Marathi Suvichar | मराठी सुविचार

Marathi Suvichar | मराठी सुविचार , या लेखात आपल्याला सर्वोत्तम अश्या मराठी सुविचारांचा संग्रह वाचायला मिळणार आहे . एक चांगला विचार आपल्याला संपूर्ण दिवस चांगले कार्य करण्याची प्रेरणा देत असतो. चांगले विचार किंवा चांगले सुविचार माणसाला नेहमीच positive सकरात्मक राहण्यास प्रवृत्त करतात.मनात चांगले विचार असतील तर आपल्या हातून घडणारे काम पण चांगलेच होते .सुविचारांचे नेहमी पठन केला तर आपले विचार समृद्ध होतात तसेच नकरात्मक गोष्टींपासून लांब राहण्यास मदत होत असते. असेच Marathi Suvichar | मराठी सुविचार वाचा आपल्या मित्रमैत्रिणींना , प्रियजनांना ,शाळेत जाणाऱ्या छोट्या दोस्त मंडळीना हे सुविचार शेअर करा .

Marathi Suvichar | मराठी सुविचार

  • स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपेत बघता , स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोपूच देत नाही .
  • न झेपणाऱ्या गोष्टी करत गेल कि , त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होते .
  • सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळते .
  • आयुष्य हे एकदाच मिळते त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदी राहायला शिका .
  • माणसं आणि नाती जपायची असतात , वापरायची नसतात
  • चांगले कर्म करत राहा त्याचे फळ आपोआप मिळेल.
  • तारुण्य म्हणजे प्रेम
  • तुमच्या मनाचा कलच तुमची निवड असू शकते
  • दानापेक्षा त्यागाने माणूस मोठा होतो .
  • गर्वाने घर खाली .
  • सुख हे पैशात नसून समाधानात आहे .
  • मुक्या जीवांवर प्रेम करा .
  • साधी राहणी उच्च विचारसरणी .
  • जे सोपे असते ते क्वचितच उत्कृष्ट असते .

Marathi Suvichar | मराठी सुविचार |सकारात्मक सुविचार

  • स्वाभिमान हा सद्गुणांचा पाया आहे .
  • प्रत्येकाचे आयुष्य त्याच्या कार्याने घडते .
  • एक चांगली माता शंभर शिक्षकांच्या बरोबरीची असते .
  • संयम नावाच्या कडू वृक्षाचे फळ नेहमीच गोड असते .
  • श्रम संपले कि आनंद सुरु होतो .
  • जीवनात यश हे कष्ट करूनच मिळते .
  • चांगले आरोग्य आणि आनंदी राहणं एकमेकांना पूरक असतात .
  • हातून घडलेल्या चुकांमधून चांगलेच निष्पन्न होते .
  • ज्या माणसाकडे संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो .
  • माणसाचा खरा शत्रू हा तो स्वतःच असतो .

Marathi Suvichar | मराठी सुविचार |अनमोल सुवचन

  • बोलल्या नंतर विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार करावा .
  • एकट्याने काम करण्यापेक्षा सर्वांनी मिळून काम केले तर काठी कामही सोपे होते .
  • कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत …आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत ..
  • यश प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो .
  • कष्ट इतक्या शांततेत कराव कि यश धिंगाणा घालेल .
  • वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात मोठी संपत्ति आहे .
  • सुरुवात हा कामाचा सर्वात महत्वाचा भाग आहे .
  • काठी काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही .
  • खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो , घेण्यात किंवा मागण्यात नसतो .
  • तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातील अंतर म्हणजे तुम्ही काय करता .
  • संयम हा यश मिळविण्यासाठी लागणार सर्वात महत्वाचा घटक आहे .
  • आयुष्य जागून समजते ,ऐकून ,वाचून किंवा बघून नाही .
  • कधीच कोणावर अवलंबून राहू नका , जे करायचं ते स्वतःच करून दाखवा .
  • दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यास आपण स्वतःची क्षमता विसरतो .
  • रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा .

Marathi Suvichar | मराठी सुविचार | आत्मविश्वास वाढविणारे सुविचार

  • कोणतीही गोष्ट सुरु करण्याचा मार्ग म्हणजे बोलणे बंद करणे आणि कामाला सुरुवात करणे .
  • नशिबावर अवलंबून राहू नका कारण नशिबाचा भाग १ टक्के आणि मेहनतीचा भाग ९९ टक्के असतो .
  • यश म्हणजे अनेक लहान लहान प्रयत्नाची बेरीज व पुनरावृत्ती असते .
  • कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत काळात नाही .
  • मेहनत कधी धोका देत नाही फक्त मेहनतीवर विश्वास असला पाहिजे .
  • अभ्यासाद्वारे मिळणारे यश दैवी नसते , कष्टाचे असते
  • यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणी कष्टाला घाबरू नका .
  • प्रत्येक प्रयत्नात यश मिळेलच अस नाही, परंतु प्रत्येक यशाच कारण प्रयत्नच असते .
  • खेळ असो व आयुष्य आपला सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल .
  • जिंकणे सर्व काही आहे असे समजू नका , तुम्हाला कोणत्या उद्देश्याने जिंकायचे आहे हे महत्वाचे आहे .
  • जो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करतो .
  • काही लोक यशाची नुसती वाट पाहतात , बाकी लोक त्यासाठी जीवापाड मेहनत करतात .
  • आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागला कि समजाव आपला उत्कर्ष होतोय .
  • तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर , तुमची ध्येय खूपच लहान आहे हे लक्षात ठेवा .
  • गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची सांगत सोडावीच लागते .
  • ठाम राहायला शिका , निर्णय चुकला तरी हरकत नाही , स्वतःवर विश्वास असेल तर जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते .
  • यशस्वी होण्यासाठी जास्त वेळेची नाही तर मनापासून काम करण्याची गरज आहे.
  • आपण जिथे आहात त्यापलीकडे जाण्याचा प्रयत्न करा ,प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही .
  • संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात तर कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग निघतोच .
  • आधी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा , मग समजेल दुसऱ्यांना सुधारणे किती अवघड आहे .
  • तुम्हाला पडण्याची भीती असेल तर तुम्ही कधीही स्वतःच्या पायांवर उभे राहू शकत नाही .
  • मेहनत हि सोनेरी चावी आहे , ती बंद भाग्याचे दरवाजेही उघडते .
  • विजयी म्हणजे लक्ष सापडण्याची कला .
  • तुम्ही ध्येयाप्रती जोश , प्रय्त्नांप्रती तळमळ आणि मनात विश्वास ठेवा यश नक्कीच मिळेल .
  • कोणतीही जोखीम न स्वीकारणे हीच सर्वात मोठी जोखीम आहे .
  • मोठे यश मिळविण्यासाठी छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा .
  • कष्ट करण्याची ताकद असेल तर जे आहे त्यात समाधान कधीच पाहू नका .
  • नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक , आपल्या पेक्षा खालच्या पायरीवर असतात.
  • संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे , ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना दोन्ही मिळत नाही .
  • रुबाब हा आपल्या जगण्यात , कामत असावा लागतो नवीन कपडे घालून रुबाब नाही दाखवता येत .
  • चेहरा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.
  • निघून गेलेला क्षण कधीच परत येत नाही .
  • सर्वात मोठा यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत.
  • स्वतःच्या नजरेत चांगले राहा , लोकांचे काय ते देवाला पण नावं ठेवतात .
  • आयुष्य आपल्याला दररोज एक संधी देते , या संधीचा लाभ घ्या व आयुष्य घडवा .

Marathi Suvichar | मराठी सुविचार

  • शिक्षण हे एकच प्रभावी अस्त्र आहे , जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग बदलताना बघू शकता .
  • वेळेचे चक्र खूप जलद गतीने पळते , म्हणूनच ना ताकदीचा गर्व बाळगावा न संपत्तीचा .
  • मानसिक गुलामगिरी हा स्वप्नांना जखडून ठेवणारा सर्वात मजबूत साखळदंड आहे .
  • स्वतःची तुलना इतराबरोबर करू नका , तसे केल्यास तुम्हू स्वतःचा अपमान करत आहात .
  • आयुष्यात नवीन गोष्टी करायला कधीच घाबरू नका .
  • परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण विचार गरीब नसावे .
  • शरीर जितका फिरतं राहील तेवढं स्वस्थ राहत , आणि मन जितकं स्थिर राहील तेवढं शांत राहत .
  • शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर व्यक्तीच्या निश्चयावर अवलंबून असते .
  • भविष्य त्यांच्याच मालकीचे आहे जे स्वप्नांच्या सौंदर्यावर विश्वास ठेवतात .
  • उद्याच काम करा आणि आजच काम आत्ताच करा .
  • कोणतेही कार्य हे अडथल्यांशिवाय पार पडत नाही , शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते .
  • डोक शांत असले तर निर्णय चुकत नाहीत , भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत .
  • आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत काळात नाही
  • नेहमी तत्पर राहा बेसावध आयुष्य जगू नका .
  • वाईट मार्गाने यश मिळवण्यापेक्षा चांगल्या मार्गाने अपयशी होणे केव्हाही चांगले.
  • कष्टाशिवाय कोणालाच काहीहि मिळत नाही .
  • संकटाना हरवूनच यश प्राप्त होते .
  • यश हे हातांच्या रेषेत नाही तर कपाळाच्या घामात आहे .

Marathi Suvichar | मराठी सुविचार

  • माणसाच्या आयुष्यातील संकट हि यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक असतात .
  • खंबीरपणे उभे राहा जग तुमचे काहीही बिघडवू शकत नाही .
  • केवळ ज्ञान असून उपयोग नाही ते कसं आणि केव्हा वापरायच याचही ज्ञान हव .
  • निस्वार्थी पणे मदत करणे हि जगण्याची कला आहे .
  • स्वतःला परीस्थितीचे गुलाम समजू नका तुम्ही स्वतःचे भाग्यविधाते आहात .
  • जीवनात कष्ट केल्याने डोकं शांत राहत आणि खर बोलल्याने हृदय स्वच्छ राहत .
  • गरजेपेक्षा जास्त विचार करणं सुद्धा माणसाचा आनंद हिरावून घेतो.
  • यश तेव्हाच मिळते जेव्हा जिद्दीचे रुपांतर मेहनतीत होते.
  • संकट टाळण माणसाच्या हाती नसत ….पण संकटांचा सामना करण त्याच्या हातात असत .
  • एकाच वेळी हजार ध्येय ठेवण्यापेक्षा हजार वेळा एकच ध्येय ठेवा , यश काय तुम्ही यशाचा इतिहास घडवाल.
  • पैशाला कधीच किमत नसते,खरी किंमत तर पैसे कमावताना सोसलेल्या कष्टांची असते….
  • वारंवार आलेले अपयश माणसाला यश मिळविण्यासाठी प्रेरित करते .
  • यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.
  • जसे चांगले दिवस राहत नाहीत तसे वाईट दिवस हि राहत नाही.
  • शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागेल.
  • एकदा पडल्यावर हर मानली तर तुमच्या आयुष्यात कधीही यश मिळू शकत नाही.
  • तुम्ही तोपर्यंत हरत नाही जोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न थांबवत नाही .
  • लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात मावळत्या नाही .
  • यश मिळवायचं असेल तर स्वतःच स्वतःवर काही बंधने घाला .
  • विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा .
  • पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो .
  • एका मिनिटाचे यश अनेक वर्षांचे अपयश धुवून काढते .
  • संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजय श्री हार घालते .
  • माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसे .
  • आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका विशेषतः ज्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.
  • यशस्वी होण्यासाठी जास्त वेळेची नाही तर मनापासून काम करण्याची गरज आहे

मराठी सुविचार तुम्हाला आवडले असतील तर आम्हाला नक्की कळवा आणि तुमच्या प्रियजनांना असेच चांगले चांगले सुविचार शेअर करा . धन्यवाद .