Lakhpati Didi yojana 2024 | लखपती दीदी योजना २०२४

Lakhpati Didi yojana 2024

Lakhpati Didi yojana 2024 | लखपती दीदी योजना २०२४ ही ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे राबवली जात आहे. यामध्ये स्वयंसहायता गटाची संबंधित असलेल्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असावे यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार आहे. या योजनेला लखपती दीदी योजना असे नाव देण्यामागील उद्देश हा आहे की, महिलांमुळे त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे या योजनेला लखपती दीदी योजना असे नाव देण्यात आले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारी 2024 ला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता त्यात लखपती योजनेबाबत सांगितले होते. या योजनेबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, आतापर्यंत दोन कोटी महिलांनी लखपती योजनेचा लाभ घेतला आहे. लखपती योजनेचे उद्दिष्ट आता 2 कोटी वरून तीन कोटी करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत देशातील महिलांना विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात महिलांना एल इ डी बल्ब बनवणे, प्लंबिंग तसेच ड्रोन बनवणे आणि ड्रोन दुरुस्त करणे यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासारख्या इतर शेतीशी संबंधित असलेल्या तसेच शेतीशी संबंधित नसलेल्या अशा इतर अनेक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे.लखपती दीदी योजना प्रत्येक राज्यात स्वयं सहायता समूहाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.

लखपती दीदी योजनेत प्रामुख्याने व्यावसायिक प्रशिक्षणावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे महिला नवनवीन कौशल्य आत्मसात करू शकतात त्यांचा एखाद्या व्यवसायात उपयोग करू शकतात आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात अशा महिलांना प्रोत्साहन देणे आर्थिक मदत करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

लखपती दीदी योजनेअंतर्गत उद्योजक बनवण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मार्गदर्शन आणि पाठिंबा दिला जाणार आहे. यामध्ये बिझनेस प्लॅन, कशाप्रकारे मार्केटिंग करावे, तसेच कुठे मार्केटिंग केलं पाहिजे यासंदर्भात मदत केली जाणार. महिलांनाआर्थिक सक्षमता , आर्थिक सुरक्षितता देण्याबरोबरच विमा संरक्षण ही देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना काही अघटित घटना घडल्यास आर्थिक संरक्षण मिळेल.

लखपती दीदी योजने सूक्ष्म कर्जा ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, त्यामुळे महिलांना त्यांचा व्यवसाय, शिक्षण किंवा इतर गोष्टींसाठी कर्ज मिळतील. ज्या स्त्रियांकडे गहाण ठेवण्यासाठी काही उपलब्ध नाही अशा महिलांसाठी ही योजना फायदेशीर ठरेल. लखपती दीदी योजने अंतर्गत अनेक राज्यांमध्ये महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी पाच लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे आणि विशेष म्हणजे ह्या कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जाणार नाही म्हणजेच लखपती दीदी योजने अंतर्गत सरकार महिलांना बिन व्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे .हे बिन व्याजी कर्ज असल्यामुळे अनेक महिला या योजनेचा फायदा घेऊ शकतील .

Lakhpati Didi yojana 2024 | लखपती दीदी योजना २०२४ उद्योजकता वाढीला तर प्रोत्साहन देतेच त्याचबरोबर तंत्रज्ञाना चाही उपयोग करून घेणारी आहे. या योजनेअंतर्गत महिलांना डिजिटल बँकिंग सेवा कशी वापरावी, मोबाईल वॉलेट, तसेच आर्थिक व्यवहार करताना डिजिटल प्लॅटफॉर्म चा उपयोग कसा करावा याबद्दल प्रशिक्षण दिले जाते. लखपती दीदी योजना महिलांना फक्त एक उद्योजक म्हणून प्रोत्साहित न करता त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांचा आत्मसन्मान वाढवणे, त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणे, तसेच कुटुंबात एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करणे या गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. सध्या ही योजना उत्तराखंड या राज्यात राज्यात चालू आहे, परंतु आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर अनेक राज्य या योजनेत सहभागी होतील आणि लखपती दीदी योजना देशव्यापी होईल यात काही शंका नाही.

Lakhpati Didi yojana 2024 | लखपती दीदी योजना २०२४

Lakhpati Didi yojana 2024

लखपती दीदी योजनेचा लाभ बचत गटातील महिलांनाच मिळणार असे सांगण्यात येते बचत गट म्हणजे नेमके काय?

बचत गट म्हणजे नेमके काय?

बचत गट म्हणजे एक छोटा गट प्रामुख्याने ग्रामीण भागात महिला एकत्र येऊन हा गट तयार करतात. त्यात पैसे वाचवणे एक कर्ज देणे यासारख्या गोष्टी केल्या जातात. 1970 च्या दशकात भागात बचत गटाची सुरुवात झाली. भारतात अंदाजे 100 दशलक्ष महिला सदस्यांसह 90 लाख SHG असल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.

लखपती दीदी योजना कशा पद्धतीने राबवली जाईल

१) देशातील अनेक कुटुंबांना विविध प्रकारचे उत्पन्न किंवा उत्पादन तयार करण्यासाठी सुविधा पुरवणे, त्याबद्दल मार्गदर्शन करणे व त्यांना सक्षम करणे याची सोय केली जाईल. पुढे जाऊन त्यांचे एकत्रीकरण किंवा संसाधन जोडणीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म चा वापर केला जाईल.

२) प्रत्येक राज्यात केंद्रशासित प्रदेशात स्वयंसहायता गटातर्फे लखपती दीदींना प्रशिक्षण दिले जाईल, तसेच हाताळणी सक्षम करण्यासाठी कॅ स्केड प्रशिक्षण धोरण स्वीकारले जाईल. या प्रशिक्षण धोरणात काही तज्ञ मंडळींचा संघ लखपती दीदींना संबंधित विषयांवर प्रशिक्षण देतील. तसेच राज्यांमधील किंवा केंद्रशासित प्रदेशातील काही व्यक्ती किंवा ट्रेनर्स ला प्रशिक्षित केले जाईल या व्यक्ती प्रामुख्याने राज्य संसाधन व्यक्ती असतील आणि राज्य युनिट द्वारे ओळखले जातील. हे ट्रेनर्स पुढे जाऊन आपापल्या राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील लखपती दीदींना मार्गदर्शन करतील.

३) आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी किंवा आर्थिक सहाय्य सुलभ होण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. DAY -NRLM एक उत्प्रेरक म्हणून काम करते.

४) आजीविका नोंदणी, प्रत्येक बचत गटात आजीविका रजिस्टर असते त्यामध्ये उपजीविकेची नोंद केली जाते, उत्पन्नाचा मागोवा घेण्यासाठी आणि काम सुकर करणे प्रामुख्याने आजीविका नोंदणी करण्याचे उद्देश आहे. स्वयंसहाय्यता गटातील सदस्य हे कृषी, फलोत्पादन, रेशीम शेती, पशुपालन, फुलशेती, मत्स्यपालन, दुग्ध व्यवसाय, हस्तकला, हातमाग, अन्नधान्य उत्पादन ,घरकाम, यासारख्या अनेक उपजीविका कार्यक्रमांमध्ये सहभागी असतात. तसेच पर्यटन, वाहतूक, दुरुस्ती देखभाल, आर्थिक सेवा यासारख्या उपक्रमांमध्ये देखील SHG सदस्य सहभागी असतात. आजीविका नोंदणीमुळे लखपती दीदींच्या प्रगतीचे मोजमाप करणे सोपे होईल.

Lakhpati Didi yojana 2024 | लखपती दीदी योजना २०२४ पात्रता:

१) देशातील सर्व महिला लखपती दीदी योजनेचा लाभ घेऊ शकतात

२) लखपती दीदी योजनेसाठी वयाचे कोणतेही बंधन नाही.

३) लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना राज्यातील स्वयंसाहाय्यता समूहाचे सदस्य असणे बंधनकारक आहे.

लखपती दीदी योजनेसाठी कोण अर्ज करू शकता?

१) या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक बिझनेस प्रोजेक्ट तयार करावा लागेल.

२) बिझनेस प्रोजेक्ट तयार केल्यानंतर तुमच्या जवळील स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून सरकारला अर्ज करावा लागेल.

३) सरकार तर्फे अर्ज मंजूर करण्यात आला तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठराल.

४) या योजनेअंतर्गत अनेक राज्यांमध्ये ५ लाखापर्यंत लोन (कर्ज ) उपलब्ध करून दिले जाते.

लखपती दीदी योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:

योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे :

१) आधार कार्ड

२) पॅन कार्ड

३) ॲड्रेस प्रूफ/ रहिवासी दाखला

४) इन्कम सर्टिफिकेट/ उत्पन्नाचा दाखला

५) रजिस्टर मोबाईल नंबर

६) बँक खात्याचे माहिती

७) पासपोर्ट साईज फोटो

८) ई-मेल आयडी

Lakhpati Didi yojana 2024

FAQ : Lakhpati Didi yojana 2024 | लखपती दीदी योजना २०२४

१) लखपती दीदी योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

ans : लखपती निधी योजनेचा लाभ बचत गटातील महिलांना मिळू शकतो.

२) लखपती दीदी योजनेसाठी किती वय असणे आवश्यक आहे?

ans: लखपती दीदी योजनेसाठी वयाचे कोणतेही बंधन नाही.

३) लखपती दीदी योजनेअंतर्गत किती लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते?

ans: लखपती दीदी योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.

४) लखपती दीदी योजने अंतर्गत कर्जावर किती व्याज आकारले जाते?

ans: लखपती दीदी योजनेअंतर्गत दिलेल्या कर्जावर व्याज आकारले जात नाही ( बिनव्याजी कर्ज).

५) लखपती दीदी योजनेसाठी अर्ज कसा करावा?

ans: लखपती दीदी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे आहे. सरकारच्या ऑफिशिअल वेबसाईट वरून अर्ज करू शकता.

६) लखपती दीदी योजनेत कोणकोणते कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे ?

ans : लखपती दीदी योजनेत कृषी, फलोत्पादन, रेशीम शेती, पशुपालन, फुलशेती, मत्स्यपालन, दुग्ध व्यवसाय, हस्तकला, हातमाग, अन्नधान्य उत्पादन ,घरकाम, एल इ डी बल्ब बनवणे, प्लंबिंग तसेच ड्रोन बनवणे आणि ड्रोन दुरुस्त करणे यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

७) लखपती दीदी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?

ans : लखपती दीदी योजनेसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ॲड्रेस प्रूफ/ रहिवासी दाखला, इन्कम सर्टिफिकेट/ उत्पन्नाचा दाखला, रजिस्टर मोबाईल नंबर, बँक खात्याचे माहिती, पासपोर्ट साईज फोटो, ई-मेल आयडी हि आवश्यक कागदपत्रे आहेत .

थोडक्यात पण महत्वाचे :

केंद्र सरकार महिलांसाठी , शेतकऱ्यांसाठी , बालिकांसाठी तसेच आर्थिक सक्षमता नसेल अशा प्रत्येकासाठी कुठली न कुठली yojana राबवत असते . आजच्या लेखात आपण Lakhpati Didi yojana 2024 | लखपती दीदी योजना २०२४ बद्दल माहिती घेतली . दिलेली माहिती महत्वपूर्ण तर आहेच पण हि माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे . त्यासाठी हा लेख तुमच्या माहितीतील , तुमच्या जवळील महिलांना पाठवा त्यांना ह्या योजनेचा अर्ज भरण्यासाठी मदत करा .आणि त्यांनी आर्थिक सक्षम करण्यासाठी मदत करा. त्यांच्यातील उद्योजिकता कौशल्याला प्रोत्साहन द्या .प्रत्येक महिलेला स्वावलंबी बनवा .लेख आवडला असल्यास आम्हाला नक्की कळवा . धन्यवाद .