MARATHI MHANI PART-1 | मराठी म्हणी भाग-१

MARATHI MHANI PART-1 | मराठी म्हणी भाग-१ ,मराठी म्हणी आपल्या मराठी वाड्मयात, कादंबऱ्यांमध्ये, कथांमध्ये विविध म्हणींचा वापर केला जातो. म्हणीच्या वापराने एखादी समोरच्याला कमी शब्दात पद्धतीने समजावून सांगण्यात येते. एखाद्याला टोमणा मारण्यासाठी म्हणींचा उपयोग केला जातो. आपण आपल्या रोजच्या जीवनात देखील म्हणींचा वारंवार उपयोग करत असतो. अशाच काही मजेदार म्हणी आज तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे. या म्हणी वाचा यांचा रोजच्या दैनंदिन जीवनात उपयोग करा. आणि काय गंमत येते त्या मला नक्की कळवा.

MARATHI MHANI PART-1 | मराठी म्हणी भाग-१

MARATHI MHANI PART-1

१) अति शहाणा, त्याचा बैल रिकामा

२) अति तेथे माती

३) आंधळी पाण्याला गेली, घागर फोडून घरी आली

४) अप कीर्ती झाली जनी, त्या अर्धा मेला मनी

५) अग अग म्हशी, मला कुठे नेशी

६) अडला नारायण, धरी गाढवाचे पाय

७) अति राग, भीक माग

८) असतील शिते, तर जमतील भुते

९) असंगाशी संग, प्राणाशी गाठ

१०) अडजीभ खाये, पडजीभ वाट पाहे

११) असून अडचण, नसून खोळंबा

१२) आधी पोटोबा, मग विठोबा

१३) आईचा हात, गोड लागे शिळा भात

१४) आगीतून निघाल्या, फुफाट्यात पडला

१५) आजा मेला, नातू झाला

१६) आधी गुंतू नये आणि गुंतल्यावर कुंथु नये

१७) आळसाला आजाराचे निमंत्रण

१८) आधी देव, मग जेव

१९) आप मेले, जग बुडाले

२०) आपण हसतो लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला

२१) आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचं ते कारटे

२२) आपला हात जगन्नाथ

२३) आपलेच ओठ आणि आपलेच दात

२४) आपले ठेवायचे झाकून, दुसऱ्याचे पहायचे वाकून

२५) आपले ते गोजिरवाणे, दुसऱ्याचे ते लाजिरवाणे

२६) आयत्या बिळात नागोबा

२७) आमंत्रण दिले सगळ्या गावा, वादळ सुटले घरी जेवा

२८) आयत्या पिठावर रेघोट्या

२९) आयात खाऊ न लांडग्याचा भाऊ

३०) आल्यावर विपत्ति, कळे मैत्री आहे किती

३१) आवड असली की सवड मिळते

३२) आवडीने केला नवरा, त्याच्या पायात भवरा

३३) आई जेऊ घालीना, बाप भीक मागू देईना

३४) आधा दूध, आधा पाणी, ज्यादा डाले तो बेमानी

३५) आला चेव अन केला देव

३६) अवघड जागेचे दुखणे सांगताही येत नाही दाखवता येत नाही

३७) इकडे आड तिकडे विहीर

३८) ईश्वराची करणी, नारळात पाणी

३९) उंदराचा जीव जातो अन मांजराचा खेळ होतो

४०) उचलली जीभ लावली टाळ्याला

४१) उघड्या पाशी नागडे गेले, सारी रात थंडीने मेले

४२) उडला तर कावळा, बुडला तर बेडूक

४३) उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग

४४) उथळ पाण्याला, खळखळाट फार

४५) उद्योगाचे घरी, रिद्धी सिद्धी पाणी भरी

४६) ऊस गोड लागला म्हणून, मुळासकट खाऊ नये

४७) एक गाव, बारा भानगडी

४८) एक घाव दोन तुकडे

४९) एक घाव दोन तुकडे, काम करावे रोकडे

५०) एकटा जीव सदाशिव

MARATHI MHANI PART-1

५१) एक ना धड भाराभर चिंध्या

५२) एका हाताने टाळी, कधी न वाजे कोण्या काळी

५३) एकाची होळी तर दुसऱ्याची दिवाळी

५४) एकाने करायचे, साऱ्यांनी भरायचे

५५) एवढीशी थट्टा, भल्या भल्याला लावी बट्टा

५६) ऐकावे जनाचे, करावे मनाचे

५७) ऐकून घेत नाही, त्याला सांगू नाही काही

५८) कठीण समय येता, कोण कामास येतो

५९) कर गया दाढीवाला, पकडा गया मूछ वाला

६०) कर नाही त्याला डर कशाला

६१) करावे तसे भरावे

६२) करून करून भागला, अन देवपूजेला लागला

हे हि वाचा

मॉडर्न मराठी उखाणे https://marathisampada.com/100-modern-marathi-ukhane-for-bride/

नवरदेवासाठी मराठी उखाणे https://marathisampada.com/marathi-ukhane-2/

६३) कला कौशल्य ज्याचे हाती, त्याची होई जगी ख्याती

६४) कसायाच्या घरी सण, शेळ्या मेंढ्यांचे मरण

६५) कशात काय अन फाटक्यात पाय

६६) कहा राजा भोज, कहा गंगू तेली

६७) कामापुरता मामा, ताकापुरती आजी

६८) काखेत कळसा आणि गावाला वळसा

६९) कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही

७०) कुठेही गेले तरी पळसाला पाने तीनच

७१) कुत्ता धोबी का, घर का न घाट का

७२) कुत्र्याचे जिने, फजिती ला काय उणे

७३) केर डोळ्यात आणि फुंकर कानात

७४) कोकणात नारळ फुकट

७५) माझ्या संगतीने काशी नी कोणाच्या संगती फाशी

७६) कोणी निंदा कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा

७७) कोणाच्या म्हशी, कोणाला उठाबशी

७८) कोंबडे झाकले म्हणून, तांबडे फुटायचे राहत नाही

७९) खऱ्याचे खोटे, लबाडाचे तोंड मोठे

८०) खटपट करी तोच पोट भरेल

MARATHI MHANI PART-1

८१) खऱ्या चा दास नि खोट्याचा वस्ताद

८२) खान तशी माती, गहू तशी रोटी

८३) खाणे थोडे, मचमच फार

८४) खाऊन पिऊन सुखी, हरिनाम मुखी

८५) खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी

८६) खायला फार िन भुईला भार

८७) खाली मुंडी, पातळ धुंडी

८८) गरज सरो वैद्य मरो

८९) गरिबांचा वाली परमेश्वर

९०) गरजेल तो पडेल काय, बोलेल तो करेल काय

MARATHI MHANI PART-1 | मराठी म्हणी भाग-१

९१) गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली

९२) गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता

९३) गाव करी ते राव न करी

९४) गाढवाला गुळाची चव काय?

९५) गाड्या बरोबर, नळ्याची जत्रा

९६) गोगलगाय अन पोटात पाय

९७) घटकेची फुरसत नाही, दमडीची मिळकत नाही

९८) घरात घाण म्हणे बायको माझी गोरी पान

९९) घरा सारखा गुण, सासू तशी सून

१००) घर जळाल्यावर बोंब अन नाटक संपल्यावर सोंग

१०१) घर धन्याचे हाल अन फुकट्याचे वर गाल

१०२) घर नदार, देवळी बिऱ्हाड

१०३) घरचे झाले थोडे अन व्याह्याने धाडले घोडे

१०४) घरात दांडगाई, बाहेर कोरडे खाई

१०५) घरात नाही दाणा, म्हणे मला बाजीराव म्हणा

१०६) घरात नाही लोटा, अन दिमाख मोठा

१०७) घरोब्याला घर खा , पण हिशोबाला चोख रहा

१०८) घर पहावे बांधून अन लग्न पहावे करून

१०९) घाल पाणी, कर कालच्या वाणी

११०) घोडी मेली ओझ्याने आणि शिंगरू मेला हेलपाट्याने

१११) चढणीस घोडा, उतरणी रेडा

११२) चव ना ढव, दडपून जेव

११३) चकाकते ते सोने नसते

११४) चावल्याशिवाय गिळत नाही, अनुभवल्याशिवाय कळत नाही

११५) चित्त नाही थारी, बावन तीर्थे करी

११६) चोर तो चोर अन वर शिरजोर

११७) चोराच्या उलट्या बोंबा

११८) चोराच्या मनात चांदणे

११९) चोराला डसला विंचू, तो करीना हो की चू

१२०) चोराला सोडून संन्याशाला फाशी

MARATHI MHANI PART-1

MARATHI MHANI PART-1

१२१) चोरीचा मामला हळूहळू बोंबला

१२२) छडी लागे छम छम, विद्या येई घम घम

१२३) जावा तेथे दावा, सवती तेथे हेवा

१२४) जसे दान तसे पुण्य

१२५) जात कळते पण मत कळत नाही

१२६) जातीची खावी लाथ, पण परजातीचा खाऊ नाही भात

१२७) ज्याचे जळे त्याला कळे

१२८) ज्याची करावी कीव, तोच घेतो जीव

१२९) ज्याला नाही अक्कल, त्याची घरोघरी नक्कल

१३०) ज्याला नाही लाज, त्याला पृथ्वीचे राज

१३१) जित्याची खोडं , मेल्यावाचून जात नाही

१३२) जिकडे गेली वांझ, तिकडे झाली सांज

१३३) जुने ते सोने

१३४) जुन्याला लाथा अन नव्याच्या चरणी माथा

१३५) जो बायकोशी भला, तो खाई दहीकाला

१३६) जो बोलण्यात बोलका, तो कृतीत हलका

१३७) झाकली मूठ सव्वा लाखाची, उघडली म्हणजे फुकाची

१३८) झोपेला घोडा, भुकेला कोंडा

१३९) ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला

१४०) ढेकणाच्या संगे, हिरा ही भंगे

१४१) तप केल्यास बळ, वृक्ष लावल्यास फळ

१४२) तहान लागल्यावर विहीर खोदणे

१४३) तळहाताने सूर्य झाकत नाही

१४४) ताकापुरती आजी

१४५) ताकाला जाऊन गाडगे लपविणे

१४६) तुझे माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना

१४७) तुझे राहू दे तिकडे, माझे घे इकडे

१४८) तुला न मला, घाल कुत्र्याला

१४९) तेल गेले तूप गेले, हाती धुपाटणे आले

१५०) तोंड चोपडा, मनात वाकडा

१५१) तोंड दाबून, बुक्क्यांचा मार

१५२) तोंडावर गोड, मनात फोड

१५३) तोंडावर हाजी हाजी आणि मागे दगलबाजी

१५४) थोडे खाणे लज्जतिचे, फार खाने फजितीचे

१५५) दमडीची कोंबडी, चार आण्याचा मसाला

१५६) दात कोरल्याने , पोट भरत नाही

१५७) दाम करी काम

१५८) दाम करी काम, बिवि करी सलाम

१५९) दिवसभर चरते आणि मंगळवार धरते

१६०) दिव्याखाली अंधार

१६१) दिवाळी दसरा, हात-पाय पसरा

१६२) दिसते तसे नसते, म्हणून जग फसते

१६३) दिसतो मोठा, अकलेचा तोटा

१६४) दिसायला भोळा, मुदलावर डोळा

१६५) दुष्काळात तेरावा महिना

१६६) दुःख सांगावे मना, सुख सांगावे जना

१६७) दुनिया झुकती है | झुकाने वाला चाहिये

१६८) दुर्योधन कृष्णाच्या उशाशी, अर्जुन बसे पायापाशी

१६९) दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ती

१७०) दुधाची तहान ताका ने भागवणे

१७१) दुधात कालवीते मीठ, हा स्वभाव नाही नीट

१७२) दुरून डोंगर साजरे

१७३) दुरून बगळा दिसतो साधा, आत कपटाची बाधा

१७४) देखल्या देवाला दंडवत

१७५) देह देवळात, चित्त खेटारात

१७६) दे हरी पलंगावरी

१७७) देव तारी त्याला कोण मारी

१७८) देश असा वेश

१७९) दैव देते कर्म नेते

१८०) दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

१८१) धनगर बसला जेवायला, ताका बरोबर शेवया

१८२) धरले तर चावते सोडले तर पळते

१८३) धर्माला सोडावा हत्ती, पण हिशोबाला सोडू नाही रती

१८४) न खात्या देवाला नैवेद्य फार

१८५) न पढा न लिखा, नाम है विद्यासागर

१८६) न रहेगा बांस, न बजेगी बासुरी

१८७) नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न

१८८) नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये

१८९) नख भर सुख, हातभर दुःख

१९०) नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ कधी विचारू नये

१९१) नमस्कार फुकाचा आशीर्वाद लाखाचा

१९२) न कर्त्याचा वार शनिवार

१९३) नशीब लागते द्यायला, पदर नाही घ्यायला

१९४) नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे

१९५) न बोलता दुःख फार, बोलण्याने हलका भार

१९६) नाक दाबले की तोंड उघडते

१९७) नाकापेक्षा मोती जड

१९८) नाकाच्या शेंड्याला जीव लावणे

१९९) नाचता येईना अंगण वाकडे

२००) नाव मोठे लक्षण खोटे