही बचत होऊ शकते हे लक्षात आले. ही योजना राबवण्याचा मुख्य उद्देश हा महिलांचे कृषी क्षेत्रातील योगदान वाढवणे तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि सक्षम बनवणे हा होय. लेख महत्त्वपूर्ण आहेच परंतु लेख जास्तीत जास्त लोकांना शेअर केल्यास त्यांना या माहितीचा व योजनेचा फायदा होऊ शकतो. जास्तीत जास्त महिला या योजनेचा फायदा घेऊ शकतात. त्यामुळे लेख जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.

महिलांसाठी ,मुलींसाठी केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. महिलांसाठीच्या मुलींसाठीच्या इतर काही योजनांची माहिती करून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या . आमच्या वेबसाईटला तुम्हाला विविध योजनां बद्दल माहिती मिळेलच पण त्याच बरोबर आपले आरोग्य , बाळाचे आरोग्य, बाळाचे खानपान या बद्दल हि सविस्तर माहिती मिळेल .किल्ल्यांवर फिरायला जायचा प्लान असेल तर विविध किल्ल्याची पण माहिती तुम्हाला वाचायला नक्कीच आवडेल .तेव्हा आमच्या marathisampada.com या वेबसाईटला आवश्यक भेट द्या .लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.

FAQ:NAMO DRONE DIDI YOJANA IN MARATHI | नमो ड्रोन दीदी योजना

1) नमो ड्रोन दीदी योजना कशा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

ans: नमो ड्रोन दीदी योजना कृषी क्षेत्राशी संबंधित आहे.

2) नमो ड्रोन दीदी योजनेचा लाभ कोण घेऊ शकत?

ans: नमो ड्रोन दीदी योजनेचा लाभ गटातील महिला सदस्य घेऊ शकतात.

3) नमो ड्रोन दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाचीअट किती आहे?

ans: नमो ड्रोन दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे कमीत कमी वय 18 वर्षे ते ती जास्त वय 37 वर्षे असावे.

4) नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत कोणते प्रशिक्षण दिले जाते?

ans: नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन कसे उडवावे, डाटा संकलित कसा करावा, ड्रोन ची दुरुस्ती कशी करावी याबद्दल प्रशिक्षण दिले जाते.

5)नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत कृषी क्षेत्रासंबंधी कोणते प्रशिक्षण दिले जाते?

ans:नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत कृषी क्षेत्रासंबंधी बियांची पेरणी करणे, पिकांवर खतांची किंवा कीटकनाशकांची फवारणी करणे, पिकांचे निरीक्षण करणे या कामाचे प्रशिक्षण दिले जाते.

6) नमो ड्रोन दीदी योजनेमुळे शेतकऱ्यांचा कसा फायदा होतो?

ans: या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या वेळेची बचत होईल तसेच अंग मेहनतीची कामे कमी होतील. कीटकनाशकांची फवारणी करताना होणारी जीवित हानी कमी होईल, पिकांचे खूप जवळून निरीक्षण करता येईल, उत्पादन क्षमता वाढेल शेतकऱ्यांना हे फायदे होतील.

7) नमो ड्रोन दीदी योजनेसाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात?

ans: नमो ड्रोन दीदी योजनेसाठी खालील आवश्यक कागदपत्रे लागतात:

आधार कार्ड, रहिवासी दाखला, पॅन कार्ड ,बचत गटाचे ओळखपत्र ,पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर,ई-मेल आयडी इत्यादी.

8) नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत प्रशिक्षणादरम्यान महिलांना किती रोजगार मिळतो?

ans: नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत प्रशिक्षणादरम्यान महिलांना 15000 रुपये दरमहा मिळतात.

हे हि वाचा

राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/

अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/

लखपती दीदी योजना https://marathisampada.com/lakhpati-didi-yojana-2024/

प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/

सुकन्या समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/sukanya-samriddhi-yojana-2024-in-marathi/

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग https://marathisampada.com/pmfme-scheme-2024-in-marathi/