MARATHI UKHANE | विविध प्रसंगांसाठी भन्नाट मराठी उखाणे

MARATHI UKHANE | विविध प्रसंगांसाठी भन्नाट मराठी उखाणे ,आपण आपल्या संस्कृती बरोबरच पाश्चात्य संस्कृतीचा वापर रोजच्या दैनंदिन जीवनात करत असतो. परंतु आपले भारतीय संस्कृती टिकवणे आपल्या सोबत आहे. आपण कितीही पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब केला तरी काही असे संस्कार असतात किंवा अशा काही रिती असतात तुझ्या आजही पाळल्या जातात. त्यातीलच एक पद्धत म्हणजे उखाणा घेणे. आपल्या मराठी संस्कृती सण समारंभ, उत्सव, लग्न, बारसे, डोहाळे जेवण, ओटी भरण अशा अनेक प्रसंगात महिलांना उखाणा घेण्यासाठी आग्रह केला जातो. उखाणा घेताना त्या स्त्रीने शब्दांची सुंदर गुंफण करून अगदी लयबद्ध पद्धतीने आपल्या पतीचे नाव सर्वांसमोर घेणे अपेक्षित असते. परंतु प्रत्येक वेळी असे सुंदर उखाणे आठवतील असे नाही. असेच काही साधे सोपे आणि सहज पाठवणारे सुंदर उखाणे तुमच्यासाठी आजच्या MARATHI UKHANE या लेखात घेऊन आले आहे.

MARATHI UKHANE

MARATHI UKHANE | विविध प्रसंगांसाठी भन्नाट मराठी उखाणे

बारशाचे उखाणे:

बारशाच्या वेळी बाळाच्या आईला उखाणा घ्यायला सांगितला जातो. अशावेळी त्या प्रसंगाला साजेसा उखाणा आठवतोच असं नाही. म्हणूनच बारशाच्या वेळी घेण्यासाठी योग्य असे उखाणे खाली दिले आहेत.

MARATHI UKHANE

बनारसी शालू ला आहे जरतारी काठ

——– च्या मुलीच्या बारशाचा केला मोठा थाट

नाटकात नाटक गाजलं वस्त्रहरण

—— च नाव घेते बारशाचा कारण

हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी

——— रावांचे नाव घेते——– च्या बारशाच्या दिवशी

शिवाजी सारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी

———- रावांचं नाव घेते बारशाच्या दिवशी

मावळला सूर्य उगवला शशी

———-रावांचं नाव घेते बारशाच्या दिवशी

बाळाच्या हसऱ्या प्रवेशाने आनंदले घर

——– रावांच्या संसारात पडली नवी भर

दशरथ राजाने केला पुत्रासाठी नवस

आज——— रावांच्या मुलाच्या बारशाचा दिवस

हळदी कुंकवासाठी चे उखाणे:

हळदी कुंकू, हा महिलांचा आवडता प्रसंग. यावेळी तर उखाणा हमखास घ्यावाच लागतो. तर आपला उखाणा कसा इतरांपेक्षा चांगला असेल असे प्रत्येकीला वाटत असते. म्हणूनच हळदीकुंकवासाठी काही वेगवेगळे उखाणे खाली दिले आहेत.

MARATHI UKHANE

सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्रसूर्य झाले माळी

——– रावांचे नाव घेते हळदीकुंकवाच्या वेळी

अथांग वाहे सागर, संथ चालते होडी

परमेश्वरा सुखी ठेव——– राव आणि माझी जोडी

नीलवर्ण आकाशात चंद्रा सवे रोहिणी

———- रावांच्या जीवनात——— ही गृहिणी

लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव, बदलावा लागतो स्वभाव,

————– रावांच्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव

नाकात नथ.. पायात जोडवी.. पैठणी नेसले लक्ष्मी सारखी..

कानात कुड्या.. हातात पाटल्या.. बांगड्या मध्येच किनकिनती..

वेणीत खोपा.. नऊवारी साडी.. कपाळी चंद्रकोर कोरलेली..

भांगात कुंकू.. हातात तोडे.. गळ्यात चंद्रहार मनी शोभतो..

साक्षात लक्ष्मीच लक्ष्मीचे स्वागत करते.. आणि

————– रावांचं नाव घेऊन लक्ष्मीपूजन करते

सत्यनारायण पूजेसाठी उखाणे:

लग्नानंतर प्रत्येकाच्याच घरी सत्यनारायण पूजा केली जाते. किंवा इतरही वेळेस सत्यनारायण पूजा होतच असते. अशावेळी महिलांना उखाणा घ्यावा लागतो. सत्यनारायण पूजेसाठी योग्य असे काही उखाणे खाली दिले आहेत.

MARATHI UKHANE

पूजेसाठी ठेवल्या फळांच्या राशी

———– रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी

सत्यनारायण पूजे पुढे मांडले प्रसादाचे ताट

——— यांच्या साथीने मिळाली आयुष्याला नवी वाट

मंथरा मुळे घडले रामायण

——— रावांचे नाव घेते आज घरी आहे सत्यनारायण

चांदीच्या तबकात तुपाच्या फुलवाती

———– रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी

दारावर लावले झेंडूच्या फुलाचे तोरण

——— रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेचे कारण

घरात भरल्या 18 धान्याच्या राशी

——– रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी

लग्नाचे उखाणे:

लग्नाच्या वेळी वेगवेगळ्या विधीनुसार वेगवेगळे उखाणे घ्यावे लागतात जसे की सात फेरे झाल्यावर, जेवणाच्या वेळी, गृहप्रवेशाच्या वेळी. लग्नाच्या प्रत्येक विधीसाठी योग्य असे उखाणे खाली दिले आहेत.

MARATHI UKHANE

घातली मी वरमाला हसले——- राव गाली

थरथरला माझा हात लज्जेची चढली लाली

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते

———— रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते

गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं

———— रावांचे नाव माझ्या हृदयात कोरल

वय झाले लग्नाचे लागले प्रेमाची चाहूल

——– रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल

मोह नाही पैशाचा, गर्व नाही रूपाचा

——– रावां बरोबर संसार करीन सुखाचा

चांदीच्या वाटीत खडीसाखरेचे खडे

———- रावांचे नाव घेते तुमच्या पुढे

हळद असते पिवळी कुंकू असते लाल

——— रावांची मिळाली साथ जीवन झाले खुशहाल

सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण

——– रावांचे नाव घेते सोडते मी कंकण

नाव घ्या नाव घ्या म्हणता नाव तरी काय घ्यायचे

——- रावांना शेवटी अहो च म्हणायचे

वाट झाली जीवनाची सुखद आनंदी

——- रावांच्या सोबत चालते मी सप्तपदी

चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोराची

——– रावांचं नाव ऐकायला गर्दी जमली पाहुण्यांची

लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र

——— रावांचे नाव घेऊन सुरू झाले आयुष्याचे नवे सत्र

हातावरची मेहंदी देते आयुष्याला अर्थ नवा

———– रावांना घास घालायला वेळ कशाला हवा

शालू चा पदर सांभाळताना मन माझे भांबावले

——— रावांच्या साथीने नवीन जीवनाचे स्वप्न मी रंगवले

कश्मीर आहे भारताचे नंदनवन

——– रावांच्या सोबतीने सुखी झाले जीवन

एका वर्षात असतात महिने बारा

———- रावांच्या नावात सामावला आनंद सारा

सुर हवा तर ताल हवा

ताल हवा तर सुर हवा

——— रावांचे नाव घ्यायला वेळ कशाला हवा

झाली प्रभात विहंग उडाले गात

माझ्या जीवनाला——- रावांची लाभो अखंड साथ

पुरणपोळी तूप असावे साजूक

—— राव आहेत आमचे फारच नाजूक

भल्या पहाटे करावी देवाची पूजा

———- रावांच्या जीवावर करते मी मजा

बायको पेक्षा बाकी पोरी वाटतात गोड

——- रावांना डोळे मारायची फार जुनी खोड

मटणाचा केला रस्सा चिकन केले फ्राय

——— भाव देत नाही किती केले ट्राय

खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका

ती माझी मांजर आणि मी तिचा बोका

आला आला उन्हाळा संगे घामाच्या या धारा

——- रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा

साताऱ्याचे पेढे नाशिकचा चिवडा

——– राव मला तुम्ही जन्मोजन्मी निवडा

हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बांबू

मी आहे लंबू आणि——— ती किती टिंगू

केळीचं पान टरटर फाटत

—— यांचं नाव घ्यायला मला कसंतरी वाटतं

त्यांचा आणि माझा संसार होईल सुकर

जेव्हा मी चिरेन भाजी आणि——– राव लावतील कुकर

ही पण आहे सुंदर ती पण आहे छान

कोणा कोणावर प्रेम करू मी आहे परेशान

लग्नानंतर फ्रीडम गेलं जिकडे जा बायको मागे पळते

तुम्ही का हसता राव, ज्याची जळते त्यालाच कळते

कॉलेजमध्ये असताना होते मी यांची दिवाणी

——- यांचं नाव घेते आता खाऊन चिकन बिर्याणी

घरच्यांनी हो म्हटल्यावर आम्ही लगेच केला रोका

आता मी त्यांची मांजर आणि तो माझा बोका

हा दिवस आहे आमच्या करिता खास

——– तुला देतो गुलाबजामचा घास

काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून

——— च नाव येतं मात्र माझ्या हृदयातून

अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा

——- तुला घास भरवतो वरण-भात तुपाचा

काट्यात काटा गुलाबाचा काटा

—— तिचं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता

अलीबाबा ने गुफा उघडली म्हणून खुल जा सिम सिम

——– हेच नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम

चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली

पण—— तिच्याकडे होती माझ्या हृदयाचे किल्ली

तू पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव

लग्नाला हो म्हणायला——– हिने खाल्ला खूपच भाव

केसर दुधात टाकले काजू बदाम जायफळ

हेच नाव घेतो वेळ न घालवता वायफळ

वादळ आलं पाऊस आला मग आला पूर

—– हिच नाव घेतो भरून तिच्या भांगेत सिंदूर

ब्रह्मदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली

———– तू माझी देवसेना अन मी तुझा बाहुबली

पाच बोटातून होते कलेची निर्मिती

———- वर जडली माझी प्रीती

श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा

आमच्या——- रावांना आवडतो गरमागरम बटाटे वडा

संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी

माझी———- म्हणते मधुर गाणी

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान

——— रावांचे नाव घेते ऐका देऊन कान

अक्षता पडताच अंतरपाट होतो दूर

———– रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले सांगताच सनईचे सूर

आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर

———— यांचं नाव घेते करून मॅरेज रजिस्टर

आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा

———- रावांचे नाव घ्यायला उखाणा कशाला

चांदीचे जोडवे पतीची

—— रावांचे नाव घेते——- ची सून

चांदीच्या ताटात गाजराचा हलवा

———- रावांचे नाव घेते सासुबाईना बोलवा

आवडतं सर्वांना पुढचं पाऊल

——– रावांचं नाव घेते कुंकू लावून

सर्वांना नमस्कार जोडते हात

——— रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट

इंग्रजीत म्हणतात चंद्राला मून

———— रावांचे नाव घेते——– ची सून

हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे

———- रावां मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे

चंदनी पानात मुग्ध कळी हसले

——– रावांच्या प्रेमात मी नकळत फसली

बारीक मणी घरभर पसरले

———— रावांसाठी माहेर विसरले

वर्षा ऋतूत वरून राजाने केली बरसात

——— रावांचे नाव घेण्यास केली मी सुरुवात

यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब

—— रावांचे नाव घेण्यास मी करत नाही विलंब

कामाची सुरुवात होते श्रीगणेशा पासून

——- रावांचे नाव घ्यायला सुरुवात करते आजपासून

हे हि वाचा

नवरीसाठी १०० + मराठी उखाणे https://marathisampada.com/100-modern-marathi-ukhane-for-bride/

तुमच्या घरी असणाऱ्या सन समारंभात उत्सवांमध्ये किंवा लग्नांमध्ये यातील काही उखाणे घ्या. तुमच्या घरी एखादी नववधू असेल तर तिला यातील काही सुंदर सुंदर उखाणे पाठ करायला द्या. त्यामुळे तिला लग्नाच्या वेळी, सात फेऱ्यांचा वेळी, जेवणाच्या वेळी, गृहप्रवेशाच्या वेळी वेगवेगळे उखाणे घेता येतील. आणि तिचे उखाणे ऐकून नवरदेवा बरोबर घरातले देखील खुश होतील.

MARATHI UKHANE | विविध प्रसंगांसाठी भन्नाट मराठी उखाणे लेख वाचा, लेख आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद