HEALTH BENEFITS OF NACHANI IN MARATHI | नाचणीचे आरोग्यासाठी फायदे , आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सुदृढ शरीर यष्टी साठी सगळेच प्रयत्न करत असतात. आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण पौष्टिक आहार घेत असतो. विविध फळे हिरव्या पालेभाज्या वेगवेगळे कडधान्ये त्यांचा आपल्या आहारात समावेश करत असतो.
आपल्या पौष्टिक आहार आपण नेहमीच वेगवेगळ्या धान्याचे सेवन करत असतो. आजकालच्या आधुनिक जीवनशैलीत आपण गहू आणि तांदूळ या धान्य प्रकारांचा जास्तीत जास्त उपयोग करतो. ह्या धान्याचा शरीराला फायदा होतोच परंतु पूर्वापार चालत आलेल्या काही धान्यांमध्ये नागली हे एक महत्वपूर्ण भरडधान्य आहे. शक्यतो ग्रामीण भागातील लोक आणि आदिवासी पट्ट्यातील जनता नागलीचे रोजच्या आहारात सेवन करतात.
नागली या धान्य प्रकारात इतके पोषण तत्व आहेत की आपण देखील आपल्या रोजच्या आहारात एका वेळेला नागली पासून बनवलेल्या पदार्थाचा उपयोग करावा असे मला वाटते. पूर्वी नागली हे खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे धान्य होते. परंतु काही काळानंतर ते एक दुर्लक्षित धान्य प्रकारात गणले गेले.
गेल्याच वर्षी आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2023 हे वर्ष इंटरनॅशनल मिलेट इयर असे घोषित केल्यानंतर मिलेट्स किंवा भरडधान्य म्हणजे काय? याबद्दल सर्वत्र माहिती उपलब्ध व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर भरडधान्य बद्दल लोकं सतर्क झाले. भरड धान्यांचे फायदे ऐकून आपल्या आहारात भरड धान्यांचा समावेश करण्यासाठी लोकांमध्ये जागृतता निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या या HEALTH BENEFITS OF NACHANI IN MARATHI | नाचणीचे आरोग्यासाठी फायदे लेखात आपण नागली या भरड धान्याची माहिती घेणार आहोत. नागलीचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत हे बघणार आहोत. तेव्हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
HEALTH BENEFITS OF NACHANI IN MARATHI | नाचणीचे आरोग्यासाठी फायदे
नागली मधील पोषणमूल्य (per 100 gm)
कॅलरीज:354 kcal
फॅट: 3.4 gm
कोलेस्टेरॉल: 0 mg
सोडियम :5 mg
पोटॅशियम : 40 mg
कार्बोहायड्रेट :80 gm
फायबर : 2.7 gm
शुगर :0.6 gm
प्रोटीन : 13 gm
नाचणीचे आरोग्यदायी फायदे:
हाडांच्या बळकटीसाठी:
नागली मध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम उपलब्ध असते. त्यामुळे नागली सेवनाचा हाडांच्या आरोग्यासाठी खूप चांगला उपयोग होतो. त्याचप्रमाणे नागली मुळे हाडांना बळकटी देखील मिळते. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वच जण नागली पासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन सहज करू शकतात. नाचणी पचायला देखील हलके असते त्यामुळे रोजच्या आहारात एका वेळेला नाचणी खाणे फायद्याचे ठरते. गरोदर महिलांना देखील नागली पासून बनवलेले पदार्थ दिल्याने त्यांच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते. तुम्ही नागली पासून नागलीची पेज, नागलीचे आंबिल, नागलीची भाकरी, नागलीचे थालीपीठ कसे बनवू शकता. एका रिसर्च पेपर नुसार असे सांगण्यात आले आहे की तांदळाच्या तुलनेत नागली मध्ये 30 पट जास्त कॅल्शियम असते.
हे हि वाचा
६ ते १२ महिन्याच्या बाळासाठी आहार https://marathisampada.com/baby-food-recipes-in-marathi-for-6-12-month-baby/
२ वर्षाच्या बाळासाठी आहार तक्ता /आहार वेळापत्रक https://marathisampada.com/diet-chart-for-2-years-old-baby/
लहान मुलांसाठी लोह समृद्ध अन्नपदार्थ https://marathisampada.com/iron-rich-food-for-baby-in-marathi/
लहान मुलांच्या हाडांच्या वाढीसाठी कॅल्शियम युक्त आहार https://marathisampada.com/calcium-rich-food-for-baby-in-marathi/
मुलांसाठी भरड धान्यांपासून बनवलेल्या पाककृती भाग-१https://marathisampada.com/millet-recipes-for-kids-in-marathi-part-1/
या प्रथिनेयुक्त आहाराने मुलांना बनवा एकदम हेल्दी https://marathisampada.com/protein-rich-food-for-kids-in-marathi/
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी:
आजकालच्या आधुनिक जीवनशैलीमुळे अनेकांना हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब या आरोग्य समस्येला सामोरे जावे लागते. दररोज रक्तदाबाची औषधे घेण्यापेक्षा काही घरगुती उपायांनी किंवा घरगुती पदार्थांनी आपण आपल्या शरीराचा रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकतो. शरीराचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात नागलीचे सेवन करू शकता. नागलीच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी:
नागली मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात त्यामुळे एकदा जेवल्यानंतर लगेचच भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नागली उत्तम पर्याय आहे. अनेक आहार तज्ञ वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात नागली चा समावेश करण्यास सांगतात. आहारात नागली चा समावेश केल्यामुळे वजन वाढीसाठी आळा बसतो. नागली मध्ये असणाऱ्या अमायनो ऍसिड मुळे भूक कमी लागते त्यामुळे देखील वजन नियंत्रणात राहते.
पचनक्रिया सुधारण्यासाठी:
नागली मध्ये भरपूर प्रमाणात फायबर उपलब्ध असतात. आपल्या शरीरातील अन्न पचविण्यासाठी आणि आपल्या पचन क्रियेचे कार्य योग्य रीतीने चालण्यासाठी फायबर मदत करतात. रोजच्या रोज योग्य प्रमाणात फायबर सेवन केल्यास बद्धकोष्ठता, पोट फुगणे, गॅसेसचा त्रास होणे यासारख्या समस्यांना आळा घालता येतो. या सर्व समस्या दूर करण्यासाठी रोजच्या आहारात नागली चा उपयोग करणे गरजेचे आहे.
मधुमेही रुग्णांसाठी:
आपल्या भारत देशात सर्वात जास्त रुग्ण हे मधुमेहाचे आहेत. आता तर बदललेल्या जीवनशैलीमुळे अगदी लहान वयात सुद्धा अनेकांना मधुमेह झाल्याचे आढळून येते. आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे मधुमेहाचे रुग्ण जास्तीत जास्त वाढत आहे. नाचणी हे लो ग्लायसेमिक भरडधान्य आहे. नाचणीच्या सेवनामुळे रक्तातील ग्लुकोज चे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी रोजच्या आहारात नागली चा वापर करणे फायद्याचे ठरते.
रक्त वाढीसाठी:
नागली मध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे दैनंदिन आहारात नागली पासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते त्याचप्रमाणे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत होते. हिमोग्लोबिन वाढल्यामुळे ॲनिमिया सारख्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. ॲनिमिया असणाऱ्या रुग्णांनी रोजच्या आहारात नागली पासून बनलेले पदार्थ सेवन केले तर रक्त वाढीसाठी मदत होते.
स्तनपान करणाऱ्या मातांसाठी:
गरोदर महिला किंवा स्तनपान करणाऱ्या मातांसाठी नागलीची पेज किंवा नागलीची भाकरी फायद्याची ठरते. नागली मध्ये भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम आणि अमायनो ऍसिड असल्यामुळे आईच्या दुधातून हे सर्व पोषक तत्व बाळापर्यंत पोहोचतात. बाळाच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी हे पोषण तत्व आवश्यक असतात. नागली खाल्ल्यामुळे स्तनपान करणाऱ्या मातेच्या दुधामध्ये देखील वाढ होते त्यामुळे बाळाला भरपूर प्रमाणात दूध उपलब्ध होते आणि या दुधातून बाळाला जास्तीत जास्त प्रमाणात पोषक तत्वे मिळतात.
नागलीचे इतर आरोग्यासाठी चे फायदे खालील प्रमाणे:
1) आजारपणातील शारीरिक अशक्तपणा दूर करण्यासाठी नागलीची पेज हा उत्तम आहार आहे.
2) सतत पोट दुखी होत असेल किंवा सतत अपचन होत असेल तर नागली खाल्ल्याने या समस्या दूर होतात.
3) नागली ही मुळात थंड असते त्यामुळे शरीरात सतत उष्णता वाढत असेल उष्णतेचा त्रास होत असेल तर नागली खाल्ल्याने फायदा होतो.
4) शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये फॅट म्हणजेच चरबी साठवून न ठेवण्याचे काम नागली करते.
5) नागली मध्ये भरपूर प्रमाणात फायटोकेमिकल्स असतात जे कर्करोगासारख्या आजारा विरुद्ध उत्तम कार्य करतात.
6) नागली मध्ये भरपूर प्रमाणात लोह असल्यामुळे लाल रक्त पेशी निर्माण करण्याचे काम नागली करते.
7) नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे दात, हाडे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहते.
8) नागली मध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असल्यामुळे नागलीचे सेवन करणे त्वचेसाठी खूप फायदे आहेत असे ठरते.
9) नागलीच्या नियमित सेवनाने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
नागलीचे सेवन कोणी टाळावे?
योग्य प्रमाणात नागलीचे सेवन शरीराला कोणत्या प्रकारचे फायदे होतात हे आपण बघितलं परंतु अतिप्रमाणात नागलीचे सेवन केल्यास शरीराला काही प्रमाणात हानी पोहोचते
1) थायरॉईड संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तींनी नागलीचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
2) किडनी स्टोन असणाऱ्या व्यक्तीने नागलीचे सेवन योग्य प्रमाणात करावे.
3) Goiter या आजाराने तुम्ही ग्रस्त असाल तर नागलीचे सेवन टाळावे.
नागलीचे कोणकोणते पदार्थ सेवन करू शकतो?
1) नागलीचे पापड:
आपल्याकडे उन्हाळ्यात नागलीचे पापड बनवले जातात. विकतचे चिप्स खाण्यापेक्षा रोजच्या आहारात तळून किंवा भाजून नागली चा पापड खाल्ल्यास फायदा होतो.
2) नागलीचे थालीपीठ:
नागलीचे पीठ, बेसन पीठ, गव्हाचे पीठ, जिरे, आलं, लसुन, कांदा, कोथिंबीर, मीठ एकत्र करून घट्टसर गोळा करून त्याचे थालीपीठ बनवून तव्यावर दोन्ही बाजूने खमंग भाजल्यास मुले आवडीने खातात. नागलीच्या थालीपीठ नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
3) नागलीचे धिरडे:
नागलीचे थालीपीठ करण्यास वेळ नसेल तर नागलीच्या धिरडे बनवू शकतात त्यात नागलीचे पीठ, जिरे, लसुन, हिरवी मिरची, कोथिंबीर, रवा आणि मीठ घालून पातळ पीठ भिजवावे. तव्याला तेल लावून त्यावर पातळसर धिरडे चांगले भाजून घ्यावे. हा देखील नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
4) नागलीचे लाडू:
नागलीचे पीठ, तूप आणि गुळ यांचा वापर करून अतिशय पौष्टिक असे नागलीचे लाडू बनवू शकतो. हे लाडू बनवून ठेवल्यास जास्त दिवस टिकतात. दररोज मुलांना एक लाडू दिल्यास नागलीचे सर्व पोषणमूल्य त्यांना मिळू शकतात. महिलांनी देखील दररोज नागली चा एक तरी लाडू खावा.
5) नागलीची पेज:
तुपावर नागलीचे पीठ खमंग भाजून बाजूला घेतल्यानंतर तेलात थोडे जिरे, कढीपत्ता,, लसूण, हिरवी मिरची टाकून चांगले परतून घेऊन त्यात भाजलेले नागलीचे पीठ टाकावे पाणी टाकून पातळसर पेज तयार करावे चवीनुसार मीठ टाकावे. पेज चांगली शिजल्यानंतर तुम्ही ही पेज लहान मुले तसेच वयस्कर व्यक्तींना देऊ शकता.
6) नागलीची भाकरी:
रोजच्या आहारात आपण गव्हाची पोळी, तांदळाची, ज्वारीची, बाजरीची भाकरी खात असतो त्याचबरोबर आपण आपल्या आहारात नागलीच्या भाकरीचा समावेश केल्यास आपल्या शरीरासाठी खूप फायदा होऊ शकतो .
निष्कर्ष
आजच्या HEALTH BENEFITS OF NACHANI IN MARATHI | नाचणीचे आरोग्यासाठी फायदे लेखात आपण आपल्या आरोग्यासाठी नागली हे भरडधान्य किती फायदेशीर आहे हे बघितलं. आपल्या आरोग्यासाठी कोण कोणते फायदे आहे याची सविस्तर माहिती घेतली. त्याचबरोबर नागली पासून बनवलेले कोणकोणते पदार्थ आपण रोजच्या आहाराचे जेवण करू शकतो याबद्दल माहिती घेतली. लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. अशा महत्त्वपूर्ण विषयांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. धन्यवाद.
( लेखात सांगितलेले माहिती हे सर्वसामान्य ज्ञानाच्या आधारावर सांगितलेले आहे. तरीदेखील आहारात कोणत्याही प्रकारचा बदल करण्याआधी आपल्या आहार तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)
हेही नक्की वाचा
वजन कमी करण्यासाठी स्त्री व पुरुषांसाठी टिप्स https://marathisampada.com/best-weight-loss-tips-for-men-and-women/
शाकाहारी प्रथिनेयुक्त आहार https://marathisampada.com/vegetarians-protein-diet-in-marathi/
वेगन डाएट म्हणजे नक्की काय ?https://marathisampada.com/vegan-diet-information-in-marathi/
वेगन डाएट करणाऱ्यांसाठी लोहयुक्त पदार्थ https://marathisampada.com/iron-rich-food-sources-for-vegan/
झटपट वजन वाढविण्यासाठी आहार https://marathisampada.com/food-for-weight-gain/