MILLET RECIPES FOR KIDS IN MARATHI PART-1 | मुलांसाठी भरड धान्यांपासून बनवलेल्या पाककृती भाग-१ , Millet हा शब्द सध्या आपण खुपदा खूप जणांच्या तोंडून ऐकत आहोत. नक्की हे मिलेट असतात तरी काय? खरं तर मिलेट आपल्या परिचयाचे आहेत. परंतु याच धान्याला मिलेट म्हणतात हे आपल्याला नवीन आहे. गेल्याच वर्षी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2023 हे वर्ष इंटरनॅशनल मिलेट इयर असे घोषित केले. त्यानंतर मिलेट बद्दल सर्वत्र माहिती उपलब्ध झाली.
मिलेट ला आपल्या मराठी भाषेत भरडधान्य असे म्हटले जाते. भरड धान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राजगिरा यासारखे अनेक धान्य प्रकारे येतात. हे सर्व धान्य प्रकार आपल्याला माहित आहे परंतु यांनाच मिलेट्स असे म्हणतात हे आपल्यासाठी नवीन आहे. धान्य प्रकाराला भरडधान्य असे का म्हणतात तर पूर्वीच्या काळी उखळ आणि मुसळ यांचा वापर करून धान्य भरडून यांची साल काढली जायची म्हणून या धान्य प्रकाराला भरडधान्य असे म्हटले जाते.
मिलेट्स मध्ये भरपूर प्रमाणात खनिजे, प्रथिने, विटामिन ए, विटामिन बी कॉम्प्लेक्स, फॉस्फरस, पोटॅशियम, तांबे, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असतात. भरड धान्यांमध्ये फायबर देखील भरपूर प्रमाणात असतात. लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वजण भरड धान्याचे सेवन करू शकतात. भरड धान्याच्या सेवनामुळे शरीराला खूप मोठ्या प्रमाणात फायदाच होतो. भरड धान्याच्या नित्य सेवनामुळे रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. लहान मुलांना लहानपणापासूनच भरडधान्य खाण्याची सवय लावल्यास त्यांच्या शरीराला पोषक तत्वे तर मिळतातच त्याचबरोबर मोठे झाल्यानंतर देखील भरडधान्य खाण्याची सवय टिकून राहते.
भरडधान्य मधील बरेचसे धान्य प्रकार हे भारतात पिकवले जातात. आजच्या काळात देखील ग्रामीण भागात भरड धान्य पासून बनवलेले विविध पदार्थ खाल्ले जातात. परंतु शहरी भागात आधुनिक जीवनशैलीमुळे भरड धान्यांपासून बनवलेले पदार्थ कमी झालेले आहे. भरडधान्य पासून मिळणारे पोषक तत्व लक्षात घेता शहरी भागात देखील भरड धान्यांचा प्रचार प्रसार होणे गरजेचे आहे. भरडधान्य पासून बनवलेले पदार्थ खाण्याचे फायदे लोकांना पटवून देणे गरजेचे आहे आणि यासाठीच 2023 हे वर्ष इंटरनॅशनल मिलेट्स इयर म्हणून घोषित करण्यात आले.
आफ्रिका ,आशिया आणि दक्षिण अमेरिकेच्या बऱ्याचशा भागात भरड धान्य पिकवले जातात. भारत हा भरड धान्य उत्पादकां पैकी एक प्रमुख देश आहे. भारताच्या बऱ्याचशा भागात भरड धान्य पिकवली जातात. भारतात जास्तीत जास्त ज्वारी, बाजरी, नाचणी आणि वरई या भरड धान्याचे पीक घेतले जाते. भरड धान्याचे पीक घेत असताना जमिनीची फारशी मशागत करण्याची गरज पडत नाही. भरडधान्य कमी प्रतीच्या जमिनीमध्ये येऊ शकतात त्याचप्रमाणे भरड धान्याला पाणीदेखील कमी प्रमाणात लागते.
आजच्या आधुनिक जीवनशैलीत गहू ,तांदूळ यासारख्या धान्यापासून बनवलेल्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश होत असतो. या धान्यात जितके पोषणमूल्य आहेत त्यापेक्षा अधिक पोषणमूल्य भरडधान्य आहे. त्यामुळे या गहू, तांदूळ या धान्य प्रकाराच्या जोडीला भरड धान्यांचा देखील आपल्या रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
आजच्या MILLET RECIPES FOR KIDS IN MARATHI PART-1 | मुलांसाठी भरड धान्यांपासून बनवलेल्या पाककृती भाग-१ या लेखात भरड धान्याचे आपल्या काय काय फायदे आहेत हे बघणार आहोत. आपण विविध भरड धान्यापासून बनवलेल्या पाककृती बघणार आहोत. त्याचप्रमाणे लेखात सांगितलेल्या पाककृती तुम्ही लहान मुलांना तसेच मोठ्या माणसांना देखील बनवून देऊ शकता. लहानपणापासूनच मुलांना भरडधान्य खाण्याची सवय लावणे फायद्याचे ठरते.
MILLET RECIPES FOR KIDS IN MARATHI PART-1 | मुलांसाठी भरड धान्यांपासून बनवलेल्या पाककृती भाग-१
भरड धान्याचे आरोग्याला फायदे/ HEALTH BENEFITS OF MILLETS
1) भरडधान्य मध्ये भरपूर आहार तंतू असतात. आहार तंतूंमुळे लठ्ठपणा कमी होतो, वजन नियंत्रणात राहते.
2) भरडधान्य यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
3) पित्ताशयात खडे होऊ नयेत यासाठी भरड धान्य उपयोगी ठरते.
4) कोलेस्ट्रॉल कमी करते.
5) शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी भरडधान्य उपयोगी ठरते.
6) शरीरातील इन्शुलिनचे कार्य वाढवून साखर नियंत्रण ठेवण्याचे काम भरडधान्य करते.
7) नाचणी मध्ये असणारे कॅल्शियम हाडांच्या वाढीसाठी आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी मदत करते.
8) बाजरीमध्ये उपलब्ध असलेले केरोटीन हे डोळ्यांसाठी फायदेशीर असते.
9) मधुमेह ग्रस्त रुग्णांमध्ये साखर नियंत्रणात करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी भरडधान्य उपयोगात येतात.
10) भरड धान्यांमध्ये असलेल्या एंटीऑक्सीडेंट आपल्या शरीरातील पेशींना इजा होऊ देत नाही.
11) भरडधान्य यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.
12) भरड धान्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.
13) दैनंदिन आहारात भरडधान्य वापरल्यास शांत झोप लागण्यास मदत होते.
14) भरड धान्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
15) दैनंदिन आहारात भरडधान्य पासून बनवलेला पदार्थांचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता, गॅसेस आणि पोट फुगणे यासारख्या व्याधींपासून आराम मिळू शकतो.
हे हि वाचा
६ ते १२ महिन्याच्या बाळासाठी आहार https://marathisampada.com/baby-food-recipes-in-marathi-for-6-12-month-baby/
२ वर्षाच्या बाळासाठी आहार तक्ता /आहार वेळापत्रक https://marathisampada.com/diet-chart-for-2-years-old-baby/
लहान मुलांसाठी लोह समृद्ध अन्नपदार्थ https://marathisampada.com/iron-rich-food-for-baby-in-marathi/
लहान मुलांच्या हाडांच्या वाढीसाठी कॅल्शियम युक्त आहार https://marathisampada.com/calcium-rich-food-for-baby-in-marathi/
MILLETS RECIPES | भरड धान्यांपासून पाककृती बनवणे.
खाली सांगितलेल्या पाककृती या विशेष करून भरड धान्यांपासून बनविण्यात आले आहे. खाली बनवलेल्या पाककृती तुम्ही लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांच्या आहारात समाविष्ट करू शकता. यामुळे सर्वांना शारीरिक फायदाच होणार आहे. लहानपणापासूनच मुलांना भरड धान्यांपासून बनवलेले पदार्थ खाण्याची सवय लावणे खूप गरजेचे आहे. खाली सांगितलेल्या पाककृती हा घरात उपलब्ध असलेल्या भरड धान्यांपासून बनविण्यात आल्या आहेत.
1) नागलीची पेज:
साहित्य:
नागलीचे पीठ
जिरे
हिरवी मिरची
लसुन
कढीपत्ता
मीठ
तेल किंवा तूप
पाणी
कृती:
1) पातेल्यात आवडीनुसार तेल किंवा तूप टाकावे. त्यात जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लसुन आणि कढीपत्ता टाकावा. लसूण गुलाबीसर झाल्यानंतर त्यात नागलीचे पीठ टाकावे.
2) दोन ते तीन मिनिट नागलीचे पीठ मंद आचेवर भाजून घ्यावे.
3) पीठ भाजून झाल्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी टाकावे आणि चवीनुसार मीठ टाकावे.
4) पाणी टाकल्यानंतर मिश्रण सतत ढवळत राहावे त्यामुळे मिश्रणात गुठळ्या तयार होणार नाही.
5) मिश्रण खूप घट्ट वाटत असल्यास त्यात थोडे पाणी टाकावे आणि ढवळत राहावे.
6) पाच ते सात मिनिटं हे मिश्रण चांगले शिजू द्यावे.
7) तयार झालेली नागलीची पेज तुम्ही लहान मुलांना तसेच मोठ्यांना देखील देऊ शकतात.
फायदे:
नागली मध्ये असलेल्या कॅल्शियममुळे हाडांची वाढ होण्यासाठी किंवा हाडे बळकट होण्यासाठी मदत होते.
2) राजगिरा चा शिरा:
साहित्य:
राजगिऱ्याचे पीठ
तूप
साखर
वेलची पावडर
पाणी
ड्रायफ्रूट्स
कृती:
1) कढईमध्ये आवश्यकतेनुसार तूप घ्यावे त्यात राजगिऱ्याचे पीठ मंद आचेवर भाजून घ्यावे.
2) राजगिर्याच्या पिठाचा गुलाबीसर रंग झाल्यानंतर त्यात बारीक केलेले ड्रायफ्रूट्स ( काजू, बदाम)टाकावे.
3) गरम पाणी टाकून झाकण ठेवून शिरा चांगला शिजवून घ्यावा.
4) त्यानंतर आवडीनुसार साखर टाकावी आणि परत एकदा शिरा व्यवस्थित मिक्स करून घ्यावा.
5) तयार झालेल्या शिऱ्या वेलची पावडर टाकावी त्यामुळे शिऱ्याला छान वास येईल.
6) तयार झालेला शिरा तुम्ही उपवासाच्या दिवशी आणि इतर दिवशी देखील खाऊ शकता.
फायदे:
राजगिरा मध्ये भरपूर कॅल्शियम आणि आयर्न असते. त्याचप्रमाणे मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस देखील राजगिरा मध्ये उपलब्ध असतात. राजगिरा पचनासाठी हलका आणि आरोग्यासाठी पौष्टिक असतो.
3) मुग आणि बाजरीची गोड खिचडी:
साहित्य:
बाजरीची भरड :1/2 कप
मुगाची डाळ:1/4 कप
बारीक चिरलेला गुळ: 1/2 कप
ड्रायफ्रूट्स
तूप
पाणी
कृती:
1) कढईमध्ये मुगाची डाळ मंद आचेवर भाजून घ्या.
2) कुकर मध्ये बाजरीची भरड आणि भाजलेले मुगाची डाळ एकत्र करून घ्या आणि त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाका. तीन ते चार शिट्या करून मुगाची डाळ आणि बाजरीची भरड शिजवून घ्या.
3) एका पातेल्यात बारीक चिरलेला गुळ थोडंसं पाणी त्याचा पाक तयार करून घ्या.
4) कढईमध्ये तूप टाकून बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स भाजून घ्यावे.
5) कुकर थंड झाल्यावर त्यात गुळाचा पाक टाकावा त्यानंतर थोडे साजूक तूप टाकावे.
6) सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे. मिश्रणात भाजलेले ड्रायफूट टाकावे. चिमूटभर वेलचीपूड टाकून परत एकदा मुगाची आणि बाजरीची गोड खिचडी मिक्स करून घ्यावी.
7) लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ही मुगाची आणि बाजरीचे गोड खिचडी सर्वजण आवडीने खातील.
फायदे:
बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नेशियम, प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस हे घटक असतात. बाजरीच्या सेवनामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.
4) ज्वारी आणि बाजरी चे थालीपीठ:
साहित्य:
बाजरीचे पीठ: एक वाटी
ज्वारीचे पीठ: एक वाटी
बेसन पीठ: एक चमचा
हिरव्या मिरच्या
लसूण
जिरे
बारीक चिरलेला कांदा
कोथिंबीर
मीठ
तेल
पाणी
कृती:
1) एका भांड्यामध्ये बाजरीचे, ज्वारीचे आणि बेसन पीठ एकत्र करून घ्या. त्यात चवीनुसार मीठ टाका.
2) हिरव्या मिरच्या, लसूण, आलं आणि जिरे याची पेस्ट करून घ्या
3) तयार झालेली पेस्ट , बारीक चिरलेला कांदा, कोथंबीर एकत्र केलेल्या पिठामध्ये टाका. सर्व मिश्रण एकत्र करून घ्या.
4) आवश्यकतेनुसार पाणी टाकून त्याचा सैलसर गोळा मळून घ्या.
5) रुमालाला पाणी लावून त्यावर थालीपीठ बनवून द्या.
6) तव्याला तेल लावून घ्या. मंद आचेवर हे थालीपीठ दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजा.
7) तयार झालेले थालीपीठ तुम्ही टोमॅटो केचप बरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकतात.
फायदे:
बाजरीच्या सेवनाने रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठी आणि ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी ज्वारी मदत करते. ज्वारीचे सेवन करणे मधुमेही रुग्णांसाठी देखील फायद्याचे आहे. ज्वारीच्या सेवनाने शरीरातील इन्सुलिन आणि ग्लुकोज नियंत्रणात राहते.
हेही नक्की वाचा
वजन कमी करण्यासाठी स्त्री व पुरुषांसाठी टिप्स https://marathisampada.com/best-weight-loss-tips-for-men-and-women/
शाकाहारी प्रथिनेयुक्त आहार https://marathisampada.com/vegetarians-protein-diet-in-marathi/
वेगन डाएट म्हणजे नक्की काय ?https://marathisampada.com/vegan-diet-information-in-marathi/
वेगन डाएट करणाऱ्यांसाठी लोहयुक्त पदार्थ https://marathisampada.com/iron-rich-food-sources-for-vegan/
झटपट वजन वाढविण्यासाठी आहार https://marathisampada.com/food-for-weight-gain/
निष्कर्ष:
आजच्या MILLET RECIPES FOR KIDS IN MARATHI PART-1 | मुलांसाठी भरड धान्यांपासून बनवलेल्या पाककृती भाग-१ या लेखात आपण भरडधान्य बद्दल सविस्तर माहिती घेतले. भरड धान्यांचा वापर करून विविध पाककृती बघितल्या. विविध भरडधान्य संबंधित विविध माहिती आणि पाककृती आपण पुढील लेखात बघूयात. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.