LEK LADKI YOJANA 2024 IN MARATHI | लेक लाडकी योजना २०२४

LEK LADKI YOJANA 2024 IN MARATHI | लेक लाडकी योजना २०२४, राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षण घेण्यासाठी आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लेक लाडकी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत लखपती करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात येत आहे.

LEK LADKI YOJANA 2024 IN MARATHI | लेक लाडकी योजना २०२४ राबवण्याचा मुख्य हेतू म्हणजे समाजातील मुलगा मुलगी असा भेदभाव कमी करणे, मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींचा मृत्यू दर कमी करणे आणि मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणे हा होय, तसेच शाळाबाह्य मुलींना पुन्हा शिक्षण उपलब्ध करून देणे मुख्य हेतू आहे.

राज्यातील गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना लेक लाडकी योजनेचा फायदा घेता येणार आहे. लेक लाडकी योजना अंतर्गत मुलीचा जन्म झाल्यावर 5000 रुपये, मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर 6000 रुपये, मुलगी इयत्ता सहावीत गेल्यावर 7000 रुपये, मुलगी इयत्ता अकरावी त गेल्यावर 8000 रुपये आणि 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75000 रुपये मिळणार आहेत. अशा रीतीने मुलीला एकूण 11000 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे.

1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या एक किंवा दोन मुलींसाठी तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लेक लाडकी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. दुसरा प्रसूतीच्या वेळी जुळे अपत्य झाल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना लेक लाडकी योजनेचा लाभ घेता येईल. पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्या वेळेस आणि त्याच्या दुसऱ्या हप्त्याच्या वेळेस पालकांनी कुटुंबनियोजन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

LEK LADKI YOJANA 2024 IN MARATHI | लेक लाडकी योजना २०२४ या लेखात आपण योजनेचा मुख्य उद्देश काय योजनेमुळे किती आर्थिक मदत मिळते त्याच्या पात्रता व अटी काय योजनेचा अर्ज कसा करावा तसेच योजनेचा अर्ज करताना कोणकोणत्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत.

Table of Contents

LEK LADKI YOJANA 2024 IN MARATHI | लेक लाडकी योजना २०२४

LEK LADKI YOJANA 2024 IN MARATHI

लेक लाडकी योजनेचा उद्देश:

1) आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि आर्थिक सहाय्य देणे.

2) मुलींचा जन्मदर वाढवणे.

3) मुलगा मुलगी असा भेदभाव कमी करणे.

4) गरीब कुटुंबातील मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये हा मुख्य उद्देश आहे.

5) मुलींना स्वावलंबी बनवणे

6) शाळाबाह्य मुलींचे प्रमाण कमी करणे आणि शिक्षणाची गोडी निर्माण करणे.

लेक लाडकी योजना अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत:

LEK LADKI YOJANA 2024 IN MARATHI | लेक लाडकी योजना २०२४ योजनेअंतर्गत मुलींना 11000 रुपये इतकी आर्थिक मदत मिळणार आहे ती आर्थिक पद्धत खालील हत्या नुसार मिळणार आहे:

1) पहिला हप्ता: मुलीचा जन्म झाल्यावर 5000 रुपये,

2) दुसरा हप्ता: मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर 6000 रुपये,

3) तिसरा हप्ता: मुलगी इयत्ता सहावीत गेल्यावर 7000 रुपये,

4) चौथा हप्ता : मुलगी इयत्ता अकरावी त गेल्यावर 8000 रुपये आणि

5) पाचवा हप्ता: 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75000 रुपये मिळणार आहेत.

LEK LADKI YOJANA 2024 IN MARATHI

लेक लाडकी योजनेसाठी पात्रता:

1) लाभार्थी मुलीचे कुटुंबीय महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.

2) महाराष्ट्र राज्यातील कुटुंबियांना लेक लाडकी योजनेचा लाभ घेता येईल.

3) पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना लेक लाडकी योजनेचा लाभ मिळेल.

4) आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना लेक लाडकी योजनेचा लाभ घेता येईल.

5) 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी ही योजना लागू आहे.

6) 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींना तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीसाठी लेक लाडकी योजना लागू आहे.

7) दुसरा प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

8) पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्याच्या वेळेस व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्याच्या वेळेस अर्ज सादर करताना आई-वडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

9) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे.

लेक लाडकी योजनेसाठी अटी:

1) लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर मिळणारी 75000 रुपये रक्कम मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतरच बँक खात्यात जमा होईल. त्याआधी रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार नाही.

2) लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीला स्वतःचे शिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे.

3) काही कारणांमुळे शिक्षण सोडले तर लेक लाडकी योजनेचा लाभ तिला मिळू शकणार नाही.

4) अर्जदार कुटुंबातील एकही सदस्य सरकारी नोकरीला असता कामा नये.

5) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे.

6) 18 वर्षाच्या आत लाभार्थी मुलीचा विवाह न करणे.

लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

मुलीच्या जन्माचा दाखला

उत्पन्नाचा दाखला

अर्जदार मुलीचे आधार कार्ड

पालकांचा आधार कार्ड

रेशन कार्ड

रहिवासी दाखला

पासपोर्ट साईज फोटो

बँकेच्या पासबुक चा तपशील

मतदान ओळखपत्र ( 18 वर्षानंतर मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)

मुलीचे शिक्षण ज्या शाळेत चालू आहे त्या शाळेचा दाखला

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र

अविवाहित असल्याचा लाभार्थी मुलीचे स्वयंघोषणापत्र ( 18 वर्षानंतर मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी आवश्यक)

मोबाईल नंबर

LEK LADKI YOJANA 2024 IN MARATHI

लेक लाडकी योजनेसाठी ऑफलाइन अर्ज कसा करावा?

1) अर्जदाराने आपल्या जिल्ह्यातील जिल्हा कार्यालयात महिला व बाल विकास विभागात जाऊन लेक लाडकी योजनेचा अर्ज घ्यावा.

2) अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थित वाचून अर्ज पूर्ण भरावा.

3) अर्जात सांगितलेली आवश्यक कागदपत्रे तसेच भरलेला अर्ज यांची जोडणी करून अर्ज कार्यालयात जमा करावा.

4) त्यानंतर तुमच्या अर्जाची व कागदपत्रांची छाननी केली जाईल अशा प्रकारे लेक लाडकी योजनेसाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होते.

लेक लाडकी योजनेसाठी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

1) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जावे.

2) होम पेजवर लेक लाडकी योजना यावर क्लिक करावे.

3) तुमच्या समोरील स्क्रीनवर लेक लाडकी योजनेचा अर्ज ओपन होईल, अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती वाचून व्यवस्थित भरावी .

4) अर्ज सांगितलेले सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.

5) सर्व आवश्यक कागदपत्रांची अपलोडिंग पूर्ण झाल्यानंतर फॉर्म सबमिट करावा.

6) अशा प्रकारे लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली होते.

निष्कर्ष:

LEK LADKI YOJANA 2024 IN MARATHI | लेक लाडकी योजना २०२४ या लेखात आपण लेक लाडकी योजनेची सविस्तर माहिती घेतले. मुलांप्रमाणेच मुलींना देखील शैक्षणिक दृष्ट्या सबल करणे, स्वावलंबी करणे, मुलींचा जन्मदर वाढवणे, समाजातील मुलगा मुलगी हा भेदभाव कमी करणे हा एक लडकी योजनेचा मुख्य उद्देश आहे. लेखातील माहिती महत्वपूर्ण आहेच परंतु शेतकऱ्यांसाठी ,महिलांसाठी, बालिका साठी सरकारच्या विविध योजनां ची सविस्तर माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला आवश्यक भेट द्या. या योजनेचा जास्तीत जास्त मुलींना फायदा होण्यासाठी , लेख जास्तीत जास्त लोकांना शेअर करा . लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.

FAQ:LEK LADKI YOJANA 2024 IN MARATHI | लेक लाडकी योजना २०२४

1) लेक लाडकी योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

ans: आर्थिकदृष्ट्या गरीब आणि पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना लेक लाडकी योजनेचा लाभ घेता येईल.

2) लेक लाडकी योजने चा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे का?

ans: होय, लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.

3) लेक लाडकी योजनेअंतर्गत किती आर्थिक मदत मिळते?

ans: लेक लाडकी योजना अंतर्गत मुलीला 11000 रुपये इतकी आर्थिक मदत मिळते.

4) लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न किती असावे?

ans: लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे.

5) लेक लाडकी योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत किती हप्त्यांमध्ये मिळते?

ans: लेक लाडकी योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत पाच हप्त्यांमध्ये मिळते. ते हप्ते खालीलप्रमाणे:

1) पहिला हप्ता: मुलीचा जन्म झाल्यावर 5000 रुपये,

2) दुसरा हप्ता: मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर 6000 रुपये,

3) तिसरा हप्ता: मुलगी इयत्ता सहावीत गेल्यावर 7000 रुपये,

4) चौथा हप्ता : मुलगी इयत्ता अकरावी त गेल्यावर 8000 रुपये आणि

5) पाचवा हप्ता: 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75000 रुपये मिळणार आहेत.

6) लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करावा?

ans: लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.

7) लेक लाडकी योजनेसाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागतात?

ans: लेक लाडकी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:

मुलीच्या जन्माचा दाखला, उत्पन्नाचा दाखला,अर्जदार मुलीचे आधार कार्ड, पालकांचा आधार कार्ड,रेशन कार्ड,रहिवासी दाखला,पासपोर्ट साईज फोटो,बँकेच्या पासबुक चा तपशील, मतदान ओळखपत्र ( 18 वर्षानंतर मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला),मुलीचे शिक्षण ज्या शाळेत चालू आहे त्या शाळेचा दाखला, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, अविवाहित असल्याचा लाभार्थी मुलीचे स्वयंघोषणापत्र , मोबाईल नंबर इत्यादी

हेही वाचा

राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/

अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/

लखपती दीदी योजना https://marathisampada.com/lakhpati-didi-yojana-2024/

प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/

सुकन्या समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/sukanya-samriddhi-yojana-2024-in-marathi/

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग https://marathisampada.com/pmfme-scheme-2024-in-marathi/

नमो ड्रोन दीदी योजना https://marathisampada.com/namo-drone-didi-yojana-in-marathi/

महिला समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/mahila-samriddhi-yojana-2024-in-marath/

जननी सुरक्षा योजना २०२४ https://marathisampada.com/janani-suraksha-yojana-2024-in-marathi/

माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ https://marathisampada.com/mazi-kanya-bhagyashree-yojana-2024-in-marathi/

प्रधान मंत्री मातृ वंदना योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-matru-vandana-yojana-2024-in-marathi/