MARATHI MHANI PART-2 |पारंपारिक आणि आधुनिक म्हणी भाग -२

MARATHI MHANI PART-2 |पारंपारिक आणि आधुनिक म्हणी भाग -२ ,मराठी म्हणी, मराठी संस्कृती म्हणींचा सर्रास वापर होतो. जसा जसा काळ बदलत गेला तस तशा म्हणी देखील बदलत गेल्या. आजच्या या लेखात पारंपारिक म्हणीन सोबतच काही आधुनिक म्हणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या म्हणींचा अर्थ शोधा ,म्हणींचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात नक्की करा आणि काय गंमत येते हे आम्हाला नक्की कळवा.

MARATHI MHANI PART-2 |पारंपारिक आणि आधुनिक म्हणी भाग -२

MARATHI MHANI PART-2

१) नाव सगुणी पण करणी अवगुणी

२) रोज मरे त्याला कोण रडे

३) निंदकाचे घर असावे शेजारी

४) पाण्याची धाव समुद्राकडे, बायकांची धाव सोन्याकडे

५) पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही

६) पाण्यात राहून माशाशी वैर करू नये

७) पी हळद आणि हो गोरी

८) पुढच्यास ठेच, मागचा शहाणा

९) प्रकृती इतक्या विकृती

१०) प्रसंग पडे बाका, तो गधे को कहे काका

११) फाटके नेसावे पण स्वतंत्र असावे

१२) फुकटचे खाय, त्याला स्वस्त महाग काय?

१३) बळी तो कान पिळी

१४) बढाईला पुढे आणि लढाईला मागे

१५) बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर

१६) बाप से बेटा सवाई

१७) बायकोचा भाऊ, लोण्या हून मऊ

१८) बारा पिंपळावरचा मुंजा

१९) बाराची माय खाटल्यावरी जीव जाय

२०) बुडत्याला काडीचा आधार

२१) बुडत्याचे पाय डोहाकडे

२२) बोलण्यात जोर आणि कामात अंग चोर

२३) भटाला दिली ओसरी, तो हात पाय पसरी

२४) भीत्या पाठी ब्रह्मराक्षस

२५) भुकेले कोल्हे, काकडीला राजी

२६) मरावे परी कीर्तिरूपे उरावे

२७) मान सांगावा जना, अपमान सांगावा मना

२८) मामाच्या घरी भाचा कारभारी

२९) माय तसं लेकरू, गाय तसं वासरू

३०) मिया बिवी राजी , तो क्या करेगा काजी ?

३१) मुह मे राम, बगल मे छुरी

३२) मुलाचे पाय पाळण्यात दिसतात

३३) मूर्ख भांडती, वकील घरे बांधती

३४) गाढवा समोर वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता

३५) मेंढी जाते जीवानिशी, खाणारा म्हणतो वातड होती

३६) मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही

३७) म्हातारी गेली हिवाळ्यात, रडू आले पावसाळ्यात

३८) यथा राजा तथा प्रजा

३९) रात्र थोडी सोंगे फार

४०) रामनाम जपना, पराया धन अपना

४१) लहान तोंडी मोठा घास

४२) लाथ मारीन तिथे पाणी काढीन

४३) लाज ना अब्रू कशाला घाबरू

४४) लातो के भूत बातों से नही मानते

४५) लेकीला तूप साखर, सुनेला मीठ भाकर

हे हि वाचा मराठी म्हणी भाग-१ https://marathisampada.com/marathi-mhani-part-1/

४६) लेकी बोले सुने लागे

४७) लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण

४८) लंगडी गाय, वासरात शहाणी

४९) वड्याचे तेल वांग्यावर काढणे

MARATHI MHANI PART-2

५०) वरातीमागून घोडे

५१) विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर

५२) वेड घेऊन पेडगावला जाणे

५३) वेश असावा बावळा, परी अंगी असाव्या नाना कला

५४) वेळ न वखत अन गाढव चालले भुकत

५५) वेळीच जो जागे, तो भिक न मागे

५६) व्यक्ती तितक्या प्रकृती आणि देश तितक्या संस्कृती

हे हि वाचा

मॉडर्न मराठी उखाणे https://marathisampada.com/100-modern-marathi-ukhane-for-bride/

नवरदेवासाठी मराठी उखाणे https://marathisampada.com/marathi-ukhane-2/

५७) शितावरून भाताची परीक्षा करणे

५८) शहाण्याला एक बात मुर्खाला सारी रात

५९) शीर सलामत तो पगडी पचास

६०) सगळा गाव मामाचा, एक नाही कामाचा

६१) सो सुनार की एक लोहार की

६२) सर्व आहे घरी, पण नियत नाही बरी

६३) सोळा हात लुगडी आणि अर्धी तंगडी उघडी

६४) हसतील त्याचे दात दिसतील

६५) हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये

६६) जया अंगी खोटेपण तया मिळे मोठेपण

६७) सरकारी काम दहा वर्षे थांब

६८) प्रेमाच्या लग्नाला वरात कशाला

६९) अभ्यासाचे प्रदर्शन,अन लक्ष दूरदर्शनवर

७०) घाल खादी अन हो नेता

७१) दारूचे तहान, हात भट्टीवर

७२) एकमेका कॉपी देऊ, अवघे हो उत्तीर्ण

७३) रजिस्टर लग्नाला, पण ती कशाला

७४) स्मगलिंग करून भागला आणि राजकारणाला लागला

७५) अति शहाणे तिची ,पर्स रिकामी

७६) ज्याचे खावे मीठ त्याच्याशी वागावे नीट

७७) हुंड्याची सून, तोंडाळ फार

७८) नाव सागर, डोक्यावर घागर

७९) डॉक्टर, वकील, तलाठी आप्पा, तुमचे दर्शन नको रे बाप्पा

८०) व्हीआयपी मंडळी येता घरा. हले दारचा कचरा

८१) लाच खाणार, त्याला सीबीआय देणार

८२) उठता लाथ, बसता बुक्की

८३) घराला नाही दार अन म्हणे मी आमदार

८४) चमत्कारा वाचून नमस्कार नाही

८५) जन्माला आला हेला, पाणी वाहता वाहता मेला

MARATHI MHANI PART-2

८६) डोळ्यात केर, कानात फुंकर

८७) तोंडावर शिव्या अन मागे शिव्या

८८) तन खाई धन

८९) मेलेले कोंबडे आगीला भीत नाही

९०) वधू-वर राजी, काय करेल भटजी

९१) आमदार रुसला अन खुर्ची पाहून हसला

९२) पाण्याचा दुष्काळ अन दारूचा सुकाळ

९३) साहेबांची रजा, नोकरांची मजा

९४) नटीला आजार, निर्माता बेजार

९५) आले पत्नीच्या मना, तेथे पतीचे चालेना

९६) साधु नंगा तेथे, भक्तांच्या रांगा

९७) ज्याचा माल त्याचे हाल,अन कोल्हे कुत्रे झाले लाल

९८) डांग चिक डांग चीक वाजवलं, अन उपाशी वऱ्हाड झोपवलं

९९ ) ज्याच त्याले गोड आणि शेजारी म्हणते, तू हा वासरू काहून लोड

१००) दिवसान गोठी माठी अन चांदण्यान कापूस वटी

१०१) सोनार कोणाचे, नाही होणार

१०२) बोल्याले बोलका राहो, पण कामाले आग लागो

१०३) भोर कातळ, काम गताळ

१०४) तीन तिघाडा, काम बिघाडा

१०५) समजे ना उमजे, काका महा लगन करा

१०६) तोंडा पुरती माया, दाताले घामोळ्या

१०७) कडक इस्त्री, हात-पाय लूज

१०८) महिमा मोठा, झोला रिकामा

१०९) हरिकली मनी, नेईना कोणी

११०) चार दिवस बसपाचे, चार दिवस भाजपाचे

१११) नाव सागर डोक्यावर घागर

११२) घाईत घाईअन चष्मा सापडत नाही

११३) जया अंगी मोठे, तया भेटणे कठीण

११४) अभ्यासाचे प्रदर्शन, पण लक्ष दूरदर्शन

११५) रोगी सलामत, तपासण्या पचास

११६) निवडणूक सरो , मतदार मरो

११७) लाव पावडर, नी हो गोरे

११८) जावई बोले, सासरा डोले

११९) राहायला नाही घर आणि म्हणे लग्न कर

१२०) सासु क्लबमध्ये सून पबमध्ये

१२१) खिशात नाही डोनेशन, आणि घ्यायला चालले ऍडमिशन

१२२) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार

१२३) जागा लहान फर्निचर महान

१२४) उचलला मोबाईल लावला कानाला

१२५) रिकाम्या पेपर ला जाहिरातींचा आधार

१२६) काटकसर करून जमवलं, इन्कम टॅक्समध्ये गमावलं

१२७) याची देही, याची डोळा

१२८) रंगाने गोरी पण हजार गुण चोरी

१२९) राईचा पर्वत करणे

१३०) राजा तशी प्रजा

१३१) रात्र थोडी आणि सोंगे फार

१३२) रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी

१३३) रुखवत आलं, रुखवत आलं उघडा खिडकी, पाहिलं तर फाटकीच फडकी

१३४) रुखवत आले रुखवत आले दनानली आळी, पाहतात ते अर्धीच पोळी

१३५) रोज घालतय शिव्या अन एकादशीला गातय ओव्या

१३६) लंकेत सोन्याच्या विटा

१३७) लकडी शिवाय मकडी वळत नाही

१३८) लबाडाचे आमंत्रण जेवल्या बिगर खोटे

१३९) लवकर निजे, लवकर उठे त्याची आरोग्य संपत्ती लाभे

१४०) लाखाचे बारा हजार

१४१) लाखाशिवाय बात नाही अन वडापाव शिवाय काही खात नाही

१४२) लाथ मारेन तिथे पाणी काढीन

१४३) लेक द्यावी श्रीमंताघरी, सून करावी गरिबा घरची

१४४) लेकीची लेकरं उडती पाखरं, लेकाची लेकरं चिकट भोकर

१४५) वर मुकुट आणि खाली नागडे

१४६) वराती मागून घोडे

१४७) वरून दिसे सोज्वळ, आज सावळा गोंधळ

१४८) वरून कीर्तन आतून तमाशा

१४९) असेल तर सूत नाही तर वडावरचे भूत

१५०) वाजे पाउल आपले म्हणे मागून कोण आले

१५१) वासरात लंगडी गाय शहाणी

१५२) वाहता झरा अन फुलता मळा असला तरच ठीक

१५३) विचारांची तूट तेथे भाषणाला उत

१५४) विहीणीचा पापड वाकडा

१५५) वेळ न वखतअन गाढव चालाय भुकत

पारंपारिक आणि आधुनिक म्हणी भाग -२

MARATHI MHANI PART-2

१५६) वेश असे बावळा परी अंतरी नाना कळा

१५७) शब्दांचा सुकाळ तेथे बुद्धीचा दुष्काळ

१५८) शहाण होईना अन सांगता येईना

१५९) शिजे पर्यंत दम धरवतो , निवे पर्यंत धरवत नाही

१६०) शितावरून भाताची परीक्षा

१६१) शुभ बोल नाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली

१६२) सख्या सासूला दिलेल्या लाथ, चुलत सासूचा कापला कान, तिथे मामे सासू मागते मान

१६३) अंधारात केले पण उजेडात आले

१६४) अक्कल नाही काडीची आणि म्हणे नाव सहस्त्रबुद्धे

१६५) अघळ पघळ अन घाल गोंधळ

१६६) अडला हरी गाढवाचे पाय धरी

१६७) अडली गाय खाते काय

१६८) अति केलं अन मसनात गेला

१६९) अती झाल अन हसू आल

१७०) अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही

१७१) अर्धी कोंबडी कापून खायला, अन अर्धी अंडी घालायला

१७२) अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर

१७३) असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ

१७४) असतील मुली तर पेटतील चुली

१७५) चल दाम तर होईल काम

१७६) आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे

MARATHI MHANI PART-2

१७७) आईची माया अन पोर जाईल वाया

१७८) आगीशिवाय धूर दिसत नाही

१७९) आग रामेश्वरी अन बंब सोमेश्वरी

१८०) आज अंबारी, उद्या झोळी धरी

१८१) आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?

१८२) आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ

१८३) आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास

१८४) आधीच नव्हती हाऊस त्यात पडला पाऊस

MARATHI MHANI PART-2

१८५) आपण सुखी तर जग सुखी

१८६) आपले ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून

१८७) आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे

१८८) आपलेच दात आणि आपलेच ओठ

१८९) आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते

१९०) आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार?

१९१) आय नाय त्याला काय नाय

१९२)आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जावई उदार

१९३) आला भेटीला धरला वेठिला

१९४) आलिया भोगासी असावे सादर

१९५) आले मी नांदायला, मडके नाही रांधायला

१९६) आवडीने केला वर , त्याला दिवसा खोकला, रात्री ज्वर

१९७) आवळा देऊन कोहळा काढणे

१९८) आशा सुटेना अन देव भेटेना

१९९) इकडून तिकडून सगळे सारखे

२००) इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो

निष्कर्ष:

MARATHI MHANI PART-2 |पारंपारिक आणि आधुनिक म्हणी भाग -२ या लेखात आपण पारंपारिक आणि आधुनिक म्हणींची ओळख करून घेतले. शालेय जीवनात आपण म्हणी शिकलो परंतु दैनंदिन जीवनात फार कमी म्हणींचा वापर आपण करतो. आपला हा मराठी शब्द साठा असाच पुढे न्यायचा असेल, पुढच्या पिढीला शिकवायचा असेल, तर या म्हणींचा वापर दैनंदिन जीवनात नक्कीच करायला हवा. येथे काही म्हणींची यादी दिली आहे. त्याचा अर्थ काय आहे हे समजून घ्या. आणि रोजच्या जीवनात नक्की वापरा. धन्यवाद.