HEALTH BENEFITS OF FLAX SEEDS IN MARATHI | जवस खाण्याचे आरोग्यासाठी फायदे

HEALTH BENEFITS OF FLAX SEEDS IN MARATHI | जवस खाण्याचे आरोग्यासाठी फायदे , FLAX SEED म्हणजे जवसाच्या बिया त्यालाच आपण आळशीच्या बिया असेही म्हणतो. जवसाच्या बिया आपल्या घरी सहज उपलब्ध असतात. या बिया आपण फक्त बडीशोप बनवताना किंवा मुखवास बनवताना त्यात टाकतो. या जवसाच्या बिया आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे याची साधी कल्पनाही आपल्याला नाही.

या जवसाच्या बिया बियांच्या स्वरूपात, पावडरच्या स्वरूपात किंवा तेलाच्या स्वरूपात वापरल्या जातात. जवसाच्या बिया कोणत्याही स्वरूपात वापरल्या तरीही आपल्या शरीराला त्याचा फायदाच होतो.

जवसाच्या बिया दिसायला लहान आणि चॉकलेटी रंगाच्या असतात. दिसायला जरी या बिया खूप लहान असल्या तरी पोषण मूल्यांनी परिपूर्ण आहेत. भारतामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि बिहारमध्ये जवसाचे उत्पादन घेतले जाते.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे आपण दिवसेंदिवस आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड देत आहोत. सतत औषधी खाण्यामुळे आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. आरोग्याच्या समस्या काही प्रमाणात कमी करण्यासाठी आपण आहारात योग्य तो बदल करू शकतो. दररोज व्यायाम, योग करून आरोग्याच्या समस्या काही प्रमाणात कमी करू शकतो.

आज आपण या लेखात जवसाच्या बियांचा आरोग्यासाठी काय फायदा आहे हे बघणार आहोत. साधारणपणे वजन कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, मधुमेह असणाऱ्यांसाठी, केसांच्या वाढीसाठी त्याचबरोबर कर्करोगासारख्या अतिशय गंभीर रोगाचा धोका कमी होण्यासाठी जवसाच्या बिया फायदेशीर ठरतात.

जवसाच्या बिया मध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात. त्याचबरोबर झिंक, लोह, मॅंगनीज आणि विटामिन A, विटामिन D आढळून येते. ओमेगा 3 फॅटी ॲसिड सी फूड मध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. परंतु जर तुम्ही शाकाहारी असाल तर जवसाच्या बिया तुमच्यासाठी ओमेगा 3 फॅटी ऍसिड चा उत्तम स्त्रोत आहे. त्याचबरोबर जवसाच्या बिया मध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आढळून येतात.

आजच्या HEALTH BENEFITS OF FLAX SEEDS IN MARATHI | जवस खाण्याचे आरोग्यासाठी फायदे या लेखात आपण जवसाच्या बिया खाण्याचे आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत हे बघणार आहोत. त्याचबरोबर जवसाच्या बिया मध्ये कोणकोणते पोषणमूल्य असतात याची सविस्तर माहिती घेणार आहोत. जवसाच्या बियांचा दैनंदिन आहारात कसा वापर करू याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

HEALTH BENEFITS OF FLAX SEEDS IN MARATHI | जवस खाण्याचे आरोग्यासाठी फायदे

HEALTH BENEFITS OF FLAX SEEDS IN MARATHI

जवसाच्या बियांमधील पोषणमूल्य (per 100 gm)

कॅलरीज: 534 kcal

फॅट: 42 gm

कार्बोहायड्रेट: 29 gm

प्रोटीन: 18 gm

फायबर:27.9 gm

कॅल्शियम: 255 mg

आयन: 5.73 mg

मॅग्नेशियम : 392 mg

फॉस्फरस: 642 mg

हे हि वाचा

नागलीचे आरोग्यासाठी फायदे https://marathisampada.com/health-benefits-of-nachani-in-marathi/

बाजरीचे आरोग्यासाठी फायदे https://marathisampada.com/health-benefits-of-bajara-in-marathi/

ज्वारीचे आरोग्यासाठी फायदे https://marathisampada.com/health-benefits-of-jowar-in-marathi/

राजगिऱ्याचे आरोग्यासाठी फायदेhttps://marathisampada.com/health-benefits-of-rajgira-in-marathi/

जवसाच्या बिया खाण्याचे आरोग्यासाठी फायदे:

जवसाच्या बियांमध्ये असलेले एकूण पोषणमूल्य:

जवसाच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर्स आढळून येतात. त्याचबरोबर इतर धान्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळून येतात. जवसाच्या बियांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, झिंक आणि फॉस्फरस आढळून येतात. त्याचबरोबर जवसाच्या बियांमध्ये विटामिन A आणि विटामिन D उपलब्ध असते.

हाडांच्या मजबुतीसाठी:

जवसाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. त्यामुळे रोजच्या आहारात नियमितपणे जवसाच्या बियांचा समावेश हाडे दुखणे, सांधेदुखी त्याचबरोबर हाडांच्या इतर समस्या आराम मिळू शकतो. महिलांमध्ये हाडांचे दुखणे जास्त प्रमाणात आढळून येते. त्यामुळे विशेष करून महिलांनी नियमितपणे जवसाचे सेवन करावे.

केसांच्या वाढीसाठी:

नियमितपणे केसांना जवस लावल्यास केस गळती कमी होते. त्याचबरोबर तुमच्या डोक्यावरील त्वचेला योग्य प्रमाणात आद्रता पुरवली गेल्यामुळे केसांची वाढ जलद गतीने होते.

HEALTH BENEFITS OF FLAX SEEDS IN MARATHI

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी:

जवसा मध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि लिग्नन आढळून येते. या दोघांमुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. एका अभ्यासानुसार असे सांगण्यात आले आहे की नियमितपणे जवसाच्या बियांचे सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी 6 ते 11 टक्क्यांनी कमी होऊ शकते.

हे हि वाचा

६ ते १२ महिन्याच्या बाळासाठी आहार https://marathisampada.com/baby-food-recipes-in-marathi-for-6-12-month-baby/

२ वर्षाच्या बाळासाठी आहार तक्ता /आहार वेळापत्रक https://marathisampada.com/diet-chart-for-2-years-old-baby/

लहान मुलांसाठी लोह समृद्ध अन्नपदार्थ https://marathisampada.com/iron-rich-food-for-baby-in-marathi/

लहान मुलांच्या हाडांच्या वाढीसाठी कॅल्शियम युक्त आहार https://marathisampada.com/calcium-rich-food-for-baby-in-marathi/

मुलांसाठी भरड धान्यांपासून बनवलेल्या पाककृती भाग-१ https://marathisampada.com/millet-recipes-for-kids-in-marathi-part-1/

या प्रथिनेयुक्त आहाराने मुलांना बनवा एकदम हेल्दी https://marathisampada.com/protein-rich-food-for-kids-in-marathi/

हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी:

जवसाच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, प्रोटीन्स, फायबर्स, विविध प्रकारची खनिजे आणि वेगवेगळे जीवनसत्व आढळून येतात. ही सर्व पोषणमूल्य हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत करतात. नियमितपणे जवसाच्या बियांचे सेवन केल्यास कर्करोग, हृदयरोग, आणि मधुमेह या रोगांचा धोका कमी होऊ शकतो.

HEALTH BENEFITS OF FLAX SEEDS IN MARATHI

वजन कमी करण्यासाठी:

जवसाच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणत फायबर असतात त्यामुळे थोडे खाल्ले तरी पोट नेहमी भरल्यासारखे वाटते .जर तुम्ही वजन कमी करायचा विचार करत असाल किंवा वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर जवसाच्या बियांचे सेवन नक्की करा .

पोटाच्या समस्यांपासून आराम मिळविण्यासाठी :

जवसाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येतात. जितके जास्त प्रमाणात शरीरात फायबर जातात तितकी आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. आणि पचनशक्ती सुधारली की बद्धकोष्ठता सारखे समस्यांपासून दूर राहता येते.त्याचबरोबर पोटात दुखणे , पोट फुगणे या सारख्या आरोग्य समस्या देखील कमी होतात .

HEALTH BENEFITS OF FLAX SEEDS IN MARATHI

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी:

लहान पणापासूनच जवसाच्या बियांचे सेवन केल्यास त्यातील सर्वच पोषण मुल्ये आपल्याला मिळतात त्याच बरोबर रोगप्रतिकार शक्ति वाढविण्यास मदत होते .

त्वचेचा पोत सुधारण्यासाठी:

उन्हाळ्यात त्वचेचा दाह होतो अशावेळी जवसाच्या बियांपासून बनवलेले मिश्रण त्वचेला लावल्यास त्वचेचा दाह कमी होतो. त्याचबरोबर त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी जवसाच्या बिया वापराव्या.नियमित पणे जवसाच्या तेलाचा वापर केल्यास त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते .

कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी:

जवसाच्या बियांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतात. हे फॅटी ॲसिड कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करतात. त्यामुळे नियमितपणे जवसाच्या बियांचे सेवन केल्यास कर्करोगापासून धोका कमी होऊ शकतो. स्तनाच्या कर्करोगापासून दूर राहण्यासाठी देखिल जवसाच्या बिया मदत करतात .

मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी:

मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे असते अशावेळी नियमितपणे जवसाचे बियाचे सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते असे एका अहवालात आढळून आले आहे.पावडर स्वरुपात जवसाच्या बियांचे सेवन करणे मधुमेही रुग्णांसाठी फायद्याचे ठरते .

ग्लुटेन फ्री बिया:

गहू तांदूळ या धान्यांमध्ये ग्लुटेन आढळून येते. परंतु जवसाच्या बिया नैसर्गिक ग्लुटेन फ्री आहेत. त्यामुळे जवसाच्या बियांचे पचन सहज रित्या होते. गहू आणि तांदुळाचे सेवन केल्यानंतर त्याचे पचन होण्यास अधिक वेळ लागतो कारण त्यात ग्लुटेन असते .

जवसाच्या बिया कोणी खाऊ नये?

1) जास्त प्रमाणात जवसाच्या बियांचे सेवन बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

2) जास्त प्रमाणात जवसाच्या बियांचे सेवन अतिसाराचा त्रास होऊ शकतो.

3) गरोदरपणात जवसाच्या बिया खाऊ नये.

4) स्तनपान करणाऱ्या मातांनी देखील जवसाच्या बियांचे सेवन करू नये.

5) जवसाच्या बियांचे सेवन करणे आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

6) योग्य प्रमाणात जवसाच्या बियांचे सेवन शरीराला फायदेशीरच ठरेल परंतु अति प्रमाणातील सेवन टाळावे.

जवसाच्या बियांचे सेवन कसे करावे?

1) जवसाचे तेल:

जवसाच्या बियांपासून तयार केलेले तेल तुम्ही वापरू शकता. त्यामुळे जवसाच्या बियांचे संपूर्ण फायदे तुम्हाला मिळू शकतील. परंतु हे तेल स्वयंपाक करण्यासाठी वापरू वापरू नये. जवसाचे तेल तुम्ही स्मूदी मध्ये किंवा शेक मध्ये मिसळून घेऊ शकता.

जवसाच्या बियांपासून तयार केलेले तेल तुम्ही त्वचेला लावू शकता. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचेतील आद्रता टिकून राहते.

2) जवसाच्या बियांची चटणी:

जवसाच्या बिया भाजून शेंगदाण्याची किंवा तिळाची चटणी करतो त्याप्रमाणे आपण जवसाच्या बियांची चटणी करू शकतो. तुम्ही रोजच्या आहारात या चटणीचा समावेश करू शकता.

3) जवसाच्या बियांची पावडर:

तुम्ही जवसाच्या बियांची पावडर करू शकता ही पावडर भाजी बनवताना इतर मसाल्याबरोबर भाजी टाकू शकतात. जवसाच्या बियांच्या पावडर मुळे भाजीची चव आणखीनच वाढेल आणि अशा पद्धतीने तुम्ही जवसाच्या बियांचे सेवन करू शकता.

4) मुखवास बनवताना:

बडीशोप किंवा मुखवास बनवताना तुम्ही जवसाच्या बिया भाजून त्यात टाकू शकतात. दररोज जेवल्यानंतर एक चमचा बडीशेप खाताना जवसाच्या बिया देखील तुमच्या पोटात जातील. अन्न पचन सुधारणे त्याच बरोबर जवसाच्या बियांचे शरीराला फायदे होतील.

5) जवसाच्या बिया पाण्यात भिजवून:

एक चमचा जवसाच्या बिया तुम्ही रात्रभर पाण्यात भिजवून ठेवू शकता. सकाळी उठल्यावर उपाशीपोटी पाणी पिऊन भिजवलेल्या जवसाच्या बिया खाल्ल्याने शरीराला जवसाच्या बियांमधील सर्व पोषणमूल्य मिळतात.

निष्कर्ष

आजच्या HEALTH BENEFITS OF FLAX SEEDS IN MARATHI | जवस खाण्याचे आरोग्यासाठी फायदे लेखात आपण जवसाच्या बिया खाण्याचे आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेतली. जवसाच्या बिया कोणी खाऊ नये हेही बघितले त्याचबरोबर जवसाच्या बियांचे सेवन आपण कशाप्रकारे करू शकतो हे बघितले.लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. अशा महत्त्वपूर्ण विषयांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. धन्यवाद.

( लेखात सांगितलेले माहिती हे सर्वसामान्य ज्ञानाच्या आधारावर सांगितलेले आहे. तरीदेखील आहारात कोणत्याही प्रकारचा बदल करण्याआधी आपल्या आहार तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

हेही नक्की वाचा

वजन कमी करण्यासाठी स्त्री व पुरुषांसाठी टिप्स https://marathisampada.com/best-weight-loss-tips-for-men-and-women/

शाकाहारी प्रथिनेयुक्त आहार https://marathisampada.com/vegetarians-protein-diet-in-marathi/

वेगन डाएट म्हणजे नक्की काय ?https://marathisampada.com/vegan-diet-information-in-marathi/

वेगन डाएट करणाऱ्यांसाठी लोहयुक्त पदार्थ https://marathisampada.com/iron-rich-food-sources-for-vegan/

झटपट वजन वाढविण्यासाठी आहार https://marathisampada.com/food-for-weight-gain/