MARATHI MHANI WITH MEANING |मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ

MARATHI MHANI WITH MEANING |मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ, मराठी व्याकरणात म्हणींना खूपच महत्त्व आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात देखील आपण या म्हणींचा वापर करत असतो. एखादी घडलेली परिस्थिती समोरच्याला कमी शब्दात सांगायचे असेल तर म्हणींचा उपयोग केला जातो. एखाद्याचा स्वभाव दाखवण्यासाठी, एखाद्याची वाईट सवय दर्शविण्यासाठी, एखाद्याने चांगले काम केले ते दाखवून देण्यासाठी, किंवा एखाद्याचे वाईट काम नजरेत आणून देण्यासाठी म्हणींचा वापर केला जातो.

MARATHI MHANI WITH MEANING |मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ या लेखात आपण मराठीतील विविध म्हणी बघणार आहोत त्यांचे अर्थ समजून घेणार आहोत विविध परीक्षांमध्ये म्हणींचा अर्थ विचारला जातो. म्हणीन संदर्भात अनेक प्रश्न विचारले जातात. त्याचप्रमाणे काही ठिकाणी म्हणी पूर्ण करा असे देखील प्रश्न असतात. त्यासाठी अनेक विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना या लेखाचा उपयोग होणार आहे.

MARATHI MHANI WITH MEANING |मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ

1) डल्ला मारणे : दुसऱ्याची वस्तू चोरणे

2) डोंगर पोखरून उंदीर काढणे : जास्त मेहनत करून पण कमी फायदा होणे

3) तळ्यात मळ्यात करणे : काय करावे याबद्दल मनात अस्थिरता असणे

4) ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला: नेहमी सोबत राहणारे दोन व्यक्तींच्या सवयी एकमेकींना लागतात

५) तरण्याला लागली कळ आणि म्हाताऱ्याला आलं बळ : तरुण माणसे आळशीपणा करतात तर म्हातारे उत्साह दाखवतात.

६) तवा तापला आहे तोवर भाकरी भाजून घ्यावी : जोपर्यंत लाभ होत आहे तोपर्यंत आपला स्वार्थ साधून घ्यावा.

७) तहान लागल्यावर विहीर खोदणे : जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज आहे त्यावेळी त्या गोष्टीसाठी तयारी करणे.

८) तोंडाला पाने पुसणे : समोरच्या व्यक्तीला शब्द देऊन सुद्धा त्या व्यक्तीचे काम न करणे.

९) दैव देते आणि कर्म नेते : आपले कर्म वाईट असेल तर चांगल्या गोष्टींचा सुद्धा त्याग करावा लागतो

१०) नरोवा कुंजरोवा : कोणत्याही गोष्टीबाबत काहीही वक्तव्य न करणे

११) नाकापेक्षा मोती जड : डोई जड होणे

१२) नाचता येईना अंगण वाकडे : स्वतःला एखादी गोष्ट येत नसेल तर इतर गोष्टींना नावे ठेवणे.

१३) नाव मोठे लक्षण खोटे : मोठा थाट दाखवणे पण प्रत्यक्षात काहीच नसणे

१४) पालथ्या घड्यावर पाणी : बुद्धिहीन व्यक्तीचे वागणे सुधारत नाही

१५) पुढच्याच ठेच मागचा शहाणा : एकाच मार्गाने जाणाऱ्या पुढील व्यक्ती वाईट अनुभव आल्यास तो

मागच्या व्यक्तीसाठी मार्गदर्शक ठरतो

१६) बळी तो कान पिळी : बलवान असलेला माणूस दुर्बल माणसांना त्रास देतो

१७) भरवशाच्या म्हशीला टोणगा : पूर्ण निराशा करणे

१८) लहान तोंडी मोठा घास : छोट्या व्यक्तीने त्याच्या आवाक्या बाहेरील गोष्टी करणे

१९) लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा : मोठे असण्यापेक्षा लहान होऊन सुखी राहणे कधीही चांगले.

२०) विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर : फिरत्या माणसाचा ठाव ठिकाणा लागणे कठीण असते

२१) शितावरून भाताची परीक्षा : फार थोड्या नमुन्या वरून मोठ्या वस्तूंची चाचणी करणे

२२) शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी : संस्कारी कुटुंबांमध्ये चांगल्याच व्यक्ती असतात

२३) हत्ती होऊन ओंडके, मुंगी होऊन साखर खाल्लेली बरी : मोठेपणा न मिरवता छोटे होऊन आपले काम पूर्ण करणे यातच खरे

सुख आहे.

२४) हपापाचा माल गपापा : अति हव्यासामुळे असलेली संपत्ती देखील नष्ट होते

२५) अग अग म्हशी मला कुठे नेशी ? : एका व्यक्तीच्या चुकीसाठी इतर लोकांना दोष देणे

२६) अठरा विश्व दारिद्र्य असणे : अत्यंत गरिबीची परिस्थिती असणे.

२७) नारायण गाढवाचे पाय धरी : बलाढ्य व्यक्तीला गरजेच्या वेळी सर्वसामान्य माणसाकडे मदत मागावी

लागणे.

२८) आंधळीपेक्षा तिरळी बरी : एखादी गोष्ट अगदीच वाईट असण्यापेक्षा/ स्वीकारण्यापेक्षा थोडे दोष

असलेली गोष्ट स्वीकारणे

२९) आकांक्षा पुढती गगन ठेंगणे : आशावाद ठेवल्यास कोणतेही ध्येय साध्य करता येते.

३०) अडाण्याची गोळी भल्यास गिळी : अशिक्षित माणूस कोणालाही अडचणीत आणू शकतो

मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ

३१) उचलली जीभ लावली टाळ्याला : कसेही बेताल बोलणे

३२) उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी :उदयोगी मनुष्य जीवनात यशस्वी होतोच

३३) एक पाय मोडल्याने गोम लंगडी होत नाही : एक काम मिळाले नाही तर आयुष्य संपत नाही

३४) एका हाताने टाळी वाजत नाही : दोष दोन्ही बाजूकडे असतो

३५) करवंदीच्या जाळीला काटे : चांगल्या वस्तू सोबत वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो

३६) कुठे राजा भोज कुठे गंगू तेली : बलवान मनुष्य आणि दुर्बल मनुष्य यांची तुलना होऊ शकत नाही

३७) क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे : जास्त बोलण्यापेक्षा काम करणे चांगले असते

३८) खायला कोंडा निजेला धोंडा : खूप गरीबी असणे

३९) खिळ्यासाठी नाल गेला आणि नालीसाठी घोडा : कामाचे व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे खूप होणे

४०) गाव करी ते राव न करी : माणसाने केलेल्या कामापेक्षा समूहाने केलेले काम तुलनेने जास्तच असते.

४१) घोड मैदान जवळ असणे : परीक्षा लवकरच होणे

४२) चोर तो चोर वर शिरजोर : स्वतः चोर असून आणखी जास्त चढेल पणाच्या गोष्टी सांगाने

४३) जावयाचं पोर हरामखोर : मनुष्याचा स्वभाव आपला स्वार्थ साधण्यासाठीच असतो

४४) ज्याची मिळते पोळी त्याची वाजवावी टाळी : आपल्या मालकाचे गुणगान करणे

४५) तेरड्याचा रंग तीन दिवस : एखादे काम काही दिवस जोरात चालू ठेवणे आणि एकदमच बंद पडणे

४६) दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत : दिखाऊ गोष्टी वेगळ्या असतात आणि मुळात गोष्ट काहीतरी वेगळीच असते

४७) नव्याचे नऊ दिवस : नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नाही

४८) नावडतीचे मीठ आळणी : नावडत्या व्यक्तीने केलेली कोणतीही गोष्ट आवडत नाही

४९) पी हळद आणि हो गोरी : उतावीळ असणे

५०) मोठे घर आणि पोकळ वासा : श्रीमंत असण्याचा आव आणणे

५१) वाचाल तर वाचाल : शिक्षण घेतले तरच प्रगती होऊ शकते

५२) वड्याचे तेल वांग्यावर : एखाद्या गोष्टीचा राग दुसऱ्यावर काढणे

५३) वाऱ्या वरती वरात काढणे : स्वतःचे नियोजन न करता दुसऱ्यावर अवलंबून राहून महत्त्वाचे काम करणे

५४) हा सूर्य आणि हा जयद्रथ : पुराव्यासहित सिद्ध करणे

५५) शेरास सव्वाशेर : प्रत्येक वाईट माणसाला त्याच्या पेक्षा वरचढ माणूस भेटतोच

५६) यज्ञास बळी बोकडाचा : दुर्बल व्यक्तीला कठीण काम करण्यास सांगणे

५७) पहिले पाढे पंचावन्न : खूपदा समजावून सांगून सुद्धा वाईट वागण्यात बदल न होणे

५८) देन न घेन अनेक कंदील लावून येन : उगाचच एखाद्याची खोड काढणे

५९) दुधाने पोळलं की ताकही फुकून प्यावे : एखाद्या अवघड प्रसंगातून गेल्यावर पुढे काळजी घेणे

६०) दहा गेले पाच उरले : आत्मविश्वास कमी होणे

मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ

६१) दमडीची नाही मिळकत आणि घडीची नाही फुरसत: रिकामटेकडा माणूस आपण खूप व्यस्त आहोत असे दर्शवितो

६२) जो खाईल आंबा तो सोसेल ओळंबा : एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना त्या गोष्टीचे दोषही स्वीकारावे लागतात

६३) जसा भाव तसा देव : आपली जशी श्रद्धा असेल त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळते

६४) चोराच्या मनात चांदणे : वाईट व्यक्ती कायम वाईट डाव रचण्यात व्यस्त असते

६५) घरात घाण दारात घाण कुठे गेली गोरीपान : काम न करता फक्त दिखाऊपणा करणे

६६) कोंबडं झाकलं तरी तांबड्या उगवल्या शिवाय राहत नाही: सत्य कधी लपून राहत नाही

६७) कळतंय पण वळत नाही : चांगल्या सवयी अंगवळणी पाडणे कठीण असते

६८) कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडू ते कडूच: वाईट व्यक्तीच्या वाईट सवय कधी जात नाही

६९) अक्कल खाती जमा होणे : नुकसान होणे

७०) अंगाचा तिळपापड होणे : खूप संताप होणे

७१) अंगाची लाही लाही होणे : खूप संताप होणे

७२) अंगाची तलखी होणे : खूप संताप होणे

७३) दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी : दोन जिवलग व्यक्तींची भेट जवळ असूनही न होणे

७४) नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये : घरातील ( धाकटे) लहान व्यक्तींना नेहमी कामे सांगितली जातात

७५) नर का नारायण बनणे : कर्म करून उच्च होणे

७६) नाव सगुणी अन करणी अवगुणी : नावाप्रमाणे न राहता वाईट कृत्य करणे

७७) बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर : कोणत्याही गोष्टीचा पुरावा मागणे

७८) भित्यापाठी ब्रह्मराक्षस : स्वभावाने भित्रा माणूस नेहमीच कोणत्याही छोट्या गोष्टींना घाबरतो

७९) रामकृष्ण आले गेले तरी जग का चालायचे थांबते: व्यावहारिक बाबी कुणासाठी थांबत नाही

८०) वाळूचे कण रगडीता तेलही गळे : प्रामाणिक आणि कठोर परिश्रमामुळे कोणतेही ध्येय साध्य होऊ शकते

८१) सरकारी काम अन 12 महिने थांब : काही कामे नेहमीच विलंबाने होत असतात त्यासाठी धीर देणे योग्य

८२) हात दाखवून अवलक्षण : उगाच विविध गोष्टींच्या मागे धावून स्वतःचे हसे करून घेणे

८३) टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही : कष्टाशिवाय कोणतेही यश मिळत नाही

८४) ज्याचं जळतं त्यालाच कळतं : आपले दुःख आपल्याला सोसावे लागते

८५) जेथे पिकते तेथे विकत नाही : एखादी गोष्ट ज्या भागात जास्त प्रमाणात असते त्या भागात त्या गोष्टीला महत्त्व

राहत नाही

८६) अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ : दुबळा मनुष्य बलवान व्यक्तीवर सरळ सरळ हल्ला करू शकत म्हणून तो

छोट्या छोट्या खोड्या काढून पसार होतो

८७) अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे : नावाप्रमाणे लोक नसतात

८८) 18 विश्व दारिद्र्य त्याला 36 कोटी उपाय : जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक उपाय आहेत

८९) अडली गाय खाते काय : गरजू माणूस कोणत्याही अटी स्वीकारून काम करतो

९०) अन्नछत्रात मिरपूड मागू नये : गरजवंत व्यक्तीला पर्याय नसतो

९१) आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते : एकाने कष्ट करायचा आणि दुसऱ्याने त्याचा लाभ घ्यायचा

९२) आंधळा प्रजेत हेकना राजा : असहाय्य गरीब लोकांमध्ये एखादा चुकीचे निर्णय घेऊन राज्य करतो

९३) आई जेऊ घालीना बाप भीक मागू देईना : दोन्ही बाजूने संकटात सापडणे

९४) आचार तेथे विचार : चांगली संस्कृती चांगल्या विचारांना जन्म देते

९५) आपल्या अळवाची खाज आपणास ठावी : आपले दोष आपल्यालाच माहीत असतात

९६) इच्छा तेथे फळ : मनात चांगले विचार ठेवून केलेले कार्य यशस्वी होतेच

९७) इकडे आड तिकडे विहीर : चहू बाजूने कोंडी होणे

९८) उंटावरून शेळ्या हाकणे : कोणत्याही कामात प्रत्यक्ष सहभाग न घेता उगाच फुकटचे मार्गदर्शन करणे

९९) एकटा जीव सदाशिव : एकटा माणूस सुखी असतो

१००) करायला गेले एक आणि झाले भलतेच : चांगले करायला गेले तरी वाईट घडते