JANANI SURAKSHA YOJANA 2024 IN MARATHI |जननी सुरक्षा योजना २०२४

JANANI SURAKSHA YOJANA 2024 IN MARATHI |जननी सुरक्षा योजना २०२४, भारताचा कृषिप्रधान देशात शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त जनता राहतो. शेती हा प्रामुख्याने केला जाणारा व्यवसाय आहे. ग्रामीण भागात राहणारे बहुसंख्य लोकसंख्या हे दारिद्र्य रेषेखाली असून ग्रामीण भागात बेरोजगारीची समस्या हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. शेतीवर अवलंबून न राहता विविध ठिकाणी जाऊन काम करणाऱ्या कामगारांची संख्या आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले जाते. अशा स्थलांतरित कामगारांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत. आपल्या दैनंदिन मूलभूत गरजा भागवणे देखील या कामगार वर्गाला कठीण असते. त्यातूनच काही आजार उद्भवला तर खूप मोठ्या आर्थिक आपल्याला तोंड द्यावे लागते. याच वर्गातील महिला ज्यावेळेस गरोदर असतात, त्यावेळी देखील त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. सरकारी अहवालानुसार देशात दरवर्षी 13 लाखान अधिक नवजात बालकांचा एका वर्षात मृत्यू होतो तर 56000 हून अधिक महिलांचा गरोदरपणा मृत्यू होतो. यात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील स्त्रियांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. हेच मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि हळूहळू रोखण्यासाठी जननी सुरक्षा योजनेचे आयोजन केले आहे . पैशांच्या अभावामुळे दारिद्ररेषेखालील कुटुंब गर्भवती महिलांना योग्य ते उपचार योग्य ते औषध उपचार देऊ शकत नाही .त्यांना मदत म्हणून हे योजना फायद्याची ठरेल . जननी सुरक्षा योजनेमुळे नवीन जन्माला येणाऱ्या बाळाचा मृत्युदर कमी होईलच पण त्याचा बरोबर बाळावर जन्मल्यानंतर योग्य ते औषध उपचार करता येईल .या योजने अंतर्गत मिळणाऱ्या सर्व सुविधा मोफत देण्यात येणार आहेत .

JANANI SURAKSHA YOJANA 2024 IN MARATHI |जननी सुरक्षा योजना २०२४ सुरू करण्यामागे सरकारच्या खूप मोठा उद्देश आहे तो असा की कोणत्याही परिस्थितीत गरोदरपणा त स्त्रीचा आकस्मिक किंवा अकाली मृत्यू होऊ नये. या योजनेच्या माध्यमातून सरकार अनेक प्रकारचे आर्थिक सहाय्य करते, अनेक प्रकारच्या आर्थिक सुविधा उपलब्ध करून देते, गरोदरपणा महिलांना आर्थिक मदत मिळाल्यामुळे आई आणि बाळाचे आरोग्य सुधारते बाळंतपणातील मृत्युदर कमी व्हावा यासाठी जननी सुरक्षा योजना संपूर्ण देशात सुरू करण्यात आली आहे.

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी, बालकांसाठी , बालिका साठी, महिलांसाठी त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवले आहेत. गर्भवती महिलांचे आरोग्य नवजात बालकाचे आरोग्य त्याला लागणारा आर्थिक खर्च लक्षात घेता JANANI SURAKSHA YOJANA 2024 IN MARATHI |जननी सुरक्षा योजना २०२४ सुरू करण्याची घोषणा केली या योजनेअंतर्गत गरोदर गरोदर महिलांच्या सर्व तपासण्या आणि प्रसूती मोफत केले जाईल. महिलांची प्रसूती रुग्णालयातच व्हावे यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. जननी सुरक्षा योजनेच्या अंतर्गत सरकारी रुग्णालयात दारिद्र्य रेषेखालील महिलेचे प्रसूती झाल्यानंतर केंद्र सरकार त्या महिलेच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करणार आहे.

केंद्र सरकारने JANANI SURAKSHA YOJANA 2024 IN MARATHI |जननी सुरक्षा योजना २०२४ अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील शहरी व ग्रामीण भागातील गर्भवती महिलांचा विचार करून त्यांना संपूर्ण गर्भारपणात आणि प्रसूतीच्या वेळी ,प्रसूतीनंतर आवश्यक त्या सर्व सुविधा मोफत देण्याचे ठरवले आहे. ग्रामीण व शहरी भागात राहणाऱ्या गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. परंतु महिलेची प्रसूती शासन मान्य रुग्णालयात किंवा सरकारी रुग्णालयात होणे आवश्यक आहे. जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता असायला हवे, तसेच जननी सुरक्षा योजना अंतर्गत प्रति महिला किती लाभ घेऊ शकते, कसा लाभ घेऊ शकते तसेच जननी सुरक्षा योजनेसाठी अर्ज कसा करावा कोणकोणती आवश्यक कागदपत्रे फॉर्मला जोडावी याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या लेखात बघणार आहोत.

JANANI SURAKSHA YOJANA 2024 IN MARATHI |जननी सुरक्षा योजना २०२४

JANANI SURAKSHA YOJANA 2024 IN MARATHI

जननी सुरक्षा योजना 2024 पात्रता:

1) शहरात व गावांमध्ये राहणाऱ्या गर्भवती महिला जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेऊ शकतात.

2) अर्जदार महिलेचे वय 19 वर्ष आणि त्याहून अधिक असावे.

3) शासनाने निवडलेल्या शासकीय रुग्णालय संस्थेत प्रसूती केल्यावरच योजनेचा लाभ मिळणार आहे.

4) जननी सुरक्षा योजना2024 अंतर्गत गर्भवती महिलेच्या दोन अपत्यांच्या जन्मापर्यंत तिला मोफत तपासणी आणि मोफत प्रसूतीची सुविधा मिळणार आहेत.

5) बीपीएल श्रेणीतील आणि दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबा तिल महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

6) अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील सर्व स्त्रियांना जननी सुरक्षा योजना2024 या योजनेचा लाभ घेता येईल.

जननी सुरक्षा योजना 2024 अंतर्गत गर्भवती महिलांना मिळणारे लाभ:

1) जननी सुरक्षा योजना अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थी महिलेला प्रसूतीच्या तारखेनंतर सात दिवसाच्या आत 700 रुपये बँक खात्यात जमा केले जाईल.

2) जननी सुरक्षा योजना अंतर्गत शहरी भागातील लाभार्थी महिलेला प्रसूतीच्या तारखेनंतर सात दिवसाच्या आत 600 रुपये बँक खात्यात जमा केले जाते.

3) ग्रामीण व शहरी भागात राहणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलेची प्रसूती घरीच झाल्यास प्रसूतीच्या तारखेनंतर सात दिवसाच्या आत 500 रुपये बँक खात्यात जमा केले जाते.

4) लाभार्थी महिलेचे सिझेरियन शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्यास लाभार्थी महिलेला 1500 रुपये रोख रक्कम बँक खात्यात जमा केले जाते.

जननी सुरक्षा योजना 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया:

1) जननी सुरक्षा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रथम आरोग्य केंद्र कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.

2) त्यानंतर अर्जाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करावे.

3) अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असल्याने आमची प्रिंट आउट घ्यावी लागेल.

4) फॉर्म मध्ये दिलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा. जसे की अर्जदाराचे नाव, वडील व पतीचे नाव, वय, लिंग, गर्भधारणा ची तारीख इत्यादी.

5) फॉर्म मध्ये सांगितलेल्या आवश्यक कागदपत्रांची छायाप्रत अर्जाला जोडावे.

6) फॉर्म तुमच्या जवळच्या खाजगी आरोग्य केंद्रात आणि अंगणवाडी केंद्रात जमा करा.

7) तुम्ही दिलेल्या फॉर्मची आणि कागदपत्रांची योग्य पडताळणी केल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल.

जननी सुरक्षा योजना2024 साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:

बीपीएल रेशन कार्ड

आधार कार्ड

वोटर आयडी कार्ड

MCH कार्ड

रहिवासी दाखला

जननी सुरक्षा कार्ड

शासकीय रुग्णालयातून डिलिव्हरी प्रमाणपत्र

बँक खाते पासबुक

मोबाईल नंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो

आयु प्रमाणपत्र

JANANI SURAKSHA YOJANA 2024 IN MARATHI

निष्कर्ष:

JANANI SURAKSHA YOJANA 2024 IN MARATHI |जननी सुरक्षा योजना २०२४ या लेखात आपण जननी सुरक्षा योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेतली. शहरी तसेच ग्रामीण गर्भवती महिलांसाठी जननी सुरक्षा योजना कशी फायदेशीर आहे याबद्दल सविस्तर माहिती बघितली. जननी सुरक्षा योजनेसाठी अर्ज कसा करावा तसेच कोणती आवश्यक कागदपत्रे जोडावे या याबद्दल माहिती बघितली. केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी, बालकांसाठी , मुलींसाठी, महिलांसाठी त्यांच्या फायद्याच्या अनेक योजना राबवत असतात. अशा विविध योजनांबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. असे महत्त्वपूर्ण लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेख शेअर करा. लेख वाढल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.

FAQ :JANANI SURAKSHA YOJANA 2024 IN MARATHI |जननी सुरक्षा योजना २०२४

1) जननी सुरक्षा योजना कोणासाठी आहे?

ans: जननी सुरक्षा योजना ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील गर्भवती स्त्रियांसाठी आहे.

2) जननी सुरक्षा योजनेअंतर्गत कोणत्या सुविधा मिळतात?

ans: जननी सुरक्षा योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना प्रसूती आणि प्रसूतीनंतरच्या इतर सुविधा मोफत मिळतात.

3) जननी सुरक्षा योजनेअंतर्गत किती रक्कम मिळते?

ans: जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना 1,400/- रुपये मिळतात तर शहरी भागातील गर्भवती महिलांना ₹1000 मिळतात.

4) जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलेची प्रसूती सरकारी रुग्णालयात करणे आवश्यक आहे का?

ans: होय, जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलेची प्रसूती सरकारी रुग्णालयात किंवा शासन मान्य रुग्णालयात करणे आवश्यक आहे.

5) गर्भवती महिलेची प्रसूती घरीच झाली तर तिला किती मदत मिळते?

ans: गर्भवती महिलेची प्रसूती घरीच झाली तर तिला ₹500 इतकी मदत मिळते.

6) जननी सुरक्षा योजनेचा फॉर्म ऑनलाईन भरता येतो का?

ans: जननी सुरक्षा योजनेचा फॉर्म ऑनलाईन भरता येत नाही.

7) जननी सुरक्षा योजनेचा फॉर्म कसा भरावा?

ans: जननी सुरक्षा योजनेचा फॉर्म भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट ला जाऊन फॉर्म डाउनलोड करावा, फॉर्मची छायाप्रत घेऊन, फॉर्म व्यवस्थित भरून आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म अंगणवाडी किंवा शासकीय आरोग्य केंद्रात जमा करावा.

8) जननी सुरक्षा योजनेसाठी कोणते आवश्यक कागदपत्रे लागतात?

ans: जननी सुरक्षा योजनेसाठी बीपीएल रेशन कार्ड, आधार कार्ड, वोटर आयडी कार्ड, MCH कार्ड, रहिवासी दाखला, जननी सुरक्षा कार्ड, शासकीय रुग्णालयातून डिलिव्हरी प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, आयु प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक लागतात.

9) जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलेचे वय किती असावे?

ans: जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलेचे वय 19 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे.

10) जननी सुरक्षा योजनेचा लाभ किती अपत्यासाठी घेऊ शकतो?

ans: जननीसुरक्षा योजनेचा लाभ दोन अपत्त्यासाठी घेऊ शकतो.

11) गर्भवती महिलेचे सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यास जननी सुरक्षा योजनेअंतर्गत किती पैसे मिळतात?

ans: गर्भवती महिलेचे सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यास जननी सुरक्षा योजनेअंतर्गत 1500/- पैसे मिळतात.

हेही वाचा

राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/

अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/

लखपती दीदी योजना https://marathisampada.com/lakhpati-didi-yojana-2024/

प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/

सुकन्या समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/sukanya-samriddhi-yojana-2024-in-marathi/

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग https://marathisampada.com/pmfme-scheme-2024-in-marathi/

नमो ड्रोन दीदी योजना https://marathisampada.com/namo-drone-didi-yojana-in-marathi/

महिला समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/mahila-samriddhi-yojana-2024-in-marath/