LADALI BAHANA YOJANA 2024 | लाडली बहाना योजना २०२४

LADALI BAHANA YOJANA 2024 | लाडली बहाना योजना २०२४, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चोहान महिलांसाठी राबवलेली ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. लाडली बहना योजनेचा फायदा मध्य प्रदेशातील लाखो महिलांना झाला आहे. या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. असे म्हटले जाते की मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान हे लाडली बहना योजनेमुळे सत्तेत आले. मध्य प्रदेशात भाजप सरकारने राबवलेली ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. अशीच योजना महाराष्ट्रात राबवण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

LADALI BAHANA YOJANA 2024 | लाडली बहाना योजना २०२४ योजना अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1250 रुपये दिले जातात. म्हणजेच एका वर्षात एका महिलेला 15000 रुपये इतकी रक्कम दिली जाते. या दिलेल्या रकमेचा उपयोग महिलांना स्वतःचे आणि मुलांचे आरोग्य जपण्यासाठी तसेच घर खर्च भागवण्यासाठी करता यावा हा या योजनेचा उद्देश आहे.

मध्य प्रदेशातील महिलांसाठी सुरु केलेली लाडली बहना ही सर्वात महत्त्वाची योजना असून, मागासवर्गीय, अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती , अल्पसंख्यांक, विधवा, सर्वसाधारण प्रवर्ग या गटातील सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

लाडली बहना योजनेसाठी काही पात्रता देखील सांगितले आहे लाभार्थी महिला मध्य प्रदेशचे रहिवासी असणे अनिवार्य आहे. शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुली किंवा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 23 ते 60 वर्षे या दरम्यान असावे.

LADALI BAHANA YOJANA 2024 | लाडली बहाना योजना २०२४ योजनेमुळे महिलांना मिळणाऱ्या पैशामुळे महिलांना एक आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. त्याचप्रमाणे महिला स्वावलंबी बनतील. तसेच घर खर्चाला, घराचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी, महिलांनी त्यांचे स्वतःचे आणि मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी या पैशाचा उपयोग करावा.

LADALI BAHANA YOJANA 2024 | लाडली बहाना योजना २०२४

LADALI BAHANA YOJANA 2024

लाडली बहना योजनेचे उद्दिष्ट:

1) महिलांना स्वावलंबी बनवणे.

2) त्यांच्या मुलांच्या आरोग्यात सुधारणा करणे.

3) महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे.

4) महिलांचे जीवनमान उंचावणे.

5) आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनून कुटुंबात त्यांना योग्य तो दर्जा प्राप्त करून देणे.

6) मुलांच्या पोषण स्थिती सुधारणा करणे.

7) महिलांना स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी कोणावरही अवलंबून राहता येऊ नये.

8) महिलांना बाल संगोपनात सक्षम करणे.

9) महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करून महिलांचा आत्मविश्वास वाढवणे.

10) महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रेरणा / प्रोत्साहन देणे

लाडली बहना योजनेचे फायदे:

1) लाडली बहना योजनेसाठी अर्ज केलेल्या लाभार्थी महिलेला दरमहा 1250 रुपये इतकी रक्कम बँक खात्यात अनुदान म्हणून देण्यात येईल.

2) 60 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या महिलेला सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गत दरमहा 1250 पेक्षा कमी रक्कम मिळत असेल तर त्या महिलेला 1250 रुपये इतकी रक्कम देण्यात येईल.

LADALI BAHANA YOJANA 2024

लाडली बहना योजनेसाठी पात्रता:

1) अर्ज करणारे अर्जदार महिला ही मध्य प्रदेशातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.

2)मागासवर्गीय, अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती , अल्पसंख्यांक, विधवा, सर्वसाधारण प्रवर्ग या गटातील सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

3) विवाहित महिला, घटस्फोटीत महिला, विधवा महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता.

4) अर्ज करणाऱ्या अर्जदार महिलेचे वय 21 वर्षे ते 60 वर्ष या दरम्यान असावे.

लाडली बहना योजनेसाठी अपात्रता:

1) ज्या कुटुंबाचे किंवा महिलेचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

2) अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील सदस्य किंवा स्वतः अर्जदार महिला ही आयकर दाता असेल तर अशी महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

3) अर्ज करणारी महिला किंवा तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य हा सरकारी नोकरीला नसावा.

4) अर्ज करणारी महिला किंवा तिच्या कुटुंबातील कोणताही सदस्य हा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत असेल तर अशी महिला योजनेसाठी अपात्र असेल.

5) अर्ज करणारी महिला केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून कोणत्या इतर योजनेअंतर्गत 1250 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम अनुदान म्हणून प्राप्त करत असेल तर अशी महिला योजनेसाठी अपात्र असेल.

6) अर्ज करणारी महिला किंवा कुटुंबातील सदस्य हे आजी-माजी खासदार/ आमदार असतील तर अशी महिला योजनेसाठी अपात्र असेल.

7) अर्ज करणारी महिला किंवा कुटुंबातील सदस्य हे बोर्ड/ कॉर्पोरेशन बोर्ड याचे अध्यक्ष/ संचालक किंवा सदस्य असतील आणि केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी त्यांना नामांकित केलेले असेल तर अशी महिला योजनेसाठी साठी अपात्र असेल.

8) अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील सदस्य किंवा महिला स्वतः कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले नसावे.

9) अर्ज करणाऱ्या महिलांकडे किंवा तिच्या कुटुंबाकडे स्वतःची चार चाकी गाडी असेल तर अशी महिला या योजनेसाठी अपात्र असेल.

लाडली बहना योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया:

1) लाडली बहना योजनेसाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरून किंवा मोबाईल ॲप द्वारे ऑनलाइन भरता येतात.

2) योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदारांना अर्ज हे ग्रामपंचायत/ वर्ड ऑफिस/ कॅम्प/ अंगणवाडी/ कॅम्प या केंद्रांमध्ये उपलब्ध आहेत.

3) हा फॉर्म घेऊन अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थित भरावी आणि अर्ज ग्रामपंचायत/ वर्ड ऑफिस/ कॅम्प/ किंवा अंगणवाडी येथे जमा करावा.

4) केंद्रातील कर्मचाऱ्यांना द्वारे फॉर्म मधील माहिती ऑनलाईन भरण्यात येईल.

5) सर्व माहिती ऑनलाईन भरून झाल्यानंतर तुम्हाला एक पोच पावती देण्यात येईल.

6) लाभार्थ्याला ही पोचपावतीSMS/WHATSAPP द्वारे देखील मिळेल.

7) अशा प्रकारे अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होते.

8) त्यानंतर अर्जदार महिलेला स्वतः केंद्रात उपलब्ध राहावे लागेल जेणेकरून महिलेचा फोटो काढता येईल आणि ई-केवायसी करण्यात येईल.

9) अर्जदार महिलेने केंद्रात जाताना स्वतः सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे ठेवणे अनिवार्य आहे.

लाडली बहना योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड

रहिवासी दाखला

जन्मदाखला

पासपोर्ट साईज फोटो

बँक खात्याचा तपशील

मोबाईल नंबर

ई-मेल आयडी

निष्कर्ष:

LADALI BAHANA YOJANA 2024 | लाडली बहाना योजना २०२४ या लेखात आपण लाडली बहना योजनेबद्दल सविस्तर माहिती घेतली. सध्या ही योजना मध्य प्रदेशातील महिलांसाठी राबविण्यात येत असून इतरही राज्य त्याचा अवलंब करणारा असल्याचे संकेत देण्यात येत आहे. ही महिला इतरही राज्याने राबवली तर अनेक महिलांना याचा फायदा होईल. शेतकऱ्यांसाठीच्या, महिलांसाठीच्या, मुलींसाठीच्या केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला आवश्य भेट द्या. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.

LADALI BAHANA YOJANA 2024

FAQ:LADALI BAHANA YOJANA 2024 | लाडली बहाना योजना २०२४

1) लाडली बहना योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

ans: महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणे तसेच त्यांच्या व त्यांच्या परिवाराच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणणे हे लाडली बहना योजनेचे उद्दिष्ट आहे

2) लाडली बहना योजना अंतर्गत कौटुंबिक उत्पन्नासाठी काय अटी आहेत?

ans: लाडली बहना योजना अंतर्गत अर्जदार महिलेचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

3) आयकर दाता लाडली बहना योजनेचा फायदा घेऊ शकता का?

ans: आयकर दाता लाडली बहना योजनेचा फायदा घेऊ शकत नाही.

4) लाडली बहना योजनेअंतर्गत किती रुपये आर्थिक मदत मिळते?

ans: लाडली बहना योजनेअंतर्गत दरमहा 1250 रुपये इतक्या आर्थिक मदत मिळते.

5) लाडली बहना योजनेसाठी वयाचे काय अट आहे?

ans: लाडली बहना योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार महिलेचे वय 21 ते 60 वर्ष या वयोगटातील असावे.

6) लाडली बहना योजनेसाठी कोणकोणत्या आवश्यक कागदपत्रे लागतात?

ans: लाडली बहना योजनेसाठी खालील आवश्यक कागदपत्रे लागतात:

आधार कार्ड

रहिवासी दाखला

जन्मदाखला

पासपोर्ट साईज फोटो

बँक खात्याचा तपशील

मोबाईल नंबर

ई-मेल आयडी

7) सरकारी सेवेत काम करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो का?

ans: नाही, सरकारी सेवेत काम करणाऱ्या महिलांना लाडली बहना योजनेचा लाभ घेता येत नाही.

8) मुली किंवा अविवाहित अर्जदार या योजनेसाठी पात्र आहे का?

ans: नाही, ही योजना फक्त विवाहित/ घटस्फोटीत/ विधवा महिलांसाठी आहे.

9) लाडली बहना योजनेसाठी अर्ज कसा करावा?

ans: लाडली बहना योजनेसाठी ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.

10) लाडली बहना योजना कोणत्या राज्यासाठी आहे?

ans: लाडली बहना योजना सध्या फक्त मध्यप्रदेश या या राज्यातील महिलांसाठी आहे.

केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा

राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/

अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/

लखपती दीदी योजना https://marathisampada.com/lakhpati-didi-yojana-2024/

प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/

सुकन्या समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/sukanya-samriddhi-yojana-2024-in-marathi/

हर घर नल योजना २०२४ https://marathisampada.com/har-ghar-nal-yojana-2024/

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग https://marathisampada.com/pmfme-scheme-2024-in-marathi/

नमो ड्रोन दीदी योजना https://marathisampada.com/namo-drone-didi-yojana-in-marathi/

महिला समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/mahila-samriddhi-yojana-2024-in-marath/

जननी सुरक्षा योजना २०२४ https://marathisampada.com/janani-suraksha-yojana-2024-in-marathi/

माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ https://marathisampada.com/mazi-kanya-bhagyashree-yojana-2024-in-marathi/

प्रधान मंत्री मातृ वंदना योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-matru-vandana-yojana-2024-in-marathi/

लेक लाडकी योजना २०२४ https://marathisampada.com/lek-ladki-yojana-2024-in-marathi/

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२४ https://marathisampada.com/widow-pension-scheme-2024-in-marathi/

प्रधान मंत्री मुद्रा योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-mudra-yojana-2024/

आयुष्मान भारत योजना २०२४ https://marathisampada.com/ayushaman-bharat-yojana-2024/

प्रधान मंत्री कौशल विकास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-kaushal-vikas-yojana-2024/

प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-ujjwala-yojana-2024/

प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना २०२४ https://marathisampada.com/pm-kisan-sanman-nidhi-yojana-2024/

प्रधान मंत्री सौभाग्य योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-saubhagya-yojana-2024/

प्रधान मंत्री आवास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-awas-yojana-2024/