HEALTH BENEFITS OF JOWAR IN MARATHI | ज्वारीचे आरोग्यासाठी फायदे ,तंतुमय पदार्थांचे म्हणजेच फायबरचे भरपूर प्रमाणात ज्वारी या धान्य प्रकारात उपलब्ध असते. देशातील शहरी भागात गव्हाची पोळी, तांदळाची किंवा बाजरीची भाकरी खाल्ली जाते. परंतु ग्रामीण भागात आजही ज्वारीची भाकरी खाल्ली जाते. ज्वारीमध्ये पोषणमूल्य आढळून येतात.
ज्वारीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात त्याच बरोबर मॅग्नेशियम, कॅल्शियम, तांबे, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, लोह आढळून येतात. ज्वारीमध्ये विटामिन B1,B2,B3,B9 देखील आढळून येतात. हे सर्व पोषण मूल्य लक्षात घेता ज्वारीला सुपर फूड म्हटले जाते हे खरेच आहे.
महाराष्ट्राच्या बऱ्याच ग्रामीण भागामध्ये आजही ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ज्वारीच्या 30 प्रजाती आहेत. परंतु खाण्यायोग्य फक्त एकच प्रजात आहे. अनेक पोषण मूल्यांनी समृद्ध असे हे ज्वारीचे पीक आहे. ग्रामीण भागात आजही शेतकरी माणसे ज्वारीची भाकरी खाणे पसंत करतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्वारी पासून बनवलेले अन्नपदार्थ सर्वांना शक्तीवर्धक असतात. गव्हाची पोळी किंवा तांदळाची भाकरी पेक्षा ज्वारीमध्ये जास्त पोषण मूल्य आहेत.
पूर्वापार चालत आलेले हे धान्य प्रकार आजच्या आधुनिक जगातील आपल्या आयुष्यात आपण वापरले तर बरेचसे आजार नियंत्रणात राहण्यासाठी मदत होऊ शकते. पूर्वीच्या काळी रोजच्या आहारात बाजरी ज्वारी या धान्य प्रकारांचा आहारात समावेश असायचा त्यामुळे बरेचसे आजार नियंत्रणात राहण्यास मदत होत असे. पूर्वीच्या काळी ज्वारी बाजरी खाल्लेले आपले आजी-आजोबा आजही निरोगी आणि तंदुरुस्त आहे हे आपण सर्वच जाणतो.
आजच्या HEALTH BENEFITS OF JOWAR IN MARATHI | ज्वारीचे आरोग्यासाठी फायदे या लेखात आपण बहुगुणी अशा ज्वारी बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. ज्वारीचे अभ्यास आरोग्यासाठी काय फायदे आहेत याची माहिती घेणार आहोत. ज्वारीपासून बनविलेल्या कोणकोणत्या अन्नपदार्थ आपण आहारात समावेश करू शकतो याची थोडक्यात माहिती बघणार आहोत.
HEALTH BENEFITS OF JOWAR IN MARATHI | ज्वारीचे आरोग्यासाठी फायदे
ज्वारी मधील पोषणमूल्य (per 100 gm)
कॅलरीज: 329kcal
कर्बोदके: 72.1gm
प्रथिने:10.6gm
चरबी:3.5 gm
फायबर:6.7 gm
लोह: 4.4mg
कॅल्शियम:13mg
मॅग्नेशियम:165mg
फॉस्फरस:289mg
पोटॅशियम:363mg
जस्त:1.6mg
व्हिटॅमिन B1 (थायमिन):0.35MG
विटामिनB2 ( रायबोफ्लेविन):0.14mg
विटामिन B3 ( नियासिन): 2.1mg
विटामिन B9 ( फोलेट):20μg
ज्वारीचे आरोग्यदायी फायदे:
हाडांच्या मजबुतीसाठी:
वरती सांगितलेल्या पोषण मूल्यानुसार ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस आढळून येतात. ही सर्व खनिजे हाडांच्या निर्मितीसाठी, हाडांच्या मजबुतीसाठी आणि हाडाच्या बळकटी करण्यासाठी अत्यावश्यक असतात. हाडांच्या वेगवेगळ्या आजारांपासून जसे की ऑस्टिओपोरोसिस पासून दूर राहण्यासाठी रोजच्या आहारात ज्वारीपासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश नक्की करा.
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी:
आजच्या आधुनिक जीवनात तरुण वयातील मुला मुलींपासून तर वयोवृद्ध लोकांना रक्तदाबाचा त्रास होताना आपण बघतो. रक्तदाबाचा त्रास चालू होऊ नये यासाठी आपण आपल्या रोजच्या आहारात काही लहान लहान बदल करू शकता. त्यातीलच एक म्हणजे आपण रोजच्या आहारात ज्वारी चा समावेश करून घेऊ शकतो. ज्वारीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात आढळून येते त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते.
वजन वाढीला आळा घालण्यासाठी:
ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर आढळून येतात. त्याचप्रमाणे ज्वारीमध्ये कॅलरीचे प्रमाणही खूप कमी असते. ज्वारीपासून तयार केलेले अन्नपदार्थ रोजच्या आहारात सेवन केल्यास आपण वजन वाढीला आळा घालू शकतो. त्याचप्रमाणे जे लोकं वजन कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत त्यांनी आवर्जून ज्वारीचे सेवन करावे.
हे हि वाचा
नागलीचे आरोग्यासाठी फायदे https://marathisampada.com/health-benefits-of-nachani-in-marathi/
बाजरीचे आरोग्यासाठी फायदे https://marathisampada.com/health-benefits-of-bajara-in-marathi/
पचनक्रिया सुधारण्यासाठी:
ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आढळून येतात. फायबर बरोबरच इतर अनेक खनिज तत्त्वे आढळतात. आपल्या शरीरातील पचनक्रिया सुधारण्यासाठी किंवा आपण शरीरात घेतलेल्या अन्नाचे योग्य वेळेत योग्य पचन होण्यासाठी फायबर अत्यावश्यक असतात. जर आपण ज्वारीचे नियमित सेवन केले तर आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्याच बरोबर सततची पोट दुखी, बद्धकोष्ठता, गॅसेस, पोट फुगणे यासारख्या पोटासंबंधी समस्यांपासून आपण दूर राहू शकतो.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी:
ज्वारी हे लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या धन्य प्रकार आहे. मधुमेह रुग्णांसाठी त्यांच्या शरीरातील रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्वारी हा एक उत्तम पर्याय आहे. त्याचप्रमाणे मधुमेही रुग्णांना गहू तांदूळ कमी प्रमाणात खायला सांगितले जातात. त्यांच्यासाठी ज्वारी हा एक चांगला पर्याय आहे.
रक्त वाढीसाठी:
ज्वारी मध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळून येते. त्यामुळे ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे किंवा ॲनिमिया सारख्या आजाराने ग्रस्त अशा रुग्णांनी ज्वारीचे सेवन आवश्यक करावे. ज्वारीच्या नित्य सेवनाने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते त्याच बरोबर लाल रक्तपेशींचे प्रमाण देखील वाढते.
ऊर्जा वर्धक:
ज्वारीमध्ये आढळून येणारे कर्बोदके शरीराला भरपूर ऊर्जा पुरवतात. ज्वारीमध्ये आढळून येणारे कर्बोदके ही शरीरात हळूहळू पचतात त्यामुळे शरीराला जास्त वेळ ऊर्जा टिकून राहते. अनेक क्रीडापटू त्यांच्या आहारात ज्वारीच्या समावेश आवर्जून करतात जेणेकरून त्यांच्या शहरात दिवसभर ऊर्जा टिकून राहावे त्याच बरोबर शरीराची सहनशक्ती वाढावी.
हे हि वाचा
६ ते १२ महिन्याच्या बाळासाठी आहार https://marathisampada.com/baby-food-recipes-in-marathi-for-6-12-month-baby/
२ वर्षाच्या बाळासाठी आहार तक्ता /आहार वेळापत्रक https://marathisampada.com/diet-chart-for-2-years-old-baby/
लहान मुलांसाठी लोह समृद्ध अन्नपदार्थ https://marathisampada.com/iron-rich-food-for-baby-in-marathi/
लहान मुलांच्या हाडांच्या वाढीसाठी कॅल्शियम युक्त आहार https://marathisampada.com/calcium-rich-food-for-baby-in-marathi/
मुलांसाठी भरड धान्यांपासून बनवलेल्या पाककृती भाग-१ https://marathisampada.com/millet-recipes-for-kids-in-marathi-part-1/
या प्रथिनेयुक्त आहाराने मुलांना बनवा एकदम हेल्दी https://marathisampada.com/protein-rich-food-for-kids-in-marathi/
ग्लुटेन फ्री अन्नपदार्थ साठी पर्याय:
ज्वारी हे नैसर्गिक रित्या ग्लुटेन फ्री असलेला धान्य प्रकार आहे. ग्लुटेन ची एलर्जी असणाऱ्या लोकांसाठी ज्वारी हा एक उत्तम पर्याय आहे. ग्लुटेन मुळे निर्माण होणाऱ्या पचनसंस्थेच्या आणि इतर आरोग्याच्या समस्यांना कमी करण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात ज्वारी चा समावेश नक्की करा.
ज्वारीचे इतर आरोग्यासाठी चे फायदे खालील प्रमाणे:
1) ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात कर्बोदके असल्यामुळे दिवसभराची ऊर्जा मिळविण्यासाठी आपण आहारात ज्वारी चा समावेश करावा.
2) ज्वारी पासून बनवलेल्या अन्नपदार्थ शक्तीवर्धक असतात.
3) ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स उपलब्ध असतात त्यामुळे ज्वारीच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेचा समस्येपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते.
4) ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे कर्करोगासारखे रोग आपल्या शरीरापासून दूर ठेवण्यासाठी मदत होते.
5) ज्वारीपासून बनवलेले अन्नपदार्थांचे नियमित सेवन केल्यास पोटाच्या सर्व आजारांपासून दूर राहता येऊ शकते.
6) ज्वारी ही पचायला हलकी असल्यामुळे लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांना तुम्ही ज्वारी पासून बनवलेले अन्नपदार्थ देऊ शकता.
7) हृदयविकार, रक्तदाब, तसेच मधुमेह यासारखे आजार आटोक्यात राहण्यासाठी रोजच्या ज्वारी चा समावेश नक्की करा.
8) त्वचेचे आजार असणाऱ्या लोकांनी किंवा त्वचारोग कमी करण्यासाठी रोजच्या आहारात ज्वारीचा वापर नक्की करा.
9) वजन नियंत्रणात आणण्यासाठी त्याचबरोबर लठ्ठपणा कमी करण्यासाठी हृदयाच्या आहारात ज्वारीचा समावेश करा.
10) रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारीचा आहारात उपयोग करा.
11) हाडांच्या बळकटीसाठी रोजच्या आहारात नियमितपणे ज्वारी पासून बनवलेल्या अन्नपदार्थ नक्की घ्या.
12) सततची पोट दुखी, गॅसेस होणे, पोट फुगणे यासारख्या पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी आहारात नियमितपणे ज्वारीचे सेवन करावे.
13) ग्लुटेन ची एलर्जी असणाऱ्या लोकांनी प्रामुख्याने ज्वारीचे सेवन करावे.
14) लहान मुलांना आणि स्तनपान करणाऱ्या मातांना ज्वारीची पेज किंवा ज्वारीची भाकरी देऊ शकता. त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी ही शक्तीवर्धक असते.
15) रोजच्या आहारातील गहू तांदूळ या धान्य प्रकाराला पर्याय म्हणून ज्वारीचा आहारात समावेश करावा.
ज्वारीचे कोणकोणते पदार्थ सेवन करू शकतो?
1) ज्वारीच्या लाह्या:
ज्वारीपासून लाह्या बनविल्या जातात. ह्या लाह्या तुम्ही लहान मुलांना देऊ शकता.
2) ज्वारीचे थालीपीठ:
ज्वारी बरोबरच आवडीनुसार इतर सर्व पीठे एकत्र करून घ्या त्यात आलं, लसुन, मिरची , कांदा, कोथिंबीर आणि मीठ टाकून घट्टसर गोळा मळून घ्या. त्याचे थालीपीठ बनवून तव्यावर दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्या. भाजताना तेलाचा किंवा तुपाचा वापर करा. नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
3) ज्वारीचे पॅनकेक:
ज्वारीच्या पीठापासून घरच्या घरी गोड चवीचे पॅनकेक बनवू शकता. हे पॅन केक मुले आवडीने खातात.
4) ज्वारीची खिचडी:
ज्वारी आणि तुरीची डाळ स्वच्छ धुऊन घ्या.तेलामध्ये कांदा टोमॅटो बटाटा लसुन परतून घ्यावे. त्यात आवडीनुसार इतर मसाले टाकावे. मसाले व्यवस्थित परतल्यानंतर ज्वारीचे आणि तुरीच्या डाळीचे मिश्रण घालावे. आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ घालून खिचडी मऊ शिजवून घ्यावे. थोडी थंड झाल्यावर तूप टाकून तुम्ही सर्व्ह करू शकतात.
5) ज्वारीची भाकरी:
आपण रोजच्या आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करू शकतो. ज्वारीच्या भाकरी मुळे ज्वारीतील सर्व पोषणमूल्य आपल्याला मिळतात.
निष्कर्ष
आजच्या HEALTH BENEFITS OF JOWAR IN MARATHI | ज्वारीचे आरोग्यासाठी फायदे या लेखात आपण ज्वारीच्या विविध गुणधर्म बद्दल माहिती घेतली. आपल्या आरोग्यासाठी ज्वारीचे काय काय फायदे आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेतली. त्याच बरोबर रोजच्या आहारात ज्वारीपासून बनवलेले कोण कोणते अन्नपदार्थ आपण खाऊ शकतो याबद्दल थोडक्यात माहिती बघितले. टेक्नो लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. अशा महत्त्वपूर्ण विषयांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. धन्यवाद.
( लेखात सांगितलेले माहिती हे सर्वसामान्य ज्ञानाच्या आधारावर सांगितलेले आहे. तरीदेखील आहारात कोणत्याही प्रकारचा बदल करण्याआधी आपल्या आहार तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)
हेही नक्की वाचा
वजन कमी करण्यासाठी स्त्री व पुरुषांसाठी टिप्स https://marathisampada.com/best-weight-loss-tips-for-men-and-women/
शाकाहारी प्रथिनेयुक्त आहार https://marathisampada.com/vegetarians-protein-diet-in-marathi/
वेगन डाएट म्हणजे नक्की काय ?https://marathisampada.com/vegan-diet-information-in-marathi/
वेगन डाएट करणाऱ्यांसाठी लोहयुक्त पदार्थ https://marathisampada.com/iron-rich-food-sources-for-vegan/
झटपट वजन वाढविण्यासाठी आहार https://marathisampada.com/food-for-weight-gain/