MODERN MARATHI UKHANE PART-2|मॉडर्न मराठी उखाणे भाग -२, आपल्या मराठी संस्कृती मध्ये लग्न झाल्यानंतर नवरा नवरीला घ्यायला सांगितले जाते त्याचबरोबर आपले विविध सण उत्सव अनेक समारंभ यात देखील महिलांना तसेच पुरुषांना देखील नाव घ्यायला सांगितले जाते. अशा वेळी पटकन एखादे नाव आठवते असे नाही. आपली फजिती होऊ नये, किंवा लोकांना हसू होऊ नये यासाठी काही सहज सोपे मराठी उखाणे महिला व पुरुषांसाठी दोघांसाठी घेऊन आलो आहोत या MODERN MARATHI UKHANE PART-2|मॉडर्न मराठी उखाणे भाग -२ या लेखात. उखाणे आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. आणि वेगवेगळ्या सण ,उत्सव ,समारंभात पत्नीचे किंवा पतीचे नाव घेताना या उखाण्यांचा उपयोग नक्की करा.
MODERN MARATHI UKHANE PART-2|मॉडर्न मराठी उखाणे भाग -२
1) नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
——– चे नाव आहे लाख रुपये तोळा
2) समुद्राचे पाणी लागते खूप खारे,
——— तुझ्यासाठी तोडून आणीन मी चंद्र तारे
3) नाशिकचे द्राक्ष, नागपूरचे संत्री
——- झाली आज माझी गृहमंत्री
4) एक होता काऊ आणि एक होती चिऊ
——— चे नाव घेतो, डोकं नका खाऊ
5) द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,
—– चे नाव घेतो ऐका देऊन कान
6) कपाळी लावला टिळा, गळ्यात घातल्या माळा,
आणि येता जाता—— नुसती मलाच मारते डोळा
7) ढीगभर चपात्या किती पटापट लाटतेस
——– तु मला, सुपरवुमन वाटतेस
8) तसा मला काही शौक नाही, पहायचा क्रिकेट….
पण बघता बघता—— च्या प्रेमात पडली माझी विकेट
9) सोन्याच्या कपावर, चांदीची बशी….
——- च्या समोर फिक्या पडतील रंभा आणि उर्वशी
10) नव्या नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी
मी आहे राजा——- माझी राणी
11) फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान
——– च्या रूपाने, झालो मी बेभान
12) तू दिसतेस खूप सुंदर साडीवर,
—— तुला बायको बनवून फिरवीन गाडीवर
13) काही शब्द येतात ओठातून,
काही येतात गळ्यातून,
——- च नाव येतं मात्र थेट हृदयातून
14) पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले,
—— च नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले
15) गीतात जसा भाव, फुलात जसा सुगंध
——- रावां मुळे मिळाला मला भरभरून आनंद
16) पुण्यात आहेत मुली एकशे एक
—— आहे माझी लाखात एक
17) लावत होते कुंकू त्यात पडला मोती
——- सारखे पती मिळाले भाग्य मानू तरी किती?
18) ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल,
——- रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल
19) सागराला शोभते निळाईचे झाकण
——— चे नाव घेऊन सोडते कंकण
20) जुईच्या फुलांचा मधुर सुटतो सुवास
——- चे नाव घेऊन देते घास
MODERN MARATHI UKHANE PART-2| नवरदेवासाठी मराठी उखाणे
21) शंकराची पूजा पार्वती करते वाकून,
——- रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून
22) सूर्यबिंब शोभते संधीच्या भाळी
—— रावांचे नाव घेते संध्याकाळच्या वेळी
23) इंद्राच्या नंदनवनात अप्सरा गातात गोड,
भाग्याने लाभली——— ची जोड
24) घास घेण्यासाठी हातात घेतले पुरी श्रीखंड,
———- रावांना लाभो आयुष्य उदंड
25) आई-वडिलांनी दिला जन्म, ब्रह्मदेवाने बांधल्या गाठी
माहेर सोडलं——– रावांच्या सौख्यासाठी
26) गुलाब पाकळी पेक्षा नाजूक दिसतेस शेवंती
——— राव सुखी राहोत हीच माझी विनंती
27) ज्योतीने पेटते ज्योत, प्रीतीने प्रीती वाढते
——– रावांचे नाव तुमच्यासाठी घेते
28) आकाशात चमकतात तारे,
——– हेच माझे अलंकार खरे
29)जमिनीवर चमकतात हिरे
——– हेच माझे अलंकार खरे
30) राजहंस पक्षी शोभा देतो वनाला,
——– रावांचे नाव घेताना आनंद होतो माझ्या मनाला
31) सागराला आली भरती, नदीला आला पूर,
——— रावांच्या सौख्या करता आई-बाप केले दूर
32) कृष्णाने पण केला रुक्मिणी लाच वरीन,
——– रावांसोबत आदर्श संसार करीन
33) सासरचं निरंजन माहेरची फुलवात,
——— रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात
34) राम लक्ष्मणाची जोडी अमर झाली जगात
——– रावांचे नाव घेते——- च्या घरात
35) जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
———— रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
36) राम लक्ष्मण सीता, तीन मूर्ती साक्षात
——– रावांचे नाव घेते नीट ठेवा लक्षात
37) महादेवाच्या पिंडीला बेल वाहते ताजा
——- रावांचे नाव घेते पहिला नंबर माझा
38) कृष्णाच्या बासरीचा राधेला ध्यास,
——– रावांना भरवते लाडूचा घास
39) इमारत बांधायला मजूर लागतात कुशल,
——– रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल
40) हरिश्चंद्र राजा, रोहिदास पुत्र
—— रावांच्या नावाचे घालते मंगळसूत्र
नवरीसाठी मराठी उखाणे
41) खवळला समुद्र लाटा आल्या काठोकाठ,
——— रावांचे नाव घेते———– च्या पाठोपाठ
42) सावित्रीने केला नवस पती मिळावा सत्यवान
———- रावांची झाले राणी, आहे मी भाग्यवान
43) आंबाबाईच्या देवळासमोर हळदी कुंकवाचा सडा
——— रावांच्या नावाने भरते हिरवा चुडा
44) गोकुळाच्या वनात कृष्ण वाजवितो बासरी,
———— रावांचे नाव घेऊन निघाले मी सासरे
45) सोन्याचा मंगळसूत्र सोनारांनी घडवलं
——– रावांचे नाव घेते मैत्रिणींनी अडवलं
46) चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेढा,
———— रावांच्या नावाने भरते सौभाग्याचा चुडा
47) शाहूराजे बांधतात कोल्हापुरी फेटा,
——— रावांच्या सुख दुःखात माझा अर्धा वाटा
48) राम मंदिर बांधणारे मजूर होते कुशल,
———— रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल
49) जगाला सुवास देत उमलली कळी
भाग्याने लाभले मला——– ही प्रेम पुतळी
50) जीवनात लाभला मनासारखा साथी,
माझ्या संसारात रथावर——— माझी सारथी
51) उगवला सूर्य मावळली रजनी,
——— रावांचे नाव सदैव माझ्या मनी
52) बहरली फुलांनी निशिगंधाची पाती,
——- रावांचे नाव घेते लग्नाच्या रात्री
53) अस्सल सोने 24 कॅरेट
—— अन माझे झाले आज मॅरेज
54) सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग….
——– माझी नेहमी घर कामात दंग
55) मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट
——– बरोबर बांधली जीवन गाठ
56) आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड
———- रावांचं नाव अमृतापेक्षा ही गोड
57) सोन्याचा दिवा कापसाची वात
आयुष्यभर देईन——- ची साथ
58) कोकिळेचा आवाज वाटतो खूपच गोड
——– ला जपतो मी, जसा तळहाताचा फोड
59) नभात दिसते शरदाचे चांदणे,
—— चे रूप आहे खूपच देखणे
60) हत्तीच्या अंबारी मखमली झुल
—— माझी नाजूक, जसे गुलाबाचे फुल
61) गालावर खळी, डोळ्यात धुंदी
——- च्या सहवासाने झाले आयुष्य सुगंधी
पुरुषांसाठी मॉडर्न मराठी उखाणे
62) मुद्दाम नाही करत, नकळत हे घडते
माझं मन रोज नव्याने——- च्याच प्रेमात पडते
63) पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले
——– रावांचं नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले
64) टाळ चिपळ्यांचा गजर त्यामध्ये वाजे विना
——— चे नाव घेतो सर्व जय हिंद म्हणा
65) अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा
——- रावांना घास भरवते वरण-भात तुपाचा
66) देवळाला खरी शोभा कळसाने येते
———— मुळे माझे गृहसौख्य वाढते
67) पुरणपोळीत तूप असावे साजूक,
——— आहेत आमच्या फारच नाजूक
68) तुरीच्या डाळीला जिऱ्याची फोडणी
बघताक्षणी प्रेमात पडलो——— ची लाल ओढणी
69) फुलांच्या तोरणात आंब्याचे पान
———- च्या रूपाने झालो मी बेभान
70) संसाराच्या सागरात पती-पत्नी नावाडी,
———- मुळे लागली मला संसाराची गोडी
71) सनई चौघडा वाजतो सप्त सुरात
———– चे नाव घेतो——– च्या घरात
72) नंदनवनात आहे अमृताचा कलश
———— आहे माझी खूपच सालस
73) दही, चक्का, तूप….
——– आवडते मला खूप
74) पक्ष्यांचा थवा दिसतो आकाशात छान
———- आली जीवनात, वाढला माझा मान
75)——- च्या मैदानात खेळत होतो क्रिकेट
——— ला पाहून पडली माझी विकेट
76) माझ्याशी लग्न लावून द्यायला घरचे झाले राजी
केलं मी लग्न———– झाली माझी
77) प्रेमाची कविता प्रेमाचा लेख
——— माझी लाखात एक
78) काळी माती हिरवे रान
हृदयात माझ्या——– चे स्थान
79) दोन आणि दोन होतात चार
——– सोबत करेल मी सुखाचा संसार
80) ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड
——- समोर माझ्या, सोन सुद्धा लोखंड
महिलांसाठी मॉडर्न मराठी उखाणे
81) जाई जुईच्या फुलांचा दरवळला सुगंध
—— च्या सहवासात झालो मी धुंद
82) काय जादू केली, जिंकलं मला एका क्षणात
प्रथम दर्शनीच भरली——– माझ्या मनात
83) उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात,
माझ्या प्रेमाचा हार——– च्या गळ्यात
84) चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ
———- चं नाव घेतो पुढचं नाही पाठ
85) गरगर गोल फिरतो भवरा,
——– च नाव घेतो मी तिचा नवरा
86) उंच उंच आकाशात, पाखरांचे थवे
——– चे नाव कायम ओठी यावे
87) एका वर्षात महिने असतात बारा
——– मुळे वाढलाय आनंद सारा
88) मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस
——— तू फक्त गोड हास
89) देव आमचा विठोबा, विटेवरी उभा
——— ने वाढवली आमच्या घरची शोभा
90) गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा
——- च्या गोड हास्याचा मला लागलाय लळा
91) प्रेमाच्या रानात नाचतो मोर
——- शी केले लग्न नशीब माझं थोर
92) कोरा कागद काळी शाई
——– ला रोज देवळात जाण्याची घाई
93) पाहताच———– ला जीव झाला येडा पिसा
तिच्या शॉपिंगच्या वेडापायी रिकामा होतो माझा खिसा
94) कोल्हापुरात आहे महालक्ष्मीचा वास
मी भरवितो——- ला लाडूचा घास
95) सुंदर प्रेमाचे सुंदर गाव
——— च्या मेहंदीत, माझे नाव
96) दिवस जाता जाता लग्नाला वर्ष झाले
पहिले वहिले सण सारे आनंदाने केले
जन्मोजन्मीचे साथ नात्यात उतरली गोडी
——– राव आणि माझी राजा राणीची जोडी
97) शॉपिंग ला जायला तयार होते मी झटकन
——— रावांचे नाव घेते तुमच्यासाठी पटकन
98) चंद्राला पाहून भरती येते सागराला
——– ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला
99) जीवनसाथी वर पाठवली होती यांनी रिक्वेस्ट
परंतु———— रावांना केले मी आयुष्यभरासाठी एक्सेप्ट
100) उष्णता खूप वाढली म्हणून यांनी आणली कुल्फी
———– रावां सोबत काढते आज सर्वांसमोर सेल्फी
महिलांसाठी १०० भन्नाट मराठी उखाणे https://marathisampada.com/100-marathi-ukhane-for-female/