HEALTH BENEFITS OF RAJGIRA IN MARATHI | राजगिर्‍याचे आरोग्यासाठी फायदे

HEALTH BENEFITS OF RAJGIRA IN MARATHI | राजगिर्‍याचे आरोग्यासाठी फायदे , राजगिरा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उपवास येतात. उपवासाच्या दिवशी राजगिऱ्याच्या पदार्थांचे सेवन केले जाते. परंतु राजगिरा इतका पौष्टिक आणि बहुगुणी आहे ज्यामुळे राजगिरा रोज खाल्ला तर आपल्या शरीराला खूप फायदा होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला राजगिरा मध्ये असलेले सर्व पोषण गुणधर्म माहीत असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे राजगिऱ्याच्या सेवनाने शरीराला कोणकोणते फायदे होतात हेदेखील माहीत असणे आवश्यक आहे.

राजगिरा हा शरीरासाठी शक्तीवर्धक तर आहेच त्याच बरोबर राजगिरा मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि आयर्न आढळून येतात. राजगिरा मध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलिक ऍसिड, झिंक, प्रोटीन आणि भरपूर प्रमाणात फायबर आढळतात. राजगिरा ला चौलाई, रामदाना आणि अमरंथ या नावाने देखील संबोधले जाते.

लहान मुलांच्या शारीरिक वाढीसाठी जसे की हाडांच्या मजबुतीसाठी हाडांच्या वाढीसाठी त्याच बरोबर त्यांचे डोळे निरोगी राहावे यासाठी, केसांची दातांची योग्य ती वाढ होण्यासाठी आपण नेहमीच सतर्क असतो. परंतु आहारातूनच असे काही पौष्टिक पदार्थ आपण मुलांना जर दिले तर त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी फायदाच होतो. राजगिरा हा एक असा पदार्थ आहे जो मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी पौष्टिक आणि बहुगुणी ठरतो. तसेच तरुण वयातील महिला, पुरुष आणि वयोवृद्ध लोक बऱ्याचदा अनेक शारीरिक समस्यांनी ग्रस्त झालेल्या आपण बघतो, तरुण वयातील महिलांमध्ये अशक्तपणा, हार्मोनल असंतुलन आढळून येते. वयोवृद्ध लोकांमध्ये डोळ्यांची कमजोरी दिसून येते. अशावेळी मेडिकल ट्रीटमेंट घेऊन फायदा होत नाही तर आपल्या दैनंदिन आहारात आपल्याला अशा काही पदार्थांचा समावेश करून घ्यावा लागतो जेणेकरून या समस्या दूर होऊ शकतील.

ज्या पद्धतीने आपण गहू तांदूळ ज्वारी बाजरी यासारख्या धान्य प्रकारांचा आपल्या आहारात समावेश करत असतो. त्याच पद्धतीने राजगिऱ्याचे पोषणमूल्य समजल्यानंतर आपण देखील राजगिऱ्याच्या आहारात नक्की समावेश करून घ्याल याची खात्री आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण इन्स्टंट गोष्टींकडे खूप लवकर आकर्षित होतो. परंतु या गोष्टी शरीरासाठी हानिकारक असतात. वृद्धापकाळात आपले शरीर सुदृढ आणि चांगले ठेवायचे असेल तर शरीराला योग्यता पोषण आहार मिळवून देणे गरजे आहे.

आजच्या HEALTH BENEFITS OF RAJGIRA IN MARATHI | राजगिर्‍याचे आरोग्यासाठी फायदे या लेखात आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच अनेक शारीरिक समस्यांवर उपाय ठरेल अशा राजगिरा या धान्य प्रकाराबद्दल माहिती घेणार आहोत. राजगिरा आपल्या आरोग्यासाठी कसा फायदेशीर आहे हे बघणार आहोत. त्याचबरोबर राजगिऱ्याच्या पासून बनवल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थांचे थोडक्यात माहिती घेणार आहोत.

HEALTH BENEFITS OF RAJGIRA IN MARATHI | राजगिर्‍याचे आरोग्यासाठी फायदे

HEALTH BENEFITS OF RAJGIRA IN MARATHI

राजगिरा मधील पोषणमूल्य (per 100 gm)

कॅलरीज: 251kcal

प्रोटीन:9.3gm

फॅट: 5.2gm

कार्बोहायड्रेट:46gm

मॅग्नीज:2.1mg

फॉस्फरस:364mg

मॅग्नेशियम:160mg

लोह:5.2mg

सेलेनियम:13.5mcg

कॉपर:0.4mg

राजगिऱ्याचे आरोग्यदायी फायदे:

राजगिऱ्याचे असलेले एकूण पोषणमूल्य:

राजगिरा मध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि फायबर आढळून येतात. त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह ही खनिजे आढळून येतात. राजगिरा मध्ये विटामिन के आणि विटामिन बी 6 उपलब्ध असते. राजगिरा मध्ये फोलेट देखील आढळून येते.

हाडांच्या मजबुतीसाठी:

राजगिरा मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते हे आपण बघितले. इतर धान्यांच्या तुलनेत राजगिरा मध्ये मध्ये जास्तच कॅल्शियम उपलब्ध असते. त्यामुळे हाडांच्या निर्मितीसाठी, हाडांच्या बळकटीसाठी आणि हाडांच्या मजबुतीसाठी रोजच्या आहारात आपण राजगिर्‍याचा वापर करणे फायद्याचे ठरते. नियमित राजगिऱ्याच्या सेवनाने ऑस्टिओपोरोसिस सारखे हाडांचे आजार दूर राहू शकतात.

हे हि वाचा

नागलीचे आरोग्यासाठी फायदे https://marathisampada.com/health-benefits-of-nachani-in-marathi/

बाजरीचे आरोग्यासाठी फायदे https://marathisampada.com/health-benefits-of-bajara-in-marathi/

ज्वारीचे आरोग्यासाठी फायदे https://marathisampada.com/health-benefits-of-jowar-in-marathi/

केसांच्या वाढीसाठी:

राजगिरा मध्ये भरपूर प्रमाणात लायसीन आणि सिस्टीन आढळून येतात ज्यामुळे केसांची वाढ व्हायला, केस दाट व्हायला, केस मजबूत व्हायला मदत होते. दैनंदिन आहारात राजगिरा चा समावेश केल्यास केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी:

राजगिरा मध्ये फायटो स्टेरॉल हे पोषण मध्ये आढळून येते जे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. कोलेस्ट्रॉल जास्त असणाऱ्या लोकांनी त्यांच्या आहारात नियमितपणे राजगिरा चा समावेश करावा.

डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी:

राजगिरा मध्ये विटामिन ए आढळून येते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी विटामिन ए गरजेचे असते. लहानांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांनीच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आहारात राजगिरा चा समावेश नक्की करावा.

HEALTH BENEFITS OF RAJGIRA IN MARATHI

वजन कमी करण्यासाठी:

राजगिरा मध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आढळून येतात. आपल्या शरीरातील पचनसंस्थेचे कार्य योग्य पद्धतीने चालण्यासाठी आणि आपले वजन नियंत्रणात राहण्यासाठी फायबर्स अत्यावश्यक असतात. त्यामुळे तुम्ही देखील वजन कमी करण्याचा विचार करत असाल किंवा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काही उपाययोजना करत असाल तर व्यायाम ,योग याचबरोबर आहारामध्ये राजगिरा चा समावेश नक्की करा.

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी:

राजगिरा मध्ये मुबलक प्रमाणात झिंक आणि विटामिन ए आढळून येते. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी झिंक आणि विटामिन ए मदत करतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात राजगिरा चा समावेश नक्की करा.

हे हि वाचा

६ ते १२ महिन्याच्या बाळासाठी आहार https://marathisampada.com/baby-food-recipes-in-marathi-for-6-12-month-baby/

२ वर्षाच्या बाळासाठी आहार तक्ता /आहार वेळापत्रक https://marathisampada.com/diet-chart-for-2-years-old-baby/

लहान मुलांसाठी लोह समृद्ध अन्नपदार्थ https://marathisampada.com/iron-rich-food-for-baby-in-marathi/

लहान मुलांच्या हाडांच्या वाढीसाठी कॅल्शियम युक्त आहार https://marathisampada.com/calcium-rich-food-for-baby-in-marathi/

मुलांसाठी भरड धान्यांपासून बनवलेल्या पाककृती भाग-१ https://marathisampada.com/millet-recipes-for-kids-in-marathi-part-1/

या प्रथिनेयुक्त आहाराने मुलांना बनवा एकदम हेल्दी https://marathisampada.com/protein-rich-food-for-kids-in-marathi/

शक्तिवर्धक:

राजगिरा मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येतात. प्रोटीनमुळे आपल्या शरीरातील स्नायूंचा योग्य विकास होतो योग्य वाढ होते आणि स्नायू मजबूत होतात. राजगिऱ्याच्या नित्य सेवनाने तुम्हाला शक्तीवर्धक वाटेल.

ग्लुटेन फ्री अन्नपदार्थ साठी पर्याय:

राजगिरा हे एक नैसर्गिक रित्या ग्लुटेन फ्री अन्नपदार्थ आहे. ग्लुटेन ची एलर्जी असणाऱ्या लोकांसाठी राजगिरा हा एक उत्तम पर्याय आहे.

राजगिऱ्याचे इतर आरोग्यासाठी चे फायदे खालील प्रमाणे:

1) राजगिरा मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट वाढवून येतात त्यामुळे राजगिरा हे शक्तीवर्धक आणि उत्साहवर्धक धान्य प्रकार मानले जाते.

2) राजगिरा मध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म आढळून येतात त्या फ्रीरॅडिकल पासून होणारा धोका टाळता येऊ शकतो.

3) राजगिरा मध्ये अँटी-इनफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे शरीरातील ज्या भागात सूज आली आहे ती सूज कमी व्हायला मदत होऊ शकते.

4) राजगिरा मध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आढळून येतात त्यामुळे बद्धकोष्ठतेचा सारख्या समस्येपासून दूर राहण्यास मदत होते.

5) राजगिरा मध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आढळून येत असल्यामुळे पोटाच्या समस्या, पोट दुखणे, पोट फुगणे कमी होण्यास मदत होऊ शकते.

6) राजगिरा हे लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचे काम राजगिरा करते.

7) राजगिरा मध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळून येते त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.

8) ॲनिमिया सारख्या समस्या असणाऱ्या लोकांनी नियमितपणे राजगिऱ्याचे सेवन नक्की करावे.

राजगिऱ्याचे कोणकोणते पदार्थ सेवन करू शकतो?

1) राजगिऱ्याच्या लाह्या:

राजगिऱ्याच्या लाह्या तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता. एकदा लाह्या बनवून ठेवल्यानंतर हवाबंद डब्यात त्या भरपूर दिवस टिकतात. राजगिऱ्याच्या लाह्या मुलांना दुधातून देऊ शकता.

2) राजगिऱ्याचे लाडू:

राजगिऱ्याच्या लाह्या तयार केल्यानंतर राजगिऱ्याचे लाडू करणे खूपच सोपे असते. गुळाचा पाक तयार करून तयार केलेल्या राजगिऱ्याच्या लाह्या टाकाव्यात. मिश्रण एकत्र करून थोडे थंड झाले की त्याचे लाडू वळावे.

HEALTH BENEFITS OF RAJGIRA IN MARATHI

3) राजगिऱ्याची चिक्की:

राजगिऱ्याची चिक्की देखील राजगिऱ्याच्या लाह्या पासूनच बनवतात. ज्या पद्धतीने आपण राजगिऱ्याचे लाडू बनवणार आहोत त्याच पद्धतीने राजगिऱ्याची चिक्की बनवली जाते.

HEALTH BENEFITS OF RAJGIRA IN MARATHI

4) राजगिरा चा शिरा

राजगिऱ्याचे दाणे कढईत भाजून घेऊ त्याचे पीठ तयार करून घ्यावे. हे पीठ तुपावर खमंग भाजून घ्यावे. गरम त्यानंतर त्याच्यात गरम पाणी टाकून झाकण ठेवून शिजवून घ्यावे. आवडीनुसार साखर आणि वेलची पूड घालून मिश्रण एकत्र करून घ्यावे. तयार झालेल्या राजगिरा चा शिरा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो.

5) राजगिऱ्याची भाकरी:

राजगिऱ्याचे पीठ तयार असेल तर राजगिऱ्याची भाकरी करणे खूप सोपे असते. ज्याप्रमाणे आपण ज्वारी बाजरीची भाकरी बनवतो त्याचप्रमाणे राजगिऱ्याची भाकरी बनवू शकता. ही भाकरी तुम्ही उपवासाच्या दिवशी खाऊ शकता.

6) राजगिऱ्याचे डोसे:

राजगिऱ्याच्या पिठापासून तुम्ही डोसे देखील तयार करू शकतात. डोसा बनविण्यासाठी लागणारे मिश्रण तयार करून घ्या. तव्यावर तेल किंवा तूप टाकून तयार मिश्रणापासून डोसे बनवून घ्या. बटाट्याची भाजी किंवा चटणी बरोबर देऊ शकता. नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

निष्कर्ष

आजच्या HEALTH BENEFITS OF RAJGIRA IN MARATHI | राजगिर्‍याचे आरोग्यासाठी फायदे या लेखात आपण राजगिरा या धान्य प्रकाराबद्दल सविस्तर माहिती घेतली. राजगिरा किती बहुगुणी आहे त्याच बरोबर राजगिरा मध्ये किती पोषणमूल्य उपलब्ध आहेत हे आपण बघितले. राजगिऱ्याचे आपल्या आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत याची सविस्तर माहिती घेतली. राजगिरा पासून कोण कोणते अन्नपदार्थ बनवले जाऊ शकतात याबद्दल थोडक्यात माहिती घेतली.लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. अशा महत्त्वपूर्ण विषयांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. धन्यवाद.

( लेखात सांगितलेले माहिती हे सर्वसामान्य ज्ञानाच्या आधारावर सांगितलेले आहे. तरीदेखील आहारात कोणत्याही प्रकारचा बदल करण्याआधी आपल्या आहार तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

हेही नक्की वाचा

वजन कमी करण्यासाठी स्त्री व पुरुषांसाठी टिप्स https://marathisampada.com/best-weight-loss-tips-for-men-and-women/

शाकाहारी प्रथिनेयुक्त आहार https://marathisampada.com/vegetarians-protein-diet-in-marathi/

वेगन डाएट म्हणजे नक्की काय ?https://marathisampada.com/vegan-diet-information-in-marathi/

वेगन डाएट करणाऱ्यांसाठी लोहयुक्त पदार्थ https://marathisampada.com/iron-rich-food-sources-for-vegan/

झटपट वजन वाढविण्यासाठी आहार https://marathisampada.com/food-for-weight-gain/