MODERN MARATHI UKHANE 2024| मॉडर्न मराठी उखाणे २०२४

MODERN MARATHI UKHANE 2024

MODERN MARATHI UKHANE 2024| मॉडर्न मराठी उखाणे २०२४

1) जीवन रुपी कादंबरी वाचली दोघांनी

—— रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

2) ज्योतीला मिळेल ज्योत आता पडेल प्रकाश

—– रावांच्या जीवनात ठेंगणे होईल आकाश

3) गुलाबाचे फुल दिसायला छान

——- तुझं नाव घेते ठेवून तुमचा मान

4) ज्ञानदानाने करते नेहमी मी कर्तव्यपूर्ती

—— रावांच्या शब्दांनी मला मिळते नेहमी स्फूर्ती

5) चांगली पुस्तके असतात माणसांचे मित्र

——- रावांच्या सोबतीने रंगवते संसाराचे चित्र

6) विद्येचे माहेरघर आहे पुणे

—— रावांच्या सहवासात मला नाही काही उणे

7) इंग्रजी भाषेत गवताला म्हणतात ग्रास

—– रावांचे नाव घ्यायला मला नाही त्रास

8) श्रावणात महादेवाला केला मी दुधाचा अभिषेक

—— रावांच्या नावाने बेल वाहिले एकशे एक

9) भक्तांच्या भेटीला वेडा झाल्यानंतर नंदे चा नंदन

—— रावांचे नाव घेऊन मंगळागौरीला करते वंदन

10) सोन्याच्या ताटात चांदीची वाटी

सात जन्म घेईल मी—– रावांसाठी

11) माझ्या अंगणात रोजच रांगोळीच सजते

—— रावांच्या डोळ्यात नेहमी माझेच प्रतिबिंब दिसते

12) घन निळा सुटला सुसाट वारा

—– राव छेडती माझ्या हृदयाच्या तारा

13) सासरी आहेत माझ्या सासू-सासरे आणि दीर

——- रावांना आवडते माझ्या हातची रव्याची खीर

14) दोन वाटी दोन ज्योती दोन शिंपले दोन मोती

—— रावांची राहो मी अखंड सौभाग्यवती

15) समोरच्या बागेत नाचत होता मोर

—- रावांसारखे पती मिळाले भाग्य माझे थोर

नवरीसाठी खास उखाणे | ukhane for female

16) निळ्या आकाशात पक्षी उडाले सात

—– रावांची आणि माझी जन्मोजन्मीची साथ

17) निळ्या आकाशात उगवला शशी

—- रावांचे नाव घेते—– ज्या दिवशी

18) झुळझुळ वाहे नदी, मंद चाले होडी

परमेश्वरा सुखी ठेव माझी अन—— रावांची जोडी

19) असा असावा सुखी संसार जिथे संकटांना घ्यावी लागेल माघार

——- प्रवाहित माझ्या जेवणाचा आधार

20) चांदीच्या दिव्यात लावली फुलवात

—- रावां सोबत सोबत करते सुखी जीवनाला सुरुवात

21) फुलात फुल जाईचे, प्रेमात प्रेम आई-बाबांचे

——– राव आहेत माझ्या प्रीतीचे

22) ओट्यावर परात परातीत गहू,

तुमच्या आग्रहासाठी —- रावांचं नाव किती वेळा घेऊ?

23) महादेवाला प्रसाद म्हणून देते संत्र्याची फोड,

—- रावांचे बोलणे साखरे पेक्षा गोड

24) समोरच्या फडताळात ठेवले फणसाचे गरे

—– राव दिसतात बरे पण वागतील तेव्हा खरे

25) राजहंस पक्षी खातो मोत्याचा चारा

—- रावांच्या संसारात नाही दुःखाला थारा

MODERN MARATHI UKHANE 2024| मॉडर्न मराठी उखाणे २०२४

26) आकाशात चमकतो तारा,

—— रावांसारखे पती मिळाले हाच भाग्योदय खरा

27) अंगठीत चमकतो हिरा,

——- रावांसारखे पती मिळाले हाच भाग्योदय खरा

28) गर्व नाही श्रीमंतीचा

—— रावांचे नाव घेते संसार करील सुखाचा

29) घराला आहे अंगण, अंगणात आहे तुळस

—— रावांच्या नावाचा संसारावर चढवीन कळस

30) लग्नानंतर प्रत्येक स्त्री होते जबाबदार

—— राव माझे दिसतात फारच रुबाबदार

31) कुंकू लावते ठसठशीत, हळद लावते किंचित

——- रावांचे नाव घेते हेच माझं संचित

32) ज्या घरात असते स्वच्छता, त्याच घराला शोभा

—– रावांच्या पाठीमागे सदैव परमेश्वर उभा

33) तांब्याचे पंचपाळ त्याला नागाचा वेढा

—– रावांचा आणि माझा जन्माचा सात जन्माचा जोडा

34) नवीन मिळाले कादंबरी, वाचून घ्यावा बोध

—– रावां मुळे लागला सुखी जीवनाचा शोध

35) आकाशात उमटले सप्तरंगाचे इंद्रधनुष्य

—— रावांना मिळो दीर्घ आयुष्य

MODERN MARATHI UKHANE 2024| मॉडर्न मराठी उखाणे २०२४ | UKHANE FOR BRIDE

36) रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हास

—- रावांचं नाव घेते आज दिवस आहे खास

37) सुर तेच छेडीता शब्द उमटले नवे

—— रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य मला हवे

38) पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीवर पडतो चंद्राचा प्रकाश

गृहलक्ष्मी सह भाग्यलक्ष्मी येवो ——-रावांच्या घरात

39) नाव घ्या !नाव घ्या! सगळे झाले गोळा

——- रावांचे नाव आहे लाख रुपये तोळा

40) सागर तिरी शुभ्र वाळू

——- राव म्हणतात चल राणी क्रिकेट खेळू

41) काळे मणी सोन्याच्या तारेत गुंफले

—— राव माझ्या वचनात गुंतले

42) थंडगार पाण्याला आहे वाळ्याचा सुवास

—– रावांची आणि माझी जोडी आहे खास

43) शुभ सकाळी आली आमची वरात

—– रावांचे नाव घेऊन गृहप्रवेश करते—— घरात

44) शिवरायांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने

——- रावांचे नाव घेते प्रेमभाव आणि भक्तीने

45) संसार रुपी सागरात उसळती लाटा

——- रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा

46)झाडो झाडी पानोपानी फुल फुलावे

——- रावांच्या सहवासात सुख माझे हसावे

47) वसिष्ठाची जशी अरुंधती

तशी—– रावांची मी आवडती

48) जीर साळीचा भात पिकतो मावळात

——- रावांचे नाव घेते—— च्या देवळात

49) समोरून आला टांगा त्याला होते अरबी घोडे

——– रावांचे नाव घेते सत्यनारायणापुढे

50) आज आहे गुरुवार करते मी दत्ताची आरती

—– राव आहेत माझ्या जीवनाचे सारथी

MODERN MARATHI UKHANE 2024| मॉडर्न मराठी उखाणे २०२४ | marathi ukhane | स्त्रियांसाठी भन्नाट मराठी उखाणे

51) प्राजक्ताच्या झाडाखाली शुभ्र फुलांच्या राशी

——– रावांचे नाव घेताना, मला वाटते खुशी

52) मनात जन्मली कल्पना, फुल गुंफिले शब्दांचे

——— रावांचे नाव घेते मन राखून सर्वांचे

53) चालली सप्तपदीची सात पावले

—– रावांच्या नावाने मंगळसूत्र बांधले

54) कृष्ण प्राप्तीसाठी रुक्मिणीने लिहिले पत्र

—— रावांच्या नावाचे घातले मी मंगळसूत्र

55) मला आज ते नेहमी चांगल्या साहित्याचे आस

——– रावांना भरवते मी लाडवाचा घास

56) एका वाक्यातली तुळस दुसऱ्या वाफ्यात रुजवली

——– रावांची सारी माणसे मी आपली मानली

57) बासरी वाजे, वीणा वाजे, पेटी वाजे छान

—– रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान

58) जीवनात ही घडी अशीच राहू दे

——- रावांची प्रीत सदैव अशीच फुलू दे

59) माहेरचे निरंजन सासरची वात

——- रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरुवात

60) संसारात रमली राहिले नाही काळाचे भान

——- रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान

61) कुलदेवतेला स्मरून वंदन करते देवाला

—— रावांचे सौभाग्य अखंड दे मला

62) कपाळावर कुंकू, गळ्यात आहे हार

—— रावांचे नाव घेताना आनंद होतो फार

63) संसारात स्त्रीने नेहेमी राहावे दक्ष

—— रावांचे नाव घेते या इकडे लक्ष

64) मोठ्यांना द्यावा मान

——- रावांच्या नावाने घेते सौभाग्याचे वाण

65) ध्रुवतारा ढगाला देतो शोभा,

——- रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा

66) आई-वडील करत होते काळजी, कसे मिळते घर

——– रावांचे नाव घेते भाग्य माझे थोर

67) हिरव्यागार झाडाखाली हरीण घेते विसावा

——– रावांचे नाव घेते तुमचा आशीर्वाद असावा

68) चांदीच्या दिव्यात लावते तुपाचे फुलवात

——— रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरुवात

69) सोन्याचे ताट आणि चांदीची वाटी

सात जन्म घेईन मी——— रावांसाठी

70) काळ्याभोर केसात सजले गुलाबाचे फुल

——– राव क्षमा करतात माझी प्रत्येक भूल

MODERN MARATHI UKHANE 2024| मॉडर्न मराठी उखाणे २०२४ | MARATHI UKHANE २०२४

71) रखरखत्या वैशाखात प्रेमाचा धुंद वारा

——– रावा मुळे समजला जीवनाचा खेळ सारा

72) कपाळावर कुंकवा खाली हळद सजते

——– रावांचे नाव हातावरच्या मेहंदीत रेखाटते

73) देवाजवळ सायंकाळी करते रोज आरती

——— राव आहेत माझ्या जीवनाचे सारथी

74) ध्येयपूर्तीसाठी प्रत्येकाने झटावे

—— रावांचे नाव घेण्यास मागे का हटावे?

75)——– रावांच्या प्रेमाला जगात नाही तोड

प्रभुच्या चरणी प्रार्थना शेवट व्हावा गोड

76) संसार सुखाची मनामध्ये आस

—– रावांना भरवते—— चा घास

77)——- राव आमचे आहेत मोठे करारी

म्हणून तर मी घेऊ शकले उंच भरारी

78) मंगल झाली प्रभात, पक्षी उडाले गात

——– रावांच्या हाती दिला हात

79) दोन कुळांचा उद्धार करते कन्या, एका कुळाचा उद्धार करतो पुत्र

——- रावांच्या नावाचे बांधले मी मंगळसूत्र

80) निरंजनात लावते प्रीतीची वात

——- रावांच्या नावाने करते संसाराला सुरुवात

81) नमस्कार फुकाचा आशीर्वाद लाखाचा

—— रावांच्या बरोबर संसार करीन सुखाचा

82) सरस्वतीच्या मंदिरात साहित्याच्या राशी

—– रावांचे नाव घेते शुभमंगल दिवशी

83) सर्व कार्याचा पाठीराखा विघ्नहर्ता गणेश

——- राव आहेत माझ्या जीविताचे परमेश

84) संध्याकाळी तुळशीपाशी मंद ज्योत ठेवते

——- दिवस म्हणून—- रावांचे नाव घेते

85) कोसळल्या जलधारा, धरा आनंदली रातोरात

——– रावांच्या सहवासात होईल सौख्याची बरसात

MODERN MARATHI UKHANE 2024| मॉडर्न मराठी उखाणे २०२४

86) तलावात असते जसे निर्मळ पाणी

तशीच मी——– रावांची सहधर्मचारिणी

87) लक्ष्मी माते वंदन करते मनी ते श्रद्धेचे बळ

—— रावांच्या संसारी दे समृद्धीचे फळ

88) स्वप्नातला गुलाब गालात हसला

—— रावांचे नाव घेण्यास मान कसला

89) कृष्णाच्या हातात होती बासरी

—– रावांचे नाव घेताना मी सदैव हसरी

90) रातराणीच्या सुगंधाने आसमंत झाला मोहित

——– रावांना आयुष्य मागते सासू-सासरे सहित

91) अमावस्येच्या रात्री चांदोबाच लपून बसणं

——- राव हेच माझं गुलाबी स्वप्न

92) नको पैंजण नको अंगठी नको हार

——- रावांच्या जीवनात मी सुखी फार

93) गुढीपाडव्याच्या सणाला पुरणपोळी चा मान

——— रावांच्या सहवासात विसरते मी भूक आणि तहान

94) गणपतीला दुर्वा महादेवाला बेल

—— रावांच्या सोबतीने बहरली संसार रुपी वेल

95) ननंद आहे हौशी, प्रेमळ आहे जाऊ

—— रावांच्या गुणांचे गोडवे किती गाऊ

96) शितल आहे चांदणे वारा आहे मंद

——– रावांना सिनेमाचा भारीच छंद

97) फुलला पळस रानोरानी, मोहरला आंबा पानोपानी

—— राव माझे धनी मी त्यांची अर्धांगिनी

98) वसंत ऋतूत कोकिळा गाते गाणी

अर्पण करते आयुष्य——- रावांच्या चरणी

99) पित्याने दिली विद्या मातेने दिले गृह शिक्षण

—— राव मिळाले हेच माझे भूषण

100) नाव घ्या नाव घ्या आग्रह कशासाठी

——- रावांचे नाव असते सदैव ओठी पण थांबले होते उखाण्यासाठी

101) ज्यांच्या सर्विसला होल वर्ल्ड इज रेडी

अशा—— रावांची मी ब्युटीफुल लेडी

102) शाळेच्या ग्राउंडवर खेळत होते गेम

तिकडून आले—— राव त्यांनी विचारले व्हॉट इज युअर नेम

103) सुशील माझे सासू-सासरे सुशील माझे माता पिता

—– रावांचे नाव घेते—— ची मी माता

104) माहूर गडावर आहे रेणुका माते ची वस्ती

—— रावांना मिळावे आयुष्य माझ्यापेक्षा जास्त

105) वैचारिक प्रगल्भतेचे——– राव मला लाभले

म्हणून जीवनाचे प्रत्येक स्वप्न मी साकारले

106) पती-पत्नी असतात सुख-दुःखाचे साथी

—— रावांचे नाव घेते देवी आई वरद हस्त असुदे माथी

107) विचाराने सरळ, मनाने निर्मळ—– राव मला लाभले

सूरताल मिळाल्याने जीवनी स्वर्ग अवतरले

108) प्रेमाने बोलणे मनमोकळे हसणे

——- रावांच्या सहवासात कशाला हवे रुसणे

109) करता करविता परमेश्वर त्यावर टाकते मी भार

—— रावांचे नाव घेते कर देवा नौका पार

110) कळत नाही माझेच, स्वप्न आहे की भास

—– रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.

नवरदेवा साठी मराठी उखाणे https://marathisampada.com/marathi-ukhane-2/