MUKHYAMANTRI YUVA KARYA PRASHIKSHAN YOJANA MAHARASHTRA 2024 | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र २०२४, प्रशिक्षणार्थी ला मिळणार 10,000 रुपये मासिक वेतन , नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात माननीय उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील तरुणांसाठी एका महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली ती योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील युवकांना काळाच्या गरजेनुसार आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्याचबरोबर प्रत्येक प्रशिक्षणार्थी ला दर महिन्याला 10,000 रुपये इतके मासिक भत्ता देखील देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत रोजगार क्षमता वाढवणे, उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, नवीन उद्योग करू पाहणाऱ्या युवकांना उद्योग उभारणीसाठी मदत करणे त्याचप्रमाणे भविष्यातील कुशल कामगार तयार करणे यासारखे अनेक उद्देश आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सहभागी होणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षणार्थी ला दर महिन्याला 10,000 रुपये इतके मासिक वेतन तर मिळतील त्यामुळे आर्थिक दृष्ट्या गरीब आणि दुर्बल घटकातील युवकांना प्रशिक्षणासाठी चा आर्थिक भार कमी होईल. विशेषता आर्थिकदृष्ट्या गरीब आणि दुर्बल घटकातील युवकांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. सध्याच्या जगात कोणकोणते आवश्यक कौशल्य आहेत त्यांची विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्याबद्दल त्यांना प्रशिक्षित करणे हा मुख्य उद्देश आहे त्यामुळे कौशल्यपूर्ण काम करता तयार होतीलच परंतु रोजगार क्षमतेत ही लक्षणे वाढ होईल.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत कशाप्रकारे सहभागी व्हावे लागेल, योजनेसाठी त्या पात्रता व अटी काय आहेत, योजनेसाठी अर्ज करताना कोणकोणते आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतील याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या लेखात आपण बघणार आहोत.
MUKHYAMANTRI YUVA KARYA PRASHIKSHAN YOJANA MAHARASHTRA 2024 | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र २०२४
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काय आहे?
सध्या राज्यात तरुणांपुढे बेरोजगारीची खूप मोठी समस्या आहे. ही समस्या लक्षात घेताच महाराष्ट्र राज्य सरकारने ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील नोकरी नसलेल्या तरुणांना एकत्र करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी विविध कौशल्यांचे प्रशिक्षण, नोकरीसाठी आवश्यक असलेले कौशल्य यांची माहिती करून घेणे आणि त्याबद्दल प्रशिक्षण देणे यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा करण्यात आली आहे.
MUKHYAMANTRI YUVA KARYA PRASHIKSHAN YOJANA MAHARASHTRA 2024 | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र २०२४ योजनेचा लाभ हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटुंबातील युवकांना घेता येणार आहे. या प्रशिक्षणाचा आर्थिक भार कुटुंबावर पडू नये सरकारने मासिक वेतन देखील जाहीर केले आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना दर महिन्याला 6000 रुपयांपासून ते 10,000 रुपयांपर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणासाठी सर्व आर्थिक खर्च हे सरकार उचलणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेऊ शकतील.
MUKHYAMANTRI YUVA KARYA PRASHIKSHAN YOJANA MAHARASHTRA 2024 योजनेसाठी 12 वी, आयटीआय, पदविका व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेले बेरोजगार तरुण अर्ज करू शकतील. योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्ष या गटातील असावे, तसेच अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची उद्दिष्टे:
1) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सध्याच्या जॉब मार्केटला आवश्यक असलेले सर्व कौशल्य युवकांना शिकवण्यात येतील.
2) महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरीब कुटुंबातील युवक या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
3) विद्यार्थ्यांना उद्योग संबंधित कौशल्य देणे, त्याचप्रमाणे व्यावहारिक अनुभव देणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे
4) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षित झालेल्या युवकांमध्ये रोजगार क्षमतेत लक्षणीय वाढ झालेली दिसून येईल.
5) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 6000 ते 10,000 रुपये इतके मासिक वेतन देखील देण्यात येणार आहे.
6) या योजनेअंतर्गत मासिक वेतन दिले जाणार असून त्यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांच्या कुटुंबीयांवर प्रशिक्षणाचा आर्थिक भार पडणार नाही.
7) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देणे, रोजगार क्षमता वाढवणे, उद्योजकतेला प्राधान्य देणे, नवीन उद्योजक तयार करण्यास प्रोत्साहन देणे, त्याचप्रमाणे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील याकडे लक्ष देणे हे मुख्य उद्देश आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४ https://marathisampada.com/mukhyamantri-ladaki-bahin-yojana-2024/
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे फायदे:
1) या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतल्यानंतर कौशल्यपूर्ण कामगार वर्ग तयार होईल त्यामुळे रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांचा नक्कीच फायदा होईल.
2) योजनेअंतर्गत नवनवीन कौशल्य शिकल्यामुळे आणि व्यावहारिक प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे युवकांमध्ये रोजगार क्षमता वाढेल.
3) महाराष्ट्रातील मधील बेरोजगारीचा दर कमी होईल.
4) योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतल्यामुळे युवकांमध्ये आत्मविश्वास तर नक्कीच वाढेल आणि त्यामुळे चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवणे त्यांना अधिक सोपे होईल.
5) व्यावसायिक प्रशिक्षण घेतल्यामुळे नवनवीन व्यवसाय उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल. नवीन उद्योग निर्माण करण्यावर भर दिला जाईल त्यामुळे रोजगारात वाढ होईल.
6) या सर्व गोष्टींमुळे महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था बळकट होईल.
7) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तरुणांना कौशल्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना अधिक सक्षम केले जाईल त्यामुळे त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावेल.
8) कमी अधिक प्रमाणात गरिबी कमी करण्यात या योजनेचा सहभाग असेल.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मिळणारे मासिक वेतन:
योजनेअंतर्गत 6000 रुपयापासून ते 10,000 रुपयांपर्यंत मासिक वेतन देण्याचे सरकारने घोषित केले आहे. या मासिक वेतनाची विभागणी कशी केली आहे ते आपण बघूयात.
1) बारावी पास प्रशिक्षणार्थी: 6000 रुपये प्रति महिना
2) आयटीआय किंवा पदविका झालेले प्रशिक्षणार्थी: 8000 रुपये प्रति महिना
3) पदवीधर आणि पदव्युत्तर झालेले प्रशिक्षणार्थी: 10,000 रुपये प्रति महिना
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पात्रता:
1) योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
2) योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार व्यक्तीचे वय 18 ते 35 वर्ष या वयोगटातील असावेत.
3) अर्ज करणारा युवक हा बेरोजगार असावा.
4) योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार युवकाचे कमीत कमी 12 वी पास असणे बंधनकारक आहे.
5) आयटीआय, पदविका, पदव्युत्तर शिक्षण झालेले बेरोजगार युवक या योजनेसाठी पात्र असतील.
6) अर्ज करणाऱ्या अर्जदार युवकाचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असावे.
7) अर्ज करणाऱ्या अर्जदार युवकाकडे रोजगार नोंदणी क्रमांक असावा.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र २०२४ https://marathisampada.com/mukhyamantri-tirth-darshan-yojana-maharashtra-2024/
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
रहिवासी दाखला
12 वी पास प्रमाणपत्र
बँक पासबुक
रोजगार नोंदणी क्रमांक
पासपोर्ट साईज फोटो
मोबाईल नंबर
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:
महाराष्ट्र सरकारने जुलै महिन्यातच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा केली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच चालू होईल. अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेले अधिकृत वेबसाईट लवकरच युवकांसाठी खुली करण्यात येईल. अधिकृत वेबसाईट सुरू झाल्यानंतर तुम्ही खाली दिलेल्या पद्धतीनुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
1) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जा.
2) समोर ओपन झालेल्या होम पेजवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी ऑनलाइन अप्लाय करण्यासाठी एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
3) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा अर्ज ओपन होईल.
4) फॉर्म मध्ये विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती योग्य पद्धतीने भरा. त्यानंतर बँकेच्या तपशिलाची माहिती भरा.
5) फॉर्म मध्ये सांगितलेले सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
6) फॉर्म व्यवस्थित भरून झाल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा.
7) अशाप्रकारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होते.
8) त्यानंतर तुमच्या फॉर्मची आणि कागदपत्रांची योग्य ती पडताळणी केल्यानंतर तुम्ही योजनेसाठी पात्र असल्यास तुम्हाला कळवण्यात येईल.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र २०२४ https://marathisampada.com/mukhyamantri-annapurna-yojana-2024/
निष्कर्ष
या लेखात आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात सविस्तर माहिती बघितली. या योजनेअंतर्गत कशाप्रकारे बेरोजगार युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जातील, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील त्याबद्दल सविस्तर माहिती घेतली. महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटुंबातील बेरोजगारी युवकांना महाराष्ट्र सरकारने ही खूप मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे त्याचा त्यांनी नक्कीच फायदा घ्यावा. हा लेख जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लेख जास्तीत जास्त शेअर करा. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. महिलांसाठीच्या, शेतकऱ्यांसाठीच्या, मुलींसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकाराच्या योजनांबद्दल सविस्तर माहिती वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. धन्यवाद.
FAQ:MUKHYAMANTRI YUVA KARYA PRASHIKSHAN YOJANA MAHARASHTRA 2024 | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र २०२४
1) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कोणासाठी आहे?
ans: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी आहे.
2) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत किती मासिक वेतन मिळणार आहे?
ans: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 6000 ते 10,000 इतके मासिक वेतन मिळणार आहे.
3) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी वयोमर्यादा किती आहे?
ans: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 18 ते 35 वर्षे ही वयोमर्यादा आहे.
4) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतात?
ans: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी खालील आवश्यक कागदपत्रे लागतात:
आधार कार्ड
रहिवासी दाखला
12 वी पास प्रमाणपत्र
बँक पासबुक
रोजगार नोंदणी क्रमांक
पासपोर्ट साईज फोटो
मोबाईल नंबर
5) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज कसा करावा?
ans: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा
राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/
अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/
प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/
हर घर नल योजना २०२४ https://marathisampada.com/har-ghar-nal-yojana-2024/
आयुष्मान भारत योजना २०२४ https://marathisampada.com/ayushaman-bharat-yojana-2024/
प्रधान मंत्री कौशल विकास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-kaushal-vikas-yojana-2024/
प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-ujjwala-yojana-2024/
प्रधान मंत्री सौभाग्य योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-saubhagya-yojana-2024/
प्रधान मंत्री आवास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-awas-yojana-2024/