HAR GHAR NAL YOJANA 2024 | हर घर नल योजना २०२४ , केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील प्रत्येक कुटुंबात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे. हा या योजनेचा उद्देश आहे. हर घर नल योजनेला जल जीवन मिशन असेही म्हटले जाते. हर घर नल योजनेच्या अंतर्गत देशातील प्रत्येक घरात नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोचविण्यासाठी नळ कनेक्शन देणे हे काम पूर्ण करण्यासाठी 2030 पर्यंत चे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. परंतु आता 2024 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
HAR GHAR NAL YOJANA 2024 | हर घर नल योजना २०२४ योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नळाची सुविधा पुराणात येणार आहे. प्रत्येक घरात शुद्ध पाण्याचा पुरवठा केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यात देखील सुधारणा होणार आहे. विविध साथीच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी मदत होणार आहे.
HAR GHAR NAL YOJANA 2024 | हर घर नल योजना २०२४ योजना अंतर्गत देशातील प्रत्येक घरात नळ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना दूरवर पायपीट करण्याची गरज भासणार नाही. पूर्वी कुटुंबातील स्त्रियांना किंवा पुरुषांना देखील पाण्यासाठी खूप दूरवर पायपीट करून पाणी आणावे लागत असे. ते पाणी शुद्ध असेलच याची शाश्वती पण नसायची. त्यामुळे विविध साथीचे रोग पसरत असे. आणि मग आरोग्याच्या समस्या उद्भवल्या की त्यासाठी उपचार घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती ही तितकीशी चांगली नसे. परंतु हर घर नल योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला पाणी पुरवले जाणार आहे. त्यामुळे सर्वच समस्या सुटणार आहेत. नागरिकांना आरोग्याच्या समस्या युद्ध होणार नाही. आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. प्रतिव्यक्ती प्रतिदिन 55 लिटर पाणी वापरते असे गृहीत धरून त्या दराने प्रत्येक कुटुंबाला पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
HAR GHAR NAL YOJANA 2024 | हर घर नल योजना २०२४ योजनेला जल जीवन मिशन असेही संबोधले जाते. या जल जीवन मिशन अंतर्गत देशातील प्रत्येक घराघरात शुद्ध पिण्याचे पाणी पोचविला जाणार आहे त्यासाठी प्रत्येक घरात नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. तसेच प्रतिदिन प्रतिव्यक्ती 55 लिटर या दराने शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 2030 पर्यंत प्रत्येक राज शुद्ध पाणी पोहचवण्याचे उद्दिष्ट होते परंतु आता 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घराघरात नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पोचवणे हे ध्येय ठरविण्यात आले आहे. या लेखात आपण हर घर नल योजना नक्की काय आहे? योजनेसाठी अर्ज कसा करावा? योजनेसाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्र? तसेच योजनेसाठी कोणत्या पात्रता व अटी आहेत? याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यामुळे लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
HAR GHAR NAL YOJANA 2024 | हर घर नल योजना २०२४
हर घर नल योजनेचा उद्देश:
हर घर नल योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की देशातील ग्रामीण व शहरी भागात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवणे.
हर घर नल योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पिण्याचे पाणी पोचविण्यासाठी नळ कनेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हर घर नल योजनेसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार 50 50 टक्के खर्च करणार आहेत.
हर घर नल योजनेअंतर्गत शुद्ध पिण्याचे पाणी प्रत्येक घरात पोहोचवून नागरिकांचे आरोग्य सुधारणे हादेखील आहे.
हर घर नल योजनेअंतर्गत नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी घरपोच पोहोचत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दूरवर जाऊन पायपीट करणे कमी होईल. आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी देखील उद्भवणार नाहीत.
नागरिकांचे जीवनमान उंचावले जाईल.
तसेच शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्यामुळे साथीच्या रोगांना अटकाव बसेल.
2030 पर्यंत प्रत्येक राज शुद्ध पाणी पोहचवण्याचे उद्दिष्ट होते परंतु आता 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घराघरात नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पोचवणे हे ध्येय ठरविण्यात आले आहे.
हर घर नल योजनेअंतर्गत शुद्ध पिण्याचे पाणी नळाद्वारे घरपोच मिळणार असल्यामुळे नागरिकांची वेळेचीही बचत होईल.
हर घर नल योजनेअंतर्गत प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर या दराने शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
प्रत्येक पातळीवर हर घर नल योजनेचे काम करणाऱ्या संस्था:
राष्ट्रीय स्तर- राष्ट्रीय जलजीवन अभियान
राज्य स्तर- राज्य जल आणि स्वच्छता अभियान
जिल्हास्तर- जिल्हा पाणी आणि स्वच्छता अभियान
ग्रामपंचायत स्तर- पाणी समिती/ गाव पाणी आणि स्वच्छता समिती/ वापरकर्ता गट
हर घर नल योजनेसाठी मंजूर झालेला निधी:
हर घर नल योजनेचा एकूण खर्च अंदाजे 3.60 लाख कोटी रुपये इतका आहे.
विविध राज्यांसाठी मंजूर झालेला निधी:
1) केंद्रशासित प्रदेश: 100% खर्च केंद्र सरकार करणार आहे.
2) हिमालयीन आणि ईशान्येकडील राज्य: 90% केंद्र सरकार आणि 10% राज्य सरकार खर्च करणार आहे.
3) इतर सर्व राज्यांसाठी: 50% केंद्र सरकार आणि 50% राज्य सरकार खर्च करणार आहे.
केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा
राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/
अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/
लखपती दीदी योजना https://marathisampada.com/lakhpati-didi-yojana-2024/
प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/
सुकन्या समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/sukanya-samriddhi-yojana-2024-in-marathi/
हर घर नल योजनेअंतर्गत कोण कोणती कामे केली जातील?
1) प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी मिळावे यासाठी गावात पाणीपुरवठा साठीच्या सुविधा निर्माण करणे.
2) प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रत्येक घराला नळ कनेक्शन देणे.
3) नैसर्गिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये वाढ करणे.
4) पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे जतन करणे.
5) प्रत्येक घराला नळ कनेक्शन देण्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईन काम पूर्ण करणे.
हर घर नल योजनेचे वैशिष्ट्ये आणि फायदे:
1) देशातील ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे हा मुख्य उद्देश आहे.
2) हर घर नल योजनेअंतर्गत प्रत्येक घराला नळ कनेक्शन मिळणार आहे.
3) ग्रामीण भागातील प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचे पाणी होणार आहे.
4) शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे नागरिकांच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे. आणि त्यांचे जीवनमानही उंचावेल.
5) केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत नळ कनेक्शन मिळणार असल्यामुळे दूरवर पायपीट करत जाऊन पाणी आणण्याची गरज भासणार नाही.
6) केंद्र सरकार प्रतिदिन प्रतिव्यक्ती 55 लिटर पाणी या दराने पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देणार आहे.
हर घर नल योजने साठी अर्ज करण्याची प्रक्रिया:
1) हर घर नल योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करताना सर्वप्रथम जल जीवन मिशन च्या ऑफिशिअल वेबसाईट ला भेट द्या.
2) तुमच्यासमोर एक होमपेज ओपन होईल त्यावर apply now या पर्यायावर क्लिक करा.
3) समोर ओपन झालेल्या नवीन पेजवर तुमची वैयक्तिक माहिती जसे की तुमचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी इत्यादी सर्व माहिती व्यवस्थित टाका.
4) वेबसाईटवर सांगितलेली महत्त्वाचे कागदपत्रे अपलोड करा.
5) सर्व कागदपत्रे अपलोड करून झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा.
6) अशा प्रकारे हर घर नल योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होते.
केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग https://marathisampada.com/pmfme-scheme-2024-in-marathi/
नमो ड्रोन दीदी योजना https://marathisampada.com/namo-drone-didi-yojana-in-marathi/
महिला समृद्धी योजना २०२४ https://marathisampada.com/mahila-samriddhi-yojana-2024-in-marath/
जननी सुरक्षा योजना २०२४ https://marathisampada.com/janani-suraksha-yojana-2024-in-marathi/
माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ https://marathisampada.com/mazi-kanya-bhagyashree-yojana-2024-in-marathi/
हर घर नल योजनेसाठी पात्रता:
हर घर नल योजनेसाठी एकच पात्रता लावण्यात आलेला आहे तो असा की हर घर नल योजनेसाठी करणारा अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
हर घर नल योजनेसाठी आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे:
आधार कार्ड
रहिवासी दाखला/ पत्त्याचा पुरावा/ निवास प्रमाणपत्र
वयाचा पुरावा
उत्पन्नाचा दाखला
पासपोर्ट आकाराचे फोटो
मोबाईल नंबर
ई-मेल आयडी
निष्कर्ष:
HAR GHAR NAL YOJANA 2024 | हर घर नल योजना २०२४ या लेखात आपण हर घर नल योजनेची सविस्तर माहिती घेतली. या योजनेचे महत्त्वपूर्ण कार्य काय आहे. तसेच या योजनेअंतर्गत कशाप्रकारे नळ कनेक्शन पुरवले जाणार आहे हे बघितले. शेतकऱ्यांसाठीच्या महिलांसाठीच्या मुलींसाठीच्या केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांची सविस्तर माहिती वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविण्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.
FAQ: HAR GHAR NAL YOJANA 2024 | हर घर नल योजना २०२४
1) हर घर नल योजना काय आहे?
ans: हर घर नल योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक कुटुंबात शुद्ध पिण्याचे पाणी पोचविण्यासाठी नळ कनेक्शन पुरवले जाणार आहे.
2) हर घर नल योजनेअंतर्गत किती लिटर पाणी पुरवले जाणार आहे?
ans: हर घर नल योजनेअंतर्गत प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पिण्याचे पाणी पुरविले जाणार आहे.
3) हर घर नल योजनेसाठी पात्रता काय आहे?
ans: हर घर नल योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा
प्रधान मंत्री मातृ वंदना योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-matru-vandana-yojana-2024-in-marathi/
लेक लाडकी योजना २०२४ https://marathisampada.com/lek-ladki-yojana-2024-in-marathi/
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२४ https://marathisampada.com/widow-pension-scheme-2024-in-marathi/
प्रधान मंत्री मुद्रा योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-mudra-yojana-2024/
आयुष्मान भारत योजना २०२४ https://marathisampada.com/ayushaman-bharat-yojana-2024/
प्रधान मंत्री कौशल विकास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-kaushal-vikas-yojana-2024/
प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-ujjwala-yojana-2024/
प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना २०२४ https://marathisampada.com/pm-kisan-sanman-nidhi-yojana-2024/
प्रधान मंत्री सौभाग्य योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-saubhagya-yojana-2024/