GOBAR-DHAN YOJANA 2024 |गोबर-धन योजना २०२४

GOBAR-DHAN YOJANA 2024 |गोबर-धन योजना २०२४, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या विभागामार्फत गोबर धन योजना राबविण्यात येत आहे. GOBAR-DHAN (Galvanizing Organic Bio-Agro Resources- Dhan) गोबर धन योजना भारत सरकारचा ग्रामीण भागात राबविण्यात येणारा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

ग्रामीण भागातील स्वच्छता कायमस्वरूपी टिकवण्यासाठी गावातील गुरे ढोरे आणि सेंद्रिय कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. गोबर धन योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागात स्वच्छता ठेवणे, गुरांना पासून तयार होणाऱ्या कचऱ्यातून ऊर्जा निर्मिती करणे सेंद्रिय खत तयार करणे याचबरोबर ग्रामीण भागातील कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न वाढवणे हा आहे. भारतातील ग्रामीण भागाने आधीच उघड्यावर शौचास मुक्त (ODF) हा उपक्रम राबवून तो परिपूर्ण देखील केला आहे त्यामुळे गोबर धन उपक्रमाचे महत्व आणखीनच वाढले आहे. आणि हा उपक्रम राबवून गावांना ODF PLUS दर्जा प्राप्त करण्यासाठी मदत होईल.

GOBAR-DHAN YOJANA 2024 |गोबर-धन योजना २०२४ योजनेमुळे ग्रामीण भागातील लोकांना विशेष करून महिलांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या योजनेअंतर्गत जनावरांचे शेण, शेतात जमा होणारा घनकचरा गोळा करणे त्याची साठवणूक करणे याला प्रोत्साहन दिले जाणार आहे. साठवलेल्या शेणाचा, कचऱ्याचा बायोगॅस तयार करण्यासाठी उपयोग केला जाईल. आणि हेच स्वच्छ बायोगॅस इंधन प्रत्येक घराघरात पोहोचवले जाऊन महिलांना स्वयंपाक करण्यासाठी याचा उपयोग होईल. महिलांचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढणार असून. शेतकरी स्वावलंबी होणार आहेत त्याचबरोबर गाव स्वच्छ ठेवणे म्हणजेच देश स्वच्छ ठेवणे हा हेतू होणार आहे.

GOBAR-DHAN YOJANA 2024 |गोबर-धन योजना २०२४ योजनेअंतर्गत गावातील लोकांना त्यांची गुरे ढोरे त्यापासून मिळणारे शेण आणि शेताचा कचरा व्यवस्थापित करण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी मदत मिळेल, जनावरांपासून मिळणाऱ्या शेणाचा आणि सेंद्रिय कचऱ्या चा बायोगॅस मध्ये रुपांतरीत करण्यासाठी मदत मिळेल, ग्रामीण भागातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आणि गाव स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिले जाईल त्याचप्रमाणे गोबर धन युनिट्स ची स्थापना, त्याचे संचालन आणि व्यवस्थापन करण्यासाठी उद्योजक, स्वयंसहाय्यता गट आणि युवकांना सहभागी करून योग्य ते प्रशिक्षण देऊन ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि उत्पन्न निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील.

GOBAR-DHAN YOJANA 2024 |गोबर-धन योजना २०२४ योजनेअंतर्गत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नवीन कचऱ्याचा प्लांट उभारले जाणार आहेत. कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी सरकार 500 प्लांट उभारणार आहे. यात 200 बायोगॅस प्लांट असणार आहेत. तसेच शहरी भागात 75 प्लांटची उभारणी करण्यात येणार आहे. याशिवाय 300 समुदाय किंवा क्लस्टर आधारित प्लांट्स चा यात समावेश असणार आहे. गोबर धन योजनेसाठी सरकारकडून 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केले जाणार आहे.

GOBAR-DHAN YOJANA 2024 |गोबर-धन योजना २०२४

GOBAR DHAN YOJANA 2024

गोबर धन योजने चा मुख्य उद्देश:

1) GOBAR-DHAN YOJANA 2024 |गोबर-धन योजना २०२४ योजनेअंतर्गत 500 नवीन वेस्ट टू वेल्थ प्लांट्स ची स्थापना केली जाईल.

2) यामध्ये 200 कॉम्प्रेसर बायोगॅस (CBG) प्लांट चा समावेश असेल. यात शहरी भागात 75 प्लांट असतील. त्याचप्रमाणे 300 सामुदायिक किंवा क्लस्टर आधारित प्लांट असतील.

3) गोबर धन योजनेसाठी सरकारमार्फत 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

4) गोबर धन योजनेच्या घोषणे दरम्यान सात प्राधान्यक्रम (सप्तर्षी) सांगितले आहेत ते खालील प्रमाणे:

1) सर्वसमावेशक विकास

2) शेवटच्या घटकापर्यंत विकास

3) पायाभूत सुविधांचा विकास

4) क्षमतांमध्ये वाढ करणे

5) ग्रीन ग्रोथ

6) युवाशक्ती

7) आर्थिक क्षेत्र

5) ग्रामीण भागातील कचऱ्याचे योग्यरीत्या विल्हेवाट लावून पर्यावरणातील स्वच्छतेला प्रोत्साहन देणे आणि वेस्टरजन्य रोगांना आळा घालने.

6)गोबर धन युनिट्स ची स्थापना, त्याचे संचालन आणि व्यवस्थापन करण्यासाठी उद्योजक, स्वयंसहाय्यता गट आणि युवकांना सहभागी करून योग्य ते प्रशिक्षण देऊन ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि उत्पन्न निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील.

गोबर धन योजनेअंतर्गत विविध मॉडेल:

1) वैयक्तिक कुटुंब:

ज्या घरांमध्ये तीन किंवा त्यापेक्षा जास्त गुरे आहेत ते कुटुंबीय हे मॉडेल स्वीकारू शकतात. वनस्पतींपासून तयार होणारा बायोगॅस आणि स्लरी घरगुती स्वयंपाकासाठी आणि खत म्हणून वापरले जाते.

2) समुदाय:

या मॉडेलमध्ये किमान कुटुंब संख्या असलेल्या ( पाच ते 10 लोक) असलेल्या कुटुंबासाठी बायोगॅस यंत्रे तयार करता येतात. यात निर्माण होणारा गॅस घरांसाठी, रेस्टॉरंट साठी ,विविध संस्थांसाठी पुरवला जातो आणि तयार झालेला मळीचा वापर शेतीमध्ये सेंद्रिय खत म्हणून केला जातो किंवा इतर शेतकऱ्यांना विकला जाऊ शकतो.

3) क्लस्टर :

या मॉडेलमध्ये एखाद्या गावात किंवा गावातील एखाद्या गटात वैयक्तिक बायोगॅस यंत्रे अनेक कुटुंबात मिळून बसवली जातात. यात तयार होणारा बायोगॅस घरगुती वापरासाठी वापरला जातो. आणि तयार होणारी सलरी किंवा मळी घन आणि द्रव भागामध्ये वेगळी केली जाते आणि नंतर सुकल्यानंतर जैविक खते म्हणून विकली जाऊ शकते.

4) कमर्शियल कॉम्प्रेस बायोगॅस(CBG):

उद्योजक, सरकारी संस्था, गोशाळा इत्यादी मार्फत CBG प्लांट उभारले जाऊ शकतात. यात उत्पादित कच्चा बायोगॅस संकुचित केला जातो आणि वाहन इंधन म्हणून वापरला जाऊ शकतो किंवा इतर उद्योगांना विकला जाऊ शकतो. तयार होणारी मळी सेंद्रिय खत किंवा जैविक खतांमध्ये रूपांतरित केले जाऊन शेतकऱ्यांना विकली जाते.

GOBAR DHAN YOJANA 2024

गोबर धन योजनेच्या अंमलबजावणीचे मार्गदर्शक तत्त्वे:

1) ग्रामीण भागातील जनावरांच्या शेणाचा उपयोग करून त्यापासून बायोगॅस निर्मिती करण्यासाठी प्रामुख्याने गोबर धन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे आखणी, अंमलबजावणी, आणि व्यवस्थापन गावातीलच एखाद्या समुदाय करेल.

2) गोबर धनाचे फायदे आणि त्यासाठी आवश्यक असलेले सामुदायिक कृती करण्याची गरज याला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृतीचा कार्यक्रम करण्यात येतील.

3) गोबर धन उपक्रमाचे महत्व लोकांना कळावे यासाठी गाव, जिल्हा, राज्य आणि ब्लॉक प्रशासनाद्वारे ग्रामीण भागातील गुरांचे शेण आणि इतर कचऱ्याचे सक्तीने सुरक्षित व्यवस्थापन केले जाईल.

4) ज्या गावांमध्ये गुरांचे जास्तीत जास्त संख्या आहे त्या गावांना प्रामुख्याने प्राधान्य दिले जाते. आणि जास्तीत जास्त कुटुंबांना तयार होणाऱ्या बायोगॅस चा फायदा मिळवण्यासाठी उपलब्ध असलेला आर्थिक स्त्रोतांचा योग्य तो वापर केला जाईल.

गोबर धन योजनेचे मुख्य फायदे:

1) ग्रामीण भागातील गुरांना पासून मिळणाऱ्या शेणाचा उपयोग जैविक खत निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याचा उपयोग घरगुती वापरासाठी इंधन म्हणून करण्यात येईल.

2) या योजनेमुळे ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावेल. त्याचप्रमाणे गावात स्वच्छता टिकवून ठेवण्यास मदत होईल.

3) ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नात बरोबरच या योजनेमार्फत ही उत्पन्न निर्माण करण्याची संधी मिळेल. तयार होणाऱ्या जैविक खताची विक्री करून शेतकरी पैसे मिळू शकतात. त्याचबरोबर या योजनेसाठी शेतकऱ्यांना कोणताही कच्चामाल खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करण्याची गरज राहणार नाही.

4) या योजनेद्वारे तयार होणारे कंपोस्ट खत शेतकरी त्यांच्या शेतजमिनी साठी वापरू शकतात. त्याचप्रमाणे स्वतः चे कंपोस्ट प्लांट लावण्यासाठी सरकार मदत करेल.

5) गावात उपलब्ध होणाऱ्या शेणापासून आणि इतर सेंद्रिय कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती करून संपूर्ण गावात इंधन म्हणून वापरण्यात येईल.

6) अतिरिक्त प्रमाणात बायोगॅस निर्मिती होत असल्यास त्याचा उपयोग वीज निर्माण करण्यासाठी देखील करता येईल.

गोबर धन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया:

1) सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

2) समोरओपन झालेल्या होम पेज वर तुम्हाला रजिस्ट्रेशन असा एक पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.

3) त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरावे जसे की वैयक्तिक माहिती, पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी.

4) संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करावे.

5) अशा प्रकारे गोबर धन योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते.

6) त्यानंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळेल तो तुम्हाला जपून ठेवावा लागेल.

गोबर धन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड

पत्त्याचा पुरावा

मोबाईल नंबर

ई-मेल आयडी

पासपोर्ट आकाराचा फोटो

गोबर धन योजनेसाठी पात्रता:

गोबर धन योजनेसाठी खूप पात्रता व अटी नाही आहेत. गोबर धन योजनेसाठी पात्रता व अटी खालीलप्रमाणे:

1) गोबर धन योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा देशातील ग्रामीण भागातील असावा.

2) गोबर धन योजने चा फायदा घेण्यासाठी फक्त शेतकरीच पात्र असतील.

GOBAR DHAN YOJANA 2024

निष्कर्ष:

GOBAR-DHAN YOJANA 2024 |गोबर-धन योजना २०२४ या लेखात आपण गोबर धन योजने बद्दल सविस्तर माहिती घेतली. ही योजना नक्की काय आहे या योजनेचा फायदा कोण कोण कसे घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत कशाप्रकारे इंधन निर्मिती केली जाते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होईल याबद्दल सविस्तर माहिती बघितली.

या योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचा आणखीन एक स्त्रोत निर्माण होईल. त्याचप्रमाणे ग्रामीण भाग स्वच्छ ठेवण्यासाठी मदत होईल. या योजनेमुळे घरगुती कामांसाठी गरज असेल तेवढे इंधन स्वतः निर्माण करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळेल. आणि बायोगॅस निर्मिती प्रकल्पामुळे सामुदायिक काम केल्यामुळे ग्रामीण भागातील समुदायांमध्ये एकता निर्माण होईल.

शेतकऱ्यांसाठीच्या, महिलांसाठीच्या, मुलींसाठी च्या केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांची सविस्तर माहिती वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. असेच महत्त्वपूर्ण लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लेख जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद

केंद्र सरकारच्या इतर योजनांची सविस्तर माहिती येथे वाचा

राष्ट्रीय वयोश्री योजना https://marathisampada.com/rashtriya-vayoshri-yojana-2024-in-marathi/

अटल पेन्शन योजना https://marathisampada.com/atal-pension-yojana-in-marathi/

प्रधान मंत्री सूर्योदय योजना https://marathisampada.com/pm-suryoday-yojana-2024/

हर घर नल योजना २०२४ https://marathisampada.com/har-ghar-nal-yojana-2024/

आयुष्मान भारत योजना २०२४ https://marathisampada.com/ayushaman-bharat-yojana-2024/

प्रधान मंत्री कौशल विकास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-kaushal-vikas-yojana-2024/

प्रधान मंत्री उज्ज्वला योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-ujjwala-yojana-2024/

प्रधान मंत्री सौभाग्य योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-saubhagya-yojana-2024/

प्रधान मंत्री आवास योजना २०२४ https://marathisampada.com/pradhan-mantri-awas-yojana-2024/

लाडली बहाना योजना २०२४ https://marathisampada.com/ladali-bahana-yojana-2024/