70+ Marathi Ukhane |नवरदेवासाठी मराठी उखाणे

marathi ukhane उखाणे घेण हे तसा स्त्रियांचं department आहे , पण आपल्या पुरुष मंडळीना देखिल लग्न काही सण समारंभ असले कि उखाणा घ्यायचा आग्रह होतो .मुलांना उखाणे घेण तसा थोडा अवघडच जात, आग्रह केला कि त्यावेळीच बऱ्याच जनाची तत फफ होतेच किवा मग आपला ठरलेला “भाजीत भाजी मेथीची —- माझ्या प्रीतीची” हा उखाणा घेतला जातो. पण याच सारखे पाठ व्हायला सोपे आणि मजेशीर उखाणे आज मी लेखात लिहिले आहे .नवरी साठी जसे सुंदर सुंदर उखाणे असतात तसे नवरदेवा साठी देखील काही सुंदर सोपे आणि मजेशीर उखाणे आपण आज या लेख बघणार आहोत.

Marathi ukhane

१) काय जादू केली , जिंकलं मला एकाक्षणात

प्रथम दर्शनीच भरली —– माझ्या मनात

२)रुप्याचा लोटा सोन्याची झारी

असली काळीसावळी तरी —–माझी प्यारी

३)हत्तीच्या अंबारीला मखमली झूल

माझी —-नाजूक जे गुलाबाचे फुल

४)सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल

संसार करू सुखाचा —-तू, मी आणि एक मुल

५)जाईच्या वेणीला चांदीची तार

माझी —-म्हणजे लाखात सुंदर नार

६) अस्सल सोने चोवीस कॅरेट

—–अन माझे झाले आज marriage

७) लग्नाचा वाढदिवस करू साजरा

—- तुला आणला मोगऱ्याचा गजरा .

८) कोरा कागद काळी शाई

—- ला रोज देवळात जाण्याची घाई

९) संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका

—-चे नाव घेतो सर्व जण ऐका

१०) दारी होते कोनाडे त्यात होती पळी

माझी —व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी

११)आंबा गोड ,ऊस गोड ,त्याही पेक्षा अमृत गोड

—- च नाव आहे अमृता पेक्षा गोड

१२)श्रावण मारती भुदेवीने पांघरली हिरवी शाल

—-गेली माहेरी की होतात माझे हाल

१३) —-माझे पिता —माझी माता

शुभमुहूर्तावर घरी आणली —-ही कांता

१४)जाई जुई च्या फुलाचा दरवळला सुगंध

—- च्या सहवासात झालो मी धुंद

१५)उभा होतो मळ्यात , नजर गेली खळ्यात

नवरत्नांचा हार —च्या गळ्यात

१६) तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधणारे होते कुशल

—-चं नाव घेतो तुमच्या करिता स्पेशल

१७) प्रसन्न वदनाने आले रविराज

—- ने चढविला संसाराला स्नेहाचा साज

१८) नाशिकची द्राक्षे नागपुरची संत्री

—–आज पासून माझी गृहमंत्री

१९)सीतेसारखे चारित्र्य, रंभेसारखे रूप

—-मिळाली आहे मला अनुरुप

२०)सायंकाळच्या आकाशात पिवळसर रंग

—– माझी नेहमी घरकामात दंग

२१) मायामय नगरी , प्रेममय संसार

—-च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार

२२) राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास

मी देतो —-ला लाडवाचा घास

२३)जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र

—च्या गळ्यात बांधतो मंगल सुत्र

२४) रुख्मिणीने केला पण कृष्णाला वरीन

—-च्या साथीने आदर्श संसार करीन

२५)जगाला सुवास देत उमलली कळी

—-भाग्याने लाभली मला —प्रेम पुतळी

Marathi Ukhane |नवरदेवासाठी मराठी उखाणे

Marathi Ukhane | Marathi Ukhane for Groom | नवर देवा साठी मराठी उखाणे

marathi ukhane

२६)जीवनात लाभला मनासारखा सारथी

माझ्या संसाराच्या रथावर —-सारथी

२७) हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी

—च्या जीवनात मला आहे गोडी

२८)निळे पाणी ,निळे डोंगर , हिरवे हिरवे रान

—-चे नाव घेवून राखतो सर्वांचा मान

२९) चंद्राचा होतो उदय समुद्राला येते भरती

—–च्या स्पर्श्याने सारे श्रम हरती

३०)जन्म दिला मातेने पालन केले पित्याने

–च्या गळ्यात मंगल सुत्र बांधतो प्रेमाने

३१)उगवला सूर्य मावळली रजनी

—चे नाव सदैव माझ्या मनी

३२) कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास

—-देतो मी लाडवाचा घास

३३) सनई चौघडा वाजतो सप्त सुरात

—–चे नाव घेतो —-च्या घरात

३४) श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी

—च्या साथीसाठी केली लग्नाची तयारी

३५) मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट

—-बरोबर बांधली जीवनगाठ

३६)मोह नाही माया नाही नाही मत्सर हेवा

—–चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा

३७) आई-वडील , भाऊ बहिण जणू गोकुलासारखे घर

—च्या आगमनाने पडली त्या सुखात भर

३८) चांदीच्या ताटात रुपया वाजतो खनखन

—–चे नाव घेवून सोडतो काकण

३९)पुढे जाते वासरू मागून चालली गाय

—–ला आवडते दुधावरची साय

४०)संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी

—–मुळे लागली मला संसाराची गोडी

४१)देवाजवळ करतो मी दत्ताची आरती

——माझ्या जीवनाची सारथी

४२)काश्मीरच्या नंदन वनात फुलती निशिगंध

——सोबत जीवनात आहे मला आनंद

४३) नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व

—–आहे माझे जीवन सर्वस्व

४४)भारत देश स्वतंत्र झाला, इंग्रज गेले पळून

—-चे नाव घेतो जरा पहा मागे वळून

४५)बहरली फुलांनी निशिगंधाची पाती

—–चे नाव घेतो लग्नाच्या राती

४६) ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल

—-चे नाव घेतो तुमच्या साठी स्पेशल

४७)आपल्या देशात करावा मराठी भाषेचा मान

—-चे नाव घेतो ऐका सर्व देऊन कान

४८)देवळाला खरी शोभा कळसाने येते

—–मुळे माझे गृह सौख्य दुनावते

हे हि वाचा नवरीसाठी मराठी उखाणे संग्रह: https://marathisampada.com/marathi-ukhane/

४९)अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा

—ला घास भरवतो वरण भात तुपाचा

५०) देश भक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले

—–शी लग्न करून मनोरथ पूर्ण झाले

Marathi Ukhane | Marathi Ukhane for Groom

Marathi Ukhane | Marathi Ukhane for Groom | नवर देवा साठी मराठी उखाणे

५१)श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण

—ला सुखात ठेवीन हा माझा पण

५२) टाळ चिपल्यांचा गजर त्यामध्ये वाजे वीणा

—-चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा

५३) नीलवर्ण आकाशातून पडती पावसाच्या सरी

——चे नाव घेतो —-च्या घरी

५४)नंदन वाणीच्या कोकिला बोलती गोड

—–राणी माझ्या तळ हातावरचा फोड

५५)नंदन वनात अमृताचे कलश

——आहे माझी खूपच सालस

५६)देवाला करतो मनोभावे वंदन

—-मुळे झाले संसाराचे नंदन

५७) भाजीत भाजी मेथीची

—-माझ्या प्रीतीची

५८) दही चक्का तुप

—आवडते मला खूप

५९)हिरवळीवर चरती सुवर्ण हरणी

—–झाली आता माझी सहचारिणी

६०)आंब्याच्या झाडावर बसून कोकिला करते कुजन

माझ्या नावाचे ——-करी पुजन

६१) सोन्याची सुंपली मोत्यांनी गुंफली

——राणी माझ्या घरकामात गुंतली

६२)रुपयाचे ताट त्यावर सोन्याचे ठशे

——ला पाहून चंद्र सूर्य हसे

६३) पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले

—— चं नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले

६४) मातीच्या चुली घालतात घरोघर

——झालीस माझी आता चाल बरोबर

६५)नभांगणी दिसे शरदाचे चांदणे

——चे रूप आहे अत्यंत देखणे

६६) गंगेची वाळू चाळणीने चाळू

चल चल—— आपण सारीपाट खेळू

६७)इंग्लिश भाषेला महत्व आले फार

—–ने माझ्या संसाराला लावला हातभार

६८) सर्व ऋतूत चांगला ऋतू आहे वसंत

——केली मी पत्नी म्हणून पसंत

६९) इंद्राची इंद्राणी , दुष्यंताची शकुंतला

——नाव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला

७०)रखरखत्या वैशाखात प्रेमाचा धुंद वारा

——-जीवनाचा खेळ समजला —मुळे सारा

७१)वर मथळl खाली बातमी , वर्तमान पत्राची रीती

——–चे नाव घेतो , अजोड आमची प्रीती

७२) मुखी आसवे प्रेम मनामध्ये दया

——सोबत जडली माझी माया

७३)लाखात दिसते देखणी चेहरा सदा हसरा

—–च्या रूपापुढे , अप्सरेचा काय तोरा

७४) जास्वंदाचे फुल गणपतीला वाहिले

—–च्या साठी —गाव पहिले

७५) हिर्याचा कंठा मोत्याचा घाट

——च्या हौशीसाठी केला सगळा थाट

७६) रसाळ पाहिजे वाणी स्त्री पाहिजे निर्मला

——च्या नावाचा लागला मला जिव्हाळा

७७) श्रीमंत माणसाना आस्ते पैशाची धुंदी

—–चे नाव घेण्याची हि पहिलीच संधी

७८)खडी साखरेचा खडा खावा तेव्हा गोड

——-च्या रुपात नाही कुठेच खोड

७९)कळी हसेल फुल उमलेल मोहरून येईल सुगंध

—-च्या सोबतीने गवसेल जीवनाचा आनंद

८०)पुण तिथ काय उण म्हणतात सरी जण

—–न केला सार्थ माझ जिण

८१) कपाळावर कुंकू जशी चंद्राची कोर

—-च्या मदतीवर माझा सगळा जोर

८२) चित्रकाराने केली फलकावर रंगांची उधळण

——चे नाव भासे जणु माणिक मोत्यांची उधळण

८३) निसर्गाला नाही आदी नाही अंत

—-आहे माझ्या मनपसंत

८४) चौकोनी आरशाला वाटोळी फ्रेम

माझ्या लाडक्या —–वर माझे खरे प्रेम

८५)चंद्र आहे चांदणीचा सांगाती

—–आहे माझी जीवन साथी

८६)विज्ञान युगात माणूस करतोय निसर्गावर मात

——चं अर्धांगिनी म्हणून घेतला माझ्या हातात हात

८७)अंगणात होती तुळस , तुळशीला घालत होती पाणी

आधी होती आई बापाची तान्ही —–आता झाली माझी राणी

८८)ताऱ्यांच लुक लूकन चंद्राला आवडल

—–ला मी जीवन साथी म्हणून निवडलं

८९) वन टू थ्री

——चे बोलणे एकदम फ्री

९०)ध्येय प्राप्तीसाठी प्रत्येकाने झटावे

—–चे नाव घ्यायला मागे का हटावे

९१)पती पत्नी असतात सुख दुखाचे साथी

——चे नाव घेतो आशीर्वाद असू द्यावा माथी

९२)झाशीच्या राणीचा झाला स्वातंत्रासाठी घात

——-चं जन्मोजन्मी धरेन मी हात

९३)तुकारामाचा अभंग वामनाची कविता

मी आहे सागर —–माझी सरीता

९४)बोलताना जिभेचा जाऊ देऊ नये तोल

—–च्या प्रीती इतके नाही कशाचे मोल

९५)सोन्याच्या बासरीत पाचूचा खडा

——अन माझा जन्माचा जोडा

९६)अडचणीच्या वेळेस कामात पडते साठवण

——इथे नसली की येते तिची आठवण

९७) अशोक वनात लावली केळी

——चं नाव घेतो संध्याकाळच्या वेळी

९८)शब्द तिथे नाद कवी तिथे कविता

माझी आणि —-ची जोडी जणु सागर आणि सरीता

९९) इंग्लिश मध्ये आईला म्हणतात मदर

——चे नाव घेतो धरलाय तिचाच पदर

१००)उगवत्या रविला उषेची ओढ

माझ्या संसाराला लागली——ची जोड

१०१) या झाडावरून त्या झाडावर उडताय पक्षी

——-च नाव घेतो चंद्र सूर्य साक्षी

१०२) गीतेत जसा भाव फुलात तसा गंध

——सोबत जुळले मनाचे रेशमी बंध

१०३) छोटासा घरकुल माझ , सामावून घेतला साऱ्यांना

—-ची प्रेमळ साथ तृप्त करेल मनाला

१०४) शिवाजी राजाची जिजाऊ होती माता

——च नाव घेतो मी आता

१०५) माता पित्यांनी वाढवलं मनासारखा शिक्षण दिलं

सुखाच्या संसारात —–मी स्वामिनी केल