MAZI KANYA BHAGYASHREE YOJANA 2024 IN MARATHI | माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४

MAZI KANYA BHAGYASHREE YOJANA 2024 IN MARATHI | माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने मुलींसाठी, महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या लग्नासाठी चा भार वडिलांवर येऊ नये म्हणून सुकन्या समृद्धी योजनेसारखी योजना राबवली जात आहे. तसेच मुलगा मुलगी असा भेद न करता, मुलीच्या जन्मानंतरही आनंद साजरा करावा. मुलीचा जन्मदर वाढवावा या हेतूने महाराष्ट्र शासन मार्फत माझी कन्या भाग्यश्री ही योजना राबवली जात आहे.

केंद्र सरकार व राज्य सरकारच्या मुलींसाठीच्या विविध योजनांमध्ये मुलींच्या जन्मापासून ते त्यांच्या शिक्षणापर्यंत संपूर्ण भार सरकार उचलत आहे. MAZI KANYA BHAGYASHREE YOJANA 2024 IN MARATHI| माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४, या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर महाराष्ट्र शासनाकडून 50,000 रुपये मिळतात. असे केल्याने मुलींच्या जन्मदरात सुधारणा होईल असे सरकारला वाटते. तसेच मुलगा मुलगी हा भेदभाव ही कमी होईल. आणि मुलीच्या जन्माचा अतिरिक्त भार पडणार नाही हा या योजनेमागचा हेतू आहे. दोन मुली असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल.

1 ऑगस्ट 2017 पासून महिला व बालविकास महाराष्ट्र शासनातर्फे माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत 7.5 लाख रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना आणि कौटुंबिक नियोजन प्रमाणपत्र सादर केल्यानंतर माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ घेता येईल. राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना सुकन्या समृद्धी योजना बरोबरच भाग्यश्री या योजनेचा ही लाभ घेता येईल . सुकन्या समृद्धी योजनेसाठी ज्या अटी व पात्रता आहे त्यात अटी व पात्रता भाग्यश्री या योजनेसाठी लागू आहेत.

MAZI KANYA BHAGYASHREE YOJANA 2024 IN MARATHI| माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४, या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वडील हे महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे बंधनकारक आहे. तसेच योजनेसाठी अर्ज करताना मुलीच्या जन्माची नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच एखाद्या कुटुंबाने मुलीला दत्तक घेतले तर ती मुलगी त्यांचे पहिले अपत्य मानून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. फक्त मुलीचे वय 0 ते 6 वर्ष इतके असावे अशी अट आहे. माझी कन्या भाग्यश्री या योजनेचे लाभार्थी हे दोन प्रकारचे आहेत,

प्रकार 1- एकुलती एक मुलगी आहे आणि आईने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे.

प्रकार 2- एक मुलगी आहे आणि आईने दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेले आहे.

या दोन्ही प्रकारचे लाभार्थी माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ घेऊ शकतात. माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत प्रकार एक लाभार्थ्याला एका मुलीसाठी 50,000 रुपये इतके मिळतात. तर प्रकार दोन लाभार्थ्याला दोन मुलींसाठी प्रत्येकी 25-25 हजार रुपये इतके मिळतात.

दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळ्या मुली झाल्या तर या मुलींना प्रकार दोन प्रमाणे या योजनेचा लाभ मिळेल. म्हणजेच दोन मुलींसाठी २५-२५ हजार रुपये मिळतील . परंतु त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधन कारक आहे.

MAZI KANYA BHAGYASHREE YOJANA 2024 IN MARATHI| माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ या लेखात आपण माझी कन्या भाग्यश्री योजना नक्की काय आहे , कोण या योजनेचा लाभ घेवू शकतो , या योजनेचा अर्ज कसा करावा , माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या पात्रता व अटी काय आहेत तसेच अर्ज भरण्यासाठी कोण कोणत्या आवश्यक कागदपत्रांची जोडणी करणे गरजेचे आहे या बद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत .

MAZI KANYA BHAGYASHREE YOJANA 2024 IN MARATHI| माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४

MAZI KANYA BHAGYASHREE YOJANA 2024 IN MARATHI

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे उद्दिष्टे:

1) मुलगा मुलगी असा भेदभाव करण्यास आळा घालने.

2)मुलींचा जन्मदर वाढविणे.

3)मुलींच्या सुरक्षित भविष्याबद्दल कुटुंबाला खात्री देणे.

4)मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी पात्रता:

1)दारिद्र्य रेषेखालील तसेच पांढरे रेशन कार्ड धारक कुटुंबात जन्मणाऱ्या दोन मुलींसाठी या योजनेचा लाभ होऊ शकतो.

2)मुलीचे वडील महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे बंधनकारक आहे.

3) माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्म दाखला/ जन्म नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

4) माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी प्रकार एक आणि प्रकार दोन हे दोन्ही लाभार्थी पात्र असतील.

5) जर दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळ्या मुली झाल्या तर प्रकार दोन प्रमाणे या योजनेस पात्र राहतील.

6) प्रकार एक लाभार्थ्याने एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक आहे.

7) दोन लाभार्थ्याने दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक आहे.

8) एखाद्या कुटुंबाने अनाथ मुलीला दत्तक घेतले तर ती त्यांचे पहिले अपत्य आहे असे ग्राह्य धरून त्यांना माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ घेता येईल.

9) अनाथ मुलीला दत्तक घेताना मुलीचे वय शून्य ते सहा वर्षे इतके असावे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज कसा करावा?

1) माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशिअल वेबसाईट ला जावे लागेल.

2) माझी कन्या भाग्यश्री योजनेचा फॉर्म डाउनलोड करावा.

3) फॉर्म वाचून काळजीपूर्वक भरावा.

4) फॉर्म भरल्यानंतर, सर्व आवश्यक कागदपत्रांची फॉर्म ला जोडणी करून फॉर्म तुम्हाला महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे जमा करावा लागेल.

5) फॉर्म मध्ये काही चूक झाले तर फॉर्म रद्द करण्यात येईल.

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड

आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक

मोबाईल नंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो

रहिवासी दाखला

उत्पन्नाचा दाखला

मुलीच्या जन्माचा दाखला/ जन्म प्रमाणपत्र

MAZI KANYA BHAGYASHREE YOJANA 2024 IN MARATHI

निष्कर्ष:

MAZI KANYA BHAGYASHREE YOJANA 2024 IN MARATHI| माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४, या लेखात आपण माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सविस्तर माहिती घेतली. केंद्र सरकार आणि राज्य सरकार तर्फे मुलींसाठी ची ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. मुलींच्या जन्मदरात वाढ करणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्याला आणि उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणे हे हेतू या योजनेतून साध्य होतील. शेतकऱ्यांसाठी ,मुलींसाठी ,महिलांसाठी अशाच विविध योजनांची माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. असे महत्त्वपूर्ण लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेख शेअर करा.असे योजनांचे महत्वपूर्ण लेख शेयर केले तर गरजू आणि पात्र कुटुंबियांना सरकारच्या अशा विविध योजनांचा लाभ घेता येईल .त्यामुळे लेख नक्की शेयर करा . लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा .धन्यवाद.

FAQ: MAZI KANYA BHAGYASHREE YOJANA 2024 IN MARATHI| माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४,

1) माझी कन्या भाग्यश्री आणि सुकन्या समृद्धी योजना सारख्याच आहेत का?

ans: माझी कन्या भाग्यश्री आणि सुकन्या समृद्धी योजना या वेगवेगळ्या आहेत. परंतु तुम्ही दोन्ही योजनांचा लाभ घेऊ शकतात.

2) माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ किती मुलींसाठी घेऊ शकतो?

ans: माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ दोन मुलींसाठी घेऊ शकतो.

3) माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये किती अनुदान मिळते?

ans: माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये मुलीसाठी 50,000 तर दोन जुळ्या मुलींसाठी 25-25 हजार अनुदान मिळते.

4) माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक आहे का?

ans: होय,माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक आहे.

5) माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ कोण घेऊ शकता?

ans:दारिद्र्य रेषेखालील तसेच पांढरे रेशन कार्ड धारक कुटुंबात जन्मणाऱ्या दोन मुलींसाठी या योजनेचा लाभ होऊ शकतो.

6) माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे का?

ans: होय, माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वडील महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.

7) माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज ऑनलाईन भरू शकतो का?

ans: नाही, माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज ऑनलाईन भरू शकत नाही.

8) MAZI KANYA BHAGYASHREE YOJANA 2024 IN MARATHI| माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४, योजनेसाठी कोणते आवश्यक कागदपत्रे लागतात?

ans: माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे: आधार कार्ड ,आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, मुलीच्या जन्माचा दाखला/ जन्म प्रमाणपत्र इत्यादी.

9) दत्तक मुलीसाठी माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेता येऊ शकतो का?

ans: एखाद्या कुटुंबानेअनाथ मुलीला दत्तक घेतले तर ती त्यांचे पहिले अपत्य असे ग्राह्य धरून माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेता येतो.

10) दत्तक मुलीसाठी माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर दत्तक मुलीचे वय किती असावे?

ans: दत्तक मुलीसाठी माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर दत्तक मुलीचे वय 0 ते 6 वर्षे इतके असावे.

11)माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज करताना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र लागते का ?

ans:होय, माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज करताना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र लागते.

हेही वाचा

राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/

अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/

लखपती दीदी योजना https://marathisampada.com/lakhpati-didi-yojana-2024/

प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/

सुकन्या समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/sukanya-samriddhi-yojana-2024-in-marathi/

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग https://marathisampada.com/pmfme-scheme-2024-in-marathi/

नमो ड्रोन दीदी योजना https://marathisampada.com/namo-drone-didi-yojana-in-marathi/

महिला समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/mahila-samriddhi-yojana-2024-in-marath/

जननी सुरक्षा योजना २०२४ https://marathisampada.com/janani-suraksha-yojana-2024-in-marathi/