HEALTH BENEFITS OF BAJARA IN MARATHI | बाजरीचे आरोग्यासाठी फायदे

HEALTH BENEFITS OF BAJARA IN MARATHI | बाजरीचे आरोग्यासाठी फायदे , भाकरी म्हटलं की डोळ्यासमोर बाजरीची भाकरी येते. गरम गरम भाकरी त्यावर तूप आणि गुळ एकत्र करून खायची मजा काही औरच असते. आपण रोजच्या आहारात गव्हाची पोळी, तांदळाची, ज्वारीची भाकरी खातच असतो. परंतु बाजरीची भाकरी हा ग्रामीण भागातील मुख्य आहार मानला जातो.

महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजरीचे पीक घेतले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या आहारात बाजरी चा समावेश असतोच . बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस आणि अमायनो ऍसिड यासारखे पोषक तत्व आढळून येतात. या पोषक तत्त्वांवर बरोबरच बाजरीमध्ये रायबोप्लेविन, फॉलिक ऍसिड आणि बीटा कॅरेटिन देखील आढळून येतात. बाजरी शरीराला आरोग्यदायी आहे त्याचबरोबर लहानांपासून मोठ्यांपर्यंत बाजरी ही शक्तीवर्धक देखील आहे.

आजच्या आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि गहू आणि तांदूळ यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश झाल्यामुळे बाजरी या धान्य प्रकाराकडे दुर्लक्ष झाले आहे. परंतु गहू आणि तांदूळ यापेक्षाही बाजरीमध्ये जास्त पोषणमूल्ये आढळून येतात. पूर्वीच्या काळी ज्वारी ,बाजरी यासारख्या धान्य प्रकारांचा रोजच्या आहारात समावेश असायचा त्यामुळे बरेचसे आजार नियंत्रणात होते. मधुमेह, उच्च रक्तदाब, वजन वाढणे यासारख्या आरोग्याच्या समस्या त्या काळात खूप कमी प्रमाणात आढळून येत होत्या. अजूनही भारतातील बहुतेक ग्रामीण भागात बाजरीची भाकरी दैनंदिन आहारात खाल्ली जाते.

गेल्या वर्षी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी इंटरनॅशनल मिलेट इयर म्हणून 2023 हे वर्ष घोषित केले.ही घोषणा झाल्यानंतर मिलेट्स म्हणजे काय याबद्दल माहिती उपलब्ध व्हायला सुरुवात झाली. बाजरी हेदेखील एक मिलेट्स आहे हे त्यावेळी अनेकांना लक्षात आले. मिलेट्स जसे बहुगुणी आहे त्याप्रमाणे बाजरीमध्ये देखील भरपूर प्रमाणात पोषणमूल्य उपलब्ध आहेत हे लोकांच्या लक्षात यायला लागले त्यामुळे शहरी भागातील अनेकांचा कल बाजरी कडे वळला. बाजरीची पोषणमूल्य समजून घेऊन बाजरी पासून विविध खाद्यपदार्थ कशाप्रकारे बनवले जातात याबद्दल माहिती उपलब्ध व्हायला सुरुवात झाली आहे.

अशा बहुगुणी बाजरी बद्दल आजच्या या HEALTH BENEFITS OF BAJARA IN MARATHI | बाजरीचे आरोग्यासाठी फायदे लेखात आपण माहिती घेणार आहोत. बाजरी मध्ये किती प्रमाणात कोणकोणते पोषण मूल्य उपलब्ध असतात हे बघणार आहोत. त्याचबरोबर आपल्या शरीरासाठी बाजरी फायदेशीर आहे याची सविस्तर माहिती बघणार आहोत.

HEALTH BENEFITS OF BAJARA IN MARATHI | बाजरीचे आरोग्यासाठी फायदे

HEALTH BENEFITS OF BAJARA IN MARATHI

बाजरीमधील पोषणमूल्य (per 100 gm)

पाणी : 12 gm

चरबी: 5 gm

कार्ब्स :65 gm

खनिजे : 2 gm

फायबर: 1 gm

लोह: 8 mg

फॉस्फरस: 240 mg

कॅल्शियम: 40 mg

पोटॅशियम: 284 mg

हे हि वाचा

नागलीचे आरोग्यासाठी फायदे https://marathisampada.com/health-benefits-of-nachani-in-marathi/

बाजरीचे आरोग्यदायी फायदे:

हाडांच्या मजबुतीसाठी:

बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस आढळून येतात. हाडांच्या वाढीसाठी, हाडांच्या बळकटीसाठी आणि हाडाच्या मजबूतीसाठी कॅल्शियम खूप गरजेचे असते. आपले आजी-आजोबा हे आधीपासूनच त्यांच्या रोजच्या आहारात बाजरीच्या भाकरीचे सेवन करत होते त्यामुळे आता उतार वयात देखील त्यांची हाडे मजबूत आहे हे आपल्या लक्षात येते. रोजच्या आहारात बाजरीच्या भाकरीचे सेवन करणे हे हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरते.

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी:

आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे अनेकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होताना आढळून येतो. उच्च रक्तदाबासाठी एकदा गोळ्या औषधे चालू झाले की ते औषध न चुकता दररोज घेणे गरजेचे होते. परंतु बाजरीमध्ये उपलब्ध असलेले पोटॅशियम शरीरातील रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण कार्य करते. त्यामुळे रोजच्या आहारात बाजरी चा समावेश केल्यास तुम्ही रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकता.

हे हि वाचा

६ ते १२ महिन्याच्या बाळासाठी आहार https://marathisampada.com/baby-food-recipes-in-marathi-for-6-12-month-baby/

२ वर्षाच्या बाळासाठी आहार तक्ता /आहार वेळापत्रक https://marathisampada.com/diet-chart-for-2-years-old-baby/

लहान मुलांसाठी लोह समृद्ध अन्नपदार्थ https://marathisampada.com/iron-rich-food-for-baby-in-marathi/

लहान मुलांच्या हाडांच्या वाढीसाठी कॅल्शियम युक्त आहार https://marathisampada.com/calcium-rich-food-for-baby-in-marathi/

मुलांसाठी भरड धान्यांपासून बनवलेल्या पाककृती भाग-१https://marathisampada.com/millet-recipes-for-kids-in-marathi-part-1/

या प्रथिनेयुक्त आहाराने मुलांना बनवा एकदम हेल्दी https://marathisampada.com/protein-rich-food-for-kids-in-marathi/

वजन कमी करण्यासाठी:

बाजरी मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात त्याचप्रमाणे कॅलरीजचे प्रमाणही खूप कमी आहे. त्यामुळे कमी करणाऱ्यांसाठी वजन कमी करणाऱ्यांसाठी बाजरी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. बाजरी खाल्ल्यामुळे खूप वेळ पोट भरल्यासारखे राहते. लवकर भूक लागत नाही त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते. वजन कमी करणाऱ्या लोकांनी त्यांच्या रोजच्या आहारात बाजरीचा समावेश नक्की करावा.

पचनक्रिया सुधारण्यासाठी:

बाजरी मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे अन्नपचनाची क्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी बाजरी मदत करते. बाजरी मुळे तुमच्या आतड्यांची पचनाची क्षमता वाढते. पचन योग्य पद्धतीने आणि सुरळीत होते. बद्धकोष्ठता, गॅसेस, पोट फुगणे, सतत पोटात दुखणे यासारख्या समस्या कमी करण्यासाठी रोजच्या आहारात बाजरीचा समावेश नक्की करा.

HEALTH BENEFITS OF BAJARA IN MARATHI

मधुमेही रुग्णांसाठी:

मधुमेही रुग्णांना गहू तांदूळ न खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे बाजरी पासून बनवलेले अन्नपदार्थ खाणे त्यांच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय आहे. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम तसेच इतर अनेक खनिजे आढळून येतात ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मधुमेह ग्रस्त रुग्णांनी आहारात बाजरीचा समावेश नक्की करावा.

रक्त वाढीसाठी:

बाजरी मध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळून येते. बाजरीच्या दैनंदिन सेवनामुळे ॲनिमिया सारख्या आजारापासून दूर राहण्यास मदत होते. बाजरीच्या नित्य सेवनामुळे शरीरातील हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढते. त्याचबरोबर लाल रक्तपेशी वाढण्यास देखील मदत होते.

स्तनपान करणाऱ्या मातांसाठी आणि लहान मुलांसाठी:

लहान मुलांसाठी त्याचप्रमाणे स्तनपान करणाऱ्या मातांसाठी बाजरी हे परिपूर्ण अन्न आहे. बाजरी मध्ये असणारे सर्व पोषणमूल्य लहान मुलांच्या शरीर वाढीसाठी अत्यावश्यक आहे. बाजरी ही पचायला हलकी असल्यामुळे लहान मुलांनी किंवा स्तनपान करणाऱ्या मातांनी बाजरीचे सेवन केल्यास पचनास त्रास होत नाही.

वृद्धत्वाची लक्षणे कमी करते:

बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट आढळून येतात. हे अँटिऑक्सिडंट फ्री रॅडिकल्स मुळे आपल्या त्वचेचे होणारे नुकसान कमी करते. चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करते त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील वृद्धत्वाच्या सुरकुत्या, रेषा आणि सूज कमी करण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात बाजरीचा समावेश करू शकता.

ग्लुटेन फ्री अन्नपदार्थ साठी पर्याय:

गहू तांदूळ यामध्ये ग्लुटेन आढळून येते. भरपूर लोकांना ग्लुटेन चे एलर्जी असते. अशावेळी ग्लुटेन फ्री अन्नपदार्थ म्हणून आपण बाजरीचा उपयोग करू शकतो. बाजरी ग्लुटेन फ्री आहे. बाजरी मध्ये भरपूर प्रमाणात ऑंटी एक्सीडेंट, प्रोटीन, फायबर आणि इतर पोषणमूल्य आढळून येतात त्यामुळे तुमच्या रोजच्या आहारात बाजरीचा समावेश नक्की करा.

बाजरीचे इतर आरोग्यासाठी चे फायदे खालील प्रमाणे:

1) बाजरी पासून बनवलेले अन्न पदार्थ हे शक्तिवर्धक असतात त्यामुळे शारीरिक अशक्तपणा कमी करण्यासाठी बाजरीचे सेवन करू शकता.

2) बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि खनिजे उपलब्ध असतात त्यामुळे शारीरिक रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

3) हिवाळ्यात नियमित बाजरीचे सेवन केल्यास शरीरात उष्णता निर्माण होण्यास मदत होते.

4) हिवाळ्यात अनेकांना बद्धकोष्ठतेचा सारख्या शारीरिक समस्येला सामोरे जावे लागते अशावेळी बाजरीचे सेवन केल्यास यासाठी बद्धकोष्ठतेचा सारख्या शारीरिक समस्या कमी होऊ शकतात.

5) तुम्हाला वारंवार पोटाच्या समस्या होत असल्यास जसे की पोट फुगणे ,गॅसेस, पोट दुखी यासारख्या समस्यांना दूर ठेवण्यासाठी आहारात बाजरीचा समावेश नक्की करा.

6) वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर आहारात नियमित बाजरीचा समावेश करा.

7) शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात बाजरीचा समावेश करा.

8) शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात बाजरी सेवन नक्की करावे.

9) हिवाळ्यात शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी बाजरी पासून बनवलेल्या विविध अन्नपदार्थांच्या आहारात समावेश करावा.

10) हाडांच्या वाढीसाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी आहारात नियमितपणे बाजरी पासून बनवलेले विविध अन्नपदार्थ खावे.

HEALTH BENEFITS OF BAJARA IN MARATHI

बाजरीचे कोणकोणते पदार्थ सेवन करू शकतो?

1) बाजरीची लापशी:

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बाजरीचे लापशी आवडते. बाजरी आणि मुगाची डाळ स्वच्छ धुऊन कुकरमध्ये शिजवून त्यानंतर त्यात गुळाचे पाणी जायफळ ,वेलची, सुकामेवा खालून परत एकदा शिजवून घेऊन खायला द्यावी.

2) बाजरीचे थालीपीठ:

बाजरीचे, गव्हाचे, बेसन पीठ एकत्र करून त्यात जिरे,आलं, लसुन, कांदा, कोथंबीर, मीठ टाकून घट्टसर गोळा मळून घ्यावा. त्याचे थालीपीठ बनवून तव्यावर तेल किंवा तूप टाकून दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्या.

3) बाजरीचे डोसे:

बाजरीच्या पिठापासून तुम्ही डोसे बनवू शकता. हे डोसे चटणी किंवा सांबार बरोबर सर्व्ह करू शकता. बाजरीचे डोसे नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे.

4) बाजरीची खिचडी:

तांदळाची बनवतो त्याचप्रमाणे बाजरीची खिचडी बनवली जाते. बाजरी स्वच्छ धुऊन काही काळ भिजत ठेवावे त्यानंतर आवडीनुसार इतर डाळी घ्याव्यात. तेलामध्ये कांदा टोमॅटो बटाटा लसुन परतून घ्यावे. त्यात इतर मसाले घालून त्यात भिजवलेली बाजरी आणि डाळ टाकावी. एकत्र करून आवश्यकतेनुसार पाणी टाकावे. चवीनुसार मीठ टाकून खिचडी मऊ शिजवून घ्यावे.

5) बाजरीची भाकरी:

रोजच्या आहारात बाजरीच्या भाकरी चा समावेश केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे आपल्या एका वेळच्या आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश नक्की करा.

HEALTH BENEFITS OF BAJARA IN MARATHI

निष्कर्ष

आजच्या HEALTH BENEFITS OF BAJARA IN MARATHI | बाजरीचे आरोग्यासाठी फायदे या लेखात आपण बाजरीच्या विविध गुणधर्म बद्दल सविस्तर माहिती बघितली . बाजरीचे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी कोण कोणते फायदे आहेत याची सविस्तर माहिती बघितले. बाजरी पासून कोणकोणते पदार्थ बनवले जाऊ शकतात याबद्दल थोडक्यात माहिती बघितली.लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. अशा महत्त्वपूर्ण विषयांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. धन्यवाद.

( लेखात सांगितलेले माहिती हे सर्वसामान्य ज्ञानाच्या आधारावर सांगितलेले आहे. तरीदेखील आहारात कोणत्याही प्रकारचा बदल करण्याआधी आपल्या आहार तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

हेही नक्की वाचा

वजन कमी करण्यासाठी स्त्री व पुरुषांसाठी टिप्स https://marathisampada.com/best-weight-loss-tips-for-men-and-women/

शाकाहारी प्रथिनेयुक्त आहार https://marathisampada.com/vegetarians-protein-diet-in-marathi/

वेगन डाएट म्हणजे नक्की काय ?https://marathisampada.com/vegan-diet-information-in-marathi/

वेगन डाएट करणाऱ्यांसाठी लोहयुक्त पदार्थ https://marathisampada.com/iron-rich-food-sources-for-vegan/

झटपट वजन वाढविण्यासाठी आहार https://marathisampada.com/food-for-weight-gain/