FOOD FOR WEIGHT GAIN | झटपट वजन वाढविण्यासाठी आहार

FOOD FOR WEIGHT GAIN | झटपट वजन वाढविण्यासाठी आहार, आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही असेदेखील खूप जणांचे म्हणणे आहे. वजन वाढीसाठी अनेक जण प्रयत्न करताना आपण बघतो.

कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही असे आपण अनेक जणांकडून ऐकतो, परंतु वजन का वाढत नाही काही कारणं आहेत जसे की आपण जो आहार घेतो त्यातून आपल्याला पुरेशा प्रमाणात कॅलरीज मिळत नाही त्यामुळे ही खाल्ले तरी वजन वाढत नाही. वजन वाढविण्यासाठी आपण रोजच्या आहारातून ज्या प्रमाणात कॅलरीज घेतो त्यापेक्षा जास्त कॅलरीज चेआपण सेवन करायला पाहिजे. कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही यामागे आणखी एक कारण असू शकते जसे की आपल्या शरीराचा मेटाबोलिजम म्हणजेच आपली चयापचय चांगली आहे त्यामुळे तुम्ही जे अन्न खाता ते लगेच पचते आणि शरीरात चरबी निर्माण होत नाही आणि चरबी जमा होत नाही.

वजन कमी करण्यासाठी खाण्यावर खूप कंट्रोल ठेवावा लागतो. खूप व्यायाम करावा लागतो. परंतु वजन वाढविण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने सतत खावे लागते. दररोज व्यायाम नाही केला तरी चालतो. परंतु वजन वाढवण्यासाठी घरी बनवलेले घरगुती पौष्टिक, जास्त प्रमाणात कॅलरीज असलेले अन्न खावे.

फक्त वजन वाढवण्याच्या उद्देशाने जर आपण बाहेरील जंक फूड, फास्ट फूड, कोल्ड्रिंक्स, हाय शुगर फुड, तेलकट, मसालेदार पदार्थ खाल्ले तर ते आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी योग्य नाही. अशा पदार्थांमुळे कदाचित वजन वाढू शकते परंतु त्यातून तुमच्या शरीराला पुरेसे पोषण मिळणार नाही. तुमचे शरीर आतून बळकट होणार नाही. त्यामुळे वजन वाढविण्यासाठी घरगुती अन्नाचे सेवन करावे.

अनेक जण वजन वाढविण्यासाठी मास गेनर किंवा प्रोटीन पावडर खाणे सुरू करतात. परंतु प्रोटीन पावडर च्या अतिसेवनामुळे शरीर बळकट होत नाही फक्त शरीर फुलू लागते. त्यामुळे वजन वाढवताना अशा काही पदार्थांचे सेवन करण्याआधी योग्य आहार तज्ञाचा सल्ला नक्की घ्या.

FOOD FOR WEIGHT GAIN | झटपट वजन वाढविण्यासाठी आहार

वजन न वाढण्याची कारणे:

1) शरीराच्या आवश्यकतेपेक्षा कमी कॅलरीजचे सेवन करणे.

2) वजन न वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे आपल्या शरीराचा मेटाबोलिजम रेट म्हणजेच चयापचय क्रिया खूप चांगली असणे त्यामुळे सेवन केलेले अन्न लगेच पचते आणि म्हणून शरीरात चरबी जमा होत नाही.

FOOD FOR WEIGHT GAIN

वजन वाढवत आहात तर हे लक्षात ठेवा:

1) जर तुम्ही वजन वाढवत असाल तर तुम्ही जास्त वेळ उपाशी राहू नका.

2) दोन जेवणांच्या मध्ये जास्त अंतर ठेवू नका.

3) दर दोन ते अडीच तासांनी काहीतरी खात राहा.

हेही नक्की वाचा

वजन कमी करण्यासाठी स्त्री व पुरुषांसाठी टिप्स https://marathisampada.com/best-weight-loss-tips-for-men-and-women/

शाकाहारी प्रथिनेयुक्त आहार https://marathisampada.com/vegetarians-protein-diet-in-marathi/

वेगन डाएट म्हणजे नक्की काय ?https://marathisampada.com/vegan-diet-information-in-marathi/

वेगन डाएट करणाऱ्यांसाठी लोहयुक्त पदार्थ https://marathisampada.com/iron-rich-food-sources-for-vegan/

वजन वाढवत आहात तर हे लक्षात ठेवा:

1) आहारात कार्बोहायड्रेट आणि फॅट्स चे प्रमाण प्रोटीन च्या तुलनेत जास्त असावे.

2) एकूणच आहारात 60 ते 70% कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स असावेत तर 20 ते 30% प्रोटीन असावेत.

3) शरीरातील फॅट्स वाढविण्यासाठी आहारात रताळे, बटाटे, केळी यांचा समावेश असावा.

4) वजन वाढवण्यासाठी रोजच्या आहारात भात, दूध, अंडी, पालेभाज्या, कडधान्य, डाळी यांचा समावेश असावा.

5) वजन वाढविण्यासाठी डाळी, कडधान्य जास्तीत जास्त प्रमाणात खायला हवे.

6) दिवसभरात कमीत कमी आठ ते दहा ग्लास पिणे गरजेचे आहे.

7) रोजच्या नाश्त्यामध्ये तुम्ही पोहे, उपमा, शिरा, डोसा ,इडली, उत्तप्पा किंवा ओट्स या पदार्थांचा समावेश करू शकतात.

8) नाश्त्यानंतर आणि दुपारच्या जेवणाच्या मधल्या काळात केळी, उकडलेले अंडे किंवा सफरचंद खावे.

9) दुपारच्या जेवणात दोन ते तीन चपात्या, भाजी, डाळ भात, दही/ ताक, मुळा, काकडी, गाजर, बीट यांची कोशिंबीर यांचा समावेश करावा.

10) दुपारचे जेवण झाल्यानंतर साधारण दोन तासांनी केळी, किंवा रताळे खावे तुम्हाला आवडत फ्रूट ज्यूस पिऊ शकता.

11) संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये चहा चपाती किंवा चहा ब्रेड खाऊ शकता.

12) रात्रीच्या जेवणात तुम्ही भात, भाजी, कडधान्य चपाती, चिकन यांचा समावेश करू शकता.

13) वजन वाढविण्यासाठी दिवसभरात दोन ग्लास फुल फॅट मिल्क प्या.

14) वजन वाढविण्यासाठी आहारात सोया चंक चा वापर करा.

15) वजन वाढविण्यासाठी आहारात साजूक तुपाचा समावेश करा.

16) वजन वाढवण्यासाठी स्टार्च युक्त भाज्या जसे की बटाटे यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करा. बटाट्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. बटाट्याचे रोज सेवन केल्यास वजन लवकर वाढते.

17) वजन वाढवण्यासाठी रोजच्या नाश्त्यामध्ये दोन तरी केळी खा. केळ्यामध्ये फायबर, प्रोटीन, विटामिन ए त्याचबरोबर फॅट्स देखील असतात. दररोज केळी खाल्ल्यास वजन लवकरात लवकर वाढते.

18) वजन वाढविण्यासाठी रोजच्या आहारात तांदळाच्या पदार्थांचा किंवा भाताच्या विविध पदार्थांचा आहारात समावेश करा.

19) वजन वाढविण्यासाठी रोजच्या आहारात उकडलेले अंडे खावे.

20) रोजच्या आहारात पीनट बटर चा वापर केल्यास वजन झटपट वाढते.

21) डेअरी फूड जसे की दूध, दही, ताक, पनीर यांचा रोजच्या आहारात समावेश केल्यास वजन वाढण्यास मदत होते.

FOOD FOR WEIGHT GAIN

वजन वाढवण्यासाठी जीवनशैलीत करावयाचे बदल:

1) दररोज दोन ते तीन लिटर पाणी आवश्यक आहे.

2) दररोज किमान आठ तास झोप आवश्यक घ्या.

3) संपूर्ण आठवडा जिममध्ये जाऊन व्यायाम करणे गरजेचे नाही.

4) वजन वाढवण्यासाठी दिवसाआड जिमला जावे.

5) शरीराला पुरेशी विश्रांती द्यावी त्यामुळे शरीरातील स्नायू वाढतात.

6) वजन वाढवण्यासाठी घरी शिजवलेले ताजे अन्न खा.

7) जंक फूड, फास्ट फूड, चिप्स, कुकीज खाणे टाळा.

निष्कर्ष:

आजच्या FOOD FOR WEIGHT GAIN | झटपट वजन वाढविण्यासाठी आहार लेखात आपण वजन वाढवण्यासाठी काय करायला हवे. आहारात कोणकोणत्या अन्नपदार्थांचा समावेश करायला हवा याबद्दल माहिती घेतली. वजन वाढवण्यासाठी आपल्या दररोजच्या जीवनशैली देखील काही प्रमाणात बदल करणे आवश्यक असते त्याबद्दलही आपण माहिती बघितली. या लेखात सांगितलेले सर्व माहिती पारंपारिक आणि सर्वसामान्य ज्ञानातून दिलेली आहे. परंतु वजन वाढवताना आणि वजन कमी करताना काही सप्लीमेंट्स चा वापर करताना तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. लेख आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.