MAHILA SAMRIDDHI YOJANA 2024 IN MARATHI | महिला समृद्धी योजना २०२४ , सरकार महिलांसाठी राबविण्यात येणारे ही एक महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील बचत गटांमार्फत कर्ज पुरवले जाणार आहे. हे कर्ज अत्यल्प व्याजदरात महिला लाभार्थ्यांना मिळेल. महिला समृद्धी योजनेमुळे महिला करू इच्छिणारे व्यवसाय त्यासाठी लागणारे भांडवल मिळणाऱ्या कर्जातून घेऊ शकतात. महिला समृद्धी योजनेमुळे महिला अधिक सक्षम, अधिक स्वावलंबी, आर्थिकदृष्ट्या कर्तुत्ववान होऊ शकतात.
राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाद्वारे महिला समृद्धी कर्ज योजना राबवली जात आहे. ही योजना इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी लागू आहे. या योजनेमार्फत महिलांना बचत गटातर्फे त्यांच्या व्यवसायासाठी कर्ज देण्यात येते. महिला समृद्धी योजनेचा लाभ ग्रामीण भागातील महिलांना तर होईलच पण शहरी भागातील महिलांना होईल. महिला समृद्धी योजना अंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची परतफेड सरकारने महिलांचा पूर्ण विचार करून अत्यल्प व्याजदर ठेवला आहे. त्यामुळे महिला कर्जाची परतफेड सहज रित्या करू शकता.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेहमीच महिलांसाठी विविध योजना घेऊन येत असते. त्यातीलच एक महिला समृद्धी योजना, योजनेच्या नावाप्रमाणेच ही योजना असून या योजनेअंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे, स्वावलंबी बनवणे हा हेतू असून बचत गटांच्या मार्फत महिलांना लघु उद्योगासाठी किंवा त्या करत असलेल्या व्यवसायासाठी कर्ज दिले जाईल. या योजनेअंतर्गत जे कर्ज मिळेल त्यावर अत्यल्प व्याजदर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कर्ज परतफेड करणं महिलांना अधिक सुखकर होईल. महिला करत असलेल्या लघु उद्योगांमुळे त्या विशिष्ट भागामध्ये अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लघु उद्योग करणाऱ्या एका महिलेमुळे अनेक कुटुंबातील महिलांना रोजगार तर मिळेल त्याचबरोबर त्यांचा दैनंदिन जीवनाचा स्तर उंचावेल तसेच अधिक आर्थिक सक्षम बनतील.
महिलांना स्वतःचा लघुउद्योग करायचा असेल आणि त्यासाठीचा आर्थिक पाठबळ हवे असेल तर महिला समृद्धी योजना त्यांना फायद्याचे ठरेल. त्यातूनच स्वयंरोजगाराच्या संधी मध्ये उपलब्धता निर्माण होईल. महिला समृद्धी योजनेमुळे महिलांचा दैनंदिन जीवनाचा स्तर उंचावेल त्याबरोबर सामाजिक ,आर्थिक सबलता येऊन जीवनमान उंचावेल. महिला समृद्धी योजनेमुळे महिलांचा आत्मविश्वास तर वाढेलच त्याचबरोबर त्यांना स्वावलंबी आत्मनिर्भर होण्याचा एक मार्ग सापडेल.
महिलांचा विकास केला तर देश विकसनशील राष्ट्राकडून विकसित राष्ट्राकडे लवकरात लवकर जाईल याचा विचार करून महिलांसाठी विविध योजना राबवल्या जातात. महिला या देशातील एक प्रमुख घटक असून पुरुषांबरोबर त्यांनाही आर्थिक सामाजिक सक्षमता करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आजच्या जगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करतात स्वतःचा आणि कुटुंबाचा विकास करतात. कुटुंबाला आर्थिक स्थिरता प्राप्त करून देतात. या सर्व गोष्टींचा विचार करून महिला समृद्धी योजना राबवली जात आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारी महिला मागासवर्गीय गटातील असावे महाराष्ट्राचा नागरिक असावी 18 ते 50 या वय वर्ष गटातील असावे आणि महिलेचे कौटुंबिक वार्षिक आर्थिक उत्पन्न 98000 रुपये ग्रामीण भागासाठी व 1 लाख 20 हजार रुपये शहरी भागासाठी एवढे असावे. या योजनेद्वारे लघु उद्योग व व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांना 5 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. महिला समृद्धी योजनेद्वारे दिलेल्या कर्जावर 4% दराने व्याज आकारले जाणार आहे.
थोडक्यात समृद्धी योजना काय आहे याबद्दल तुम्हाला अंदाज आलाच असेल. या लेखात आपण महिला समृद्धी योजनेचे सविस्तर माहिती बघणार आहोत यात या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे त्याबद्दल माहिती करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे या योजनेचे वैशिष्ट्य बघणार आहोत. या योजनेचे नक्की स्वरूप कसे असणार आहे याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. या योजनेचा अर्ज कसा करावा याबद्दल माहिती बघणार आहोत. योजनेसाठी अर्ज कसा करावा योजनेसाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागतात योजनेसाठी ची पात्रता व अटी काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण MAHILA SAMRIDDHI YOJANA 2024 IN MARATHI | महिला समृद्धी योजना २०२४ या लेखात बघणार आहोत.
MAHILA SAMRIDDHI YOJANA 2024 IN MARATHI | महिला समृद्धी योजना २०२४ योजनेचा उद्देश:
महिला समृद्धी योजना २०२४ योजनेचा उद्देशखालील प्रमाणे :
महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
महिलांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे व आर्थिक मदत देणे.
स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे.
महिलांना आर्थिक सक्षम बनवणे.
महिलांचा आर्थिक सामाजिक जीवनाचा स्तर उंचावणे.
महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे.
MAHILA SAMRIDDHI YOJANA 2024 IN MARATHI |महिला समृद्धी योजना २०२४ योजनेसाठी पात्रता
महिला समृद्धी योजना २०२४ योजनेसाठीअसणाऱ्या अटी व पात्रता खालील प्रमाणे :
समृद्धी योजने चा लाभ घेणारी महिला भारताचा महाराष्ट्राचा रहिवासी असावी.
लाभार्थी महिला मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती, अल्पसंख्यांक प्रवर्गातील असावे.
लाभार्थीचे वय किमान 18 ते 50 वर्ष असायला हवे
लाभार्थी महिला बचत गटाचे सदस्य असावे.
लाभार्थी महिलेचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण भागासाठी 98000 रुपये व शहरी भागासाठी एक लाख वीस हजार रुपये
MAHILA SAMRIDDHI YOJANA 2024 IN MARATHI | महिला समृद्धी योजना २०२४ योजनेचे स्वरूप
महिला समृद्धी योजनेसाठी पात्रता काय आहे हे आपण बघितलाच आता महिला समृद्धी योजना २०२४ योजनेचे स्वरूप कसे असेल हे आपण बघुयात :
ग्रामीण व शहरी भागातील महिलांना बचत गटांमार्फत कर्जपुरवठा करणे.
प्रकल्प मर्यादा पाच लाख पर्यंत असून बचत गटातील 20 सभासदांना प्रत्येकी 25 हजार रुपये मिळतील.
राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग 95% असेल तर राज्य महामंडळाचा सहभाग 5% असेल
दिलेल्या कर्जाचा व्याजदर 4% असेल.
दिलेले कर्ज परतफेडीचा कालावधी हा तीन वर्षाचा असेल.
अनुसूचित जातीतील( चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) समाजा तील महिलांसाठी महिला समृद्धी योजना राबवली जात आहे. मात्र त्या योजनेच्या अटी व पात्रता हा वेगवेगळ्या आहेत. या योजनांची
पात्रता व अटी संदर्भात संपूर्ण माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटला अवश्य भेट द्या.
महिला समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
MAHILA SAMRIDDHI YOJANA 2024 IN MARATHI | महिला समृद्धी योजना २०२४ योजनेचा लाभ घेणाऱ्या बचत गटातील लाभार्थी महिलांकडे खालील कागदपत्रे आवश्यक आहे:
योजनेचा अर्ज
जात प्रमाणपत्र
आधार कार्ड
रेशन कार्ड
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी दाखला
मोबाईल नंबर
ई-मेल आयडी
बँकेचा तपशील
पासपोर्ट साईज फोटो
व्यवसाय प्रकल्पाचे खर्चाचे अंदाजपत्रक
महिला समृद्धी योजनेसाठी अर्ज कसा करावा
महिला समृद्धी योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या योजनेसाठी अर्ज करताना अर्ज तुम्हाला कोठे उपलब्ध होईल? अर्जाबरोबर कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतात याबद्दल माहिती खालील प्रमाणे:
महिला समृद्धी योजनेच्या अर्जासह कर्ज मागणी करणारा अर्ज तसेच सर्व आवश्यक कागदपत्रांची जोडणी करून योजनेचा अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावा.
आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे: जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी,बँकेचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो, व्यवसाय प्रकल्पाचे खर्चाचे अंदाजपत्रक इत्यादी .
अर्जाची व कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज मंजूर केला जाईल.
अर्जात दिलेल्या प्रकल्पाचे प्रकल्पासाठी लागणाऱ्या खर्चाचा अंदाजाची योग्य ती छाननी करून कर्जाला मंजुरी मिळेल.
निष्कर्ष:
या लेखात आपण महिला समृद्धी योजनेची सविस्तर माहिती घेतली. महिलांच्या आर्थिक विकासासाठी राबविण्यात येणारी ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. महिलांसाठी, मुलींसाठी, शेतकऱ्यांसाठी सरकार तर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती मिळविण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. तसेच आपल्या व आपल्या बाळाच्या आरोग्या विषयी माहिती , बाळच्या खानपानाच्या विवध रेसिपीज जाणून घेण्या साठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या . महत्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेख शेअर करा. लेखा आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.
FAQ : MAHILA SAMRIDDHI YOJANA 2024 IN MARATHI | महिला समृद्धी योजना २०२४
१) महिला समृद्धी योजना कोणासाठी आहे?
ans : महिला समृद्धी योजना ग्रामीण व शहरी भागातील मागासवर्गीय गटातील महिलांसाठी आहे.
२) महिला समृद्धी योजनेसाठी वयाची काय अट आहे?
ans: महिला समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय 18 ते 50 या वयोगटातील असावे>
३) महिला समृद्धी योजना मार्फत किती कर्ज मिळू शकते?
ans: महिला समृद्धी योजना मार्फत 5 लाखापर्यंत खर्च मिळू शकते.
४) महिला समृद्धी योजनेमार्फत मिळणाऱ्या कर्जावर किती टक्के व्याज आकारले जाते?
ans: महिला समृद्धी योजना मार्फत मिळणाऱ्या कर्जावर 4% इतके व्याज आकारले जाते.
५) कर्ज परतफेडीचा कालावधी किती आहे?
ans: महिला समृद्धी योजनेमार्फत मिळणाऱ्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी तीन वर्षाचा आहे.
६) महिला समृद्धी योजना मार्फत कशासाठी कर्ज मिळते?
ans: महिला समृद्धी योजना मार्फत महिलांना लघु उद्योगासाठी किंवा व्यवसायासाठी कर्ज मिळते?
७) महिला समृद्धी योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करू शकतो का?
ans: महिला समृद्धी योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करू शकत नाही.
८) महिला समृद्धी योजनेचा अर्जासाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतात?
ans: महिला समृद्धी योजनेचा अर्जासाठी खालील आवश्यक कागदपत्रे लागतात: योजनेचा अर्ज , जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला,रहिवासी दाखला, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, बँकेचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो, व्यवसाय प्रकल्पाचे खर्चाचे अंदाजपत्रक इत्यादी.